Shri.Sawji Pundlik Shirsat, filed a consumer case on 25 Nov 2010 against Shri.Rajesh Chhaganbhai Patel,Prop.Raj Builders, in the Aurangabad Consumer Court. The case no is EA/09/1 and the judgment uploaded on 30 Nov -0001.
Smt. Anjali L. Deshmukh ,PRESIDENT Smt.Rekha Kapadiya ,MEMBER
PRESENT :
Shri.S.R.Jadhav., Advocate for Appellant
Adv.Rahul Joshi, Advocate for RespondentAdv.S.M.Jondhale, Advocate for Respondent
Dated : 25 Nov 2010
JUDGEMENT
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
तक्रारदारातर्फे अड एस.आर.जाधव हजर सोबत तक्रारदार हजर वि प 2 तर्फे अड. राहूल जोशी हजर. वि प 3 तर्फे अड.जोंधळे हजर. वि प 1 गैरहजर. मंचानी सर्व कागदपत्राची पाहणी केली. त्यावरुन श्री.राजेश कपाडिया हे मुळ तक्रारीत पक्षकार नसल्यामुळे त्यांना अंमलबजावणी अर्जात पक्षकार करता येत नाही. या कारणावरुन आज रोजी पक्षकार म्हणून वगळण्यात येत आहे.
प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये मंचानी गैरअर्जदार क्र.1 आणि 2 बिल्डर्स आणि मालक यांनी, तक्रारदाराच्या सदनिकेचे नोंदणीकृत खरेदी खत करुन द्यावे. तसेच मानसिक त्रासापोटी म्हणून रु.10,000/-, तक्रारीचा खर्च म्हणून रु.1,000/- द्यावे. आणि गैरअर्जदार क्र.3 सिडको यांनी, तक्रारदारांनी नोंदणीकृत खरेदी खताची प्रत दिल्यानंतर 6 आठवडयाच्या आत तक्रारदारास सदनिका हस्तांतरीत करुन द्यावे असा आदेश दिला होता. तक्रारदारांनी त्यांच्या सदनिकेच्या नोंदणीकृत खरेदी खताची प्रत दि.15 जानेवारी 2010 रोजी सिडको ऑफीसमध्ये दिली. त्याचबरोबर एन.ओ.सी., बेटरमन चार्जेस, एन.ए.चार्जेस आणि प्रतिज्ञापत्र दिले, हे प्रतिज्ञापत्र सिडकोच्या विहीत नमुन्याप्रमाणे देण्यात आले, त्यानंतर साधारण एप्रिल 2010 मध्ये असोसिएशन व अपार्टमेन्टची प्रत सिडको ऑफीसला देण्यात आली, तरी सुध्दा सिडकोने केवळ पुर्णत्वाचे प्रमाणपत्र नसल्यामुळे तक्रारदाराची सदनिका हस्तांतरीत करुन देत नाही असे सांगितले. सिडकोचे अडव्होकेट जोंधळे यांनी सदनिका हस्तांतरण करण्यासाठी लागणारे नियम, अटी व शर्ती दाखल केल्या आहेत. त्यामध्ये बिल्डर्सनी पुर्णत्वाचे प्रमाणपत्र द्यावे असा एक क्लॉज आहे. प्रस्तुतच्या प्रकरणामध्ये राज बिल्डर्सची पॉवर ऑफ अटर्नी, मेसर्स, ग्लेटलेजर (इंडिया) या कंपनीने सन 1997 मध्ये काढून घेतली. तसेच जागेचे मालक जे.के.मोरारजी मुख्य व्यवस्थापक यांचे दि.20.08.2008 रोजी निधन झाले. तक्रारदारानी, सोसायटी फॉर्म किंवा असोसिएशन ऑफ अपार्टमेन्ट केल्याचा पुरावा सिडको ऑफीसमध्ये नेऊन दिलेला आहे, त्या अपार्टमेन्टचे काम पूर्ण झालेले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी तक्रारदारानी सिडकोला विनंती अर्ज दिलेला आहे. मंचाच्या मते तक्रारदारानी सिडकोकडे आवश्यक ती कागदपत्रे दिलेली आहेत. फक्त बांधकाम पूर्ण झाले आहे किंवा नाही हाच मुददा शिल्लक राहिलेला आहे, अशा परिस्थितीत तो सिडको ऑफीसने अपार्टमेन्टची पाहणी करुन स्वतःच बांधकाम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र तयार करावे, आणि तक्रारदारास मंचाच्या आदेशानुसार सदनिका हस्तांतरीत करुन द्यावी. हे सर्व 6 आठवडयाच्या आत करावे. अशाप्रकारे हे प्रकरण बंद करण्यात येत आहे. हाच आदेश दरखास्त क्र.1/09, 2/09, 3/09 मध्ये पारित करण्यात आला.
श्रीमती रेखा कापडिया श्रीमती अंजली देशमुख
सदस्य अध्यक्ष
[ Smt.Rekha Kapadiya] MEMBER[ Smt. Anjali L. Deshmukh] PRESIDENT
Consumer Court Lawyer
Best Law Firm for all your Consumer Court related cases.