जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 2009/123. प्रकरण दाखल तारीख - 20/05/2009 प्रकरण निकाल तारीख – 31/07/2009 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या मा.श्री.सतीश सामते - सदस्य शंकर विरभद्र कौरवार वय, 74 वर्षे, रा.नर्सी रोड मुखेड ता.मुखेड जि.नांदेड अर्जदार विरुध्द. 1. श्रीकृष्ण झाडीकर, कार्यकारी संचालक दि. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. नांदेड जि. नांदेड गैरअर्जदार. 2. डॉ. श्रीकर परदेशी, जिल्हाधिकारी नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - स्वतः गैरअर्जदार क्र. 1 तर्फे वकील - अड.एस.डी.भोसले. निकालपञ (द्वारा - मा.श्री.बी.टी.नरवाडे, अध्यक्ष ) गैरअर्जदार नांदेड जिल्हा सहकारी बँक यांचे सेवेतील ञूटी बददल अर्जदार यांनी खालील प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार बँकेकडे मूदत ठेव क्र.385325 द्वारे दि.25.7.2004 रोजी रु.10,000/- तेरा महिन्यासाठी 6.50 व्याज दराने व दूसरी मूदत ठेव पावती क्र.385360 द्वारे रु.89000/- तेरा महिन्यासाठी 7 टक्के व्याज दराने असे एकूण रु.99,000/- गूंतविले होते. ते मिळण्यासाठी गैरअर्जदारास विनंती केली. परंतु गैरअर्जदारानी आर.बी.आय. चे निर्बध असल्यामूळे रक्कम देऊ शकत नाही असे सांगितले. सदर रक्कमेची त्यांना जिवन जगण्याकरिता,औषधोपचाराकरिता व जेष्ठ नागरिक असल्यामूळे वेळोवेळी प्रकृती खराब हाते त्यासाठी वरील रक्कमेची आवश्यकता आहे. तक्रार अर्जासोबत मूदत ठेवीबददल पावती, जेष्ठ नागरिक पमाणपञ, जिल्हाधिकारी पोहच पावती इत्यादी कागदपञ दाखल केलेली आहेत. तरी त्यांनी अर्जदाराची रक्कम दिली नाही त्यामूळे ही तक्रार दाखल करुन अशी विनंती केली की, मूदत ठेवीमधील रक्कम रु.99,000/- व्याजासह मिळावेत तसेच मानसिक व शारिरीक ञासाबददल रु.1,00,000/-मिळावेत अशी विनंती केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे मांडले आहे. त्यांना हे मान्य केले आहे की, अर्जदाराचे रु.99,000/- जमा आहेत, पैसे परत देत नाहीत व व्याजही देत नाहीत हे म्हणणे खोटे आहे. गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने दि.20.10.2005 रोजी 35 अ कलम लाऊन आर्थिक निर्बध घातले आहेत. अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज व त्यांसोबत डॉक्टराचे प्रमाणपञ व उपचारासाठीची सर्व कागदपञे दाखल करुन प्रस्ताव दिल्यास तो प्रस्ताव मंजूरीसाठी आर.बी.आय. कडे पाठविण्यास बँक तयार आहे. मंजूर होऊन आलेली रक्कम बँक अर्जदारास देण्यास तयार आहे. रक्कम न देऊन बँकेने कोणतीही ञूटी केलेली नाही. म्हणून सदरची तक्रार फेटाळावी अशी मागणी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्हणून शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी सिध्द होते काय ? नाही. 2. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदाराचे दोन मूदत ठेव पावती मध्ये रु.99,000/- जमा आहेत ही बाब गैरअर्जदार यांना मान्य आहे. पण अर्जदार हे वयोवृध्द असल्यामूळे त्यांना रक्कमेची आवश्यकता पडली असेल ही बाब सूध्दा नाकारता येणार नाही. परंतु गैरअर्जदार बँकेवर आर.बी.आय. ने कलम 35 ए हे कलम लावून बँकेच्या आर्थिक व्यवहारावर निर्बध लादले असल्यामूळे गैरअर्जदार आर.बी.आय. च्या परवानगीशिवाय रक्कम देऊ शकत नाही. त्यामूळे गैरअर्जदार यांच्या सेवेतील ञूटी होत नाही. गैरअर्जदार बँकेने म्हटल्याप्रमाणे अर्जदाराला जर रक्कमेची आवश्यकता असेल तर आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यातील अर्ज, उपचाराचे कागदपञ व इतर कागदपञ दाखल करुन रक्कमे बाबतचा प्रस्ताव त्यांचेकडे सादर केल्यास तो प्रस्ताव बँक ताबडतोब आर.बी.आय.कडे पाठविण्यास तयार आहे व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम अर्जदार यांना देण्यास तयार आहे. अशा प्रकारे रक्कम न देऊन बॅकेने कोणतीही सेवेत ञूटी केलेली नाही. जिल्हाधिकारी नांदेड यांना पार्टी का केले ? त्यांचा या प्रकरणाशी काही संबंध दिसत नाही म्हणून त्यांचे विरुध्द आदेश करता येणार नाही. वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराचा तक्रार अर्ज खालील प्रमाणे मंजुर करण्यात येतो. 2. अर्जदार यांनी योग्य कागदपञासह रक्कमेबाबतचा प्रस्ताव आर.बी.आय. ने ठरवून दिलेल्या विहीत नमून्यात गैरअर्जदार बँकेकडे सादर करावा व बँकेने तो प्रस्ताव त्यांचे मार्फत आर.बी.आय. कडे सादर करावा व आर.बी.आय. ने मंजूर केलेली रक्कम ताबडतोब अर्जदार यांना दयावी. 3. मानसिक ञासाबददल आदेश नाही. 4. दावा खर्च पक्षकारांनी आपआपला सोसावा. 5. गैरअर्जदार क्र.2 यांचे विरुध्द आदेश नाही. 6. पक्षकाराना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते अध्यक्ष सदस्या सदस्य जे.यु.पारवेकर लघूलेखक. |