Maharashtra

Satara

CC/10/195

Shri Mukuund Nagesh Jadhav - Complainant(s)

Versus

Shriment Malojiraje sah Grahtaran sanstha Prashasak shri P.N. Ranvar - Opp.Party(s)

mundekar

18 Jan 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 195
1. Shri Mukuund Nagesh JadhavA/p Kolki tal phaltan dist satarasatara ...........Appellant(s)

Vs.
1. Shriment Malojiraje sah Grahtaran sanstha Prashasak shri P.N. Ranvarphaltan tal phaltan dist satarasatara2. sansthapak shri Duryodhan D. Ranvarephaltan satara3. Chairman Shantanu D. Ranvarephaltansatara4. Vic. chaiman shri prakash P Jadhavphaltansatara ...........Respondent(s)


For the Appellant :mundekar, Advocate for
For the Respondent :

Dated : 18 Jan 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.50
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 195/2010
                                          नोंदणी तारीख - 18/8/2010
                                          निकाल तारीख - 18/1/2011                                         निकाल कालावधी – 150 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
 
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री मुकुंद नागेश जाधव
रा.अक्षतनगर, कोळकी, ता.फलटण
जि.सातारा                                        ----- अर्जदार
                                         (अभियोक्‍ता श्री. संग्राम मुंढेकर )
      विरुध्‍द
1. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्‍था मर्या.
    फलटण तर्फे प्रशासक, श्री पी.एन.रणवरे
    अध्‍यक्ष, प्रशासक मंडळ, तथा सहकारी अधिकारी (श्रेणी-2)
    अधीन सहायक निबंधक, सहकारी संस्‍था, फलटण
    ता.फलटण जि. सातारा
2. संस्‍थापक संचालक श्री दुर्योधन दत्‍तात्रय रणवरे
    रा.दत्‍तकृपा, संभाजीनगर, गोळीबार मैदान,
    लक्ष्‍मीनगर, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
3. चेअरमन श्री शंतनू दुर्योधन रणवरे
    रा.दत्‍तकृपा, संभाजीनगर, गोळीबार मैदान,
    लक्ष्‍मीनगर, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
4. व्‍हा.चेअरमन, श्री प्रकाश प्रतापराव जाधव
    रा.संजीवराजेनगर, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
5. संचालक श्री पुरुषोत्‍तम लक्ष्‍मण बक्षी
    रा.रॉयल रेसीडेन्‍सी, दादामहाराज मठासमोर,  
    ब्राम्‍हण गल्‍ली, कसबा पेठ, मु.पो.ता.फलटण
    जि. सातारा     
6. संचालक, श्री देवरावज विश्‍वासराव जाधव
    रा.गोळीबार मैदान, लक्ष्‍मीनगर, फलटण
    जि. सातारा
7. संचालक, श्री ज्‍यो‍तीराम महादेव गोरे,
    रा.अयोध्‍या प्रेस, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
8. संचालक, श्री राजेंद्र रामचंद्र झामरे पाटील
    रा.गोळीबार मैदान, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
9. संचालक, श्री पोपट आण्‍णा जाधव
    रा.96, मारवाड पेठ, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
10. संचालक, श्री सदाशिव पांडुरंग घोलप
    मु.ठाकुरकी, पो.ता.फलटण जि.सातारा
11. संचालक, श्री बबन भिकू चव्‍हाण
    मु.ठाकुरकी, पो.ता.फलटण जि.सातारा
12. संचालक, श्री यशवंत गजानन कांबळे
    मु.धुमाळवाडी, पो.गिरवी, ता.फलटण जि. सातारा
13. संचालिका, सौ शारदादेवी दुर्योधन रणवरे
    रा.दत्‍तकृपा, संभाजीनगर, गोळीबार मैदान,
    लक्ष्‍मीनगर, मु.पो.ता.फलटण जि. सातारा
14. संचालिका, सौ कांचनमाला शंकरराव जाधव
    रा. गोळीबार मैदान, लक्ष्‍मीनगर,
    मु.पो.ता.फलटण जि. सातारा
15. व्‍यवस्‍थापक, श्री संभाजी संपत शिंदे
    रा.रॉयल रेसीडेन्‍सी, दादामहाराज मठासमोर,
    ब्राम्‍हण गल्‍ली, कसबा पेठ, फलटण जि.सातारा  ----- जाबदार क्र.4,10,11 व 15                                           
                                             (अभियोक्‍ता श्री ए.एस.फाळके)
 
 
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. सदरच्‍या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी अर्जदार यांना त्‍यांच्‍या रकमेचे चेक दिले. परंतु सदरचे चेक न वटता परत आले. त्‍यावर जाबदार यांनी अर्जदार यांची देय रक्‍कम अर्जदारचे बचत खात्‍यामध्‍ये वर्ग केली. सदरच्‍या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली असता जाबदार यांनी रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून बचत खात्‍यातील देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी बचत खात्‍यातील रक्‍कम तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी जाबदार क्र.7 यांना झालेली आहे. नोटीस मिळालेची पोचपावती प्रस्‍तुतकामी दाखल आहे. तसेच जाबदार क्र. 2, 3, 5, 6, 8, 12, 13, 14 यांना प्रस्‍तुत प्रकरणी जाहीर नोटीस काढण्‍यात आली. परंतु जाबदार क्र. 2, 3, 5, 6, 7, 8, 12, 13 व 14 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा योग्‍य असा आदेश दि.10/12/10 रोजी नि.1 वर पारीत केला आहे.
 
3.    जाबदार क्र.1 यांनी याकामी नि.21 ला म्‍हणणे दाखल केले आहे. जाबदार क्र.1 यांनी असे कथन केले आहे की, सहायक निबंधक सहकारी संस्‍था फलटण यांनी जाबदार संस्‍थेवर प्रशासकीय मंडळाची नेमणूक केली असून त्‍यावर जाबदार क्र.1 यांची अध्‍यक्ष म्‍हणून नेमणूक केली आहे. परंतु जाबदार संस्‍थेने त्‍यांचा चार्ज अद्यापही जाबदार क्र.1 यांचकडे सोपविलेला नाही. त्‍यामुळे जाबदार क्र.1 यांना याकामी म्‍हणणे मांडता येत नाही अगर हिशोब देता येत नाही, सबब जाबदार क्र.1 यांचेवर कसलीही जबाबदारी बसविण्‍यात येवू नये असे जाबदार यांनी कथन केले आहे.
 
4.    जाबदार क्र.4, 10, 11, व 15 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.26 ला दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील मजकूर नाकारला आहे. जाबदार क्र.3, 10 व 15 यांनी राजीनामा दिला असून तो जाबदार संस्‍थेने स्‍वीकारला आहे. त्‍यामुळे ते जाबदार संस्‍थेच्‍या कायदेशीर जबाबदारीतून मुक्‍त झाले आहेत. अर्जदार यांनी प्रशासकीय मंडळातील इतर सदस्‍यांना पक्षकार केलेले नाही. अर्जदार यांनी ठेवींबाबतचा तपशील दिलेला नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
5.    जाबदार क्र.9 यांनी याकामी नि. 35 ला लेखी म्‍हणणे दाखल करुन अर्जदारचे तक्रारअर्जातील कथने नाकारली आहेत. जाबदार क्र.9 हे मुधोजी विद्यालयात लिपिक पदावर कार्यरत आहेत. जाबदार क्र.2 यांचेशी असलेल्‍या ओळखीमुळे त्‍यांनी नाममात्र कागदोपत्री संचालक म्‍हणून जाबदार क्र.9 यांची नेमणूक केली होती. परंतु जाबदार क्र.9 यांनी संस्‍थेच्‍या व्‍यवहारात कधीही भाग घेतलेला नाही. जाबदार क्र.9 यांनी संस्‍थेतील त्‍यांचे पदाचा राजीनामा दिला असून तो संस्‍थेने मंजूर केला आहे. अर्जदार यांनी जेव्‍हा बचत खात्‍यात रक्‍कम ठेवली त्‍यावेळी जाबदार क्र.9 हे संचालक पदावर कार्यरत नव्‍हते. सबब अर्जदारची रक्‍कम परत करण्‍याची जबाबदारी जाबदार क्र.9 यांचेवर येत नाही. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.9 यांनी कथन केले आहे.
6.    अर्जदार यांचे अभियोक्‍त्‍यांचा तोंडी युक्तिवाद ऐकला. जाबदार क्र.4, 10, 15, व 11 यांनी दाखल केलेला लेखी युक्तिवाद पाहिला तसेच अर्जदार व जाबदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहिली.
7.    जाबदार क्र.4, 9, 10, 11 व 15 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, त्‍यांनी त्‍यांचे पदाचा राजीनामा दिला असून जाबदार संस्‍थेने त्‍यांचा राजीनामा स्‍वीकारला आहे व त्‍यानुसार त्‍यांना पदमुक्‍त केले आहे. परंतु जाबदार संस्‍थेने जरी सदरचे जाबदार यांचा राजीनामा स्‍वीकारला असला तरी जाबदार यांना ठेव परतीच्‍या जबाबदारीतून मुक्‍त करण्‍यात आले आहे हे दर्शविणारा महाराष्‍ट्र शासनाचे सहकार खात्‍यातील सक्षम अधिका-यांचा आदेश याकामी दाखल नाही. तसेच अर्जदार यांनी ज्‍या कालावधीत जाबदार संस्‍थेकडे ठेवी ठेवल्‍या त्‍या कालावधीत सदरचे जाबदार हे जाबदार संस्‍थेवर संचालक पदावर कार्यरत होते. त्‍यामुळे केवळ राजीनामा दिला म्‍हणून सदरचे जाबदार यांना अर्जदारचे ठेव परतीची जबाबदारी झटकता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
8.    जाबदार क्र. 4, 10, 11, व 15 यांनी नि.31 सोबत सहायक निबंधक सहकारी संस्‍था फलटण यांनी जाबदार यांचेवर महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960 चे कलम 78 अन्‍वये बजावलेली कारणे दाखवा नोटीस दाखल केली आहे. सदरची नोटीस पाहता ठेवपरतीची जबाबदारी ही संपूर्ण संचालक मंडळावर राहील असे यामध्‍ये स्‍पष्‍ट नमूद केले आहे. सदरची बाब विचारात घेता जाबदार क्र.2 ते 15 हे अर्जदारची बचत खात्‍यातील रक्‍कम परत करण्‍यास वैयक्तिक व संयुक्‍तरित्‍या जबाबदार आहेत असे या मंचाचे मत आहे.
9.    जाबदार क्र.1 यांनी असे कथन केले आहे की जाबदार संस्‍थेने त्‍यांचेकडे संस्‍थेचा कार्यभार हस्‍तांतरण केलेला नाही. सदरचे कथनाचे पृष्‍ठयर्थ जाबदार क्र.1 यांनी नि.23 सोबत काही महत्‍वाची कागदपत्रे दाखल केली आहे. सदरचे कागदांचे अवलोकन केले असता असे स्‍पष्‍टपणे दिसून येते की, जाबदार संस्‍थेने अद्यापही जाबदार क्र.1 यांचेकडे संस्‍थेचा कार्यभार हस्‍तांतरण केलेला नाही. सदरची वस्‍तुस्थिती पाहता अर्जदारची रक्‍कम परत करण्‍यास जाबदार क्र.1 यांना जबाबदार धरता येणार नाही असे या मंचाचे मत आहे.
10.   या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
 
आदेश
 
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र. 2 ते 15 यांचेविरुध्‍द अंशतः मंजूर करणेत
    येत आहे.
2. अर्जदार यांचा तक्रारअर्ज जाबदार क्र.1 यांचेविरुध्‍द फेटाळणेत येत आहे.
3. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र.2 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. बचत खाते क्र.940 वरील शिल्‍लक रक्‍कम बचत खात्‍याचे नियमाप्रमाणे देय
        होणा-या व्‍याजासह द्यावी.
    ब. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    क. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
4. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि.18/1/2011
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER