Complaint Case No. CC/21/57 | ( Date of Filing : 25 Mar 2021 ) |
| | 1. Shri.Vaibhav Wasudeo Falke | Kanyaka Mandir,Bajar ward,Chandrapur,Dist,Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Shri.Santosh M.Haldekar through Shri. Trading or Gruha udyog | R/o Sai Sadan Nagar, Shelgaon Road,tah-Naygaon,Dist-Nanded | Nanded | Maharashtra | 2. Shri.ShankarRao.M.Haldekar | R/o Sai Sadan Nagar, Shelgaon Road,tah-Naygaon,Dist-Nanded | Nanded | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक २२/०२/२०२२) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- तक्रारकर्ता यांना अगरबत्ती तयार करण्याचा व्यवसाय सुरु करण्याकरिता अगरबत्ती बनविण्यासाठी मशीन व त्याकरिता लागणारा कच्चा माल विरुध्द पक्षांच्या दुकानामध्ये उपलब्ध असल्याचे तक्रारकर्त्याला समजले. विरुध्द पक्षांनी अगरबत्ती बनविण्यासाठी पूर्ण अॅटोमॅटीक मशीन जिची उत्पादन क्षमता ३५-५० किलो प्रति आठ तास असल्यांची माहिती दिली व त्यावर तक्रारकर्त्याने विश्वास ठेवून विरुध्द पक्षांचेकडून अगरबत्ती बनविण्यासाठी पूर्ण अॅटोमॅटीक मशीन रुपये ८०,०००/- मध्ये विकत घेण्याकरिता विरुध्द पक्षांच्या सांगण्यावरुन अग्रीम रक्कम रुपये ५५,०००/- जमा केले आणि उर्वरित रक्कम चंद्रपूरला आल्यानंतर देण्याचे मान्य केले. तक्रारकर्त्याने दिनांक १२/१०/२०२० रोजी रुपये ५०,०००/- त्यांचे बॅंक ऑफ महाराष्ट्र, शाखा चंद्रपूर येथे असलेल्या खात्यातून आर.टी.जी.एस. मार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांच्या खात्यात जमा केले. रक्कम जमा झाल्यानंतर विरुध्द पक्षांनी मशीन पाठवीत असल्याचे कळविले. तसेच सोबत अगरबत्ती बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल पाहिजे असल्याबाबत तक्रारकर्त्यास कळविले म्हणून तक्रारकर्त्याने ५ क्विंटल अगरबत्ती तयार करण्यास आवश्यक असलेला मसाला,काड्या,४ प्रकारचे सुगंधीत द्रव्ये आणि पॅकिंग पेपर इत्यादी कच्चा माल पाठविण्यास सुध्दा सांगितले. तक्रारकर्त्याने सदर कच्या मालाची किंमत रुपये २५०००/- यु.पी.आय.डी. ( गुगल पे) व्दारे विरुध्द पक्षांना पाठविली त्यापैकी रुपये २०,०००/- तक्रारकर्त्याचा मिञ श्री भंवरलाल कुमावत यांचे मार्फत आणि उर्वरित रक्कम रुपये ५,०००/- तक्रारकर्त्याने स्वतः यु.पी.आय.डी. ( गुगल पे) व्दारे असे एकूण रुपये २५,०००/- विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना पाठविले आणि ती रक्कम त्यांना मिळाली. तक्रारकर्त्याने मशीनचे आणि कच्चा मालाचे पैसे पाठविल्यानंतर विरुध्द पक्षांनी दिनांक १८/१०/२०२० पर्यंत मशीन आणि कच्चा माल पाठविणे अपेक्षित होते परंतु विरुध्द पक्ष यांनी मशीन आणि कच्चा माल न पाठविल्यामुळे तक्रारकर्त्याने त्यांना दुरध्वनी व्दारे कच्चा माल व मशीन पाठविण्याची विनंती केली परंतु विरुध्द पक्ष यांनी कच्चा माल व मशीन पाठविले नाही. विरुध्द पक्षांनी मशीन व कच्चा माल न पाठविल्यामुळे तक्रारकर्ता हा मुख्य सीझनच्या वेळेस अगरबत्ती विक्री करु शकला नाही. त्यामुळे त्यांचे नुकसान झाले. विरुध्द पक्ष यांनी मशीन व कच्चा माल न पाठवून सेवेत न्युनता दर्शविली आहे. तक्रारकर्त्याने दिनांक ११/१२/२०२० रोजी वकीलामार्फत विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस पाठविली. नोटीस प्राप्त होऊनसुध्दा विरुध्द पक्ष यांनी नोटीस ची पूर्तता केलीनाही तसेच उत्तर सुध्दा दिले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचे विरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली की, विरुध्द पक्षांनी तक्रारकर्त्यास अगरबत्ती मशीन आणि कच्चा माल पाठवावे आणि ते न पाठविल्यास त्यापोटी दिलेली एकूण रक्कम रुपये ८०,०००/- द.सा.द.शे. २४ टक्के दराने देण्याचे तसेच शारीरिक व मानसिक ञासापोटी रुपये १५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १५,०००/- देण्याचे आदेश विरुध्द पक्षांना द्यावे.
- तक्रारकर्त्याची तक्रार स्वीकृत करुन विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस काढण्यात आले. विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ यांना नोटीस प्राप्त होऊनही ते आयोगासमक्ष उपस्थित झाले नाही. करिता विरुध्द पक्ष क्रमांक १ व २ विरुध्द प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक १७/२/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, आणि तक्रारकर्त्याचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ता हे विरुध्द पक्ष क्र. १ व २ यांचे ग्राहक आहेत कायॽ होय २. विरुध्द पक्ष क्रं. १ व २ यांनी तक्रारकर्त्याप्रति होय न्युनतापूर्ण सेवा दिली आहे कायॽ ३. आदेश कायॽ अंतिम आदेशाप्रमाणे मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांचेकडून अगरबत्ती बनविण्यासाठी कच्चामाल व फुली अॅटोमॅटीक मशीन जिची उत्पादन क्षमता ३५-५० किलो प्रति आठ तास आहे व त्याकरिता लागणारा कच्चा माल रुपये- ८०,०००/- मध्ये विकत घेण्याकरिता दिनांक १२/१०/२०२० रोजी तक्रारकर्त्याने त्याच्या बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक ६०१४२३५०४७८ मधून विरुध्द पक्ष क्रमांक १ श्री संतोष हलदेकर यांच्या बॅंक ऑफ इंडिया, नायगांव शाखा, खाते क्रमांक ०६५३१०११०००३६४९, आय.एफ.एस.सी. कोड बी.के.आय.डी.००००६५३ यामध्ये आर.टी.जी.एस. व्दारे रुपये ५५,०००/- जमा केले. तसेच तक्रारकर्त्याचे मिञ श्री भंवरलाल कुमावत यांचे मोबाईल व्दारे यु.पी.आय.डी. (गुगल पे) मार्फत रुपये २०,०००/- पाठविले त्याचा ट्रान्सॅक्शन आय.डी. P2010141118417206003374 आणि रुपये ५०००/- त्यांनी स्वतः यु.पी.आय.डी. (गुगल पे) मार्फत पाठविले. त्याचा ट्रान्सॅक्शन आय.डी. P2010141138405896672961 असा आहे. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षांना रक्कम पाठविल्याबाबत ट्रान्स्फर अप्लीकेशनची पोच पावती तसेच दोन्ही ट्रान्सॅक्शन आय.डी चे नक्कल प्रत प्रकरणात निशानी क्रमांक ४ सोबत दस्त क्रमांक ५ ते ७ वर दाखल केलेले आहेत . यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारीत निशानी क्रमांक ४ वर दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांनी श्री ट्रेडिंग या नावाने दिलेल्या जाहिरात दस्त क्रं.२ मध्ये विरुध्द पक्ष क्रमांक १ श्री. संतोष हलदेकर आणि विरुध्द पक्ष क्रमांक २ श्री. शंकर हलदेकर यांचे नाव तसेच दुरध्वनी क्रमांक अनुक्रमे ०९९२२८३५८५५ आणि ०९९६०१४०४०० नमूद आहेत. यावरुन तक्रारकर्त्याने,विरुध्द पक्षांनी त्यांच्या नावानिशी जाहिरात मध्ये दिलेल्या मोबाईल क्रमांक वरच गुगल पे द्वारे रक्कम रु. २५,०००/- आणि रक्कम रु. ५५,०००/- आर.टी.जी.एस द्वारे पाठविल्याचे हे तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केलेल्या, यु.पी.आय.डी.पोचपावती च्या मोबाइलद्वारे घेतलेल्या स्क्रीन शॉटची प्रत दस्त ६ व७ -आणि रक्कम रु. ५५,०००/- आर.टी.जी.एस द्वारे बँकेच्या पोचपावती दस्त क्र ५ नोंदीवरून स्पष्ट होते असे एकूण रु ८०,०००/- रक्कम विरुध्द पक्षांना आर.टी.जी.एस. आणि यु.पी.आय.डी. व्दारे प्राप्त झाल्याचे दाखल केलेल्या दस्त क्र ५ते ७ वरून सिद्ध होते . विरुध्द पक्षांना रक्कम प्राप्त झाल्यावरही त्यांनी तकारकर्त्यास उपरोक्त मशीन व कच्चा माल पाठविलेला नाही. त्यानंतर तक्रारकर्त्याने दुरध्वनी व्दारे सुध्दा विरुध्द पक्षांना उपरोक्त मशीन पाठविण्याबाबत बरेचवेळा विनंती केली. परंतु विरुध्द पक्षांनी त्याकडे दुर्लक्ष केले. तक्रारकर्त्याने दिनांक ११/१२/२०२० रोजी विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांना अधिवक्ता मार्फत कायदेशीर नोटीस पाठविली तरीसुध्दा विरुध्द पक्षांनी अगरबत्ती बनविण्याचे फुलि अॅटोमॅटीक मशीन व त्यासाठी लागणारा कच्चा माल आजपावेतो पाठविलेला नाही. तक्रारकर्त्यास मशीन न मिळाल्याने तक्रारकर्त्यांचे आर्थिक नुकसान झाले व तसेच त्याला शारिरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारकर्त्याचा आक्षेप विरुध्द पक्षांनी तक्रारीत उपस्थित राहून खोडून काढलेला नाही तसेच आपल्या बचावाचे समर्थनार्थ कोणतेही म्हणणे प्रकरणात दाखल केले नाही. यावरुन विरुध्द पक्षांनी रक्कम प्राप्त झाल्यावरही तक्रारकर्त्यास उपरोक्त मशीन न पाठवून तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता दर्शविली आहे. हे दाखल दस्तवेजांवरुन सिध्द होते, या निष्कर्षाप्रत आयोग आले आहेत. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षांकडून अगरबत्ती बनविण्याची मशीन व कच्च्या मालाकरिता दिलेली एकूण रक्कम रु. ८०,०००/- तसेच आर्थिक ,शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसानभरपाई आणि तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते. परंतु विरुध्द पक्षांनि तक्रारकर्त्याला मशीन न पाठविल्याने त्याचे किती नुकसान झाले याबाबत कोणताही दस्तावेज दाखल केलेला नाही .परंतु तक्रारकर्त्याचे मशीन न मिळाल्याने आर्थीक नुकसान झाले त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्ष क्रं.1 व 2 कडून उचीत नुकसान भरपाई मिळण्यास पाञ आहे. सबब मुद्दा क्रमांक २ चे उत्तर हे होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक ३ बाबतः- - मुद्दा क्रमांक १ व २ च्या विवेचनावरुन आयोग खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. २१/५7 अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांनी वैयक्तिक व संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला रक्कम रु.८०,०००/- परत करावे .
- विरुध्द पक्ष क्र.१ व २ यांनी वैयक्तिक वा संयुक्तरीत्या तक्रारकर्त्याला आर्थीक नुकसान, शारीरिक व मानसिक ञासापोटी एकत्रीत नुकसान भरपाई रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभय पक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात याव्यात.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |