निकालपत्र :- (दि.07/08/2010) (सौ.वर्षा एन.शिंदे,सदस्या) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.2 ते 5, 7,8 10 ते 13 यांना नोटीस लागू. 12 यांना नोटीस गैरलागू झालेने फेरनोटीस काढली.त्यानंतर नोटीस लागू, सामनेवाला क्र.1 यांना पाठविलेली नोटीस ऑफिस बंदचा शेरा मारुन लखोटा परत आला. सामनेवाला क्र.9 यांनी नोटीस स्विकारली नसलेने लखोटा परत आला. सामनेवाला क्र. 6 मयत असलेने लखोटा परत आला. सामनेवाला क्र.2 ते 5, 7,9,11 वकीलांमार्फत मंचासमोर उपस्थित झाले. सामनेवाला क्र.5,7,9 व 13 यांचे लेखी म्हणणे दाखल झाले. हे सदर मंचासमोर वकीलांमार्फत उपस्थित होऊन त्यांनी लेखी म्हणणे दाखल केले. तक्रारदाराचा युक्तीवाद ऐकणेत आला. युक्तीवादाच्या वेळेस सामनेवाला संस्थेचे अवसायक हजर आहेत. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासहीत न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:- अ) तक्रारदार क्र.1 व 2 सामनेवाला यांचे ग्राहक असून सामनेवाला क्र.1 ही सहकार कायदयाने अस्तित्वात आलेली बँकींग व्यवसाय करणारी संस्था आहे. सामनेवाला क्र.2 व 3 हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे अनुक्रमे चेअरमन व व्हाईस चेअरमन आहेत. संस्थेचा कारभार सामनेवाला क्र; 2 ते 12 मार्फत चालतो. संस्थेच्या कारभारास सामनेवाला क्र.2 ते 12 हे वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार असतात. ब) तक्रारदार क्र.1 ही विधवा स्त्री असून तक्रारदार क्र.2 हा तिचा मुलगा आहे. तक्रारदार क्र.1 चे पती मयत अशोक शंकर बुचडे दि.08/07/2006 रोजी मयत झाले. तक्रारदार हे त्यांचे वारस म्हणून प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी कुटूंबाच्या कल्याणाकरिता सामनेवाला संस्थेत पुढीलप्रमाणे ठेव ठेवल्या होत्या. अ.क्र. | तक्रा.चे नांव | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेची ता. | मुदत संपलेची ता. | ठेवलेली रक्कम | मुदतीनंतरची रक्कम | 01 | रोहिणी अ.बुचडे | 03 | 05/04/95 | 05/10/99 | 5,000/- | 10,000/- | 02 | रोहिणी अ.बुचडे | 04 | 05/04/95 | 05/10/99 | 3,000/- | 6,000/- | 03 | रोहिणी अ.बुचडे | 430 | 01/03/94 | 01/10/98 | 1,000/- | 2,000/- | 04 | अशोक शं.बुचडे | 020 | 20/10/95 | 26/07/00 | 10,500/- | 21,000/- | 05 | अशोक शं.बुचडे | 982 | 24/12/98 | ------ | 10,000/- | 15% | 06 | रोहिणी अ.बुचडे | 1/137 | 14/08/98 | | 5,510/- | |
क) तक्रारदार क्र.1 ही विधवा स्त्री असून कुटूंबातील सर्वच जबाबदारी तिच्यावर आहे. उदरनिर्वाहाचे कोणतेही साधन नाही. त्यामुळे ठेव रक्कमेची आवश्यकता असलेने वेळोवेळी सामनेवालांकडे मागणी करुनही ठेव रक्कमा व्याजासहीत अदा केलेल्या नाही. सामनेवाला क्र.2 ते 12 यांची सदर रक्कम अदा करणेबाबत वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे ती त्यांनी पार न पाडल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल करणेत आली. सबब तक्रारदाराची तक्रार मंजूर करुन तक्रारदारास वर नमुद केलेप्रमाणे रक्कम रु;1,38,785/-ठेवीची रक्कम, मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु.50,000/-व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रक्कम रु.7,500/-सामनेवालांकडून वसुल होऊन मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (3) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टीप्रित्यर्थ तक्रारदांराचे दामदुप्पट ठेव पावत्यांच्या सत्यप्रती व सेव्हींग खातेचा उता-याची सत्यप्रत दाखल केली आहे व शपथपत्र दाखल केले आहे. (4) सामनेवाला क्र.5,7व9 तर्फे दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारदाराचा तक्रार अर्जातील मजकूर खोटा व चुकीचा असून तो सामनेवाला यांना मान्य व कबूल नाही. सामनेवालांनी परिच्छेदनिहाय तक्रारदाराची तक्रार चुकीची असलेने नाकारली आहे. सामनेवाला पुढे असे प्रतिपादन करतात की, प्रस्तुत सामनेवाला हे सामनेवाला पत संस्थेचे दि.14/01/1990 रोजीपर्यंत संचालक होते. त्यांनी सामनेवाला क्र.1 पत संस्थेच्या संचालक पदाचा राजीनामा दिलेला आहे. तसा ठराव मंजूर केलेला आहे. सदर राजीनाम्यानंतर सामनेवाला क्र.1च्या कारभाराशी त्यांचा कसल्याप्रकारे संबंध आलेला नाही.त्यामुळे त्यांना जबाबदार धरता येणार नाही.तक्रारदाराचे अर्जातील नमुद ठेवी या सन 1994-95-98 या कालावधीतील आहेत. तसेच सेव्हींग खाते सन 1998 साली उघडलेले आहे. त्यावेळी प्रस्तुत सामनेवाला हे संचालक नव्हते. सबब प्रस्तुतची तक्रार सामनेवालांविरुध्द चालणेस पात्र नाही. नवीन संचालक मंडळ निवडून आले. त्यांना पक्षकार केलेले नाही. तसेच नमुद पत संस्थेवर महाराष्ट्र शासन सहकार खात्याने नवीन संचालक मंडळ रद्द करुन प्रशासक मंडळाची नेमणूक केलेली आहे. तसेच अवसायकांची नेमणूक केलेली आहे. सदर कामी प्रशासक मंडळ व अवसायक यांना पक्षकार केले नसलेने प्रस्तुत तक्रार अर्ज चालणेस पात्र नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करणेत यावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (5) सामनेवाला क्र. 5,7 व9 यांनी आपले लेखी म्हणणेसोबत सामनेवाला क्र.1 यांचा दि.14/01/1990 चा ठरावाची प्रत दाखल केली आहे.
(6) सामनेवाला क्र.13 अवसायक यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रार अर्जातील मुद्दा क्र. 1 ते 7 बाबत काही म्हणणे नाही असे प्रतिपादन केले असून नमुद सामनेवाला संस्था दि.29/03/2008 रोजी अवसायनात काढणेत आलेली आहे. संस्थेचा दफ्तरी चार्ज अदयाप मिळालेला नाही. चार्ज घेणेसाठी प्रयत्न चालू आहे असे प्रतिपादन केले आहे. (7) सामनेवाला क्र.13 यांनी आपले म्हणणेसोबत कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (8) तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, सामनेवाला क्र.5,7,9 व 13 यांचे लेखी म्हणणे, दाखल कागदपत्रे तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1) प्रस्तुतची तक्रार सदर मंचात चालणेस पात्र आहे का? --- होय. 2) सामनेवालांनी सेवात्रुटी केली आहे काय ? --- होय. 3) तक्रारदार ठेव रक्कम व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत काय ? --- होय. 4) काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे. मुद्दा क्र.1:- सामनेवाला क्र.5,7, व 9 यांनी आपले लेखी म्हणणेमध्ये नवीन संचालक मंडळ व प्रशासक व अवसायक यांना पक्षकार केले नसलेने प्रस्तुतची तक्रार चालणेस पात्र नाही असे प्रतिपादन केले आहे. तक्रारदाराने दि.24/05/2010 रोजी श्री एम.बी.कांबळे अवसायक श्रीमान तुकाराम पाटील नागरी सह.पत संस्था यांना आवश्यक पक्षकार करणेबाबतचा दुरुस्ती अर्ज दिला होता. तो नमुद दिवशी सदर मंचाने मंजूर करुन त्यांना आवश्यक पक्षकार करणेबाबत आदेश पारीत केला त्याप्रमाणे अवसायकांना सामनेवाला क्र.13 म्हणून मूळ तक्रार अर्जात दुरुस्ती करणेत आलेली आहे. सबब प्रस्तुतची तक्रार मंचात चालणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. तसेच तक्रारदाराने तक्रार दाखल करतानाच विलंब माफीचा अर्ज दिलेला आहे. सदर अर्जात तक्रारदार यांनी कथन केले आहे की, तक्रारदारचे पती मयत झालेनंतर ऑगस्ट-2009 मध्ये तक्रारदार यांना त्यांचे पतीचे वापरत असलेल्या कपाटातून घराचे शेतीचे कागदपत्रांची फाईल मिळाली. त्यामध्ये सदर सामनेवाला संस्थेच्या मूळ ठेव पावत्या दिसून आल्या. तसेच तक्रारदार या पती निधनानंतर जवळजवळ दोन वर्ष घराच्या बाहेर पडत नव्हत्या त्यामुळे सदर तक्रार दाखल करणेकरिता विलंब झालेला आहे व सदरचा विलंब माफ होणेबाबत विनंती केली आहे. सदर विनंती मंजूर करणेतच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.2 :- तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेव पावती व सेव्हींग पासबुकाच्या सत्यप्रतीवरुन खालीलप्रमाणे ठेवी ठेवल्याची वस्तुस्थिती निर्विवाद आहे. अ.क्र. | तक्रा.चे नांव | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेची ता. | मुदत संपलेची ता. | ठेवलेली रक्कम | मुदतीनंतरची रक्कम | 01 | रोहिणी अ.बुचडे | 03 | 05/04/95 | 05/10/99 | 5,000/- | 10,000/- | 02 | रोहिणी अ.बुचडे | 04 | 05/04/95 | 05/10/99 | 3,000/- | 6,000/- | 03 | रोहिणी अ.बुचडे | 430 | 01/03/94 | 01/10/98 | 1,000/- | 2,000/- | 04 | अशोक शं.बुचडे | 020 | 20/10/95 | 26/07/00 | 10,500/- | 21,000/- | 05 | अशोक शं.बुचडे | 982 | 24/12/98 | ------ | 10,000/- | 15% | 06 | रोहिणी अ.बुचडे | 1/137 | 14/08/98 | | 5,510/- | |
सदर ठेव रक्कमांची मागणी करुन ही सामनेवालांनी ठेव रक्कम तक्रारदारांना अदा केलेल्या नाहीत ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. महाराष्ट्र सहकार संस्था अधिनियम 1960 कलम-102(1)(क)(2)अन्वये नमुद एम.बी.कांबळे यांची अवसायक म्हणून दि.01/04/2010 रोजी नियुक्ती करणेत आली व तसा आदेश धनंजय डोईफोडे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी पारीत केलेला आहे. तसेच सामनेवाला यांनी दाखल केलेल्या सामनेवाला संस्थेची दि.14/01/1990 रोजी झालेल्या संचालक मंडळ सभा ठराव क्र.7(7) नुसार1)वसंतराव अंबाजी पाटील2) आनंदराव द.पाटील3) तात्यासो पांडूरंग खोपडे 4) बाजीराव भ. रामाने यांनी दिलेला राजीनामा मंजूर करणेत आला असून त्यांस सुचक व अनुमोदक म्हणून अनुक्रमे बाबुराव म.पोतदार व रंगराव रा.पाटील यांची नांवे नमुद आहेत. वरील कागदपत्रांचा विचार करता सामनेवाला क्र.5,7,9 व 8 यांचा राजीनामा दि.14/01/1990 रोजी सामनेवाला क्र.1संस्थेने नमुद ठरावानुसार मंजूर केला आहे व सदरच्या तक्रारदाराच्या ठेवी या तदनंतरच्या कालावधीतील असलेने सामनेवाला क्र5,7,8 व 9 यांना जबाबदार धरता येणार नाही तसेच सामनेवाला क्र.6 यांची नोटीस ही मयत म्हणून परत आलेने त्यांनाही जबाबदार धरता येणार नाही. तसेच सामनेवाला क्र.13 हे अवसायक असलेने त्यांना जबाबदार धरता येणार नाही या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 1 ते 4, 10 ते 12 यांना तक्रारदाराच्या सदर ठेव रक्कम व्याजासहीत देणेकरिता वैयक्तिक व संयुक्तिकरित्या जबाबदार धरणेच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.3 :- तक्रारदाराने दाखल केलेल्या ठेव पावतीचे सत्यप्रतीवरुन तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे नमुद दामदुप्पट ठेव, मुदत बंद ठेव व सेव्हींग खाते ठेव स्वरुपात रक्कमा ठेवलेचे निदर्शनास येते. तक्रारदाराने व तक्रारदाराचे पतीने सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट ठेव पावती क्र.03,04,20 व 430 वरील ठेव पावत्यांची मुदत संपलेचे सदर दामदुप्पट रक्कमा मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मुदत बंद ठेव पावती क्र.982 वरील मुदत ठेव रक्कम रु.10,000/- दि.27/06/98 ते 24/12/98 अखेर या कालावधीकरिता 15% व्याज अदा करावे.तदनंतर दि.25/12/98 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार क्र.1 यांचे नांवे असलेल्या सेव्हींग खाते क्र.1/137 वरील जमा रक्कम रु.5,510/-मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर दि.15/08/98 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. मुद्दा क्र.4 :- सामनेवालांनी सेवात्रुटीमुळे तक्रारदार ही विधवा निराधार असून उत्पन्नाचे अन्य साधन नसलेने व मुलाची जबाबदारी तिच्यावर असलेने वेळेत तिला नमुद रक्कम न मिळाल्याने मानसिक त्रासापोटी रक्कम मिळणेस तक्रारदार पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला यांनी तक्रारदारास खालीलप्रमाणे दामदुप्पट रक्कम अदा करावी व सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. अ.क्र. | तक्रा.चे नांव | ठेव पावती क्र. | मुदतीनंतरची रक्कम | 01 | रोहिणी अ.बुचडे | 03 | 10,000/- | 02 | रोहिणी अ.बुचडे | 04 | 6,000/- | 03 | रोहिणी अ.बुचडे | 430 | 2,000/- | 04 | अशोक शं.बुचडे | 020 | 21,000/- |
(3) सामनेवाला यांनी तक्रारदारांना मुदत बंद ठेव पावती क्र.982 वरील रक्कम रु.10,000/- अदा करावी. सदर रक्कमेवर दि.27/06/98 ते 24/12/98 या ठेव ठेवलेल्या कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदर म्हणजे द.सा.द.शे.15 टक्के दराने व्याज अदा करावे व दि.25/12/98 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. (4) सामनेवाला यांनी तक्रारदारांना त्याचे सेव्हींग खाते क्र.1/137 वरील जमा रक्कम रु.5,510/- अदा करावी व सदर रक्कमेवर दि.15/08/98 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.3.5 टक्के व्याज अदा करावे. (5) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत. (6) सामनेवाला क्र.1ते 4 व 10 ते 12 यांनी तक्रारदारांना वरील सर्व रक्कमा वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या देणेच्या आहेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |