निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 15.03.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 01.04.2010 तक्रार निकाल दिनांकः- 31.07.2010 कालावधी 4 महिने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. मुंकूद पिता पंडीतराव अंबेकर अर्जदार वय 56 वर्षे धंदा वकिली , ( अड.मुंकूद अंबेकर ) रा.सरस्वतीनगर,परभणी. विरुध्द श्री.कुणाल जोशी/श्रीमती पारस जोशी गैरअर्जदार रिलायन्स मोबाइल शॉपी शिवाजीचौक रोड, ( एकतर्फा ) ब्रॅम्हा हॉटेलच्या समोर,परभणी. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती सुजाता जोशी सदस्या ) रिलायन्स कंपनीच्या सीम कार्डाबाबतच्या सेवा त्रूटीबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. तक्रार अर्जातील थोडक्यात हकीकत- अर्जदाराने दिनांक 05.12.2009 रोजी गैरअर्जदाराच्या रिलायन्स मोबाईल शॉपी मधून सिमकार्ड क्रमांक 9021932056 रुपये 50/- देवून खरेदी केले. दिनांक 06.12.2009 रोजी सदरील क्रमांक कार्यन्वीत झाला परंतू त्यासोबत पूर्वघोषीत रुपये 50/- चा टॉकटाइम उपलब्ध झाला नसल्याचे अर्जदाराच्या लक्षात आले तेंव्हा ही गोष्ट त्याने गैरअर्जदाराच्या लक्षात आणून दिली तेंव्हा गैरअर्जदाराने उडवाउडवीची उतरे दिली. अर्जदाराने वारंवार चौकशी केल्यानंतर गैरअर्जदाराने सीमकार्ड परत मागवले व नंतर अर्जदाराला दिलेच नाही. याबाबत अर्जदाराने गैरअर्जदाराला नोटीस दिली जी गैरअर्जदाराला दिनांक 31.12.2009 रोजी मिळाली. गैरअर्जदाराने अर्जदाराला त्रूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व सिम कार्ड ची किंमत रुपये 50/- मानसिक त्रास व नुकसान भरपाईपोटी प्रत्येकी रुपये 1000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 1000/- ही सर्व रक्कम द.सा.द.शे.18 % व्याजाने मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, सिम कार्ड चे कव्हर, पोस्टाच्या पावत्या, नोटीस ची प्रत इत्यादी कागदपत्रे दाखल केले आहेत. तक्रार अर्जावर लेखी म्हणणे सादर करण्यासाठी गैरअर्जदाराना मंचातर्फे नोटीस पाठविल्यावर गैरअर्जदार यानी पोस्टाकडून सुचना मिळूनही घेतली नाही म्हणून नोटीस न्यायमंचाकडे परत आली म्हणून गैरअर्जदाराविरुध्द तक्रार एकतर्फा चालवण्याचा आदेश पारीत करण्यात आला. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन व लेखी युक्तिवादावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्ये उत्तर 1 अर्जदाराने अर्जदाराला त्रूटीची सेवा दिली आहे काय ? होय 2 अर्जदार कोणता अनुतोष मिळण्यास पात्र आहे ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 ः- अर्जदाराने त्याच्या मोबाईलसाठी गैरअर्जदाराकडून रिलायन्स कंपनीच्या एक पैस बीलींगच्या स्किमचे सीम कार्ड रुपये 50/- ला दिनांक 05.12.2009 रोजी खरेदी केले. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून अड्रेसप्रुफ आणि लायसेंसची झेरॉक्स कॉपी घेवून क्रमांक 9021932056 चे सीम कार्ड दिले त्या कार्डचे कव्हर अर्जदाराने नि. 6/1 वर दाखल केले आहे. सिम कार्ड वापरायला सुरुवात केल्यावर दिनांक 15.12.2009 पर्यंत प्लॅनप्रमाणे रुपये 50/- अर्जदाराच्या सीमकार्डच्या खात्यात जमा झाले नव्हते म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराकडे चौकशी केली परंतू त्यानी उडवाउडवीची उत्तरे दिली व गैरअर्जदाराच्या स्त्री कर्मचा-याने अर्जदाराकडून दिनांक 18.12.2009 रोजी सीम कार्ड तपासण्यासाठी म्हणून घेतले. त्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदाराला ते सीम कार्ड परत केले नाही म्हणून अर्जदाराने गैरअर्जदाराला नोटीस पाठवली ती गैरअर्जदाराला दिनांक 31.12.2009 रोजी मिळाली. ( नि.6/4) अर्जदाराने वरील सर्व बाबी शपथेवर सांगितल्या आहेत. गैरअर्जदाराना दिनांक 31.12.2009 रोजी अर्जदाराने सीम कार्ड संबंधी पाठवलेली नोटीस मिळाली. त्याला गैरअर्जदाराने कोणतेही उत्तर दिले नाही वा नोटीसमधील मजकूर नाकारलेला नाही म्हणजे तो मजकूर त्याला मान्य आहे असेच मानावे लागेल तसेच गैरअर्जदाराने न्यायमंचाची नोटीस ही पोष्टाकडून सुचना मिळूनही स्विकारली नाही व अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे अमान्य केले नाही म्हणजेच अर्जदाराचे म्हणणे त्याला मान्य आहे असेच मानावे लागेल. अर्जदाराकडून रुपये 50/- घेवून त्याचे सिम कार्ड मध्ये गैरअर्जदाराने प्लॅनप्रमाणे रुपये 50/- जमा करुन दिले नाहीत व अर्जदाराला त्रूटीची सेवा दिली असे आम्हास वाटते म्हणून खालीलप्रमाणे आदेश करण्यात येत आहे.. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार अशंतः मंजूर करण्यात येते. 2 गैरअर्जदाराने अर्जदारास निकाल समजल्यापासून 30 दिवसाचे आत सिम कार्ड ची किंमत रुपये 50/- दयावेत. 3 याखेरीज मानसिक त्रास व तक्रारीच्या खर्चापोटी एकत्रीतपणे रुपये 500/- आदेश मुदतीत द्यावेत. 4 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |