Maharashtra

Satara

CC/12/66

RAMKRISHNA BABURAO DHUMAL - Complainant(s)

Versus

SHRIMANT MOLAJIRAJE SAHKARI GRAHTARAN - Opp.Party(s)

07 Jan 2016

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/12/66
 
1. RAMKRISHNA BABURAO DHUMAL
GOLIBAR MAIDAN PHALTAN
...........Complainant(s)
Versus
1. SHRIMANT MOLAJIRAJE SAHKARI GRAHTARAN
PHALATAN.DIST.SATARA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SAVITA BHOSALE PRESIDENT
 HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR MEMBER
  HON'BLE MRS.SUREKHA HAJARE MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.   तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार हे फलटण, जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत. जाबदार क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी पतसंस्‍था असून ग्राहकांकडून ठेवी स्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी  ग्राहकांनी रक्‍कम मागीतल्‍यास सदर रक्‍कम परत देणे तसेच संस्‍थेच्‍या सभासदांना घर बांधणेकरिता व घर दुरुस्‍तीकरीता कर्ज देणे, कर्जाची वसूली करणे अशा उद्देशाने स्‍थापन झाली आहे. तक्रारदाराने जाबदार पतसंस्‍थेत खालील नमूद परिशिष्‍टात दर्शविलेप्रमाणे 2 वर्षांच्‍या मुदतीसाठी मुदत ठेव पावतींमध्‍ये रकमा  गुंतवल्‍या होत्‍या व आहेत.

 

अ.क्र.

ठेवपावती क्रमांक

ठेवीची रक्‍कम

ठेव ठेवलेची तारीख

मुदत संपलेची तारीख

1

023727

  50,000/-

17/4/2007  

17/04/2009

2

023739

  50,000/-

18/4/2007  

18/04/2009

 

एकूण

1,00,000/-

 

 

 

     तक्रारदार यांनी वर नमूद ठेव पावत्‍या तारण ठेवून सदर ठेव पावत्‍यांवर दि.24/7/2007 रोजी प्रत्‍येकी रक्‍कम रु.25,000/- कर्ज घेतलेले होते.  ते कर्ज दि.12/4/2008 रोजी संस्‍थेस परतफेड केलेले आहे. जाबदार यांचेकडून तक्रारदार यांना मुदत ठेवींची एकूण रक्‍कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) व त्‍यावरील आजअखेरचे व्‍याज जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत आणि प्रस्‍तुत मुदत ठेवीची रक्‍कम मुदत संपल्‍यानंतर व्‍याजासह जाबदाराने तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे.  परंतू तक्रारदाराने प्रस्‍तुत मुदत ठेवींची मुदत संपलेनंतर ठेवरकमेची व्‍याजासह जाबदार यांचेकडे मागणी केली असता, जाबदार यांनी रकमा देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवींच्‍या रकमा अदा केलेल्‍या नाहीत.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. जाबदार यांचेकडून सदर मुदत ठेवींच्‍या रकमा व्‍याजासह वैयक्‍तीक व संयुक्तिकरित्‍या वसूल होऊन मिळाव्‍यात व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे. 

2.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या मुदत ठेव पावतीची एकूण रक्‍कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र)  व्‍याजासह वसूल होवून मिळावी व त्‍यावर प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के मुळ रकमेवर व्‍याज मिळावे व तक्रार अर्जाचा खर्च जाबदार यांचेकडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.

3.  तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी तक्रार अर्जाचे पृष्‍ठयर्थ नि. 2 कडे अँफीडेव्‍हीट, नि.3 चे कागदयादीसोबत नि.3/1 व नि. 3/2 कडे जाबदार संस्‍थेत मुदत ठेव ठेवलेल्‍या मुळ ठेव पावती क्र. 023727 व 023739, नि.16 कडे सरतपासाचे अँफीडेव्‍हीट, नि.17 कडे दावा दुरुस्‍तीचा अर्ज, नि.18 कडे अर्जासोबतचे अँफीडेव्‍हीट, नि.19 कडे दावा दुरुस्‍ती अर्जाची दुरुस्‍त प्रत, नि.21 सोबत नि.22 कडील कागदयादीसोबत मंचाची नोटीस रजि.पोष्‍टाने पाठवलेल्‍या पोष्‍टाच्‍या रिसिटस, नि.23 कडे जाबदार क्र. 5 ते 17 यांना  जाहीर समन्‍स काढण्‍यासाठीचा अर्ज, नि. 24 कडे जाहीर समन्‍सचा मसूदा,  नि. 29 कडे  अर्जदारांचे पुराव्‍याचे अँफीडेव्‍हीट, नि.32 कडील कागदयादीसोबत  नि.33 कडे सन 2006-2007 ते 2010-2011 ची संचालक मंडळाची यादी, नि.30 कडे पुरावा संपलेची पुरसीस इत्‍यादी कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे.   

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 4  यांना मंचाने काढलेली नोटीस लागू झालेनंतर त्‍यांनी मंचात हजर होवून नि.13 म्‍हणणे, नि. 14 क‍डे म्‍हणणेपृष्‍ठयर्थ्‍य अँफीडेव्‍हीट दाखल केले आहे. तर जाबदार क्र. 5,9,12,13,17 हे नि. 26 कडे यु.जी कदम वकीलांचे वकीलपत्र दाखल करुन नि.27 अन्‍वये म्‍हणणे देणेसाठी मुदतीचा अर्ज देवून हजर झाले आहेत परंतु त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे वारंवार संधी देवूनही दाखल न केलेने त्‍यांचेविरुध्‍द ‘म्‍हणणे नाही’ आदेश तसेच जाबदार क्र.6,7,10,11,14,15,16  यांना मंचाची नोटीस लागू होऊनसुध्‍दा ते मे मंचात गैरहजर राहीलेने व त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे दाखल न केलेमुळे त्‍यांचेविरुध्‍द एकतर्फा आदेश नि. 1 वर पारीत झालेला आहेत. त्‍यामुळे जाबदार क्र. 5 ते 17 यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणते‍ही कथन खोडून काढलेले नाही. सबब प्रस्‍तुतचे प्रकरण जाबदार क्र. 5 ते 17 यांचेविरुध्‍द एकतर्फा चालविणेत आले.

     जाबदार क्र. 1 ते 4 यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदाराची कथने नाकारलेली आहेत.  त्‍यांचे कथनानुसार तक्रारदार यांनी महाराष्‍ट्र सहकारी संस्‍थांचा कायदा, 1960  कलम 164 अन्‍वये नोटीस देणे आवश्‍यक होते ती न दिलेने सदरची तक्रार टेनेबल नाही अगर सदर तक्रारीचा गुणदोषात्‍मक अखेर निर्णय होऊ शकत नाही.  श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्‍था लि., फलटण यांचेवर दि.4/9/2009 रोजी प्रशासकीय मंडळाची नेमणूक झाली आहे.  मात्र संस्‍थेचे पदाधिकारी व अधिकारी यांनी संस्‍थेच्‍या कागदपत्राचा व मालमत्‍तेचा ताबा अगर चार्ज दिला नाही. सदर संस्‍थेचा चार्ज पोलीसांचे मार्फत कायदेशीर कारवाई करुन तारीख 1.12.2010 रोजी घेतला मात्र अशा चार्जमध्‍येही सर्व रेकॉर्ड मिळाले नाही या कारणाने सदर तक्रारीमधील ठेवी व त्‍यांचे हिशोब याबाबत जाबदार यांचे तर्फे म्‍हणणे मांडणेसही पुरेसी माहीती उपलब्‍ध नाही. तक्रारीमधील रक्‍कम मागणेकरीता 2 वर्षांचेपेक्षा जास्‍त काळ झालेने मुदतीत राहीली नाही.  तक्रारदार यांनी त्‍यांच्‍या ठेवी ठेवल्‍या तेव्‍हा संचालक मंडळ कार्यरत होते त्‍यांना या कामी जाबदार म्‍हणून समाविष्‍ट करणे आवश्‍यक होते. कारण अशा ठेवी ज्‍यांनी स्विकारल्‍या त्‍यांच्‍या परत देण्‍याच्‍या बाबत ठेव ठेवली त्‍यावेळचे संचाल, अधिकारी व सेवक यांनी ठेवीच्‍या रकमा परतीची जबाबदारी पार पाडलेली नाही म्‍हणून तेही या कामी रकमा देणेस जबाबदार आहेत त्‍यांना  या कामी जाबदार न केलेने सदरची तक्रार आवश्‍यक जाबदारांशिवाय टेनेबल नाही. तक्रारदारांनी विनाकारण व्‍याजाची आकारणी व मागणी चुकीची केली असून जादा व्‍याजाची मागणी केली आहे जाबदार संस्‍था ती देणे लागत नाही.  सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नाकारणेत यावी असे म्‍हणणे दिलेले आहे.

5.   वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्‍तुत कामी प्रस्‍तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा    

विचार केला-

अ.क्र.           मुद्दा                              उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                    होय.

2.  जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

3.  अंतिम आदेश काय?                                  खालील नमूद

                                                       केलेप्रमाणे.

विवेचन

मुद्दा क्र.1 व 2-

6.      वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-

प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार क्र.1 पतसंस्‍थेत खालीलप्रमाणे परिशिष्‍टात नमूद मुदत ठेव पावतीं मध्‍ये एकूण रक्‍कम रु.1,00,000/- (रुपये एक लाख मात्र) इतकी रक्‍कम गुंतविली होती व आहे.  प्रस्‍तुत मुदत ठेवींच्‍या मुळ ठेवपावत्‍या याकामी तक्रारदाराने नि. 3 चे कागदयादीसोबत नि. 3/1 व नि. 3/2 कडे  दाखल केल्‍या आहेत.  म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व होते हे स्‍पष्‍ट होते.  तक्रारदाराने याकामी नि. 33 सोबत नि. 33/1 कडे  जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे.  प्रस्‍तुत ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने जाबदार यांचेकडे रकमेची व्‍याजासह मागणी केली असता जाबदाराने रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व रक्‍कम तक्रारदाराला अदा केली नाही त्‍यामुळे तक्रारदाराने नि.3/3 कडील दि.3/3/12 रोजी रजि. पोष्‍टाने वकीलामार्फत रक्‍कम मागणीसाठी नोटीस पाठविली तरीही जाबदारांनी रक्‍कम परत केलेली नाही.  त्‍यामुळे तक्रारदाराचे हे कथन योग्‍य व विश्‍वासार्ह वाटते कारण प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. जाबदार क्र. 5,9,12,13,17 हे मंचात वकीलांमार्फत हजर होवून ही त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणणे याकामी दाखल केलेले नाही त्‍यामुळे त्‍यांचे विरुध्‍द ‘म्‍हणणे नाही’ असे आदेश नि. 1 वर पारीत झालेले आहेत तसेच जाबदार क्र.6,7,10,11, 14,15,16 हे नोटीस मिळूनही मंचात हजर राहीले नाहीत म्‍हणून त्‍यांचेविरुध्‍द ‘एकतर्फा’ आदेश पारीत झाला आहे. तसेच जाबदार क्र.1 ते 4 यांनी हजर होवूनही तक्रारदाराचे तक्रार अर्जावर त्‍यांचे म्‍हणणे दाखल केलेले आहे. त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये संस्‍थेच्‍या संचालक मंडळाला पक्षकार केले नसलेने तक्रार टेनेबल नसलेचे कथन केले आहे. परंतु तक्रारदार यांनी नि.17 कडे दावा दुरुस्‍तीचा अर्ज देवून जाबदार  क्र. 5 ते 17 कडे  संचालक मंडळाला पक्षकार केले आहे व तशी दुरुस्‍ती नि. 1 वर करणेत आली आहे.  त्‍यानंतर जाबदार क्र. 5 ते 17 यांना मंचाची नोटीस मिळूनही ते गैरहजर राहीले व त्‍यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन नाकारलेले नाही अथवा खोडून काढलेले नाही हे स्‍पष्‍ट होत आहे.  त्‍यामुळे तक्रारदाराने त्‍यांच्‍या वरील मुदत ठेवींच्‍या रकमा मुदतीनंतर व्‍याजासह जाबदारांकडे वारंवार मागणी करुनही जाबदारांनी अदा केलेल्‍या नाहीत हे स्‍पष्‍ट सिध्‍द होत आहे. त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

     जाबदार यांनी तक्रारदार यांना मुदतीनंतर मुदत ठेवींची रक्‍कम व्‍याजासह अदा करणे बंधनकारक असूनही जाबदाराने प्रस्‍तुत ठेवीची रक्‍कम तक्रारदारास अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब जाबदार क्र. 1 ते 4 यांना संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला वरील मुदत ठेवींची रक्‍कम ठेव ठेवले तारखेपासून मुदत संपले तारखेपर्यंत पावतींवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करणेसाठी Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणेत येते.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही मा.उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट बँक ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे. 

7.  सबब आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           -ः आदेश ः-

1.  तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2. जाबदार क्र. 1 ते 4 यांना संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला ठेव पावती क्र. 023727 व. 023739 वरील प्रत्‍येकी रक्‍कम रु.50,000/- (रुपये पन्‍नास हजार मात्र) ठेव ठेवले तारखेपासून मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करणेस जबाबदार धरणेत येते. 

3. जाबदार क्र. 1 ते 4 यांना संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला ठेव पावती क्र. 023727 वरील रक्‍कम रु.50,000/- (रुपये पन्‍नास हजार मात्र) ठेव ठेवले तारखेपासून मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करावी.  

4.  जाबदार क्र. 1 ते 4 यांना संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला ठेव पावती क्र. 023739 वरील रक्‍कम रु.50,000/- (रुपये पन्‍नास हजार मात्र) ठेव ठेवले तारखेपासून मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करावी.  

5.  जाबदार क्र. 1 ते 4 यांना संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला ठेव पावती क्र. 023727 व 023739 वरील रक्‍कम मुदतीनंतर होणा-या व्‍याजासह रकमेवर मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजदराने होणारी रक्‍कम अदा करावी.  

6. तक्रारदाराला झाले मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/-(रुपये दहा हजार मात्र)  जाबदार क्र. 1 ते 4 यांनी संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदारांना  अदा करावेत

7. अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) जाबदार क्र. 1 ते 4  यांनी संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदारांना  अदा करावेत.

8. वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार क्र. 1 ते 4 यांनी संस्‍थेकरीता संयुक्तिकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे करावे.

9.  आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेने तक्रारदाराला ग्राहक संरक्षण

कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.

10.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

11. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत   याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.07-01-2016.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 
 
[HON'BLE MRS. SAVITA BHOSALE]
PRESIDENT
 
[HON'BLE MR. SHRIKANT KUMBHAR]
MEMBER
 
[ HON'BLE MRS.SUREKHA HAJARE]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.