निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 28/01/2011 तक्रार नोदणी दिनांकः- 07/02/2011 तक्रार निकाल दिनांकः- 03/08/2011 कालावधी 05 महिने 27 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकांत बी. पांढरपट्टे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. विश्वनाथ बाबुअप्पा व्यवहारे. अर्जदार वय 55 वर्ष.धंदा. शेती. अड.एस.एन.व्यवहारे. रा.रामेटाकडी ता.मानवत जि.परभणी. विरुध्द 1 प्रो.प्रा.श्री.वांगड तरुण बालकिशन. गैरअर्जदार गोदावरी कृषी सेवा केंद्र. अड.नितीन मणियार. मानवत रोड,पोलीस स्टेशन समोर,मानवत. ता.मानवत जि.परभणी. 2 मॅनेजर साहेब. अड.एस.एच.बंग.मणियार. निर्मल सिड्स प्रा.लि.पो.ओ.बॉक्स 63,भादगांवरोड. पाचोरा जि.जळगाव. ------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपट्टे. अध्यक्ष. 2) सौ.सुजाता जोशी. सदस्या. 3) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या. ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा.सौ.सुजाता जोशी.सदस्या. ) सदोष बियाणामुळे झालेल्या नुकसान भरपाईची मागणी करण्यासाठी अर्जदाराने ही तक्रार दाखल केलेली आहे. अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी की, अर्जदार हा व्यवसायाने शेतकरी असून दिनांक 16/06/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 कडून गैरअर्जदार क्रमांक 2 चे मुगाचे बियाणे विकत घेतले. दिनांक 01/07/2010 रोजी अर्जदाराने सदरील मुगाच्या बियाणाची योग्य पध्दतीने पेरणी केली,परंतु बियाणे निकृष्ठ दर्जाचे असल्यामुळे बियाणाची उगवण झाली नाही.अर्जदाराने तालुका कृषी अधिकारी मानवत व गटविकास अधिकारी पंचायत समिती मानवत यांच्याकडे उगवण झाली नसल्यामुळे बाधीत क्षेत्राचा पंचनामा करण्यासाठी तक्रार अर्ज दिला.त्यानंतर तीन सदस्यीय समितीने सदरील क्षेत्राचा पंचनामा केला व पाहणी अहवालात बियाणे सदोष असून जिल्हा तक्रार निवारण समिती यांनी अर्जदाराच्या शेतास भेट द्यावी असा निष्कर्ष काढला.त्यानंतर जिल्हा तक्रार निवारण समिती यांनी अर्जदाराच्या शेतीचा पंचनामा केला व बियाणे सदोष असल्यामुळे उगवण 14 टक्के झाली आहे असा अहवाल दिला,गैरअर्जदाराच्या निकृष्ठ बियाणामुळे अर्जदाराचे रु.80,000/- चे नुकसान झाल्यामुळे अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. व नुकसान भरपाई म्हणून रु.80,000/- मानसिक त्रासापोटी रु.5000/- व तक्रारीचा खर्च रु.1000/- मिळावेत अशी मागणी केली आहे. अर्जदाराने तक्रारीसोबत त्याचे शपथपत्र, बियाणे खरेदीची पावती, बियाणे तक्रार निवारण समितीचा प्रक्षेत्र अहवाल व पंचनामा, सातबारा पेरा प्रमाणपत्र इ.कागदपत्र दाखल केले आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात अर्जदाराने तक्रारीत लिहिलेला मजकुर बियाणे खरेदी हद्दी पर्यंत बरोबर असुन बाकी सर्व मजकूर अमान्य केलेला आहे तसेच अर्जदाराने 2 एकर शेतात 20 क्वींटल मालाचे उत्पादन होत होते असे अतिशयोक्तीचे म्हणणे सादर करुन जास्तीची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.