::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. सदस्या. किर्ती गाडगीळ (वैदय))
(पारीत दिनांक :- 29/07/2017 )
अर्जदार हा कोरपणा जिल्हा चंद्रपुर येथील रहवाशी असुन गै.क्रं 1 ही शेती उपयोगी बी-बियाणे खते विकणारी फर्म असुन गै.क्रं 2 निर्मित बी-बियाणे गै.क्रं 1 हे विकतात. दिनांक 18/06/2015 रोजी अर्जदाराने गै.क्रं 2 निर्मित फुनगोभी एफ-1 हायब्रिड, सिएफएल 1522, प्लॉट क्रं 12023620, 30 पॉकीट रूपये 10,800/- चे मोबदल्यात गै.क्रं 1 पासुन खरेदी केले. हे बियाणे सिल बंद पॅकेट मधे होते. अर्जदाराला गै.क्रं 2 निर्मित बियाणावर विश्वास असल्यामुळे 30 पॅकेट पैकी कोणतेही बियाणे शिल्लक न ठेवता त्याने पुर्ण पेरणी केली. अर्जदाराने दिनांक 25/06/2015 या बियाणांचा वापर करून तयार झालेल्या रोपांची लागवड त्याच्या शेतात केली. कालांतराने रोपटयाची चांगली वाढ झाल्यावर गोबीचे फुल घेण्याची वेळ झाली तेव्हा त्या रोपांना गोबीचे फुल लागले त्या फुलावर गुलाबी लव, तर काही फुलांवर पानाची उगवण झाली त्यामुळे रोप जरी दिसायला सुदंर असले तरी त्या रोपा पासुन अर्जदाराला कोणतेही उत्पन्न झाले नाही म्हणुन अर्जदाराने तक्रार कृषी अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांच्या कडे केली असती दिनांक 03/10/2015 रोजी कृषी अधिकारी पंचायत समिती कोरपणा व तालुका कृषी अधिकारी यांनी मौका तपासणी करून चौकशी अहवाल दिनांक 07/10/2015 रोजी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी चंद्रपुर यांच्या कडे सादर केला व त्याची प्रत अर्जदाराला दिली त्यानंतर उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा, यांनी सहयोगी प्राध्यापक कृषी विदयालय नागपूर, तालुका कृषी अधिकारी कोरपणा यांच्या सह दिनांक 09/10/2015 रोजी शेतातील पिकांची पाहणी केल्यानंतर गै.क्रं 2 निर्मित कंपनीचे बियाणामधे दोष असल्याबाबत खाञी पटली व तसा अहवाल सादर केला. अर्जदाराने गैरअर्जदाराकडुन सदर बियाणे विकत घेतांना पावस ब्रॅन्डचे दुसरे 30 पॅकेट खरेदी केले होते त्या बियाणाची लागवड करून त्यातुन अर्जदाराला 5,00,000/- उत्पन्न मिळालेले आहे. परंतु सदर गोबीचे बियाणे गै.क्रं 1 कडुन खरेदी करून बियाणे खराब निघाल्यामुळे अर्जदाराला 5,00,000/- रुपयाचे नुकसान झाले आहे त्यामुळे या नुकसानाला गै.क्रं 1 व 2 संयुक्त रित्या जवाबदार आहे. अर्जदाराने गै.क्रं 1 व 2 यांना वकीला मार्फेत नोटीस पाठवले असता खोटे आशयाचे उत्तर पाठविले व नुकसान भरपाईचे मागणी करूनही त्यांनी न दिल्यामुळे सदरची तक्रार गै.क्रं 1 व 2 विरूध्द दाखल केली आहे.
अर्जदाराने तक्रारीत अशी मागणी केली आहे कि, गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांच्या कडुन खरेदी केलेल्या दोषयुक्त बियाणामुळे झालेले नुकसान भरपाई रूपये 5,00,000/- देण्यात यावे तसेच शारिरीक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च गैरअर्जदाराकडून मिळण्याचा आदेश व्हावे.
अर्जदाराची तक्रार स्विकृत करुन गैरअर्जदाराविरुध्द नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार हजर होवून त्यांनी त्यांचे लेखी उत्तर दाखल करून त्यात अर्जदाराचे तक्रारीतील कथन खोडुन काढुन पुढे नमुद केले की, गै.क्रं 1 यांनी गै.क्रं 2 निर्मित उत्पादीत केलेल्या गोबी बियाणांची विक्री अर्जदार यांच्या मागणीनुसार केली. सदर बियाणांच्या उत्पादनाच्या वापरा बाबत व गुणवत्ते बाबत संपुर्ण हमी व निर्देश गै.क्रं 2 यांना दिले होते. या बियाणाची विक्री कोरपणा परिसरात इतर कास्तकारांनाही केली होती परंतु त्यांनी कोणीही बियाणा बद्दल तक्रार केली नाही. अर्जदार हा पिक व्यवस्थापन योग्य रित्या करण्यास असमर्थ ठरला आहे. त्यामुळे संबंधीत स्थळ पाहणी अहवालात गै.क्रं 1 ने दिलेले बियाणे दोष पुर्ण असल्याबाबतचा निष्कर्ष त्यांच्या अहवालात नमुद नाही. सदर प्रकरणात अर्जदाराने सक्रुत दर्शनी पुरावा दाखल न केल्यामुळे सदरची तक्रार खारीज करण्यात यावी.
गै.क्रं 2 यांनी त्यांचे उत्तर दाखल करून अर्जदाराच्या तक्रारीतील विधाने खोडुन काढुन पुढे नमुद केले की, सदरची तक्रार उगवण शक्तीबाबत नाही. अर्जदाराची तक्रार शेतीच्या पाहणीबाबत अशी कोणतीही पाहणी झाल्याची दिसुन येत नाही. अर्जदाराने सांगितलेल्या तोंडी माहिती वरून तक्रारीत दाखल अहवाल तयार केल्याचे दिसुन येते. कारण त्या अहवालात बिल नंतर लॉट नं नमुद आहे. परंतु सदर बिल अर्जदार हीचे नावाने आहे किंवा नाही याबाबत खुलासा केला नाही. अर्जदाराने दाखल कथीत तज्ञांचा पाहणी अहवालाला कायदेशीर अस्तीत्व प्राप्त होऊ शकत नाही. बियाणांचे दोषाबाबत शेतक-यांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर कराव्या लागणा-या कार्यवाही बद्दल शासनाने परिपत्रक जारी केलेले आहे. अहवालातील कथीत तज्ञांनी तरतुदीचे पालन केलेले नाही. गै. क्रं 2 चे वाण हे स्वयम शोधीत असल्यामुळे त्यांच्या गुणधर्मा बंद्दल उत्पादक कंपनी कडुन माहिती घेणे बंधन कारक होते. परंतु गैरअर्जदारांना अशी कोणतीही सुचना अर्जदाराने दिली नाही त्यामुळे सदरचा अहवालाला कायदेशीर अस्तीत्व नाही. अर्जदाराने बियाणाची पुर्ण लागवड कधी केली याबाबत तक्रारीत खुलासा नाही. पुर्ण लागवडीला अधिक काळ लोटल्यावर रोपटे अपरिपक्व होते या बाबी कडे तज्ञांनी डोळे झाक केली तापमानात वाढ, दोन पावसान मधे अंतर याबाबत ही काहीही खुलासा केलेला नाही. अर्जदाराने पिकाचे व्यवस्थापना बद्दल योग्य काळजी घेतल्याबाबतचा पुरावा प्रकरणात दाखल नाही. तसेच तज्ञ व्यक्तींनी बियाणांची फिल्ड टेस्ट घेणे कायदेशीर होते परंतु ती घेतली नाही. सदर बियाणे वापण्याची मुदत ही जानेवारी 2015 असल्याने हे गैरअर्जदार यांच्याकडे असलेले सुरक्षित सदर बियाणांचे सॅम्पल प्रयोग शाळेत पाठविता आलेली नाही. गैरअर्जदाराचे बियाणे हे उत्तम प्रतीचे असुन बाजारात आणण्या पुर्वी बियाणांच्या परीक्षणा नंतरच त्याची विक्री केली जाते त्यामुळे त्यात कोणताही दोष नाही. गै.क्रं 2 ने असे नमुद केले आहे की, प्रयोग शाळेच्या अहवाला शिवाय कोणतेही दोष पुर्ण असल्याचे सिध्द करू शकत नाही व असा कोणताही प्रयोग शाळेचा अहवाल अर्जदाराने दाखल केलेला नाही. त्यामुळे सदरचे बियाणे दोष पुर्ण आहे हे अर्जदार सिध्द करू शकला नाही अर्जदार जो पर्यन्त ते सिध्द करू शकत नाही तो पर्यन्त त्याला नुकसान भरपाई देण्यास गै.क्रं 2 जवाबदार नाही. प्रस्तुत तक्रार खोटी व आधारहीन असल्यामुळे खारीज करण्यात यावे.
अर्जदाराचा अर्ज, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवाद तसेच गैरअर्जदाराचे लेखीउत्तर, दस्ताऐवज, शपथपञ लेखी व तोंडी युक्तीवाद आणि अर्जदार व गैरअर्जदार यांचे परस्पर विरोधी कथनावरुन खालील मुद्दे मंचाच्या विचारार्थ घेण्यात आले. त्यावरील निष्कर्ष आणि त्याबाबतची कारण मिमांसा पुढील प्रमाणे.
मुद्दे निष्कर्ष
(1) अर्जदार गैरअर्जदार क्रं 1 व 2 चा ग्राहक आहे काय ? होय
(2) गैरअर्जदाराने अर्जदारास न्युनतापूर्ण सेवा दिली आहे होय
काय ?
(3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रति अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केला
आहे काय ? होय
(4) अर्जदार मागणीप्रमाणे दाद मिळण्यास पाञ आहे काय ? अंतीम आदेशाप्रमाणे
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 बाबत ः- अर्जदाराने गै.क्रं 1 कडुन गै.क्रं 2 निर्मित फुलगोबी वाण दिनांक 18/06/2015 रोजी निर्मित फुनगोभी एफ-1 हायब्रिड, सिएफएल 1522, प्लॉट क्रं 12023620, 30 पॉकीट रूपये 10,800/- चे मोबदल्यात गै.क्रं 1 पासुन खरेदी केले. त्याबाबत तक्रारीत बिल दाखल असुन ही बाब गै.क्रं 1 व 2 यांनी त्यांच्या लेखी उत्तरात कबुल केलेली असल्यामुळे अर्जदार हा गै.क्रं 1 व 2 यांचा ग्राहक आहे ही बाब सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं 1 होकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 व 3 बाबत ः- अर्जदाराने गै.क्रं 1 कडुन गै.क्रं 2 निर्मित फुलगोबी वाण दिनांक 18/06/2015 रोजी निर्मित फुनगोभी एफ-1 हायब्रिड, सिएफएल 1522, प्लॉट क्रं 12023620, 29 पॉकीट रूपये 10,800/- चे मोबदल्यात गै.क्रं 1 पासुन खरेदी केले. ही बाब गैरअर्जदाराने मान्य केलेली आहे. अर्जदाराने पुर्ण 30 पॅकेटच्या बियाणांची त्यांच्या शेतीत पेरणी केली. सदर रोपटयांची वाढ झाल्यावर गोबीचे फुल येण्याची वेळ झाली तेव्हा त्या फुलांवर गुलाबी लव आली तर काही फुलांवर पानाची उगवण झाली म्हणुन जरी गोबीचे फुल सुंदर दिसत असले तरी त्यापासुन अर्जदाराला काहीही उत्पन्न झाले नाही त्याबाबत अर्जदाराने तक्रार केली असता दिनांक 03/10/2015 कृषी अधिकारी, पंचायत समिती कोरपणा व तालुका कृषी अधिकारी यांनी मौका तपासणी केली व चौकशी अहवाल तयार करून जिल्हा अधिक्षक चंद्रपुर यांच्याकडे दाखल केला या अहवालाची अवलोकन केले असता अहवालात अर्जदाराने सदर बियाणाचे लागवड केव्हा व कोणत्या पध्दतीने केली या बाबत नमुद असुन त्या फुलावर लव तसेच तांबडे ठिपके व फुलांच्या मधातुन पाने आलेले आहे असे नमुद आहे त्याबाबत तज्ञांनी बियाणात दोष आहे असा अंदाज अहवालात नमुद केलेला आहे. सदर अहवाल तक्रारीत दाखल असुन त्या अहवालानुसार तक्रार कर्त्याने योग्य त्या खतांचा वापर व पिक सरंक्षण संबंधाची पुर्ण काळजी अर्जदाराने घेतलेली दिसुन येत आहे. तसेच तक्रारीत दाखल दिनांक 09/10/2015 रोजी उपविभागीय कृषी अधिकारी राजुरा सहयोगी कृषी महाविदयालय नागपुर, तालुका कृषी अधिकारी कोरपणा व कृषी अधिकारी पंचायत समिती कोरपणा यांचे सह प्रत्यक्ष पाहणी अहवालाचे अवलोकण केले असता सदर गोबी फुलांवर काळया बुरशीची वाढ झाल्याचे आढळले त्यामुळे बियाणांमधे दोष आहे असे तज्ञांनी नमुद केले आहे त्यामुळे गै.क्रं 1 यांनी गै.क्रं 2 निर्मित अर्जदाराला विकलेले बियाणे हे सदोष होते ही बाब अनुचित व्यापारी प्रथेत मोडणारी आहे असे मंचाचे मत आहे. तसेच गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी उत्तरात कथन केले की, अर्जदारासोबत त्यांच्या परिसरात असलेल्या इतर शेतक-यांनाही याच प्रतीचे बियाणे दिले गेले परंतु त्यापैकी कोणाचीही तक्रार गैरअर्जदाराकडे आलेली नाही परंतु या म्हणण्याला सिध्द करण्याकरिता गैरअर्जदाराने कोणतेही इतर शेतक-यांचे शपथपत्र दाखल केलेले नाही. तसेच त्यांनी पुढे आक्षेप घेतला की, अर्जदार याला झालेले नुकसान हे केवळ दोष पुर्ण बियाणामुळे झाले ही बाबत सिध्द करण्याची जवाबदारी अर्जदारावर असुन वस्तु ही दोष पुर्ण आहे तर त्या सबंधी योग्य पृथ्थकरण व चाचणी केल्याशिवाय वस्तु मधे दोष सिध्द होऊ शकत नाही. अश्यावेळी अश्या वस्तुंचे सॅम्पल प्रयोग शाळेकडे पाठविण्यात येतात परंतु अर्जदाराने या वाणाचे सॅम्पल प्रयोग शाळेकडे पाठवले नसल्यामुळे बियाणात दोष आहे हे अर्जदार सिध्द करू शकला नाही. परंतु या संबंधी मा. राष्ट्र आयोगाने दिलेल्या न्याय निवाडयामध्ये
Kanta kantha rao Vs Y. Surya narayan and others
Revision petition no 1008 to 1010 of 2017 (CPR 2017(2)
Desided on 03/05/2017
मा. राष्ट्रीय आयोगाने न्यायनिर्णीत केले आहे की, तक्रार कर्त्याने खरेदी केलेल्या पुर्ण बियाणांची पेरणी केली असेल आणि प्रयोग शाळेत पृथ्थकरण परिक्षणाकरिता ते बियाणे पाठविले नाही तर त्याचा असा कदापीही अर्थ होणार नाही की ते बियाणे सदोष नाहीत. संदर्भिय न्यायनिर्णयात विषद केलेल्या न्याय तत्वानुसार सदोष बियाणे सिध्द करण्यासाठी बियाणांची पेरणी करण्यापुर्वी प्रयोग शाळेत तपासणी करिता पाठविण्यासाठी काही बियाणाची पेरणी करू नये, पेरणी नंतर उगवण शमते मधे दोष आढळल्यास राखीव बियाणाची तपासणी प्रयोग शाळेत करून घेऊन अहवालाप्रमाणे पुढिल कार्यवाही करावी असे मापदंड असले तरी केवळ वर नमुद प्रक्रीया पुर्ण केली नाही यामुळे सदोष बियाणे बाबतचा निष्कर्ष मंच काढु शकणार नाही ही बाब कायदेशीर नाही असे नमुद केले आहे.
वरील न्याय निर्णयाचा आधार घेता मंच या निष्कर्षास येत आहे की, गै.क्रं 1 ने गै.कं 2 निर्मित सदोष बियाणे अर्जदाराला विकुन अर्जदाराप्रती सेवेत न्युनता तसेच अनुचित व्यापारी पध्दती अवलंबलेली आहे. त्यामुळे अर्जदाराचे नुकसान होऊन त्याला शारिरीक मानसिक त्रास सहन करावा लागला असे सिध्द होत असल्यामुळे मुद्दा क्रं 2 व 3 चे उत्तर होकारार्थी नमुद करण्यात येत आहे.
8. मुद्दा क्रं. 1 ते 3 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
(2) गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी अर्जदारास सेवेत न्युनता व अर्जदाराप्रती
अनुचित व्यापारी पध्दतीचा अवलंब केलेला आहे असे जाहीर करण्यात येत
आहे
(3) गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्त रित्या अर्जदाराला
झालेल्या नुकसान भरपाई करिता रूपये 2,00,000/- लाख आदेशाच्या
दिनांकापासुन 30 दिवसाच्या आत दयावे.
(4) गैरअर्जदार क्रं 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्त रित्या अर्जदाराला
झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी व तक्रारीचा खर्च रूपये
20,000/- आदेशाच्या दिनांकापासुन 30 दिवसाच्या आत दयावे.
(5) उभय पक्षांनी आदेशाची प्रत विनामुल्य पाठविण्यात यावी.
चंद्रपूर
दिनांक - 29/07/2017
(श्री.उमेश वि. जावळीकर)
मा.अध्यक्ष.
( अधि. कल्पना जांगडे (कुटे) ) ( अधि. किर्ती गाडगिळ (वैदय) )
मा.सदस्या. मा. सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर.