Maharashtra

Kolhapur

CC/10/661

Baburao Maruti Jadhav - Complainant(s)

Versus

Shri.Panchganga Nagari Sahakari Patsanstha Maryadit - Opp.Party(s)

H.P.Randive

22 Mar 2011

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/661
1. Baburao Maruti JadhavShiye, Tal.Karvir Dist.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri.Panchganga Nagari Sahakari Patsanstha MaryaditShiye,Tal.Karveer, Dist.Kolhapur through - Secretary Kumar Baburao Ingawale2. Shri. Panchganga Nagari Sahakari Patsanstha Maryadit, ShiyeBr.Shiroli M I D C Tal.HatkangaleKolhapur3. Tanaji Pilu ShindeShiye, Tal.KarvirKolhapur4. Sopan Shripati ParitShiye, Tal.KarvirKolhapur5. Sarjerao Ganpati KashidShiye, Tal.KarvirKolhapur6. Jagnnath Mahadev BugaleShiye, Tal.KarvirKolhapur7. Balkrishna Maruti JadhavShiye, Tal.KarvirKolhapur8. Bajirao Yashwant PatilShiye, Tal.KarvirKolhapur9. Kashinath Bhau KambaleShiye, Tal.KarvirKolhapur10. Balaso Yashwant ShindeShiye, Tal.KarvirKolhapur11. Mangu Biru ShisalShiye, Tal.KarvirKolhapur12. Shivaji Ramu ChougaleShiye, Tal.KarvirKolhapur13. Sau.Sushila Jaysing IngavaleShiye, Tal.KarvirKolhapur14. Avdhut Vishnu Patil & Sangar Vishnu Patil, Legal heir of Vishnu Ganapati PatilShiye, Tal.Karvir, Dist.Kolhapur.15. Chandrakant Baburao Jadhav & Nandkumar Baburao Jadhav, Legal heir of Baburao Tatoba JadhavAll r/o. Shiye, Tal.Karvir, Dist.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :

Dated : 22 Mar 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.22.03.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1 यांनी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.3 ते 15 हे प्रस्‍तुत प्रकरणी वकिलामार्फत हजर झाले आहेत, परंतु त्‍यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, दोन्‍ही बाजूंचे पक्षकार तसेच त्‍यांचे वकिल गैरहजर आहेत. त्‍यामुळे हे मंच प्रस्‍तुतची तक्रार उपलब्‍ध कागदपत्रांच्‍या आधारे गुणावगुणावर निकाली काढीत आहे.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           प्रस्‍तुत सामनेवाला क्र;1 ही महाराष्‍ट्र सहकारी कायद्याप्रमाणे अस्तित्‍त्‍वात आलेली संस्‍था आहे. सामनेवाला क्र. 3 ते 13 यातील तक्रारदारांनी स्‍वत:चे व आपले कुटुंबियांचे नांवे सामनेवाला पतसंस्‍थेकडे दामदुप्‍पट, दामदिडपट ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदतपूर्ण रक्‍कम
1.
92
10000/-
26.02.2003
26.08.2007
20000/-
2.
93
5000/-
26.02.2003
26.08.2007
10000/-
3.
95
5000/-
26.02.2003
26.08.2007
10000/-
4.
40
10000/-
18.08.2003
18.12.2008
20000/-
5.
41
10000/-
18.08.2003
18.12.2008
20000/-
6.
42
10000/-
18.08.2003
18.12.2008
20000/-
7.
1849
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
8.
1850
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
9.
1851
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
10.
1852
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
11.
2780
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
12.
2781
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
13.
2782
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
14.
2783
20000/-
08.09.2005
08.09.2009
30000/-
15.
90
1500/-
08.01.2004
08.05.2009
3000/-
16.
97
10000/-
13.11.2004
13.05.2011
20000/-
17.
98
10000/-
13.11.2004
13.05.2011
20000/-
18.
253
44671/-
--
--
--
19.
267/8
7050/-
--
--
--
20.
254/8
15300/-
--
--
--

