Maharashtra

Thane

CC/781/2016

Shri Vijay Daulat ram Dargar,2. Smt Reena Vijay Dargar - Complainant(s)

Versus

Shri Rakesh Tekchand Sakhala Prop of M/s. Jai Enterprises - Opp.Party(s)

Adv Subhash G Bane

02 Jan 2017

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/781/2016
 
1. Shri Vijay Daulat ram Dargar,2. Smt Reena Vijay Dargar
At A/303, Gods Gift, New Ravi Raj complex, Jesal Park, Bhayander east , Thane 40110
Thane
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Rakesh Tekchand Sakhala Prop of M/s. Jai Enterprises
Roshni Optics,Opp S T Bue Depot, Nalasopara weswt Dist Palghar 401203,Resi at A/101, Siddi Vinayak Apt, Tulinz Rd, Near Ramdev Xeroz,Nalasopara east, Dist Palghar
palghar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 02 Jan 2017
Final Order / Judgement

    द्वारा - श्री. ना. द. कदम...................मा. सदस्‍य.

 

1.          सामनेवाले हि बांधकाम व्यावसायिक संस्था आहे. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडून विकत घेतलेल्या सदनिकेची संपूर्ण किंमत सामनेवाले यांना देऊनही सामनेवाले यांनी सदनिकेचा ताबा तक्रारदारांना दिला नसल्याने प्रस्तुत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

 

2.          तक्रारदारांच्या कथननुसार सामनेवाले यांनी नालासोपारा येथे विकसित केलेल्या जयराम हाईट्स या प्रकल्पातील इमारत क्रमांक 1 मधील सदनिका क्रमांक 408 विकत घेऊन सदनि‍केची पूर्ण किंमत रु. 20.77 लाख सामनेवाले यांना दि.21/07/2013 ते दि.16/01/2014 दरम्यान दिली.  तथापि सामनेवाले यांनी तक्रारदाराशी सदनिका विक्री करारनामा केला नाही. तक्रादारानी आग्रह धरल्यानंतर सामनेवाले यांनी सदर सदनिका जॉन डिकॉस्टा या व्यक्तीस विकल्याचे सांगितले. या नंतर सामनेवाले यांच्या विनंतीवरून जॉन डिकॉस्टा यांनी सदर सदनिका तक्रारदारांना विकल्याचा नोंदणीकृत कारनामा दि.14/10/2016 रोजी केला.  तथापि या नंतर सामनेवाले यांनी तक्रादाराना सदनिकेचा ताबा दिला नसल्याने प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे.

 

3.          तक्रारदाराची तक्रारींमधील कथने त्यासोबतची कागदपत्रे यांचे वाचन मंचाने केले. तक्रादाराच्या वकिलांना दाखल सुनावणी कमी ऐकण्यात आले. त्यावरून सदर तक्रार दाखल टप्प्यावर दाखल करून न घेता खाली नमूद केलेल्या कारणास्तव नाकारण्यात येते.

अ) तक्रारदाराने तक्रारींमधील परिच्छेद ६ मध्ये नमूद केल्या प्रमाणे सदनिकेची किंमत रु. 20.77 असून पूर्ण किंमत सामनेवाले यांना दिल्याचे नमूद केले आहे.  सबब सदनिकेचे नमूद मूल्य हे ग्रा.स.का. कलम 11(1) मध्ये नमूद केलेल्या मंचाच्या आर्थिक कार्यक्षेत्राबाहेरील असल्याने सदर तक्रार या मंचापुढे चालविता येणार नाही.

ब) तक्रादाराने तक्रारीमध्ये जयंत हाईट्स मधील इमारत क्रमांक १ मधील सदनिका क्रमांक 408 विकत घेतल्याचे नमूद केले आहे. तथापि, दि. 09/07/2003 रोजीच्या पावती क्रमांक 91 मध्ये, सदनिका क्रमांक बी२-102 असे नमूद केले आहे.  त्यामुळे, जयंत हाईट्स मधील इमारत क्रमांक 1 मधील सदनिका क्रमांक 408 सामनेवाले यांच्याकडून विकत घेतल्या बाबतचा कोणताही पुरावा तक्रादाराने दाखल केलेला नाही.

क) तक्रादाराने जॉन डिकॉस्टा यांच्याकडून जयंत हाईट्स मधील इमारत क्रमांक 1 मधील सदनिका क्रमांक 408 रु. 14.50 लाख या किमतीस विकत घेतल्याचा दि. 14/10/2016 रोजीचा करारनामा दाखल केला असून त्या मध्ये तक्रारदाराने सामनेवाले यांच्याशी सदनिका विक्री व्यवहार केल्या बाबत किंवा सामनेवाले हे सदर सदनिकेचा ताबा तक्रारदारांना देणार असल्याबाबत कोणताही उल्लेख नाही, शिवाय, या करारनाम्यामध्ये सामनेवाले हे पक्षकार नाहीत. तसेच सामनेवाले हे तक्रादाराना जयंत हाईट्स मधील इमारत क्रमांक 1 मधील सदनिका क्रमांक 408 चा ताबा देण्या बाबत जबाबदार असल्या बाबत अन्य इतर कोणताही पुरावा तक्रारदाराने अभिलेखावर आणला नाही.

तक्रारींमधील विधाने / कथने हि तक्रार दाखल कामी सादर केलेल्या कागदपत्राशी पूर्णपणे  विसंगत व अनुचित असल्याने तक्रार दाखल टप्प्यावर, खालीलप्रमाणे आदेश करण्यात येतो.

                             आदेश

1. तक्रार दाखल करून न घेता नाकारण्यात येते. (complaint stands rejected  at the admission stage)

2. खर्चाबाबत आदेश नाही.

3. आदेशाच्या प्रति उभय पक्षकारांना विनाविलंब विनामूल्य पाठविण्यात याव्यात.

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.