Maharashtra

Satara

CC/10/225

Shri Vinayak Manohar Namjoshi - Complainant(s)

Versus

Shriment Malojiraje Sah Gahtaran Sanstha Phaltan Chairman Duryodhan D. Ranvare - Opp.Party(s)

Bhosale

18 Apr 2011

ORDER


ReportsDistrict Consumer disputes redressal Forum Satara Near Cooperative Court Sadara Bazar Satara-415001
CONSUMER CASE NO. 10 of 225
1. Shri Vinayak Manohar NamjoshiA/p Baravbag Laxminagar Phaltan Dist SataraSatara ...........Appellant(s)

Vs.
1. Shriment Malojiraje Sah Gahtaran Sanstha Phaltan Chairman Duryodhan D. RanvareA/p PPhaltan Tal Phatan Dist Satarasatara2. Chairman Shantanu D RanvarePhaltansatara3. Sanchlak Shantanu D RanvarePhaltansatara4. Sanchlika Sou Shardadevi D. RanvarePhaltan satara5. Shri Devraj V. Jadhav Phaltansatara6. Shri Prkash P. Jadhav SanchalakPhaltan satara7. Shri Purushottam L. BashiPhaltansatara8. Shri Jotiram M. GorePhaltan satara9. Shri Rajendr R. Zanbre SanchlakPhaltansatara10. Shri Popat hA. Jadhav Phaltansatara11. Shri Sadashiv Govind Gholap SanchalkPhaltansatara12. Shri Baban B. Chvhan SanchalkPhaltansatara13. Shri yashvant G. KabalePhaltansatara14. Sanchalika S. JadhavPhaltansatara15. Shri Sanbhaji S. ShindPhaltansatara ...........Respondent(s)


For the Appellant :
For the Respondent :

Dated : 18 Apr 2011
ORDER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

                                                            नि.48
मे. जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
                                          तक्रार क्र. 225/2010
                                          नोंदणी तारीख – 20/09/2010
                                          निकाल तारीख – 18/4/2011
                                          निकाल कालावधी – 208 दिवस
श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्‍यक्ष
श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्‍या
श्री सुनिल कापसे, सदस्‍य
(श्री सुनिल कापसे, सदस्‍य यांनी न्‍यायनिर्णय पारीत केला)
------------------------------------------------------------------------------------
श्री विनायक मनोहर नामजोशी
रा.बारवबाग, लक्ष्‍मीनगर, फलटण
ता.फलटण जि.सातारा                             ----- अर्जदार
                                           (अभियोक्‍ता श्री.एन.व्‍ही.भोसले)
      विरुध्‍द
1. श्रीमंत मालोजीराजे सह.गृहतारण संस्‍था मर्या.
   फलटण करिता चेअरमन
2. श्री दुर्योधन दत्‍तात्रय रणनवरे, चेअरमन
3. श्री शंतनु दुर्योधन रणनवरे, संचालक
4. सौ शारदादेवी दुर्योधन रणनवरे, संचालिका
5. श्री देवराज विश्‍वासराव जाधव, संचालक
   नं.1 ते 4 सर्व रा. गोळीबार मैदान, फलटण
   जि.सातारा
6. श्री प्रकाश प्रतापराव जाधव, संचालक
   रा.संजीवराजेनगर, फलटण ता.फलटण
   जि.सातारा
7. श्री पुरुषोत्‍तम लक्ष्‍मण बक्षी, संचालक
  रा.रॉयल रेसिडेन्‍सी, ब्राम्‍हणगल्‍ली,
   फलटण
8. श्री जोतीराम महादेव गोरे, संचालक
   रा.अयोध्‍या प्रेस, अमरप्‍लाझा बिल्‍डींग,
   फलटण जि. सातारा
9.  श्री राजेंद्र रामचंद्र झांबरे, संचालक
    रा. गोळीबार मैदान, फलटण जि.सातारा
10. श्री पोपट आण्‍णा जाधव, संचालक
    रा.मारवाड पेठ, फलटण ता.फलटण
    जि.सातारा
11. श्री सदाशिव गोविंद घोलप, संचालक
   रा.ठाकुरकी, ता.फलटण जि. सातारा
12. श्री बबन भिकू चव्‍हाण, संचालक
    रा.ठाकुरकी, ता.फलटण जि. सातारा
13. श्री यशवंत गजानन कांबळे, संचालक
    रा.धुमाळवाडी, ता.फलटण जि. सातारा
14. कांचनमाला शंकरराव जाधव, संचालिका
    रा.गोळीबार मैदान, फलट‍ण जि. सातारा
15. श्री संभाजी संपतराव शिंदे, व्‍यवस्‍थापक,
    रा.ब्राम्‍हणगल्‍ली, कसबा पेठ, फलटण
    जि.सातारा                                  ----- जाबदार
                                          (अभियोक्‍ता श्री ए.एस.फाळके)
 
 
न्‍यायनिर्णय
 
    अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्‍यात खालीलप्रमाणे -
1.     अर्जदार यांनी जाबदार संस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत रक्‍कम ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या आहेत. सदरच्‍या ठेवींची मुदत संपलेली आहे. मुदत ठेव पावतीची मुदत संपलेनंतर देय होणा-या रकमेची मागणी अर्जदार यांनी जाबदार यांचेकडे केली. तथापि जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीवर व्‍याजसहित देय झालेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केली. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना देण्‍यात यावयाची रक्‍कम न दिल्‍यामुळे सेवेत त्रुटी केली आहे. अर्जदार हे जाबदार संस्‍थेचे ग्राहक आहेत. त्‍यामुळे जाबदार संस्‍थेकडून मुदत ठेव पावतीची एकूण देय रक्‍कम वसूल होऊन मिळण्‍यासाठी अर्जदार यांनी प्रस्‍तुतचा अर्ज केला आहे. सदरचे अर्जामध्‍ये अर्जदार यांनी एकूण रक्‍कम रु. 12,75,000/- व त्‍यावरील व्‍याज, तसेच मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 5,000/- ची मागणी केलेली आहे.
 
2.    प्रस्‍तुत तक्रारअर्जप्रकरणी जाबदार क्र.1 ते 5, 9, 13, 14 यांना जाहीर नोटीस काढण्‍यात आली. परंतु तरीही जाबदार क्र.1 ते 5, 9, 13, 14 हे या प्रकरणात हजर झालेले नाहीत वा त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे/कैफियत व शपथपत्र दाखल केलेले नाही. सबब याबाबतचा योग्‍य असा आदेश नि.1 वर पारीत केला आहे.
      जाबदार क्र.7 व 8 यांना प्रस्‍तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होवूनही ते याकामी हजर झाले नाहीत.  तसेच त्‍यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. सबब, जाबदार क्र.7 व 8 यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश करण्‍यात आला.
3.    जाबदार क्र. 6, 11, 12 व 15 यांनी याकामी नि.25 ला लेखी म्‍हणणे दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार संस्‍थेवर प्रशासक मंडळाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. त्‍यामुळे जाबदार यांचे प्रत्‍येक कृत्‍यास प्रशासकीय मंडळ जबाबदार आहे. जाबदार क्र.15 हे संस्‍थेचे व्‍यवस्‍थापक होते. त्‍यामुळे सदर संस्‍थेशी जाबदार यांचा कोणताही संबंध राहिलेला नाही. जाबदार क्र.6, 11, 15 यांनी त्‍यांच्‍या पदाचा राजीनामा दिला आहे. जाबदार यांचे संचालक मंडळाने सदरचा राजीनामा मंजूर केलेला आहे. त्‍यामुळे ते संस्‍थेच्‍या सर्व जबाबदारीतून ते मुक्‍त झाले आहेत. सबब सदरचे जाबदार हे अर्जदार यांना कोणतेही देणे लागत नाहीत. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे.
 
4.    जाबदार क्र.10 यांनी त्‍यांचे लेखी म्‍हणणे नि.33 ला दाखल करुन अर्जदारची तक्रार नाकारली आहे. जाबदार क्र.2 व 10 यांची ओळख असलेने जाबदार क्र.10 यांची नाममात्र कागदोपत्री संचालक म्‍हणून नोंद केलेली होती. त्‍यांनी संस्‍थेतील कोणत्‍याही व्‍यवहारात कधीही भाग घेतलेला नाही. जाबदार क्र.10 यांनी त्‍यांचे पदाचा राजीनामा दिला असून तो संचालक मंडळाने स्‍वीकारला आहे. सहायक निबंधक यांनीही जाबदार क्र.10 यांना संचालक पदातून मुक्‍त केले असलेबाबत कळविले आहे. अर्जदार यांनी ठेव ठेवली त्‍यावेळी जाबदार क्र.10 हे संचालक पदावर कार्यरत नव्‍हते. त्‍यामुळे अर्जदारची ठेव रक्‍कम परत करण्‍यास जाबदार क्र.10 जबाबदार नाहीत. जाबदार संस्‍थेवर प्रशासकीय मंडळाची नियुक्‍ती करण्‍यात आली आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार क्र.10 यांनी कथन केले आहे.
       
5.    अर्जदार व जाबदार यांचेतर्फे दाखल कागदपत्रे पाहिली. 
 
6.    जाबदार क्र. 6, 10, 11, 12 व 15 यांनी त्‍यांचे कैफियतीमध्‍ये असे कथन केले आहे की, त्‍यांनी त्‍यांचे संचालकपदाचा राजीनामा दिला असून तो संचालक मंडळाने स्‍वीकारला आहे. सबब अर्जदारची ठेव रक्‍कम परत करण्‍यास ते जबाबदार नाहीत. परंतु सदरचे कथनाशी प्रसतुतचा मंच सहमत होत नाही कारण जाबदार यांनी जरी त्‍यांचे पदाचा राजीनामा दिला असला तरी त्‍यांना संस्‍थेच्‍या सर्व कायदेशीर देयत्‍वातून मुक्‍त करण्‍यात आले आहे हे दर्शविणारा सक्षम अधिका-यांचा आदेश याकामी जाबदार यांनी दाखल केलेला नाही. केवळ राजीनामा दिला व प्रशासकीय मंडळाची नियुक्‍ती केली म्‍हणून जाबदार यांना त्‍यांची जबाबदारी झटकता येणार नाही. अर्जदार यांनी ज्‍या कालावधीत जाबदार संस्‍थेत ठेवी ठेवल्‍या त्‍या कालावधीत सदरचे जाबदार हे संस्‍थेमध्‍ये कार्यरत होते. त्‍यामुळे जाबदार यांना अर्जदारचे ठेवरक्‍कम परतीची जबाबदारी नाकारता येणार नाही. सबब जाबदार यांचे कथन याकामी ग्राहय धरता येणार नाही.
7.    अर्जदार यांनी दाखल केलेली वर नमूद कागदपत्रे पाहिली असता असे स्‍पष्‍ट दिसून येते की, अर्जदार यांनी जाबदार पतसंस्‍थेमध्‍ये वेगवेगळया ठेवपावत्‍यांन्‍वये वेगवेगळया रकमा मुदत ठेव योजनेअंतर्गत ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या होत्‍या व आहेत. सदरच्‍या ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर जाबदार यांनी अर्जदार यांना ठेवीची रक्‍कम व त्‍यावर ठेव पावतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे होणा-या व्‍याजाची रक्‍कम देण्‍याची होती. तथापि, अर्जदार यांचे शपथपत्र व अर्जदार यांनी दाखल केलेली कागदपत्रे पाहता असे दिसून येते की, जाबदार यांनी अर्जदार यांना देय असलेली रक्‍कम देण्‍यास टाळाटाळ केलेली आहे. थोडक्‍यात जाबदार यांनी अर्जदार यांना द्यावयाच्‍या सेवेत कमतरता केलेली आहे. सबब या प्रकरणी मंचाचे असे स्‍पष्‍ट मत झाले आहे की, अर्जदार यांना जाबदार यांनी कबूल केलेली सेवा म्‍हणजे ठेव म्‍हणून ठेवलेल्‍या रकमेवर व्‍याजासहित देय झालेली रक्‍कम ठेवींची मुदत संपलेनंतर दिलेली नाही. अशा प्रकारे अर्जदार हे जाबदार यांचेकडून रक्‍कम मिळणेस पात्र आहेत असे दिसून येत आहे.
 
8.    एक गोष्‍ट नमूद करणे जरुरीचे आहे की, जाबदार क्र. 2 जे श्रीमंत मालोजीराजे सह.गृहतारण संस्‍था मर्या. फलटण या संस्‍थेचे चेअरमन आहेत, अशा या जबाबदारीच्‍या पदावर काम करणा-या व्‍यक्‍तीने प्रस्‍तुतचे कायदेशीर प्रकरणाची नोटीस/सूचना स्‍वीकारणे व नेमलेल्‍या तारखांना या मंचासमोर हजर होणे जरुरीचे होते.  तथापि, कसलेही संयुक्तिक कारण जाबदार क्र. 2 यांचेतर्फे याकामी पुढे येत नाही की, जेणेकरुन जाबदार क्र. 2 हे याकामी गैरहजर राहिलेले आहेत. जाबदार यांनी अर्जदार यांचे अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले अथवा खोडून काढलेले नाही. सबब, अर्जदार यांचे या अर्जातील कथनानुसार अर्जदार यांनी विनंती कलमामध्‍ये केलेली विनंती अंशतः मान्‍य करणे जरुरीचे आहे. 
 
9.    या सर्व कारणास्‍तव खालीलप्रमाणे अंतिम आदेश करण्‍यात येत आहे.
आदेश
1. अर्जदार यांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. आजपासून 30 दिवसांचे आत जाबदार क्र. 1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व
    संयुक्‍तरित्‍या अर्जदार यांना खालीलप्रमाणे रकमा द्याव्‍यात.
    अ. ठेवपावती क्र.029941, 029942, 029943, 029944, 029945, 029946,
       029947, 029948, 029949, 029950, 029951, 029952, 029953,
       029954, 029955 वरील मूळ रक्‍कम ठेवपावतीमध्‍ये नमूद केल्‍याप्रमाणे देय
       होणा-या व्‍याजासह रक्‍कम द्यावी तसेच ठेवीची मुदत संपलेनंतरचे तारखेपासून
       संपूर्ण रक्‍कम पदरी पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्‍केंप्रमाणे व्‍याजासह द्यावी.
    ब. मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु. 3,000/- द्यावेत.
    क. अर्जाचे खर्चापोटी रक्‍कम रु. 2,000/- द्यावेत.
3. सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या न्‍यायमंचात जाहीर करणेत आला.
सातारा
दि. 18/4/2011
 
 
 
(सुनिल कापसे)           (सुचेता मलवाडे)         (विजयसिंह दि. देशमुख)
   सदस्‍य                   सदस्‍या                     अध्‍यक्ष
 
 
 
 

Smt. S. A. Malwade, MEMBERHONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT Mr. Sunil K Kapse, MEMBER