Maharashtra

Kolhapur

CC/10/358

Vithal Bhagoji Fale - Complainant(s)

Versus

Shri.Vithalai Mahila Nagari Sah Pat Sanstha - Opp.Party(s)

P.B.Jadhav

26 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/357
1. A)Sou.Joyati Sarjrrao Aswale, B)Trupti Sarjerao Aswale, C)Sandesh Sarjerao Aswale, D)Pooja Popat AswaleAll r/o.203-E, Tarabai Park, Kolhapur. (Complainant in Complaint No.357/10)2. A)Vitthal Bhagoji Fale, B)Ramchandra Vitthal Fale, C)Sou.Savita Vitthal Fale, D)Rohini Vitthal FaleAll r/o.Flat No.45, Sahyadri Housing Society, Kadamwadi, Kolhapur. ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Vithalai Mahila Nagari Sah Pat Sanstha Maryadit, Kasaba TaraleKasaba Tarle, Tal-Radhanagari, Kolhapur2. Chairman Sou.Shylaja Ashok Patil.Kasaba Tarle.Tal-Radhanagari Kolhapur.3. Sou.Sawitri Kundlik Patil.Hasur Dumala.Tal- Karveer.Kolhapur4. Sou.Malati Maruti Kirulkar.Opp.Datt Mandir.Santosh Colony.Radhanari Road.Kolhapur5. Sou.Pushpanjli Paygondarao Patil.Belbag Mangalawar Peth.Kolhapur6. Sou.Shalan Anadrao MetilKurukali Tal - Karveer Kolhapur7. Sou.Rajeshri Vasantrao Kesarkar.Sheloli.Tal - Bhudargad.Kolhapur8. Sou.Sunita Sarjerao Patil.Mangoli.Tal-Radhanagri.Kolhapur9. Sou.Suman Anatrao PotadarKasaba Tarale.Tal-Radhanagari.Kolhapur10. Sou.Shubhangi Chandrakant Patil.Gudal.Tal-Radhanagri.Kolhapur11. Sou. Smita Chandrakanat Powar.Plot no-51,Mangeskar Nagar.Magalwar Peth.Kolhapur12. Sou.Shelabai Ananda Patil.Arale.Tal- Karveer.Kolhapur13. Sou.Indubai Lahu Bait.Talgaon.Tal-Radhanagari.Kolhapur14. Sou.Yeshoda Krishna Mithari.Pirwadi , Tal - Karveer.Kolhapur15. Sou.Ajani Anadarao Kambale.Karanjfen.Tal- Radhanagri.Kolhapur.16. Manager.Ashok Shamrao Patil.Kasaba Tarale.Tal- Radhanagari.Kolhapur17. Madhukar Dhondiram Bhogulkar.Kasaba Tarale.Tal-Radhangari.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.P.B.Jadhav for the complainants
Manager for Opponent No.1

Dated : 26 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.26.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत ग्राहक तक्रार केस नं.357 व 358/10 या दोन्‍ही तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला संस्‍थेने म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद व दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदत/मुदतपूर्ण तारीख
व्‍याज/मुदतपूर्ण रक्‍कम
1.
357/10
1389
40000/-
13.06.2007
13.06.2010
10%
2.
--”--
1388
40000/-
13.06.2007
13.06.2010
10%
3.
--”--
1390
40000/-
13.06.2007
13.06.2010
10%
4.
--”--
1392
40000/-
13.06.2007
13.06.2010
10%
5.
358/10
005778
26000/-
14.08.2003
14.09.2006
14%
6.
--”--
000719
60000/-
31.12.1994
31.12.1997
151/2 %
7.
--”--
007293
5000/-
08.12.2000
08.06.2007
10000/-
8.
--”--
005776
26000/-
14.08.2003
14.09.2006
14%
9.
--”--
000632
60000/-
30.11.1994
30.11.1997
151/2 %
10.
--”--
1650
7500/-
20.04.2009
20.04.2012
10%

 
(4)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्‍कमांची त्‍यांच्‍या घरगुती गरजा, भविष्‍याकरिता व मुलींच्‍या लग्‍नाकरिता आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केल्‍याने तक्रारदारांनी नातेवाईकांकडून हातउसने घ्‍यावे लागले. तसेच, तारण कर्ज काढावे लागले.  तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व उपनिबंधक यांची पत्रे इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(6)        सामनेवाला संस्‍थेने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सदर वाद हा टचिंग द बिझनेस ऑफ द सोसायटी या स्‍वरुपाचा असल्‍याने सदरचा सहकार न्‍यायालयाकडे चालणेस पात्र आहे. सामनेवाला क्र.15 यांनी पूर्वीच राजीनामा दिलेला आहे. सामनेवाला संस्‍थेने ठेवींच्‍या रक्‍कमेपेक्षा कमी रककमेची कर्जे दिलेली आहेत, ती सुरक्षित आहेत. संस्‍थेमध्‍ये कोणताही गैरव्‍यवहार नाही. अनेक पतसंस्‍थेतील गैरव्‍यवहारामुळे ठेवीदारांनी एकदम ठेवींच्‍या मागणी केल्‍यामुळे संस्‍था अडचणीत आली. अशा परिस्थितीत, वसुलीची विशेष मोहिम राबविलेली आहे. मात्र कर्जदारांनी न्‍यायालयातून मनाई आदेश आणल्‍यामुळे वसुलीचे काम ठप्‍प झाले आहे. सामनेवाला संस्‍थेने कर्जदारांविरुध्‍द महाराष्‍ट्र सहकारी कायदा कलम 101 अन्‍वये 400 पेक्षा अधिक दाखले मिळविले असून 100 प्रकरणे वसुलीसाठी दाखल आहेत. तसेच, दिवाणी न्‍यायालय, वरिष्‍ठ स्‍तर, कोल्‍हापूर यांचेकडे प्रलंबित प्रकरणामध्‍ये स्‍थगिती आदेश असून सदर प्रकरणात 7 लाख येणे आहे. सध्‍या आर्थिक परिस्थिती नसल्‍याने ठेवीवरील व्‍याज देता येणे शक्‍य नाही. तसेच, तक्रारदारांनी ठेवींची मुदत संपलेनंतर दुस-याच दिवशी जाणीवपूर्वक तक्रार दाखल केली आहे. इत्‍यादी कारणास्‍तव तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी.
 
(7)        तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ठे़वी ठेवलेल्‍या आहेत. सामनेवाला पतसंस्‍था ही ठेवी स्विकारते. तसेच, सभासदांना कर्जे देते याबाबतची सेवा ही ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(O) या तरतुदीखाली येते. त्‍यामुळे प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. यास पूर्वाधार म्‍हणून - थिरुमुरुगन 2004 (I) सी.पी.आर.35 - ए.आय.आर.2004 (सर्वोच्‍च न्‍यायालय), तसेच कलावती आणि इतर विरुध्‍द मेसर्स युनायटेड वैश्‍य को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड - 2002 सी.सी.जे.1106 - राष्‍ट्रीय आयोग - याचा आधार हे मंच घेत आहे.
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही समाधानकारक पुरावा या मंचासमोर आणलेला नाही. तसेच, त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  
 
(9)        सामनेवाला क्र.2 ते 17 यांना या मंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, सामनेवाला क्र.1 ते 15 यांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.16 व 17 हे सामनेवाला संस्‍थेचे अधिकारी असल्‍याने त्‍यांना केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांची ठेव रक्‍कम व्‍याजासह परत करणेकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(10)       दोन्‍ही तक्रारीतील तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता बहुतांश ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व ठेव पावती क्र.1650 व्‍यातिरिक्‍त उर्वरित सर्व पावत्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे ज्‍या ठेवींच्‍या मुदती पूर्ण आहेत अशा मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(11)        ग्राहक तक्रार क्र.358/10 मधील मुदत बंद ठेव पावती क्र.1650 या पावती मुदत मुदत अ़द्याप पूर्ण झालेली नाही असे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावत्‍यांच्‍या रक्‍कमा या भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि.21.06.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.
 
(12)       तक्रार क्र.358/10 मधील तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे दामदुप्‍पट ठेव पावती क्र.007293 द्वारे रक्‍कम ठेवली आहे. सदर ठेवीची मुदत संपलेली आहे. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेवीची दामदुप्‍पट रक्‍कम रुपये 10,000/- मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
(13)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.16 व 17 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
357/10
1389
40000/-
2.
--”--
1388
40000/-
3.
--”--
1390
40000/-
4.
--”--
1392
40000/-
5.
358/10
005778
26000/-
6.
--”--
000719
60000/-
7.
--”--
005776
26000/-
8.
--”--
000632
60000/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.16 व 17 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.358/10 मधील तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र. 007293 वरील दामदुप्‍पट रक्‍कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.09.06.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.16 व 17 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.358/10 मधील तक्रारदारांना मुदतबंद ठेव पावती क्र.1650 वरील रक्‍कम रुपये 7,500/- (रुपये सात हजार पाचशे फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावत्‍यांची तक्रार दाखल दि. 21.06.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि.21.06.2010 रोजीपासून सदर रक्‍कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 ते 15 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.16 व 17  यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या प्रत्‍येक तक्रारीकरिता तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT