गणपूर्ती : 1) मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
2) मा. रा.कि. पाटील, सदस्य
ग्राहक तक्रार क्रमांकः 114/2015
तक्रारकर्ता तर्फे : अॅड. शुक्ला
विरुध्दपक्ष तर्फे :
: : न्यायनिर्णय : :
(पारित दिनांक 26/05/2015)
मा. मा.के. वालचाळे, अध्यक्ष
1. तक्रारदाराने हा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे या मंचा समोर सादर केला.
2. तक्रारदाराचे कथना प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 3 हे सिंधी समाजाचे असून त्यांचे परतवाडा येथे नातेवाईक आहे व त्यांचे तेथे नेहमी येणे जाणे असते. वर्ष २०११ मध्ये विरुध्दपक्ष क्र. 3 हे परतवाडा येथे आले होते व त्यांनी फीर्यादीची भेट घेवून विरुध्दपक्ष क्र. 1 च्या मेडिक्लेम पॉलिसी बाबत माहिती दिली. तक्रारदाराने विरुध्दपक्ष क्र. 3 वर विश्वास ठेवून वैयक्तीक मेडिक्लेम पॉलिसी रु. ७,५९९/- प्रिमीयम भरुन घेतली त्या पॉलिसीची मुदत दि. ३१.१०.२०११ ते ३०.१०.२०१२ होती. सन २०१२ मध्ये 1 वर्ष संपल्यावर तक्रारदाराने पुनश्च रु. ७,५९९/- दि. २२.१०.२०१२ रोजी प्रिमीयम भरुन तो, त्याची पत्नी, मुलगा, मुलगी यांचे नावाने मेडिक्लेम पॉलिसी घेतली जी दि. ३०.१०.२०१३ पर्यंत अस्तित्वात होती.
ग्राहक तक्रार क्रमांकः 114/2015
..3..
3. तक्रारदाराचे कथना प्रमाणे त्याची मुलगी गायत्री ही आजारी झाल्याने तिला ठाणे येथे ज्युपीटर हॉस्पीटल येथे दि. २२.४.२०१३ रोजी वैद्यकीय उपचारासाठी नेण्यात आले. त्या ठिकाणी ती दि. २९.४.२०१३ ते १.५.२०१३ पर्यत भरती होती. त्यासाठी वैद्यकीय उपचारावर तक्रारदाराने रु. १७,११२/- व इतर खर्च रु. ५,०००/- केले या रक्कमेची प्रतिपुर्ती मिळण्यासाठी त्याने सर्व कागदपत्रासह विरुध्दपक्षाकडे अर्ज केला, परंतु विरुध्दपक्षाने प्रतिपुर्तीची रक्कम देण्याचे टाळाटाळ केले त्यामुळे त्याने दि. १२.५.२०१४ रोजी वकीला मार्फत विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना नोटीस पाठवून रक्कमेची मागणी तसेच नुकसान भरपाईची मागणी केली असे असतांना विरुध्दपक्षाने नोटीसला उत्तर दिले नाही. यावरुन त्यांनी सेवेत त्रुटी केली आहे. यासाठी तक्रारदाराने हा तक्रार अर्ज दाखल करुन वैद्यकीय खर्च रु. १७,११२/- इतर खर्च रु. ५,०००/-, मानसिक व शारिरीक त्रासासाठी रु. २५,०००/-, नोटीस खर्च रु. १,०००/- इत्यादी रक्कमेची मागणी विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 कडून केली.
4. सदरचा तक्रार अर्ज हा दि. ११.५.२०१५ रोजी प्राथमिक सुनावणीसाठी मंचापुढे आला त्यावेळी तक्रारदारा तर्फे अॅड. श्री. शुक्ला यांना प्राथमिक युक्तीवाद दरम्यान मंचाने अशी
ग्राहक तक्रार क्रमांकः 114/2015
..4..
विचारणा केली की, विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 हे या मंचाच्या अधिकार क्षेत्रात व्यवसाय करीत नसल्याने तसेच राहत नसल्याने हा तक्रार अर्ज या मंचापुढे कसा चालु शकतो. त्यावर अॅड. श्री. शुक्ला यांनी मुदत देण्याची विनंती केली जी स्विकारण्यात आली. प्रकरण प्राथमिक युक्तीवादासाठी दि. १४.५.२०१५ रोजी ठेवण्यात आले परंतु त्या दिवशी तक्रारदार व त्यांचे वकील हे गैरहजर राहिल्याने पुढील तारीख २१.५.२०१५ देण्यात आली. त्या दिवशी देखील ते गैरहजर राहिले. दि. २६.५.२०१५ रोजी पुढील आदेशासाठी हे प्रकरण ठेवण्यात आले. परंतु आज रोजी देखील तक्रारदार व अॅड. श्री. शुक्ला हे मंचापुढे गैरहजर आहे. उपस्थित केलेल्या मुद्यांवर सुनावणी करण्याची संधी तक्रारदाराला देण्यात आल्यावर सुध्दा त्यांनी युक्तीवाद केला नाही.
5. तक्रार अर्ज पाहिला विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 हे अकोला येथे त्यांचा व्यवसाय करतात व विरुध्दपक्ष क्र. 3 हे अकोला येथे राहत असून तेथे त्यांचा व्यवसाय आहे.
6. तक्रारदाराने तक्रार अर्जात असे नमूद केले की, सन २०११ मध्ये विरुध्दपक्ष क्र. 3 त्यांना भेटले व त्यांच्या सांगण्यावरुन त्यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 ची मेडिक्लेम पॉलिसी काढली. त्यांनी पुढे असे नमूद केले की, सन २०१२ रोजी त्यांनी
ग्राहक तक्रार क्रमांकः 114/2015
..5..
पुनश्च मेडिक्लेम पॉलिसी प्रिमीयम भरुन काढली, परंतु असे करतांना तक्रारदाराने तक्रार अर्जात असे नमूद केले नाही की, विरुध्दपक्ष क्र. 3 हे त्यावेळी परतवाडा येथे आले होते व प्रिमीयमची रक्कम ही विरुध्दपक्ष क्र. 3 ला परतवाडा येथे देण्यात आली होती. तक्रारदाराने पॉलिसीचे दस्त दाखल केले त्यावरुन असे दिसते की, ती पॉलिसी दि. ३१.१०.२०११ ते ३०.१०.२०१२ या कालावधीत नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमीटेड यांनी दिली होती. त्यानंतर सन २०१२ मध्ये तक्रारदाराने जी मेडिक्लेम पॉलिसी काढली त्या पॉलिसीचे दस्त तक्रारदाराने दाखल केले आहे त्यावरुन असे दिसते की, तक्रारदाराने ती पॉसिली ओरीएंटल इन्शुरन्स कंपनी कडे दि. ३१.१०.२०१२ ते ३०.१०.२०१३ या कालावधीसाठी काढली होती या दोन्ही इन्शुरन्स कंपनी वेगवेगळया आहे. त्यामुळे सन २०११ मध्ये काढलेली पॉलिसीचे नुतनीकरण केले होते असे दिसत नाही. त्याबद्दल तक्रारदाराने तक्रार अर्जात तसे नमूद केले नाही. तक्रारदाराने तक्रार अर्जात ही दुसरी पॉलिसी काढतांना विरुध्दपक्ष क्र. 3 यांना परतवाडा येथे प्रिमीयमची रक्कम दिली होती किंवा विरुध्दपक्ष क्र. 3 हे त्यासाठी परतवाडा येथे तक्रारदाराकडे आले होते असे तक्रार अर्जात नमूद नाही.
ग्राहक तक्रार क्रमांकः 114/2015
..6..
7. ग्राहक संरक्षण कायदा १९८६ च्या कलम 11 चा विचार करता जेव्हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 हे या मंचाच्या अधिकार क्षेत्रात राहत नाही किंवा व्यवसाय करीत नाही त्यामुळे वर नमूद कारणामुळे हा तक्रार अर्ज या मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नसल्याने तसा निष्कर्ष काढण्यात येतो. तक्रार अर्ज हा या मंचाचे अधिकार क्षेत्रात येत नाही या कारणावरुन तक्रार अर्ज रद्द करण्यापेक्षा तो योग्य त्या मंचात दाखल करण्यासाठी तक्रारदाराला परत करणे न्यायोचित होईल. सबब खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
अंतीम आदेश
- तक्रार अर्ज क्र. ११४/१५ हा या मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसल्याने तो तक्रारदारास योग्य त्या मंचा पुढे दाखल करण्यासाठी परत करण्यात यावा.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनामुल्य द्याव्यात.
दि. 26/05/2015 (रा.कि. पाटील) (मा.के. वालचाळे)
SRR सदस्य अध्यक्ष