सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र.28/2012.
तक्रार दाखल दि.15-03-2012.
तक्रार निकाली दि. 18-09-2015.
विशाल यशवंतराव शेंडे,
रा.गोळीबार मैदान,फलटण
ता.फलटण, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था मर्या.,
फलटण, ता. फलटण, जि.सातारा, तर्फे
प्रशासक मंडळ,
2. श्री.पी.एन.रणवरे,
अध्यक्ष, प्रशासक मंडळ तथा सहकारी अधिकारी (श्रेणी)-2,
अधिन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, फलटण
3. श्रीमती एस.पी.कुलकर्णी,
सदस्य, प्रशासक मंडळ तथा सहकारी अधिकारी,
अधिन, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था, फलटण
4. श्री. व्ही.जी.जाधव
सदस्य, प्रशासक मंडळ तथा निरिक्षक,
अधिन, दि महाराष्ट्र स्टेट को-ऑप.हाऊसिंग फायनान्स
कार्पोरेशन लि.,मुंबई शाखा सातारा
5. श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था मर्या.,
फलटण, ता. फलटण, जि.सातारा,
तर्फे मॅनेजर, श्री. संभाजीराव संपतराव शिंदे,
रा. रॉयल रेसिडेन्सी, कसबा पेठ, फलटण,
ता. फलटण जि. सातारा,
6. जाबदार क्र. 1 तर्फे संस्थापक चेअरमन,
श्री. दुर्योधन दत्तात्रय रणनवरे,
7. जाबदार क्र. 1 तर्फे चेअरमन,
श्री. शंतनु दुर्योधन रणनवरे,
जाबदार क्र. 6 व 7 रा. दत्तकृपा,लक्ष्मीनगर,
गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण,जि.सातारा
8. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. देवराज विश्वासराव जाधव,
रा. दूर्योविश,गोळीबार मैदान,
फलटण, ता.फलटण,जि.सातारा
9. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण बक्षी,
रा. रॉयल रेसिडेन्सी, कसबा पेठ, फलटण,
ता.फलटण,जि.सातारा
10. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. राजेंद्र रामचंद्र झांबरे-पाटील,
रा. गोळीबार मैदान,फलटण, ता.फलटण,जि.सातारा
11. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. जोतीराम महादेव गोरे,
रा. अयोध्या प्रेस,फलटण, ता.फलटण,जि.सातारा
12. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. सदाशिव गोविंद घोलप,
13. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. बबन भिकू चव्हाण,
जाबदार क्र. 12 व 13 रा. ठाकुरकी,
फलटण, ता.फलटण,जि.सातारा
14. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
सौ.शारदादेवी दुर्योधन रणनावरे,
रा. दत्तकृपा,लक्ष्मीनगर,गोळीबार मैदान,
फलटण, ता.फलटण,जि.सातारा
15. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. यशवंत गजानन कांबळे,
रा.धुमाळवाडी,फलटण, ता.फलटण,जि.सातारा
16. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
सौ.कांचनमाला शकरराव जाधव,
रा.गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण,जि.सातारा
17. जाबदार क्र. 1 तर्फे संचालक,
श्री. पोपट आण्णा जाधव,
रा. मारवाड पेठ,फलटण, ता.फलटण,जि.सातारा .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.आर.बी.धुमाळ
जाबदार क्र.1 ते 4 तर्फे– अँड.डी.एच.पवार.
जाबदार क्र.5 ते 17 तर्फे- एकतर्फा
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री. श्रीकांत कुंभार, सदस्य यानी पारित केला
1. प्रस्तुत अर्जदार यांनी त्यांची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 प्रमाणे यातील जाबदारांविरुध्द सेवा त्रुटीबाबत तक्रार दाखल केलेली आहे.
अर्जदाराचे तक्रारीचा आशय थोडक्यात खालीलप्रमाणे-
प्रस्तुत अर्जदार हि गोळीबार मैदान, फलटण, ता.फलटण, जि.सातारा येथील रहिवाशी आहेत. यातील जाबदार क्र.1 ही फलटण, ता. फलटण येथील श्रीमंत मालोजीराजे सहकारी गृहतारण संस्था मर्या., या नावाने सहकार कायद्यान्वये स्थापन झालेली संस्था आहे. प्रस्तुत संस्था जनतेमधून ठेवी स्वरुपात संस्थेसाठी रकमा जमा करते व या रकमेतून जाबदार संस्था सभासदांना घरे बांधणेकरीता कर्ज देणे व घर दुरुस्तीकरता कर्ज देणेचा व्यवसाय करते. प्रस्तुत अर्जदाराने गावातील संस्था आहे या बाबीचा विचार करुन जाबदार संस्थेमध्ये दि. 27/3/2004 पासून रिकरिंग ठेव खाते नं. 176 चे बचत खाते सुरु केले. सदरचे खाते 60 महिन्यांकरीता होते. म्हणजेच सदरचे खाते दि.17/2/2009 अखेरच्या मुदतीचे होते. यामध्ये प्रति महिना रक्कम रु. 200/- प्रमाणे रक्कम ठेवण्यास सुरुवात केली. सदरच्या रिकरिंग खात्यामध्ये दि. 27/3/2004 ते दि. 17/2/2009 अखेर दरमहा रु.200/- प्रमाणे एकूण रक्कम रु.12,000/- रिकरिंगमध्ये ठेवले. मुदत पूर्ततेनंतर सदरची रक्कम व्याजासह अर्जदारांनी जाबदारांकडे मागणी केली. परंतु अर्जदारांनी वारंवार मागणी करुनही प्रस्तुत जाबदारांनी अर्जदाराची रक्कम त्यांना परत केली नाही. आज देतो, उद्या देतो, कर्ज वसुली झाल्यानंतर देतो असे करुन प्रस्तुत अर्जदाराला 3 वर्षे त्यांनी झुलवत ठेवले. त्यामुळे नाईलाजाने प्रस्तुत जाबदार यांनी अर्जदार यांना दिलेल्या सदोष सेवेचा विचार करुन, प्रस्तुत अर्जदारांनी मे. मंचामध्ये जाबदारांचे विरुध्द तक्रार दाखल केली व प्रस्तुत जाबदारांकडून रिकरिंग ठेवखात्याची रक्कम रु.12,000/- व त्यावर द.सा.द.श. 18 टक्के व्याजदराने होणारी रक्कम व्याजासह मिळावी व अर्जाचा खर्च मिळावा अशी विनंती मागणी मंचाकडे केली आहे.
2. प्रस्तुत कामाच्या नोटीसा प्रथमतः मुळ जाबदारांना काढण्यात आल्या. प्रस्तुत तक्रारीमध्ये मुळ जाबदार क्र. 2,3,4, यांना या प्रशासक मंडळाच्या अधिका-यांना सामील पक्षकार केलेले होते. यातील जाबदार क्र. 2,3,4 यांना प्रस्तुत कामातील नोटीसा मिळाल्या त्या नि. 15, नि. 15/1 व नि. 15/2 कडे प्रकरणी दाखल आहेत. त्याप्रमाणे जाबदार क्र. 1 ते 4 यांनी स्वतः नि. 11 ला अर्ज देवून नि. 12 कडे त्यांच्यावतीने अँड. डी.एच.पवार या विधिज्ञामार्फत हजर होऊन त्यांनी नि. 13 कडे म्हणणे दिलेले आहे. व नि. 14 कडे म्हणण्याचे पृष्ठयर्थ अँफीडेव्हीट दाखल केले आहे. या जाबदार क्र. 1 ते 4 यांच्या म्हणण्याचा आशय पाहता, जाबदारांचे आक्षेप असे आहेत की, प्रस्तुत अर्जदार यांनी महाराष्ट्र सहकार कायदा, 1960 कलम 164 अन्वये नोटीस देणे आवश्यक होते ती दिलेली नाही, जाबदार क्र. 1 पसंस्थेवर प्रशासकाची नेमणूक दि. 4/2/2009 रोजी झालेली आहे. मात्र संस्थेचे पदाधिकारी व अधिकारी यांना संस्थेच्या कागदपत्रांचा, मालमत्तेचा ताबा, अगर चार्ज जाबदार क्र. 1 ते 4 यांना दिलेला नाही. तो दि.1/12/2010 रोजी पोलीस कारवाई करुन जाबदार क्र. 1 ते 4 यांनी घेतला. संस्थेचे सर्व रेकॉर्ड या जाबदारांना मिळालेले नाही. त्यामुळे तक्रारीतील ठेवी व त्याबाबतचे हिशोब याबाबत जाबदारांना काहीही माहीती नाही. अर्जदारांचा अर्ज मुदतीत नाही. जाबदार क्र. 1 संस्थेच्या तत्कालीन संचालकांना याकामी जबाबदार धरणेत यावे व त्यांचेवर जबाबदारी धरण्यात यावी. अर्जदार मागत असलेली देय रक्कम प्रस्तुत संस्था देणे लागत नाही. अशाप्रकारचे आक्षेप प्रस्तुत जाबदारांनी नोंदवलेले आहेत. त्यानंतर प्रस्तुत अर्जदार यांनी नि. 17 कडे दावा दुरुस्ती अर्ज व त्यासोबत नि. 17 अ कडे शपथपत्र दाखल केले व त्यांना नि. 17 प्रमाणे जाबदार क्र. 5 ते 17 या लोकांना तक्रार अर्जामध्ये पक्षकार म्हणून सामील करणेत यावे असा दावा दुरुस्ती अर्ज दाखल केला व त्याप्रमाणे मे. मंचाने जाबदार क्र. 1 संस्थेच्या तत्कालीन संचालकांना सामील पक्षकार करुन घ्यावे व दुरुस्तीचा अर्ज मंजूर करणेत यावा अशी मागणी केली. मंचाने अर्जदाराचा दावा दुरुस्ती अर्ज मंजूर केला व त्यांना अर्जातील संचालकांना तक्रार अर्जात समाविष्ट करण्याची परवानगी देणेत आली. त्याप्रमाणे प्रस्तुत अर्जदारांनी मुळ जाबदार क्र. 1 ते 4 यांचेसोबत जाबदार क्र. 5 ते 17 या अनुक्रमे जाबदार क्र. 1 संस्थेच्या संचालकांना तक्रारीच्या सरनाम्यामध्ये दाखल करुन तशी दुरुस्ती केली व त्याप्रमाणे नि. 18 कडे दावा दुरुस्ती प्रत दाखल केली. नवीन संचालकांना मंचामार्फत नोटीसा पाठवण्यात आल्या. त्याच्या पोष्टाच्या पावत्या नि. 22 चे कागदयादीसोबत नि. 22/1 कडे प्रकरणी दाखल आहेत. ब-याच तारखांना वाट पाहून जाबदार क्र. 5 ते 17 यांना पाठवलेल्या नोटीसीचा कोणताही अहवाल मंचात दाखल झाला नाही किंवा जाबदारांना काढलेल्या नोटीसच्या पोहोचपावत्या मंचात आलेल्या नाहीत. त्यामुळे जाबदारांना नोटीसची बजावणी झाली किंवा कसे याबाबत कोणताही खुलासा होत नसल्यामुळे अर्जदार यांनी नि. 23 कडे दैनिक सकाळ या पेपर मध्ये जाहीर नोटीसीने समन्स काढणेबाबतचा अर्ज दाखल केला. व त्यासोबत नि. 24 कडे जाहीर नोटीसचा मसूदा दाखल केला. नि. 23 च्या अर्जास अनुसरुन अर्जदारांचा अर्ज मे. मंचाने मंजूर केला. त्याप्रमाणे नि. 25 कडील जाहीर नोटीस जाबदार क्र. 5 ते 17 विरुध्द दि.10/1/2015 रोजीच्या दैनिक सकाळ मध्ये प्रसिध्द करुन त्या दैनिकाची प्रत पुराव्याकामी, नि. 26 सोबत नि. 27 चे फेरीस्तने नि. 28 कडे दाखल केली आहे. प्रस्तुत जाहीर नोटीस दिलेनंतर जाबदार क्र. 5 ते 17 यांचे वतीने दोन ते तीन तारखांच्या मुदती देवूनही कोणीही जाबदार प्रकरणी हजर झाले नाहीत. त्यामुळे जाबदार क्र. 5 ते 17 यांना जाहीर नोटीसीने नोटीस रुजू होवूनही ते या मंचात हजर झाले नाहीत किंवा त्यांनी त्यांचे म्हणणेही दाखल केले नाही त्यामुळे त्यांचेविरुध्द दि. 12/5/2015 रोजी नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत करणेत आले. त्यामुळे प्रस्तुत जाबदार क्र. 5 ते 17 यांचे अर्जदारांचे अर्जास कोणतेही आक्षेप नाहीत असे गृहीत धरुन त्यांच्याविरुध्द एकतर्फा प्रकरण चौकशीस घेणेत आले.
3. प्रस्तुत अर्जदार यांनी नि.1 कडे दिलेला अर्ज, त्यासोबत नि. 2 कडे दिलेले प्रतिज्ञापत्र, नि.3 कडे अर्जदारांचे विधिज्ञाचे वकीलपत्र, नि. 8 कडे जाबदार क्र. 1 यांचेकडील मुळ बचत ठेव पुस्तक व नि. 9 कडे जाबदार क्र. 1 पतसंस्थेवर नेमलेल्या प्रशासक मंडळाची मे. सहा. निबंधक सहकारी संस्था, फलटण यांची सही शिक्क्याची कागदपत्रे दाखल केली आहेत. प्रस्तुत अर्जदारांनी नि. 16 कडे पुराव्याचे अँफीडेव्हीट, नि. 18 कडे दावादुरुस्ती अर्ज, नि. 29 कडे तक्रार अर्जासोबत दिलेले अँफीडेव्हीट तेच पुरावा समजणेत यावा व कागदपत्रांचे अवलोकन करुन निकाल देणेत यावा अशी पुरसीस दाखल केली आहे. नि. 30 कडे तोंडी पुरावा संपलेची पुरसीस दाखल केली आहे. या सर्व कागदपत्रांचा व यातील जाबदार क्र. 1 ते 4 यांनी प्रकरणी नि. 13 कडे दाखल केले म्हणणे व नि. 14 कडील अँफीडेव्हीट व यातील कथने व आशय यांचा विचार करता प्रस्तुत प्रकरण न्यायनिर्गत करणेसाठी खालीलप्रमाणे मुद्दे उपस्थित होतात
अ.क्र. मुद्दे निष्कर्ष
1. प्रस्तुत अर्जदार व जाबदार यांचेमध्ये ग्राहक
व सेवापुरवठादार असे नाते आहे का ? होय.
2. प्रस्तुत जाबदारांनी या अर्जदाराची मुदत पूर्ण झालेली
रिकरिंची ठेव रक्कम सव्याज व्याजासह अर्जदाराने
वारंवार मागणी करुनही त्यांना ती त्यांना
दिलेल्या वचनाप्रमाणे परत न करुन अर्जदारांना
सदोष सेवा दिली आहे काय ? होय.
3. अंतिम आदेश काय ? तक्रार अंशतः
मंजूर
कारणमिमांसा
मुद्दा क्र. 1 ते 3
प्रस्तुत प्रकरणातील अर्जदार यांनी जाबदार क्र. 1 या संस्थेमध्ये जाबदार संस्थेच्या निरनिराळया योजनेच्या अनुषंगाने चालू असलेल्या रिकरिंग मासीक बचत योजनेच्या एकूण पाच वर्षे कालावधीच्या मुदतीच्या बचत खात्यामध्ये भविष्यकालीन बचतीचा हेतू ठेवून प्रतीमहा रु.200/- प्रमाणे दि. 27/3/2004 रोजी रक्कम भरणेचे चालू केले होते. जाबदारांच्या योजनेप्रमाणे पूर्णतः पाच वर्षे म्हणजेच मुदत पूर्ततेचा दि.17/2/2009 अखेर एकूण रु.12,000/- जाबदारांच्याकडे जमा केले. मुदत पूर्ण झालेनंतर विनाविलंब प्रस्तुत जाबदारांनी रिकरिंगच्या ठेवीची रक्कम विनाविलंब परत करण्यात येईल असे वचन रिकरिंग ठेवीदारांना दिले होते. व अशाप्रकारची सेवा ते संबंधीत ग्राहकांना देत असतात. या व्यवहारावरुन वरीलप्रमाणे ठेव स्वरुपात ग्राहकांकडून रकमा घेणे व त्या व्याजासह संबंधीत ठेवीदारांना परत देणे या व्यवहारावरुन प्रस्तुत जाबदार व अर्जदार यांचेमध्ये सेवापुरवठादार हे नाते असल्याचे स्पष्ट दिसते. त्यामुळे प्रस्तुत अर्जदार ही जाबदारांची ग्राहक आहे हे स्पष्ट होते त्यामुळे मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असे दिले आहे.
रिकरिंग ठेवीची मुदत पूर्ण झालेनंतर प्रस्तुत अर्जदार यांनी त्यांच्या रिकरिंग ठेवीची रक्कम व्याजासह मिळणेसाठी प्रस्तुत जाबदारांकडे वारंवार हेलपाटे घातले व व्याजासह मागणी केली. परंतु, जाबदार यांनी अर्जदार यांना रक्कम व्याजासह दिलेली नाही, हे प्रस्तुत प्रकरणातील जाबदारांच्या कथनावरुन व अर्जदार यांचे पुराव्यावरुन स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी अर्जदार यांना त्यांनी मुदत पूर्ततेनंतर सव्याज रक्कम परत देणेच्या वचनास हरताळ फासला व रक्कम देण्याचे नाकारले. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी या अर्जदार यांनी सदोष सेवा व त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. त्यामुळे मुद्दा क्र. 2 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
4. नि. 13 व नि. 14 कडे अनुक्रमे जाबदार क्र. 1 ते 4 यांनी दिलेले म्हणणे व अँफीडेव्हीट यातील कथनांचा विचार करता, प्रस्तुत जाबदार संस्थेने व त्यांच्या संचालकांनी संस्थेकडील पूर्ण रेकॉर्ड दिलेले नव्हते, अपूर्ण रेकॉर्ड दिलेले होते, त्यामुळे अर्जदाराच्या या खात्याची देय रकमेची व त्याबाबतच्या हिशोबाची आमच्याकडे काहीही माहीती उपलब्ध नाही. त्यामुळे आम्ही अर्जदारांचे पैसे देवू शकत नाही असा बचाव घेतलेला आहे. परंतु या जाबदारांच्या कथनास आम्ही सहमत नाही. संबंधीत सहाय्यक निबंधकांनी जाबदार क्र.2,3,4 यांची नेमणूक संस्थेकडील येणी वसूल करुन प्राधान्याने सर्व प्रकारच्या ठेवीदारांची रक्कम अदा करणेसाठीच केलेली असते. त्याप्रमाणे प्रस्तुत जाबदारांनी या हेतूला बगल देवून आपली जबाबदारी झटकणेचा प्रयत्न केला आहे. जाबदार क्र.1,2,3,4, यांनी अर्जदारांची रिकरिंगची ठेव रक्कम देण्याबाबत जाणीवपूर्वक चालढकल केली या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे. त्यामुळे यातील जाबदार क्र.1,2,3,4 यांनी अर्जदाराच्या रिकरिंग ठेव रक्कम, रिकरिंग खाते क्र. 176 ची रक्कम रु.12,000/- त्यावरती दि. 27/3/2004 पासून द.सा.द.शे. 7 टक्के दराने संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंत व्याजासह होणारी रक्कम व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.5,000/- व मानसिक त्रासापोटीची रक्कम रु.5,000/- देणेची आहे. तसेच वरील सर्व रक्कम देणेची जाबदार क्र. 1 संस्थेचे संचालक या नात्याने जाबदार क्र.1, 5 ते 17 वैयक्तिक व संयुक्तिक जाबदार क्र.2,3,4 हे संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत असे घोषीत करण्यात येते. व जाबदार क्र. 5 यांना पगारी नोकर असलेने त्याना वगळणेत येणे योग्य ठरते या निष्कर्षाप्रत हा मंच आला आहे.
5. सबब वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन यास अधिन राहून खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करण्यात येतात.
आदेश
1. अर्जदारांचा अर्ज मंजूर करण्यात येतो.
2. प्रस्तुत जाबदार यांनी अर्जदार यांना त्यांनी रिकरिंग ठेवीची मुदत पूर्ततेनंतर सव्याज रक्कम परत देणेच्या वचनास हरताळ फासला व रक्कम देण्याचे नाकारले. त्यामुळे प्रस्तुत जाबदार यांनी या अर्जदार यांना सदोष सेवा व त्रुटीपूर्ण सेवा दिली आहे असे घोषीत करणेत येते.
3. जाबदार क्र. 1 पतसंस्था व तर्फे जाबदार क्र. 2,3,4, यांना संयुक्तीकपणे संस्थेच्या वसूलीतून व जाबदार क्र. 5 ते 17 यांना वैयक्तिक व संयुक्तीपणे अर्जदार यांची रिंकरिंग ठेव पावती क्र. 176 वरील एकूण रु.12,000/- व्याजासह देणेस जबाबदार धरणेत येत आहे असे घोषीत करणेत येते.
3. जाबदार क्र. 1 पतसंस्था व तर्फे जाबदार क्र. 2,3,4, यांनी संयुक्तीकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्तीपणे तक्रारदाराची रिंकरिंग बचतीची क्र. 176 वरील एकूण रु.12,000/- (रुपये बारा हजार मात्र) त्यावरती दि. 27/3/2004 पासून द.सा.द.शे. 7 टक्के दराने संपूर्ण रक्कम हाती पडेपर्यंतचे होणारे संपूर्ण व्याजासह होणारी रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून चार आठवडयांचे आततक्रारदार यांना अदा करावी.
4. जाबदार क्र. 1 पतसंस्था व तर्फे जाबदार क्र. 2,3,4, यांनी संयुक्तीकपणे व जाबदार क्र. 5 ते 17 यांनी वैयक्तिक व संयुक्तीपणे अर्जदारास झाले मानसिक त्रासापोटी रक्कम रु.5,000/- व अर्जाचा खर्चापोटी रक्कम रु.5,000/- ची रक्कम अर्जदार यांना सदर आदेश प्राप्तझालेपासून चार आठवडयांचे आत अदा करावी.
5. यातील जाबदार क्र.5 हे जाबदार क्र. 1 चे पगारी नोकर असलेने त्यांना तक्रारीच्या जबाबदारीतून वगळण्यात येते. परंतु त्यांनी सदर रक्कम संस्थेकडील जमा रकमेतून प्राध्यानाने देण्यास प्राधान्य द्यावे.
विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस अर्जदार यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई करणेची मुभा राहील.
6. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
7. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि.18 -09-2015.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.