जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – अनिल य.गोडसे
मा.सदस्या - श्रीमती गीता घाटगे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. ३१९/२०११
----------------------------------------------
तक्रार नोंद तारीखः – २२/११/२०११
निकाल तारीखः - १७/०१/२०१२
----------------------------------------------
१. श्री रघुनाथ निवृत्ती पवार
वय वर्षे – ६७, धंदा– सेवानिवृत्त
२. श्री अजित रघुनाथ पवार
वय वर्षे – ३२, धंदा– सेवानिवृत्त
३. संगीता शिवाजी पवार
वय वर्षे – १७, धंदा– घरकाम
सर्व रा.अंबक (अंबक फाटा), पार्वती निवास
ता.कडेगांव जि.सांगली ..... तक्रारदार
विरुध्द
१. श्रीपतराव तात्या कदम ग्रामीण बिगरशेती सहकारी
पतसंस्था मर्या. सांगली
शिरसगांव, ता.पलूस जि. सांगली तर्फे
चेअरमन / सेक्रेटरी
२. वसंतराव शामराव सपकाळ, चेअरमन
वय वर्षे ६५, धंदा – शेती
रा. मु.पो.शिरसगांव, ता.कडेगाव जि. सांगली
३. सतिश पांडुरंग सुर्यवंशी, व्हा.चेअरमन
वय वर्षे ४०, धंदा – शेती
रा. मु.पो.शिरसगांव, ता.कडेगाव जि. सांगली .... जाबदार
नि. १ वरील आ दे श
प्रस्तुत प्रकरण आज रोजी दाखल करुन घेणेचे मुद्यावर प्रलंबित आहे. सदर प्रकरणी दि.२९/११/२०११ रोजी नि.१ वर आदेश करुन अज्ञान व्यक्ती तक्रारअर्ज दाखल करु शकते का ? याबाबत युक्तिवाद करणेसाठी व पुरावा दाखल करणेसाठी प्रस्तुत प्रकरण दि.३/१२/२०११ रोजी ठेवणेचा आदेश करणेत आला. अर्जदारतर्फे विधिज्ञ मागील तारखेस गैरहजर. आजरोजी विधिज्ञ यांनी उपस्थित राहूनही कोणतीही तजवीज न केलेने प्रस्तुत प्रकरण दाखल करुन न घेता काढून टाकणेत येत आहे.
सांगली
दि. १७/०१/२०१२
(गीता सु.घाटगे) (अनिल य.गोडसे÷)
सदस्या अध्यक्ष
जिल्हा मंच, सांगली जिल्हा मंच, सांगली.