तसेच गैरअर्जदार क्रमांक 1 हे उत्पादक कंपनीचे एजंट असुन ते बियाणाच्या दर्जामध्ये कुठलीही ढवळाढवळ करत नाहीत गैरअर्जदारास अर्जदाराने शेताचे पंचनामा होत असतांना हजर राहण्याबाबत सुचना केली नाही व गैरअर्जदार समितीपुढे आपले म्हणणे मांडू शकला नाही.तक्रार निवारण समितीच्या क्षेत्रनिरीक्षण अहवालात पेरणीसाठी एकुण 20 कि.ग्रॅ. बियाणे वापरले असे नमुद केले आहे प्रत्यक्षात 8 कि.ग्रॅ. बियाणेच वापरले आहे त्यामुळे समितीच्या अहवालाच्या सत्यते बाबत त्याने शंका व्यक्त केली आहे. अर्जदाराने गैरकायदेशिररित्या रु.80,000/- नुकसान भरपाई मागितली असून ही तक्रार रु.5000/- इतक्या खर्चासहीत रद्द करण्याची विनंती गैरअर्जदार क्रमांक 1 ने केली आहे गैरअर्जदार क्रमांक 1 ने लेखी जबाबा सोबत त्याचे शपथपत्र, लायसेन्सची प्रत व बियाणे खरेदीची पावती दाखल केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने त्याच्या लेखी जबाबात तक्रारीतील सर्व मुद्दे नाकारले आहेत गैरअर्जदार क्रमांक 2 ने सदर संशोधीत मुग निर्मल 1 नवल प्लॉट नं.12328 च्या 2 कि.च्या पॅकींग मध्ये जालना डेपोला 225 बॅगा,पाठवल्या जालना डेपोने संतोष ट्रेडर्स जिंतूर यांना 90 व लाहोटी प्रगत शेतकरी केंद्र जवळाबाजार यांना 15 बॅगा विक्रीसाठी पावल्या त्या लॉटच्या मुग बियाणा बाबत कोणतीच तक्रार कंपनीला प्राप्त झाली नाही गैरअर्जदार क्रमांक 2 ने या लॉटचे बियाणे कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण प्रयोगशाळेत उगवण शक्ती बाबत व अनुवंशीक शुध्दते बाबत चाचणी घेवुन ते बियाणे पास झाल्यानंतरच विक्रीसाठी पाठवले या बियाण्याच्या पेरणीच्या वेळी जमीन मध्यम ते भारी निचरा होणारी व पेरणीच्या वेळी तापमान 27 ते 30 डिग्री सेल्सीयसच्या आत पाहिजे बियाणे एकरी 5 ते 6 कि.पेरणीच्या वेळी खत नत्र 20 टक्के, स्फुरद 40 टक्के, पलाश 40 टक्के या प्रमाणात द्यावे लागते तसेच निर्मल बायोपॉवर 5 कि प्रतिएकर व पेरणीपूर्व बियाण्याला निर्मल भुपरीस लावण्यात यावे.असे स्टँडर्ड टेस्ट कंडीशन कंपनीने शिफारस केलेली आहे.या गोष्टींचा पंचनाम्यात कुठेही उल्लेख नाही तसेच अर्जदाराने महाबीज, कृषी विद्यापीठ – कृषी विभाग यांच्या धोरणानुसार माती परीक्षण करणे आवश्यक आहे.तसेच तक्रार निवारण समितीने गैरअर्जदार क्रमांक 2 ना नोटीस दिलेली नसल्यामुळे पंचनामाच्या वेळेस गैरअर्जदार क्रमांक 2 हजर नव्हते तसेच अर्जदाराने बियाण्याच्या बॅगा मा.मंचापुढे सादर केल्या नाहीत व मुगाच्या बियाण्याची प्रयोगशाळा तपासणी करुन घेतली नाही. गैरअर्जदार क्रमांक 2 ने अर्जदारास कोणतीही त्रुटीची सेवा दिलेली नाही.त्यामुळे सदरील तक्रार रु.10,000/- च्या खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने लेखी जबाबा सोबत त्याचे शपथपत्र बियाणे उगवण बाबत अहवाल मुग बियाणाचे गुणधर्म,लागवडीची सुत्रे,केंद्र सरकारची किमान आधारभुत किंमत बियाणे उगवणशक्ती कमी असणे बाबतचे परिपत्रक,पिकांची लागवड पध्दती इ.कागदपत्र दाखल केली आहेत. तक्रारीत दाखल कागदपत्र व अर्जदार व गैरअर्जदारांच्या लेखी युक्तीवादा वरुन तक्रारीत निर्णयासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात. मुद्दे. उत्तर. 1 गैरअर्जदाराने खरेदी केलेले गैरअर्जदार क्रमांक 2 या कंपनीचे मुगाचे बियाणे सदोष अथवा निकृष्ट दर्जाचे होते हे सिध्द झाले आहे काय ? नाही. 2 गैरअर्जदार क्र.2 कडून याबाबतीत सेवेतील कमतरता अथवा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब झाला आहे काय? नाही. 3 अर्जदार नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? नाही. कारणे अर्जदाराने दिनांक 16/06/2010 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या दुकानातून गैरअर्जदार क्रमांक 2 यांच्या कंपनीचे मुग NUL 1 नवलच्या 12328 लॉटच्या एकुण 4 पिशव्या रु. 1200/- च्या घेतल्याचे नि.5/1 वरील पावती वरुन सिध्द होते. अर्जदाराने दिनांक 01/07/2010 रोजी खरेदी केलेल्या बियाणांची पेरणी केल्यानंतर उगवण कमी झाल्यामुळे पंचनामा करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी मानवत व गटविकास अधिकारी पंचायत समिती मानवत यांच्याकडे तक्रार अर्ज दिला.त्यानुसार त्यांनी क्षेत्र निरीक्षण अहवाल ( नि.5/2, नि.5/3) दिलेला आहे.परंतु या दोन्ही अहवाला मध्ये बियाणे विक्रेता वा बियाणे कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित असल्याचा उल्लेख नाही.वास्तविक महाराष्ट्र राज्याच्या दिनांक 12/02/2009 च्या परिपत्रकानुसार ( नि.25/13) जिल्हा तक्रार निवारण समितीच्या पाहणी दरम्यान ज्या कंपनीच्या विरुध्द तक्रार दिलेली आहे अशा कंपनीचे प्रतिनिधी व संबंधीत बियाणे विक्रेते यांना उपस्थित राहण्याच्या सुचना देण्यात याव्यात व तपासणी वेळी संबंधीत कंपनीच्या प्रतिनिधीना हजर राहणे बंधनकारक राहील व तपासणी नंतर या प्रतिनिधीची साक्ष घेणेही बंधनकारक राहील असा स्पष्ट उल्लेख आहे. तसेच नि.5/2 वरील बियाणे तक्रार निवारण समितीचा क्षेत्र निरीक्षण अहवाल पाहिला असता पेरणीसाठी वापरलेल्या बियाणाचे प्रमाण 4 बॅग 20 Kg. असे आहे.प्रत्यक्षात बियाणे खरेदी 8 कि.आहे.त्यामुळे अहवाला बाबत शंका निर्माण होते. बियाणाच्या सदोषते बद्दल अर्जदाराची तक्रार असतांना त्याने स्वतःहून किंवा कृषी अधिका-या मार्फत संबंधीत बियाणाची तपासणी करण्यासाठी ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्याची दक्षता घेतलेली दिसून येत नाही.संबंधित बियाण्याच्या प्रयोगशाळा तपासणी अहवाला खेरीज बियाणे नित्कृष्ट दर्जाचे होते अथवा सदोष होते हे कायदेशिररित्या ग्राह्य धरता येत नाही व येणारही नाही.अशा प्रकारच्या बियाणाच्या सदोषते संबंधीच्या शेतक-यांनी ग्राहक न्यायालयापुढे केलेल्या तक्रार अर्जाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य आयोगाने अपिल नं. 477/92 परशुराम वि. गोकुळ सिड्स आणि रिपोर्टेड केस 2003 (3) सी.पी.जे. पान 628 ( महाराष्ट्र) असे मत व्यक्त केले आहे की, In absence of any laboratory test No conclusim can be arrived that seed was defective.त्यामुळे अर्जदाराची प्रस्तुतची तक्रार खरी आहे हे सिध्द झालेले नाही. याउलट – गैरअर्जदार निर्मल सिड्स या कंपनीने नि.25/2 वर दाखल केलेल्या कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रण उगवण क्षमता रिपोर्ट वरुन असे सिध्द केले आहे की, त्यांनी सिड अक्ट 1996 चे नियमातील तरतुदीनुसार अर्जदाराने खरेदी केलेल्या निर्मल नवल लॉट नं.12328 चे बियाणे मार्केट मध्ये विक्रीस उपलब्ध करण्यापूर्वी प्रयोगशाळेत योग्य ती चाचणी घेवुन व तपासुन बियाणामध्ये 80 टक्के उगवण क्षमता असल्याचे रिपोर्ट वरुन स्पष्ट दिसते.या सबळ व ठोस पुराव्यामुळे सदरचे बियाणे नित्कृष्ट दर्जाचे नव्हते वा सदोष नव्हते याबद्दल कोणतीही शंका उरत नाही. गैरअर्जदार क्रमांक 1 व गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी प्रस्तुत प्रकरणात खाली नमुद केलेल्या रिपोर्टेड केसेसचा आधार घेतलेला आहे.त्यामध्ये रिपोर्टेड केस 2003(3) सी.पी.जे. 628 महाराष्ट्र राज्य आयोग रिपोर्टेड केस 2007 (2) सी.पी.जे. पान 260 ( राष्ट्रीय आयोग) रिपोर्टेड केस 2008 (2) सी.पी.आर.पान 193 (राष्ट्रीय आयोग) यामध्ये, When there was no labroatory testing report then complaint was liable to be dissmissed. व रिपोर्टेड केस 2009 (2) सी.पी.जे.पान 414 महाराष्ट्र राज्य आयोग. Field inspected by committe – Report of committee could not be acted upon as exeperts not associated as required Govt. resolution. रिपोर्टेड केस 2008 (3) सी.पी.आर.पान 260 महाराष्ट्र राज्य आयोग. Seed committe report placed on record not at all sufficient to establish inferior quality of seeds. वरील सर्व केसेस मध्ये वरीष्ठ न्यायालयांनी व्यक्त केलेली मते प्रस्तुत प्रकरणालाही लागु पडतात. अर्जदाराने खरेदी केलेल्या लॉट नंबरचे मुगाच्या बियाणाची उगवण झाली नव्हती अशाच प्रकारे अन्य लोकांच्या बाबतीतही हीच परिस्थिती झाली असाही पुरावा अगर माहितगार शेतक-यांची शपथपत्रे अर्जदाराने पुराव्यात दाखल केलेली नाहीत. वरील सर्व बाबीं वरुन व निष्कर्षा वरुन अर्जदाराने कोणत्याही सबळ पुराव्या शिवाय गैरअर्जदारां विरुध्द खोटी तक्रार केलेली आहे याबाबतीत गैरअर्जदारांकडून कोणत्याही प्रकारे अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब झालेला नाही किंवा सेवात्रुटीही झालेली नसल्याने अर्जदाराने तक्रार अर्जातून मागणी केलेली नुकसान भरपाई मिळण्यास तो पात्र नाही.म्हणून आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोंत. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 सबंधित पक्षकारांनी आपला खर्च आपण सोसावा. 3 पक्षकाराना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपट्टे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. JUSTICE C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |