AJAY PRATAPRAO GUJAR filed a consumer case on 10 Jul 2015 against SHRINATH SAH PAT SANSTHA in the Satara Consumer Court. The case no is CC/14/3 and the judgment uploaded on 28 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा.
मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 3/2014.
तक्रार दाखल ता.10-1-2014.
तक्रार निकाली ता. 10-7-2015.
श्री.अजय प्रतापराव गुजर.
रा.श्रेयस, कूपर कॉलनी, सदरबझार,
सातारा. ....तक्रारदार.
विरुध्द
गोरखपूर, पिरवाडी, सातारा-तर्फे व्यवस्थापक,
श्री.विनायक शंकर जाधव.
रा.गोरखपूर, पिरवाडी, सातारा.
2. चेअरमन, श्री.ज्ञानेश्वर कदम.
श्रीनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.
गोरखपूर, पिरवाडी, सातारा.
3. व्हा.चेअरमन, श्री.आनंदराव जाधव.
श्रीनाथ नागरी सह.पतसंस्था मर्या.
गोरखपूर, पिरवाडी, सातारा ..... जाबदार.
तक्रारदारतर्फे – अँड.महेश तावरे.
जाबदार क्र. 1 ,3- एकतर्फा आदेश.
जाबदार क्र.2- नो से आदेश.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य यांनी पारित केला.)
1. प्रस्तुतची तक्रार तक्रारदाराने ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे जाबदाराविरुध्द मंचात दाखल केली आहे.
2. तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय थोडक्यात खालीलप्रमाणे-
प्रस्तुत तक्रारदार हे श्रेयस, कुपर कॉलनी सदर बझार सातारा येथील रहिवासी आहेत, प्रस्तुत तक्रारदारानी त्यांच्या भविष्यकालीन बचतीचे हेतूने जाबदार पतसंस्थेत खालील तपशीलाप्रमाणे रकमा मुदतबंद ठेवीमध्ये गुंतवलेल्या होत्या व आहेत.
अ.क्र. | ठेवपावती क्र. | ठेव रक्कम रु. | ठेव ठेवलेचा दिनांक | मुदत संपलेचा दिनांक | ठरलेला व्याजदर |
1 | 3909 | 35,500/- | 2 -3-2006 | 2-3-2007 | 9 टक्के |
2 | 3910 | 35,500/- | 2 -3-2006 | 2-3-2007 | 9 टक्के |
3 | 3911 | 35,542/- | 2 -3-2006 | 2-3-2007 | 9 टक्के |
4 | 3912 | 66,000/- | 11-3-2006 | 11-3-2007 | 9 टक्के |
येणेप्रमाणे रकमा तक्रारदारानी जाबदार क्र.1 संस्थेत गुंतवलेल्या होत्या. तक्रारदारानी वरील सर्व मुदत पूर्ण झालेल्या ठेवीच्या रकमा जाबदाराना भेटून वारंवार मागणी केल्या, परंतु आज देतो, उद्या देतो, असे सांगून जाबदारानी तक्रारदाराच्या ठेवीच्या रकमा सव्याज परत देणेचे टाळले, त्यानंतर तक्रारदारांच्या वारंवार मागणीमुळे जाबदारांकडील तथाकथित तक्रारदारांना वरील रकमेपोटी राजेश्री घनःश्याम मंत्री यांच्या कर्जखाती तक्रारदारांची ठेवीची रक्कम जाबदारानी परस्पर जमा करुन त्यांचे शेतीच्या रकमेत तक्रारदाराना देणेचे ठरले, परंतु प्रत्यक्षात जाबदारानी तसे केले नाही व रक्कमही दिली नाही. त्यानंतरही तक्रारदाराना जाबदाराकडून अखेर सव्याज ठेवीच्या रकमा मिळालेल्या नाहीत, त्यामुळे तक्रारदारानी जाबदाराविरुध्द मे.मंचात दाद मागितली आहे. जाबदाराकउून ठेवीची रक्कम रु.1,72,542/- व त्यावरील व्याज, मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.5000/- व अर्जाचा खर्च रु.10,000/- अशी रक्कम जाबदाराकडून द.सा.द.शे.12 टक्के व्याजाने मिळावेत अशी मागणी तक्रारदारानी मे.मंचास केली आहे.
2. प्रस्तुत तक्रारदारानी नि.1 कडे तक्रारअर्ज, नि.2 कडे तक्रारीसोबतचे प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे वकीलपत्र, नि.5 कडे, नि.5/1 ते नि.5/2 कडे मूळ ठेवपावत्या, नि.5/9 कडे वरील सर्व ठेवपावत्यांची रक्कम जाबदार संस्थेकडे जमा असलेची जाबदार 1 ची पावती, नि.5/4 कडे जाबदारास वकीलातर्फे नोटीस, नि.5/5 कडे नोटीस जाबदारास मिळालेची पोहोचपावती नि.5/6 कडे इ. प्रकरणी दाखल असून नि.12 व 13 कडे जाबदार क्र.3 याना जाहीर नोटीसीने समन्स काढणेचा तक्रारदाराचा अर्ज व प्रतिज्ञापत्र, नि.14/1 कडे जाहीर नोटीसचा मसुदा, नि.16 सोबत नि.17 कडे जाबदार क्र.3 याना जाहीर नोटीसीने समन्स बजावणीसाठी नोटीस प्रसिध्द केलेल्या दै.सकाळ, सातारा आवृत्तीची दि.24-11-14 ची स्थळप्रत, नि.17 कडे सरतपासाचे प्रतिज्ञापत्र इ.कागदपत्रे प्रकरणी दाखल केली आहेत.
3. सदर कामातील जाबदार क्र.1 ते 3 याना मे.मंचातर्फे रजि.पोसटाने नोटीसा पाठवणेत आल्या, सदर नोटीसा जाबदार क्र.1 ते 3 याना मिळाल्या, त्याच्या पोहोचपावत्या नि.17 कडे प्रकरणी दाखल आहेत. सदर नोटीसा मिळूनही यातील जाबदार सदर प्रकरणी हजर झाले नाहीत वा त्यांचेतर्फे वकील नेमून त्यानी त्यांचे म्हणणे वा तक्रारदाराचे अर्जास कोणतेही आक्षेप नोंदलेले नाहीत त्यापैकी जाबदार क्र.2 हे त्यांचे वकील अँड.अनिल पवार यांचेमार्फत नि.7 कडे वकीलपत्र दाखल करुन प्रकरणी हजर झाले परंतु त्याना भरपूर मुदत देऊनही या कामी त्यांनी कोणतीही कैफियत वा म्हणणे प्रकरणी दाखल केलेले नाही त्यामुळे जाबदार क्र.1 व 3 विरुध्द नि.1 वर एकतर्फा व जाबदार क्र.2 विरुध्द नो से आदेश मंचाने पारित केला आहे. वरील कारणामुळे सदर प्रकरण एकतर्फा चौकशीस घेऊन तक्रारदारांचा अंतिम युक्तीवाद ऐकणेत आला.
4. प्रस्तुत प्रकरणी तक्रारदारानी दाखल केलेला नि.1 कडील तक्रारअर्ज, नि.2 कडील नि.1 चे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.5 सोबत दाखल केलेल्या मूळ ठेवपावत्या, तक्रारदाराने जाबदाराना पाठविलेली वकील नोटीस व त्यातील आशय यांचा विचार करता सदर तक्रारीचे निराकरणार्थ मंचाने पुढील मुद्यांचा विचार केला-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय? होय.
2. जाबदारांनी तक्रारदारांच्या मुदत पूर्ण झालेल्या
ठेवीच्या रकमा मुदतपूर्ततेनंतमर वारंवार मागणी
करुनही त्यांना परत न देऊन यातील तक्रारदाराना
सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 3-
5. प्रस्तुत जाबदार ही आर्थिक संस्था असून जनतेतून ग्राहकाकडून मुदतबंद ठेवी स्विकारुन त्या सव्याज दिलेल्या मुदतीत परत करणेचे वचन देऊन व तशी करारस्वरुप ठेवपावती ठेवीदाराना देते. अशा प्रकारची सेवा जाबदार संस्था ठेवीदाराना देते, त्यामुळे तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या सिध्द होते त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
5.2- प्रस्तुत जाबदाराकडे या तक्रारदाराने ठेवलेल्या ठेवी मुदत पूर्ण झालेनंतर वारंवार सव्याज ठेवी परत करणेची मागणी जाबदाराकडे केली. प्रत्यक्ष भेटले. परंतु सन 2007 पासून आजपर्यंत या जाबदारानी तक्रारदारांच्या ठेवी मुदतपूर्तीनंतर परत केलेल्या नाहीत त्यामुळे जाबदारांची ही कृती ग्राहक संरक्षण कायद्याप्रमाणे तक्रारदाराना दिलेली सदोष सेवा आहे, त्रुटीपूर्ण सेवा आहे. त्यामुळे जाबदारानी या तक्रारदारास सदोष सेवा दिली असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते. त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो. त्यामुळे तक्रारदारांचा अर्ज अंशतः मंजूर होणेस पात्र असून तो जाबदाराकडून विषयांकित निकालपत्र कलम 1 मध्ये दाखवलेल्या ठेवी सव्याज परत मिळणेस व शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.5000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- मिळणेस तक्रारदार पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे, त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज खर्चासह अंशतः मंजूर करणेत येतो.
2. यातील जाबदारानी तक्रारदाराना त्यांच्या मुदतपूर्ण झालेल्या ठेवी जाबदारानी दिलेल्या वचनाप्रमाणे मुदतपूर्तीनंतर सव्याज तक्रारदाराना त्यांनी वारंवार मागणी करुनही परत न देऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. यातील जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.003909 वरील ठेव रक्कम रु.35,500/- त्यावर दि.2-3-2006 पासून द.सा.द.शे.9% दराने होणारे संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. यातील जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.003910 वरील ठेव रक्कम रु.35,500/- त्यावर दि.2-3-2006 पासून द.सा.द.शे.9% दराने होणारे संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
5. यातील जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.003911 वरील ठेव रक्कम रु.35,542/- त्यावर दि.2-3-2006 पासून द.सा.द.शे.9% दराने होणारे संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
6. यातील जाबदार क्र.1 ते 3 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदारांची ठेवपावती क्र.003912 वरील ठेव रक्कम रु.66,000/- त्यावर दि.11-3-2007 पासून द.सा.द.शे.9% दराने होणारे संपूर्ण व्याजासह होणारी संपूर्ण रक्कम आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
7. यातील जाबदार क्र.1 ते 3 यांनी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या शारिरीक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/- सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावेत.
8. जाबदारानी विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केलेस तक्रारदार त्यांचेविरुध्द कलम 25 व 27 अन्वये जाबदाराविरुध्द दाद मागू शकतील.
9. सदरचा न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
10. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 10-7-2015.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.