Maharashtra

Kolhapur

CC/10/275

Radhysham Manikalal Zanvar - Complainant(s)

Versus

Shri.Udaym Nagari Sah Pat Sanstha and others. - Opp.Party(s)

Umesh Mangave.

13 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Execution Application No. CC/10/274
1. Sunil Dhondiram Tambekar, Kalamba Tarf Thane Tal-Karvir, Kolhapur.(Complainant in Complaint No.274/10)2. A) Shri Radheysham Maniklal Zanwar B) Sou.Shanta Radheysham Zanwar C) Shri Sachin Radheysham Zanwar D) Sou.Mamta Sachin Zanwar E) Shri Jagdish Radheysham Zanwar F) Sou.Vaishali Jagshish Zanwar,All r/o.227, C, Bhende Galli, Kolhapur. (No.2 to 6 through Authority Letter Holder, Shri Radheysham Maniklal Zanwar)(Complainants in Complaint No.275/10) ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Udhyam Nagari Sah Pat Sanstha Maryadit, KolhapurSiddhi Complex, 69, D Ward, Mahadwar Road, Kolhapur.2. Chairman.Chandrakant Ganpatrao Sawekaar.Shri.Udyam Nagari Sah Pat Sanstha.Kolhapur3. Prakash Shripatrao Charne.Charan Eng.Works.Karajgar Road.Shivaji Udyam Nagar.Kolhapur4. Chandrakant Marutirao Chorge.Modern Eng.Y.P.Powar Nagar.Kolhapur5. Nitin Surykant Miraje.Mirje Associeats,Bagal Chowk.Kolhapur6. Vilasrao Mahadevrao Waghmode.Shvshakti Pat Sanstha Ford corner.Laxmipuri.Kolhapur7. Sanjay Parshram AngadiUchagaonkar Iron Works Udyamnagar.Kolhapur8. Vikas Baburao Patil.Behind Mahadev Mandir.Gujari.Kolhapur.9. Sinil Manohar Mohite.1797 A Ward.Shivaji Peth.Kolhapur10. Arun Dayndev Khatawkar.462,B,Jadhavwadi.Kolhapur.11. Chandrakant Shamrao Jadhav.New India Moters Rajaram Road.Kolhapur12. Sou.Suhashini Digambar Ingawale.Tarabai Road.Rankala Road.Kolhapur13. Sou.Anuradha Ajit Yadav.Tarabai Road.Kolhapur14. Branch Manager.Udyam Nagari Sah Pat Sanstha 1025 E,Rajaram Road.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :Adv.Umesh Mangave for the complainants

Dated : 13 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.13.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुत ग्राहक तक्रार केस नं.274/10 275/10 या दोन्‍ही तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हेदेखील एकच असल्‍याने हे मंच दोन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीतआहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवालायांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.6 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरितसामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍यावकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रारअशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडेदामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
274/10
239
8000/-
23.01.2002
23.01.2007
16000/-
2.
--”--
1933
9000/-
28.11.2001
28.11.2006
18000/-
3.
--”--
बचत खाते क्र. 3433
36078/-
--
--
--
4.
275/10
243
9000/-
23.01.2002
23.01.2007
18000/-
5.
--”--
1937
9000/-
28.11.2001
28.11.2006
18000/-
6.
--”--
244
9000/-
23.01.2002
23.01.2007
18000/-
7.
--”--
1938
8000/-
28.11.2001
28.11.2006
16000/-
8.
--”--
245
9000/-
23.01.2002
23.01.2007
18000/-
9.
--”--
1939
8000/-
28.11.2001
28.11.2006
16000/-
10.
--”--
246
9000/-
23.01.2002
23.01.2007
18000/-
11.
--”--
1940
8000/-
28.11.2001
28.11.2006
16000/-
12.
--”--
247
8000/-
23.01.2002
23.01.2007
16000/-
13.
--”--
1941
8000/-
28.11.2001
28.11.2006
16000/-
14.
--”--
248
8000/-
23.01.2002
23.01.2007
16000/-
15.
--”--
1942
8000/-
28.11.2001
28.11.2006
16000/-

 
(4)        तक्रारदारांनी सदरच्‍या ठेवी अडीअडचणीच्‍यावेळीउपयोगी याव्‍यात या एकमेव उददेशाने ठेवलेल्‍या होत्‍या व आहेत. सदर ठेवींची मुदतसंपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केलीआहे. तथापि, सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍यानाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसानभरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबतठेवपावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखलकेले आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.6 यांनी त्‍यांच्‍याम्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍याम्‍हणण्‍यात पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला यांनी संचालकपदाचा राजीनामा जिल्‍हाउपनिबंधक, सहकारी संस्‍था, कोल्‍हापूर व सामनेवाला संस्‍थेकडे दि.25.01.2007 रोजीसुपूर्द केलेला आहे. सदरचा राजीनामा स्विकारला असल्‍याने प्रस्‍तुत सामनेवाला यांनाया कामी जबाबदार धरता येणार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार नामंजूर करणेत यावी वमानसिक/शारिरीक त्रासापोटी रुपये 50,000/- देणेबाबत तक्रारदारांना आदेश व्‍हावेतअशी‍ विनंती केली आहे.
 
(7)        सामनेवाला क्र.6 यांनी त्‍यांच्‍याम्‍हणण्‍याच्‍या पुष्‍टयर्थ दि.25.01.2007 रोजीच्‍या राजीनामा पत्राची प्रत दाखलकेली आहे.   
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीतउल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेवपावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनीठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपूनगेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहकसंरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होतआहे. सामनेवाला क्र.6 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात त्‍यांनी सामनेवालासंस्‍थेच्‍या संचालकपदाचा दि.25.01.2007 रोजी राजीनामा दिला आहे व तो स्विकारलाअसल्‍याने त्‍यांना जबाबदार धरता येत नसल्‍याचे कथन केले आहे. उपलब्‍ध कागदपत्रांचेअवलोकन केले असता सामनेवाला क्र.10 यांनी सदर कथनाच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थत्‍यांच्‍या राजीनामा स्विकारलेबाबत अगर त्‍यांना त्‍यांच्‍या जबाबदारीतून मुक्‍तकेले असलेबाबत तसेच त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यातील अन्‍य कथनांच्‍या पुष्‍टीप्रित्‍यर्थ कोणताही कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. तसेच, तक्रारदारांच्‍यावकिलांनी त्‍यांचे युक्तिवादाचेवेळी प्रस्‍तुत सामनेवाला या तक्रारदारांनीत्‍यांच्‍या ठेव रक्‍कमा या प्रस्‍तुत सामनेवाला संचालक हे संचालक पदावर कार्यरतअसताना ठेवलेल्‍या असल्‍याचे प्रतिपादन केले. त्‍यामुळे प्रस्‍तुत सामनेवाला हेसंस्‍थेचे संचालक असल्‍याने तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा व्‍याजासह परत करणेचीत्‍यांची जबाबदारी टाळू शकत नाहीत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येते. 
 
(9)        सामनेवाला क्र.1 ते 5 7 ते 14 यांना यामंचाने संधी देवूनही त्‍यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचेवर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या व्‍याजासह रक्‍कमा परत करण्‍याकरिताकोणतेही प्रामाणिक प्रयत्‍न केलेले नाहीत हे स्‍पष्‍ट दिसून येते. तसेच, सामनेवालायांनी सदर प्रकरणी म्‍हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रारमान्‍य असल्‍याचे दाखवून दिले आहे. सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमासामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍याठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारीतर सामनेवाला क्र.14 हे संस्‍थेचे कर्मचारी असल्‍याने त्‍यांची केवळ संयुक्तिक‍जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखलकेलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या दामदुप्‍पटठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळेतक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍यातारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हेमंच येत आहे.
 
(11)        तसेच, तक्रार क्र.274/10 मधील तक्रारदारांनीसामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमाठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 3433 वर दि.31.03.2010 रोजीअखेररुपये 36,078/-(रुपये छत्‍तीस हजार अष्‍ठयाहत्‍तर फक्‍त) जमा असल्‍याचे दिसूनयेते. त्‍यामुळे सदर तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कमद.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येतआहे.
 
(12)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनहीसामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचितरहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेतयाही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व ग्राहक तक्रार क्रमांकनिहाय आदेश पारीत करीतआहे.
 
आदेश
 
 
 
ग्राहक तक्रार केस नं.274/10 :-
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेतयेत.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या वसंयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांनाखालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूदतारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजद्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
देय मुदतपूर्ण रक्‍कम
व्‍याजदेय तारीख
1.
274/10
239
16000/-
23.01.2007
2.
--”--
1933
18000/-
28.11.2006

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या वसंयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारक्र.274/10 मधील तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.3433 वरील रक्‍कमरुपये 36,078/- (रुपये छत्‍तीस हजार अष्‍ठयात्‍तर फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवरदि.31.03.2010 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या वसंयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांनामानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
 
 ग्राहक तक्रार केस नं.275/10 :-
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेतयेत.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या वसंयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांनाखालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर कोष्‍टकात नमूदतारखांपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याजद्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
देय मुदतपूर्ण रक्‍कम
व्‍याजदेय तारीख
1.
275/10
243
18000/-
23.01.2007
2.
--”--
1937
18000/-
28.11.2006
3.
--”--
244
18000/-
23.01.2007
4.
--”--
1938
16000/-
28.11.2006
5.
--”--
245
18000/-
23.01.2007
6.
--”--
1939
16000/-
28.11.2006
7.
--”--
246
18000/-
23.01.2007
8.
--”--
1940
16000/-
28.11.2006
9.
--”--
247
16000/-
23.01.2007
10.
--”--
1941
16000/-
28.11.2006
11.
--”--
248
16000/-
23.01.2007
12.
--”--
1942
16000/-
28.11.2006

 
 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या वसंयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.14 यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांनामानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT