Maharashtra

Thane

CC/1122/2015

Shri Primas Marshal Parera - Complainant(s)

Versus

Shri Everest Niklas Nunus - Opp.Party(s)

Adv Maria Dabre

03 Feb 2016

ORDER

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे .
 
Complaint Case No. CC/1122/2015
 
1. Shri Primas Marshal Parera
At Khazanpat,Papdi Tal Vasai Dist Palghar, 401207
Palghar
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri Everest Niklas Nunus
At Everest solar,Security system kargil, Vijay building, shop no 9, Stella vira Petrol Pump near, Vasai west ,Tal Vasai ,Dist Palghar 401209
Palghar
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE PRESIDENT
 HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE MEMBER
 HON'BLE MR. N D Kadam MEMBER
 
For the Complainant:
For the Opp. Party:
ORDER

Dated The 03 Feb 2016

               न्‍यायनिर्णय  

        (द्वारा सौ. माधुरी एस. विश्‍वरुपे- मा. सदस्‍या)

 

  1.           तक्रारदारांनी सामनेवाले यांचे जाहिरातीनुसार सौर उर्जेचे उपकरण विकत घेतले.  तक्रारदारांनी सदर सौर उर्जेचे उपकरणाचे खरेदीपोटी सामनेवाले यांना एप्रिल, 2013 मध्‍ये रु. 5,00,000/- तसेच ऑगस्‍ट, 2013 मध्‍ये रु. 5,00,000/- अदा केली. सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर सौर उर्जेचे उपकरण घरात बसविल्‍यास विजेचे बिल शुन्‍य येईल असे सांगितले. परंतु प्रत्‍यक्षात सदर यंत्रणेमार्फत सौर उर्जा मिळविण्‍यास अडथळा चालू झाला. तक्रारदारांनी सामनेवाले यांचे ऑफिसमध्‍ये यासंदर्भात तक्रारी नोंदविल्‍या. सौर उर्जेमध्‍ये अडथळा आल्‍यामुळे तक्रारदारांना 3 ते 4 दिवस अंधारात रहावे लागत होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांच्‍या घरात बसविलेल्‍या उपकरणांवर उत्‍पादने कोणत्‍या कंपनीची व किती किंमतीची आहेत याबाबतचे लेबल काढून टाकले आहे. तसेच सामनेवाले यांनी तक्रारदारांना सदर उपकरण खरेदी केल्‍याबाबतचे बिल व्‍हॅट, LBT टॅक्‍स वगैरे दिलेले नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी कायदेशीर करार न करता पैशाच्‍या पावत्‍या न देता उत्‍पादनाच्‍या किंमतीची माहिती न देता, बिले न देता सरकारी कर, टॅक्‍स, LBT टॅक्‍स इ. न भरता बनावटपणे व बेकायदेशीरपणे तक्रारदारांशी व्‍यवहार करुन फसवणूक केली आहे. त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून रक्‍कम रु. 20,00,000/- परत मिळण्‍यासाठी (Refund of Money) प्रस्‍तुत तक्रार दाखल केली.
  2.         तक्रारदारांचे वकीलांचा युक्‍तीवाद दाखल सुनावणीकामी ऐकण्‍यात आला. तक्रारदारांनी दाखल केलेली तक्रार, कागदपत्रे, वकीलांचा युक्‍तीवाद यावरुन मंच खालीलप्रमाणे निष्‍कर्ष काढत आहेः

कारण मिमांसा-  

        तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून सदर उपकरण खरेदी केल्‍याबाबतचे          बिल अथवा पावती मंचात दाखल नाही. तसेच तक्रारदार व सामनेवाले यांचेमधील व्‍यवहाराबाबतचा कोणताही कागदोपत्री पुरवा मंचात दाखल नाही. त्‍यामुळे तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडून कोणत्‍या कंपनीचे, किती किंमतीचे व कोणते उपकरण विकत घेतले याबाबत खुलासा होत नाही.  तसेच तक्रारदारांनी सामनेवाले यांना तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे रक्‍कम रु. 10,00,000/- दिल्‍याबाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल नाही.

       सामनेवाले यांनी तक्रारदारांची फसवणूक करुन सदर उपकरण विक्री केलेबाबत तक्रारदारांनी तक्रारीत नमूद केले आहे. सदरची बाब ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही. तसेच तक्रारदारांनी प्रस्‍तुत तक्रार सामनेवाले यांचेकडून रक्‍कम रु. 20,00,000/- परत मिळण्‍यासाठी (Refund of Money) दाखल केलेली आहे. सदरची बाब ही ग्राहक मंचाचे अधिकारक्षेत्रात येत नाही. त्‍याचप्रमाणे तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणात तक्रारदार व सामनेवाले यांचेमधील सदर उपकरण खरेदी केल्‍याबाबतचा कोणताही पुरावा मंचात दाखल केलेला नाही. याकारणास्‍तव तक्रारदारांची तक्रार सबळ पुराव्‍याअभावी दाखल करुन न घेता फेटाळण्‍यात येते.

   आदेश

  1. तक्रार क्रमांक 1122/2015 ग्राहक संरक्षण कायदा कलम 12(3) अन्‍वये फेटाळण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत आदेश नाही.
  3. तक्रारीचे अतिरिक्‍त संच असल्‍यास तक्रारदार यांना परत करण्‍यात यावे.

 

 
 
[HON'BLE MRS. SNEHA S. MHATRE]
PRESIDENT
 
[HON'BLE MRS. MADHURI S. VISHWARUPE]
MEMBER
 
[HON'BLE MR. N D Kadam]
MEMBER

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.