Complaint Case No. CC/21/174 | ( Date of Filing : 07 Oct 2021 ) |
| | 1. Shri.Nilesh Charanwas Jivne | R/o.Samta Colony,Vidya Vihar Convent Road,S.T.Workshop Chowk Road,S.T workshop Chowk Tukum,Chandrapr | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Shri.Pankaj Ravindra.Aksapure | R.o.Dilip Somalwar,Near Hanuman Mandhir,Indira Nagar,Mul Road,Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्या) (पारित दिनांक २०/०७/२०२२) - तक्रारकर्त्याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ अन्वये दाखल केली आहे.
- तक्रारकर्ता वरील नमूद पत्त्यावर राहत असून त्यांनी त्यांच्या मालकीच्या मौजा देवई गोविंदपूर रैय्यतवारी येथील त.सा.क्र.११, सर्व्हे क्रमांक १०७/१ग, १०७/१घ मधील प्लॉट क्रमांक १० वरील राहत्या घराच्या वरच्या मजल्याचे नकाशामध्ये दर्शविल्याप्रमाणे बांधकाम करण्याचा ठेका व सोबत तक्रारकर्त्याचे वडील श्री चरणदास जीवने यांच्या खालच्या मजल्याचे संपूर्ण मटेरियल, मजुरीसह बांधकाम करण्यासाठी ठेका इंजिनियर श्री अक्षय वासनिक यांना दिनांक २८/१०/२०२१ रोजी रक्कम रुपये १०,७५,०००/- ला दिला होता व विरुध्द पक्ष हे श्री वासनिक यांचेकडे सिव्हील ठेकेदार म्हणून त्याचे साईट वरचे संपूर्ण बांधकाम त्याचे मजूर लावून करीत होते. तक्रारकर्त्याचे घराचे बांधकाम करण्याचा संपूर्ण मटेरियल व मजुरीसह श्री वासनिक यांना देण्यात आले होते व त्यांनी तक्रारकर्त्याच्या घराचे बांधकाम चालु केले त्यावेळी विरुध्द पक्ष स्वतः आपले मजुरांचे मार्फतीने ते काम करीत होते म्हणजेच श्री वासनिक यांचे संपूर्ण सिव्हील बांधकामाचे काम विरुध्द पक्ष हे ठेकेदार म्हणून करीत होते परंतु श्री वासनिक यांनी तक्रारकर्त्याचे घराचे काम अर्ध्यातच म्हणजे जानेवारी २०२१ मध्ये सोडून दिले व त्यांची पूर्ण कल्पना विरुध्द पक्ष यांना दिली. श्री वासनिक यांनी मधातूनच काम सोडल्यामुळे तक्रारकर्ता दुस-या ठेकेदारच्या शोधात होते तेव्हा विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला स्वतःहून उरलेले काम काही रक्कम वाढवून दिल्यास संपूर्ण मटेरियल व मजुरीसह करण्यास तयार आहे असे सांगितले म्हणून तक्रारकर्त्याने त्याच्या म्हण्णण्याला होकार दिला व त्यानुसार उरलेल्या घराचे बांधकामाचा ठेका विरुध्द पक्ष यांना ६,०५,०००/- व तक्रारकर्त्याचे वडील त्यांच्या घराचे उर्वरित बांधकामाकरिता ३,२०,०००/- असे एकूण रुपये ९,२५,०००/- ला संपूर्ण मटेरियल व मजुरीसह करण्याचे ठरुन त्यानुसार दिनांक २४/०१/२०२१ रोजी उर्वरित बांधकामाचा करारनामा केला व तो विरुध्द पक्ष यांना बंधनकारक होता. त्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांना घराचे बांधकाम जानेवारी २०२१ मध्ये सुरु केले व ते मे २०२१ पर्यंत नियमीत केले नंतर माञ त्यांना परवडतच नाही म्हणून बांधकाम अपूर्ण सोडून दिले. यासंदर्भात वारंवार त्यांना संपर्क तक्रारकर्त्याने साधला एवढेच नाही तर परवडत नसेल तर रक्कम वाढवून देण्याची तयारी दर्शविली परंतु विरुध्द पक्ष यांनी टाळाटाळ केली म्हणून तक्रारकर्त्याने दिनांक २/७/२०२१ रोजी रजिस्टर पोस्टाने उर्वरित काम पूर्ण करण्यासाठी विरुध्द पक्ष यांना पञ पाठविले परंतु विरुध्द पक्ष यांनी पञाला दाद दिली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याने पोलीस ठाण्यात विरुध्द पक्षाविरुध्द तक्रार दिली असता विरुध्द पक्ष यांनी पोलीसांसमोर होकार दिला परंतु त्यानंतरही बांधकाम करुन दिले नाही उलट पोलिसात तक्रार केली म्हणून ‘बघुन घेईल’ म्हणून धमकी दिली. तक्रारकर्त्याने आतापर्यंत करारनाम्याची एकूण रक्कम रुपये ९,२५,०००/- रकमेपैकी रक्कम रुपये ७,४०,५७८/- दोन्ही काम मिळून वेळोवेळी मटेरियल किंवा मजुरी म्हणून विरुध्द पक्ष यांना दिली आहे. व उर्वरित रुपये १,८४,४२२/- बाकी आहेत.
- तक्रारकर्त्याचे तक्रारीत पुढे म्हणणे आहे की, बांधकामाला किती मजूर किंवा मटेरियल लागले याची पूर्ण कल्पना विरुध्द पक्ष यांना होती. त्याप्रमाणे दिनांक २४/०१/२०२१ च्या करारात टीप मध्ये तसे नमूद असून विरुध्द पक्ष यांनी बांधकाम मध्येच अपूर्ण सोडल्यास किंवा करारनाम्याचा भंग केल्यास करारनाम्याची संपूर्ण रक्कम २ टक्के चक्रवाढ व्याजासहीत विरुध्द पक्ष परत करतील असे नमूद आहे. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याच्या घराचे काम निकृष्ठ दर्जाचे केले असून जास्त नफ्याच्या लालसेने ते मध्येच काम सोडून गेले अशा त-हेने तक्रारकर्त्याची विरुध्द पक्ष यांनी फसवणूक करुन सेवेत न्युनता दिली आहे त्यामुळे तक्रारकर्त्याला नाईलाजास्तव दुस-याकडून काम पूर्ण करुन घ्यावे लागत आहे. सबब तक्रारकर्त्याने दिनांक १/९/२०२१ रोजी विरुध्द पक्ष यांना त्याचे वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून १५ दिवसाच्या आत रुपये ९,२५,०००/- द्यावे असा नोटीस पाठविला परंतु विरुध्द पक्ष यांनी नोटीसला खोट्या आशयाचे उत्तर दिले व मागण्या अमान्य केल्या. अशा प्रकारे विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला सेवेत न्युनता दिली असल्यामुळे तक्रारकर्त्याला आयोगापुढे तक्रार दाखल करावी लागली.
- तक्रारकर्त्याने तक्रारीत विरुध्द पक्षाविरुध्द अशी मागणी केली आहे की, दिनांक २४/०१/२०२१ रोजी झालेल्या करारनाम्यानुसार नुकसान भरपाई द्यावी तसेच अर्धवट काम सोडून गेल्यामुळे तक्रारकर्त्याला दुस-या व्यक्तीकडून उर्वरित काम करुन घेण्यासाठी तक्रारकर्त्याला लागलेला खर्च रुपये ५,००,०००/- विरुध्द पक्ष यांनी द्यावे आणि तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये २५,०००/- देण्याचे आदेशीत व्हावे.
- विरुध्द पक्ष यांना आयोगामार्फत नोटीस काढण्यात आले असता नोटीस प्राप्त होऊनही आयोगात हजर न झाल्यामुळे दिनांक २३/१२/२०२१ रोजी विरुध्द पक्षा विरुध्द एकतर्फा कारवाईचा आदेश पारित करण्यात आला.
- तक्रारकर्त्याची तक्रार, दस्तावेज यावरुन तक्रार निकाली काढण्याकरिता खालील निष्कर्ष व त्यावरील कारणमीमांसा कायम करण्यात आले.
कारणमीमांसा - तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे अवलोकन केले असता निशानी क्रमांक ४ वरील दस्तऐवजाच्या यादीप्रमाणे त्यांनी सहा कागदपञे दाखल केलेली आहेत. त्यातील दस्त क्रमांक १ बांधकाम करारनामा चे अवलोकन कले असता तक्रारकर्त्याच्या व त्याचे वडीलाच्या घराचे बांधकाम एकूण रुपये ९,२५,०००/- मध्ये विरुध्द पक्ष यांनी करुन देण्याचे ठरले व त्याप्रमाणे करारनाम्यात बांधकामाचे विवरणही नमूद केलेले आहे. तसेच उपरोक्त बांधकामासाठी पेमेंट कसे दिले जाईल त्याबद्दलचे विवरण करारनाम्यात दिलेले आहे. पेमेंट विवरणानुसार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना रुपये ९२५,०००/- मधून रुपये ७,४०,५७८/- दिलेले असून फक्त रुपये १,८४,४२२/- इतकी रक्कम देणे बाकी होते परंतु विरुध्द पक्ष यांनी करारनाम्यानुसार तक्रारकर्त्याचे घराचे बांधकाम पूर्ण न करता अर्ध्यावरच तसेच सोडून दिले असे तक्रारकर्त्याचे तक्रारीत म्हणणे आहे परंतु तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना बांधकामापोटी रक्कम रुपये ७,४०,५७८/- देऊनही कुठपर्यंत काम केले याबद्दल काहीही खुलासा केला नाही. तक्रारकर्त्याने मौखीक तसेच दस्त क्रमांक ३ नुसार दिनांक २/७/२०२१ रोजी विरुध्द पक्ष यांना रजिस्टर पोस्टाव्दारे पञ पाठवून बांधकाम पूर्ण करुन द्यावे असे सांगितले परंतु विरुध्द पक्ष यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष त्याच्या बांधकामाचे टाळाटाळ करतात हे लक्षात येताच विरुध्द पक्ष यांची दस्त क्रमांक ४ नुसार रामनगर पोलीस स्टेशन येथे तक्रार केली त्याप्रमाणे विरुध्द पक्ष यांनी बांधकामास तयारी दर्शविली परंतु त्यानुसार काही केले नाही. तक्रारकर्त्याने तक्रारीत नमूद केले की उरलेले बांधकाम त्यांनी दुस-या व्यक्तीकडून पूर्ण करुन घेतले व त्यासाठी त्यांना अतिरिक्त रक्कम मोजावी लागली. तक्रारकर्त्याने त्याची बाजु सिध्द करण्यासाठी तक्रारीत पुरावा दाखल श्री अजय व्ही पालारपवार, अभियंता यांचे शपथपञासहीत त्याचे तक्रारकर्त्याच्या घराचा आढावा घेऊन त्याबद्दलचा अहवाल दाखल केला असून त्याबद्दलचे घराचे छायाचिञही तक्रारीत अहवालासोबत दाखल आहेत. या अहवालात विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याचे अर्धवट घराचे काम सोडल्यानंतर तक्रारकर्त्याने दुस-या व्यक्तीकडून सदर घराचे काम पूर्ण करुन घेतले त्याबद्दल किती खर्च तक्रारकर्त्यास आला त्याचे विवरण नमूद आहे. तसेच सदर अहवालात श्री पालारपवार अभियंता यांनी तक्रारकर्त्याच्या म्हणण्यानुसार विरुध्द पक्ष हे कोणत्या स्टेज ला अर्धवट बांधकाम सोडून गेले व त्यानंतर दुस-या व्यक्तीकडून त्यांनी पूर्ण बांधकाम करुन घेतले व ते बांधकाम पूर्ण करण्यास त्यांना खर्च रुपये ५,३५,०००/- अंदाजे खर्च लागला ही बाब नमूद आहे. श्री पालारपवार यांनी त्याच्या अहवालासोबत बांधकाम पूर्ण झाल्याचे फोटो तक्रारीत दाखल आहेत. याउलट विरुध्द पक्ष यांना आयोगामार्फत नोटीस प्राप्त होऊनही त्यांनी प्रकरणात उपस्थित राहून तक्रारकर्त्याच्या कथनाचे खंडन केले नाही अशा परिस्थितीत आयोगाच्या मते तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना करारात ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन न देऊन अनुचित व्यापार पध्दतीचा अवलंब केलेला आहे ही बाब वरील दाखल सर्व दस्तऐवजावरुन स्पष्ट दिसून येत आहे. निशानी क्रमांक ४, दस्त क्रमांक १ नुसार करारनामा उभयपक्षामध्ये झालेला असूनही तसेच विरुध्द पक्ष यांनी ठरल्याप्रमाणे बांधकाम पूर्ण करुन न दिल्यामुळे तक्रारकर्त्याप्रति सेवेत न्युनता केलेली आहे हे सिध्द होत आहे. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रार क्रमांक १७४/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला अपूर्ण बांधकाम पूर्ण करण्यासाठी लागलेली रक्कम रुपये ५,३५,०००/- व त्यावर ६ टक्के व्याज आदेशाच्या दिनांकापासून ते प्रत्यक्ष अदायगीपर्यंत द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी रक्कम रुपये १०,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावे.
(किर्ती वैद्य (गाडगीळ)) (कल्पना जांगडे (कुटे)) (अतुल डी. आळशी) सदस्या सदस्या अध्यक्ष | |