Maharashtra

Satara

CC/15/225

Swapnil Sudhakar Kambale - Complainant(s)

Versus

Shrimant Malojiraje Grihataran Sah Patsanstha Maryadit - Opp.Party(s)

Kadam

26 May 2016

ORDER

Consumer Disputes Redressal
Forum, Satara
 
Complaint Case No. CC/15/225
 
1. Swapnil Sudhakar Kambale
Sambhaji nagar, Phaltan
satara
MH
...........Complainant(s)
Versus
1. Shrimant Malojiraje Grihataran Sah Patsanstha Maryadit
Laxminagar Phaltan
Satara
MH
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. MILIND PAWAR HIRUGADE PRESIDENT
 
For the Complainant:
For the Opp. Party:
Dated : 26 May 2016
Final Order / Judgement

             तक्रार क्र. 225/2015.

                      तक्रार दाखल दि.28-09-2015.

                            तक्रार निकाली दि.26-05-2016. 

स्‍वप्‍नील सुधाकर कांबळे

रा. संभाजीनगर, फलटण,

ता.फलटण, जि.सातारा.                           ....  तक्रारदार.

  

         विरुध्‍द

 

1. श्रीमंत मालोजीराजे गृहतारण सहकारी संस्‍था मर्या.,

   लक्ष्‍मीनगर, फलटण, ता. फलटण, जि.सातारा, तर्फे

   चेअरमन, दुर्योधन दत्‍तात्रय रणनवरे

2. संस्‍थापक/चेअरमन, दुर्योधन दत्‍तात्रय रणनवरे,

   रा. दत्‍तात्रय कृपा, गोळीबार मैदान,

   संभाजीनगर, फलटण, ता. फलटण, जि.सातारा.

3. श्री. शंतनु दुर्योधन रणनवरे, चेअरमन

   रा. दत्‍तात्रय कृपा, गोळीबार मैदान,

   संभाजीनगर, फलटण, ता. फलटण, जि.सातारा.

4. व्‍हा.चेअरमन, देवराज विश्‍वासराव जाधव,

   रा. प्रसाद व्‍हीला, संजीवराजेनगर, फलटण

5. संचालक, प्रकाश प्रतापराव जाधव

   रा. संजीवराजेनगर, फलटण, ता.फलटण,जि.सातारा

6. संचालिका, सौ.शारदादेवी दुर्योधन रणनवरे,

   रा. दत्‍तात्रय कृपा, गोळीबार मैदान,

   संभाजीनगर, फलटण, ता. फलटण, जि.सातारा           ....  जाबदार

               तक्रारदारातर्फे अँड.आनंद आर. कदम.

               जाबदार क्र.1 ते 6 -अँड.अरविंद रामराव कदम.                                                               

 

                        न्‍यायनिर्णय  

 

सदर न्‍यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्‍यक्षा यानी पारित केला

 

1.   तक्रारदाराने सदरचा तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे.  तक्रारअर्जातील थोडक्‍यात कथन खालीलप्रमाणे-

       तक्रारदार हे त्‍यांचे कुटूंबियांसह रा.संभाजीनगर, फलटण, ता. फलटण जि.सातारा येथील कायमस्‍वरुपी रहिवासी आहेत. तक्रारदार यांनी अडीअडचणीच्‍या काळात, आजारपणात उपयोगी पडतील यासाठी स्‍वतःच्‍या नावावर दि.10/11/2010  रोजी अनुक्रमे मुदत ठेव पावती क्र. 031263 मध्‍ये रक्‍कम रु.2,50,000/- व मुदत ठेव पावती क्र.031264 मध्‍ये रक्‍कम रु.2,50,000/- गुंतविली होती व आहे.   जाबदार क्र.1 ही सहकार कायद्याप्रमाणे स्‍थापन झालेली सहकारी पतसंस्‍था असून ग्राहकांकडून ठेवीस्‍वरुपात रक्‍कम स्विकारुन मुदतीनंतर किंवा मुदतीपूर्वी  ग्राहकांनी रक्‍कम मागीतल्‍यास, सदर रक्‍कम परत देणे तसेच संस्‍थेच्‍या सभासदांना घर बांधणेकरिता व घर दुरुस्‍तीकरीता कर्ज देणे, कर्जाची वसूली करणे यामधून आपला नफा कमविणे अशा उद्देशाने स्‍थापन झाली आहे. जाबदार क्र. 2 हे संस्‍थेचे संस्‍थापक तर जाबदार क्र. 3 हे संस्‍थेचे चेअरमन जाबदार क्र. 4 हे संस्‍थेचे व्‍हा.चेअरमन तर जाबदार क्र.5 व 6 या संस्‍थेच्‍या संचालक आहेत.

     वरीलप्रमाणे मुदत ठेवपावतीमध्‍ये द.सा.द.शे. 9 % व्‍याजदराने ठेवलेली होती व आहे.  त्‍याची मुदत दि.10/11/2011 अखेर संपलेली आहे.  मुदत ठेवीची रक्‍कम व त्‍यावरील आजअखेरचे व्‍याज जाबदार हे तक्रारदार यांना देणे लागत आहेत आणि प्रस्‍तुत मुदत ठेवीची मुदत संपल्‍यानंतर व्‍याजासह रक्‍कम जाबदारानी तक्रारदार यांना देणे बंधनकारक होते व आहे.  परंतू तक्रारदाराने प्रस्‍तुत मुदत ठेवीची मुदत संपलेनंतर व्‍याजासह रक्‍कम जाबदार यांचेकडे मागणी केली असता जाबदार यांनी रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व आजअखेर तक्रारदार यांना ठेवीची रक्‍कम अदा केलेली नाही.  त्‍यामुळे जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे. जाबदार यांचेकडून सदर मुदत ठेवीची रक्‍कम ठेवपावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह रक्‍कम वैयक्‍तीक व संयुक्तिकरित्‍या वसूल होऊन मिळावी  तसेच मानसिक व शारिरीक त्रासाकरीता व तक्रार अर्जाचा खर्च मिळावा म्‍हणून तक्रारदाराने प्रस्‍तुत तक्रार अर्ज मे मंचात दाखल केला आहे. 

2.   तक्रारदाराने प्रस्‍तुत कामी जाबदार यांचेकडून वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या मुदत ठेव पावती क्र. 031263 मध्‍ये रक्‍कम रु.2,50,000/- व मुदत ठेव पावती क्र.031264 मध्‍ये रक्‍कम रु.2,50,000/- अशी एकूण रक्‍कम रु.5,00,000/-  ठेवपावतीवरील नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह  वसूल होवून मिळावी व त्‍यावर प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्‍के व्‍याज मिळावे व शारीरिक व मानसिक त्रासापोटी रक्‍कम रु.1,00,000/- मिळावेत तसेच तक्रार अर्जाचा खर्च रक्‍कम रु.50,000/- जाबदार यांचेकडून मिळावा अशी विनंती तक्रारदाराने या कामी केली आहे.

3.  तक्रारदार यांनी नि. 2 कडे तक्रार अर्जाचे पृष्‍ठयर्थ अँफीडेव्‍हीट, प्रस्‍तुत कामी नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 कडे मुदत ठेव पावती क्र. 031263 नि.5/2 मुदत ठेव पावती क्र. 031264 व नि. 5/3 कडे संचालक मंडळ यादी, नि. 15 कडे  तक्रारदारांनी तक्रार अर्जासोबत दिलेले अँफीडेव्‍हीट तसेच दाखल केलेले कागद हाच पुराव्‍याचा भाग समजणेत यावा व याऊपर तक्रारदार यांना पुरावा देणेचा नाही अशी पुरसिस इत्‍यादी कागदपत्रे तक्रारदाराने याकामी दाखल केली आहे.   

4.  प्रस्‍तुत कामी जाबदार क्र. 1 ते 6  यांना मंचाने काढलेली नोटीस लागू झालेनंतर जाबदार क्र. 1 ते 6 यांनी नि. 14 कडे म्‍हणणे दाखल केलेले आहे.  त्‍यांनी त्‍यांचे म्‍हणण्‍यामध्‍ये तक्रारदारांची तक्रार नाकारलेली आहे.  त्‍यांनी त्‍याचे म्‍हणण्‍यामध्‍ये असे कथन केले आहे की, जाबदार क्र. 1 पतसंस्‍था या संस्‍थेचे संचालक मंडळ म्‍हणजेच या कामातील जाबदार हे दि.2/9/2009 रोजी मा. सहाय्यक निबंधकसो, सहकारी संस्‍था, फलटण, जि.सातारा यांचे आदेशाने बरखास्‍त केलेली आहे व त्‍याचदिवशी श्री. पी.एन.रणवरे, श्री.एस.पी.कुलकर्णी व श्री. व्ही.जी. जाधव या तिघांचे प्रशासक मंडळ जाबदार क्र. 1 संस्‍थेवर त्‍याचदिवशी त्‍याच आदेशाने नियुक्‍त केलेले आहे.  म्‍हणजेच तक्रारदार यांनी ज्‍या दिवशी ठेव पावती केली  व ज्‍या दिवशी सदर ठेवीची मुदत संपली, त्‍या संपूर्ण कालावधीमध्‍ये जाबदार यांचे संचालक मंडळ सदर सहकारी संस्‍थेवर कार्यरत नव्‍हते.  तक्रारदारांनी ठेव ठेवण्‍याअगोदर 1 वर्षापूर्वीच  सदर जाबदार यांचे संचालक मंडळ बरखास्‍त केलेले होते. त्‍यामुळे तक्रारदार यांच्‍या मुदत ठेवीबद्दल जाबदार क्र. 1 ते 6 यांना व्‍यक्‍तीशः माहिती नव्‍हती तसेच सदर ठेव पावत्‍यांच्‍या मुदती अखेरच्‍या देय रकमेस सदर संचालक मंडळावर कसलीही जबाबदारी येत नाही. सन 2009 साली जाबदार क्र. 1 ते 6 हे संस्‍थेच्‍या संचालक मंडळाच्‍या पदावर कार्यरत नसल्‍याने व कालावधीनंतरच्‍या तक्रारदाराच्‍या झालेल्‍या कोणत्‍याही व कसल्‍याही व्‍यवहारांशी संबंध येत नसल्‍याने तक्रारदार यांना या जाबदारांकडे तथाकथीत रक्‍कम जाबदारांना मागणी करण्‍याचा कोणताही व कसलाही प्रश्‍नच उदभवत नाही.  महाराष्‍ट्र सहकारी कायदा, कलम 82,83 व 88 प्रमाणे चौकशी होवून जोपर्यंत जाबदार यांची जबाबदारी ठरविण्‍यात येत नाही तोपर्यंत सामनेवाला यांच्‍याविरुध्‍द वैयक्तिकरित्‍या मागण्‍यात आलेली मागणी कायद्याने मंजूर करता येणार नाही. मा. ना.उच्‍च न्‍यायालय,मुंबई यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 मध्‍ये दि.22/12/2012 रोजी सौ. वर्षा रविंद्र ईसार विरुध्‍द सुरेखा अरुण दिक्षित यांच्‍या निकालपत्रामध्‍ये “The Directors cannot be held personally liable for making the payment.”  असे निर्देश दिलेले आहेत.  यावरुन सदर कामातील तक्रादारांच्‍या मागणीप्रमाणे जाबदार कोणतीही रक्‍कम देण्‍याची कसलीही जबाबदारी येत नाही. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा अर्ज खर्चासह नामंजूर करण्‍यात यावा. जाबदार क्र. 1 संस्‍थवर जुलै,2015 पासून अवसायकाची नेमणूक झालेली आहे.  जाबदार संस्‍थेवर प्रशासकाची नेमणूक झाल्‍यापासून आतापर्यंत 1 कोटी पेक्षा तास्‍त रक्‍कम संस्‍थेच्‍या ठेवीदारांना संस्‍थेकडून वाटप करण्‍यात आलेली आहे. यावरुन जाबदार हे तक्रारदार यांच्‍या कोणत्‍याही मुद ठेवीच्‍या पावतीची कसलीही रक्‍कम वैयक्तिक व सामुहिकरित्‍या तक्रारदारांचे मागणीप्रमाणे देणेस जबाबदार नाहीत त्‍यामुळे तक्रार अर्जातील कोणताही  मजकूर जाबदार यांना मान्‍य व कबूल नाही.  सबब तक्रारदाराची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती केली आहे. 

5.   वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केलेली तक्रार,शपथपत्र, व सर्व कागदपत्रांचे अवलोकन करुन मे.मंचाने प्रस्‍तुत कामी प्रस्‍तुत तक्रारीचे निराकरणार्थ खालील मुद्दयांचा  विचार केला-

अ.क्र.            मुद्दा                                      उत्‍तर

1.  तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक आहेत काय?                    होय.

2.  जाबदार यांनी तक्रारदाराना सदोष सेवा पुरवली आहे काय?        होय.

3.  अंतिम आदेश काय?                                  खालील नमूद

                                                       केलेप्रमाणे.

विवेचन

मुद्दा क्र.1 व 2-

6.      वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्‍तर आम्‍ही होकारार्थी देत आहोत. कारण-

प्रस्‍तुत तक्रारदाराने जाबदार पतसंस्‍थेत त्‍यांचे स्‍वतःचे नावे मुदत ठेव पावती क्र. 031263 मध्‍ये रक्‍कम रु.2,50,000/- व मुदत ठेव पावती क्र.031264 मध्‍ये रक्‍कम रु.2,50,000/-  अशी एकूण रक्‍कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र) रक्‍कम गुंतविलेली होती व आहे.  प्रस्‍तुत मुदतठेव पावतीची सत्‍यप्रती याकामी तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/1 व 5/2 कडे दाखल केल्‍या आहेत.  म्‍हणजेच तक्रारदार हे जाबदार यांचे ग्राहक आहेत व होते हे स्‍पष्‍ट होते.  तक्रारदाराने याकामी नि.5/3 कडे जाबदार क्र. 1 पतसंस्‍थेच्‍या संचालक मंडळाची यादी दाखल केलेली आहे.  प्रस्‍तुत ठेवींची मुदत संपलेनंतर तक्रारदाराने जाबदार यांचेकडे रकमेची व्‍याजासह मागणी केली असता जाबदाराने रक्‍कम देणेस टाळाटाळ केली व रक्‍कम तक्रारदाराला अदा केली नाही हे तक्रारदाराचे कथन योग्‍य व विश्‍वासार्ह वाटते  व तक्रारदाराने त्‍यांची मुदत ठेवीची व्‍याजासह रक्‍कम जाबदारांनी मुदतीनंतर वारंवार मागणी करुनही अदा केलेली नाही हे स्‍पष्‍ट सिध्‍द होत आहे.  त्‍यामुळे जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे असे आमचे स्‍पष्‍ट मत आहे. सबब आम्‍ही मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्‍तर होकारार्थी दिलेले आहे.

     जाबदार यांनी तक्रारदार यांना अनुक्रमे मुदत ठेव पावती क्र. 031263 व 031264 मध्‍ये प्रत्‍येकी रक्‍कम रु.2,50,000/-  अशी एकूण रक्‍कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र) मुदतीनंतर व्‍याजासह अदा करणे बंधनकारक असूनही जाबदाराने प्रस्‍तुत मुदत ठेवीची रक्‍कम तक्रारदारास अदा केलेली नाही ही सेवेतील त्रुटीच आहे असे या मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे.  सबब जाबदार क्र. 1 ते 6 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला वरील मुदत ठेव पावतीवरील रक्‍कम होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करणेसाठी Co-operative corporate veil  नुसार जबाबदार धरणेत येते.  सबब प्रस्‍तुत कामी आम्‍ही मा.उच्‍च न्‍यायालय मुंबई यांचे रिट पिटीशन क्र.117/2011- मंदाताई संभाजी पवार विरुध्‍द स्‍टेट ऑफ महाराष्‍ट्र या न्‍यायनिवाडयाचा व त्‍यातील दंडकांचा आधार घेतला आहे. 

7.  सबब आम्‍ही प्रस्‍तुत कामी खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करीत आहोत-

                           आदेश

1.    तक्रारदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.

2.   जाबदार क्र. 1 ते 6 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला अनुक्रमे मुदत ठेव पावती क्र. 031263 व क्र.031264 मध्‍ये प्रत्‍येकी रक्‍कम रु.2,50,000/-  अशी एकूण रक्‍कम रु.5,00,000/- (रुपये पाच लाख मात्र)  मुदतठेव पावतींची मुदतीनंतर मिळणारी रक्‍कम पावतीवर नमूद व्‍याजदराने रक्‍कम होणा-या व्‍याजासह तक्रारदारास अदा करणेस जबाबदार धरणेत येते.

3.   जाबदार क्र. 1 ते 6 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्र. 031263 वरील रक्‍कम रु.2,50,000/-  ठेव ठेवले तारखेपासून मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदारास अदा करावेत.  तसेच प्रस्‍तुत रकमेवर मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

4.   जाबदार क्र. 1 ते 6 यांना वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे तक्रारदाराला मुदत ठेव पावती क्र. 031264 वरील रक्‍कम रु.2,50,000/-  ठेव ठेवले तारखेपासून मुदत संपले तारखेपर्यंत पावतीवर नमूद व्‍याजदराने होणा-या व्‍याजासह रक्‍कम तक्रारदारास अदा करावेत.  तसेच प्रस्‍तुत रकमेवर मुदत संपले तारखेपासून रक्‍कम प्रत्‍यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्‍के दराने व्‍याज अदा करावे.

5.  जाबदार क्र. 1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे  तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्‍कम रु.10,000/- (रुपये दहा हजार मात्र)  तक्रारदारांना  अदा करावेत

6.    जाबदार क्र. 1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे अर्जाचा खर्च रक्‍कम रु.5,000/- (रुपये पाच हजार मात्र) तक्रारदारांना  अदा करावेत.

7.    वरील सर्व आदेशाचे पालन आदेश पारित तारखेपासून 45 दिवसात जाबदार क्र. 1 ते 6 यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे यांनी वैयक्तिक व संयुक्‍तीकपणे करावे.

8.  आदेशाची पूर्तता विहीत मुदतीत न केलेस तक्रारदाराला ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम 25 किंवा 27 नुसार वसुलीची प्रक्रिया करणेची मुभा राहील.

9.  सदरचा न्‍यायनिर्णय खुल्‍या मंचात जाहीर करणेत आला.

10. सदर न्‍यायनिर्णयाच्‍या सत्‍यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्‍य पाठवणेत   याव्‍यात.

ठिकाण- सातारा.

दि.26-05-2016.

 

        (सौ.सुरेखा हजारे)  (श्री.श्रीकांत कुंभार)   (सौ.सविता भोसले)

           सदस्‍या           सदस्‍य            अध्‍यक्षा.

               जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.

 

 

 

 

 

 
 
[HON'BLE MR. MILIND PAWAR HIRUGADE]
PRESIDENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.