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदारांची आर्थिक परिस्थिती अत्‍यंत बेताची असून त्‍यांना  सदर रक्‍कमांची नितांत आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.02.11.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. सदरच्‍या रक्‍कमा परत करणेची सामनेवाला यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.1 संस्‍थेने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, प्रस्‍तुत सामनेवाला संस्‍था जसजशी रक्‍कम वसूल होईल तसतशी ठेवीदारांच्‍या ठेवी अदा करत आहे; तक्रारदारांनी त्‍यांच्‍या ठेवी संस्‍थेवरील विश्‍वासापोटी संस्‍थेमध्‍ये ठेवलेल्‍या होत्‍या व सदरच्‍या ठेवी अदा करणेस संस्‍था स्‍वत: जबाबदार आहे. सामनेवाला संस्‍थेचे वेळावेळी शासकिय लेखापरिक्षण झालेले असून त्‍यामध्‍ये संचालक मंडळाने कोणतेही गैरकृत्‍य केलेचे नमूद नाही. संस्‍थेचे संचालकांना जबाबदार धरता येणार नाही, म्‍हणून तक्रार अर्जाच्‍या जबाबदारीतून संचालक मंडळाला वगळणेत यावे. तसेच, तक्रारीत मागणी केलेल्‍या संपूर्ण रक्‍कमा या तक्रारदारांच्‍या वैयक्तिक नांवच्‍या नाहीत. त्‍यामुळे इतर लोकांच्‍या ठेवी तक्रारदारांना मागणेचा हक्‍क व अधिकार नाही. सबब, संचालक मंडळाला वैयक्तिकरित्‍या संस्‍थेव्‍यतिरिक्‍त जबाबदारीतून मुक्‍त करणेत यावे व जसजशी रक्‍कम वसूल होईल तसतशी रक्‍कम अदा करणेस संस्‍थेस सवलत मिळावी अशी विनंती केली आहे.
 
(6)        सामनेवाला क्र.14 व 15 यांनी त्‍यांचे एकत्रित म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, ग्राहक संरक्षण कायद्यामध्‍ये प्रस्‍तुत सामनेवाला यांना सामनेवाला म्‍हणून सामील करण्‍याची कोणतीही तरतुद नसल्‍याने प्रस्‍तुत सामनेवाला यांना वगळणेत यावे.  प्रस्‍तुत सामनेवाला यांचे मयत वडिल सामनेवाला संस्‍थेमध्‍ये संचालक होते हे म्‍हणणे खोटे आहे. तक्रारदारांच्‍या रक्‍कमांशी प्रस्‍तुत सामनेवाला यांचा काहीही संबंध नसताना नाहक पक्षकार केलेने त्‍यांना प्रस्‍तुत तक्रारीतून वगळणेत यावे व मानसिक-शारिरीक-आर्थिक त्रासापोटी रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्‍हावेत अशी विनंती केली आहे.
 
(7)        या मंचाने तक्रारदारांची तक्रार, सामनेवाला यांचे म्‍हणणे व उपलब्‍ध कागदपत्रे यांचे अवलोकन केले आहे. प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेमध्‍ये दामदुप्‍पट ठेव ठेवली आहे व त्‍याची मागणी करुनही सामनेवाला यांनी ठेव रक्‍कमा व्‍याजासह दिलेल्‍या नाहीत. त्‍यामुळे प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. सामनेवाला संस्‍थेने सामनेवाला संचालक मंडळावर सदर रक्‍कमा देणेची कायद्याने कोणतीही जबाबदारी त्‍यांचेवर येत नसल्‍याचे प्रतिपादन केले आहे. वस्‍तुस्थितीचा विचार करता तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे दामदुप्‍पट ठेव रक्‍कम ठेवली आहे व दि.02.11.2010 रोजी नोंद पोच डाकेने मागणी केली आहे व मागणी करुनही सदर रक्‍कम सामनेवाला संस्‍थेने दिलेली नाही. त्‍यामुळे सदर ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र. 2 ते 12 यांची वैयक्तिक जबाबदारी रक्‍कम देणेबाबत आहे असे तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत कथन केले आहे. परंतु, महाराष्‍ट्र सहकारी संस्‍था अधिनियम 1960, कलम 73 (ए) व (बी), कलम 78, 88 यातील तरतुदीचा विचार केला असता संस्‍थेच्‍या कामकाजासंदर्भात वैयक्तिक जबाबदारी निश्चित करणेबाबतचे अधिकार सहकार निबंधकांना आहेत. याचा विचार करता तक्रारदारांनी प्रस्‍तुत सामनेवाला यांची त्‍याप्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केलेली आहे. तसेच, सामनेवाला संस्‍थेचे ऑडीट होवून सदर सामनेवाला यांचे सदर कलम 88 प्रमाणे वैयक्तिक जबाबदारी निश्चित केली आहे याबाबत कोणताही पुरावा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.2 ते 12 यांची ठेव रक्‍कम व्‍याजासह देणेबाबत वैयक्तिक जबाबदारी येत आहे याबाबतचा तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीत केलेले कथन हे मंच फेटाळत आहे. परंतु, ठेव रक्‍कमा व्‍याजासह देणेची जबाबदारी ही सामनेवाला क्र.1 संस्‍थेची येत आहे. सदर विवेचनास पूर्वाधार म्‍हणून मा.ना.उच्‍च न्‍यायालय, मुंबई (औरंगाबाद खंडपीठ) यांनी रिट पिटीशन नं.5223/2009 - सौ.वर्षा रविंद्र ईसाई वि. राजश्री राजकुमार चौधरी वगैरे - आदेश दि.22.12.2010 याचा आधार हे मंच घेत आहे. सदर पूर्वाधारातील महत्‍त्‍वाचा मुद्दा खालीलप्रमाणे :-
 
“The complaint can be instituted against the society before the Consumer Forum by a depositor or a member of the society and a relief can also be granted as against the society. However, so far as members of the managing committee/directors are concerned, they stand on a different footing and unless the procedure prescribed under the special enactment i.e. Maharashtra Co-operative Society Act, 1960 is followed and unless the liability is fixed against them, they cannot be held responsible in respect of payment of any dues recoverable from the society.”
 
(7)        प्रस्‍तुतची तक्रार चौकशीकरिता असताना तक्रारदारांनी तक्रार दुरुस्‍ती अर्ज दाखल केला. तथापि, सदर अर्जावर तक्रारदारांनी स्‍टेप्‍स् घेतल्‍या नाहीत. त्‍यामुळे सदर दुरुस्‍ती अर्जावर कोणतेही आदेश पारीत झालेले नाहीत.  
 
(8)        सामनेवाला संस्‍थेने त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात तक्रारीत मागणी केलेल्‍या ठेव रक्‍कमा या तक्रारदारांच्‍या नांवे नसल्‍याने त्‍यांना सदर ठेवी मागणेचा अधिकार नसलेचे कथन केले आहे. तक्रार अर्जाचे व ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता प्रस्‍तुत प्रकरणी दाखल असलेल्‍या ठेव पावत्‍यांपैकी ठेव पावती क्र.1849, 2782 व 97 या ठेव पावत्‍याच केवळ तक्रारदारांच्‍या नांवाच्‍या असल्‍याचे दिसून येते. उर्वरित ठेव पावत्‍या या तक्रारदारांच्‍या कुटुंबियांच्‍या नांवे असल्‍याचे दिसून येते. सदर तक्रारदारांचे कुटुंबिय ठेवीदार हे तक्रारदार म्‍हणून प्रस्‍तुत कामी सामिल नाहीत.   तक्रारदारांना इतर ठेवीदारांच्‍या ठेव रक्‍कमा मागणीबाबत वैध स्थिती (Locus-standi)येत नाही.  त्‍यामुळे तक्रारदारांना इतर ठेवीदारांच्‍या ठेव रक्‍कमांची मागणी करता येणार नाही. सबब, तक्रारदार हे केवळ त्‍यांचे नांवे असलेल्‍याच ठेव पावत्‍यांच्‍या, सेव्‍हींग खात्‍याच्‍या व पिग्‍मी खात्‍याच्‍या रक्‍कमा व्‍याजासह मिळणेस प्रस्‍तुतचे तक्रारदार पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. 
 
(9)        तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता ठेव पावती क्र. 1849 व 2782 या दामदिडपट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर दामदिडपट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेली ठेव पावती क्र.97 चे अवलोकन केले असता सदर ठेव पावती ही दामदुप्‍पट ठेवीची असून तिची मुदत अ़द्याप पूर्ण झालेली नाही असे दिसून येते. म्‍हणजेच तक्रारदारांनी सदर ठेव रक्‍कमांची मुदतपूर्व मागणी केलेचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर ठेव पावती क्र.97 ची रक्‍कम ही भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार सदर ठेव पावतीची तक्रार दाखल दि.10.12.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का वजाजाता होणा-या व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत.
 
(11)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 253 वर दि.14.12.2007 रोजीअखेर रुपये 44,671/- जमा असल्‍याचे दिसून येते. तसेच, पिग्‍मी ठेव खाते क्र.267/8 वर दि. 22.08.2007 रोजीअखेर रुपये 7,050/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील व पिग्‍मी खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(12)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदिडपट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.08.09.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
दामदुप्‍पट रक्‍कम
1.
1849
30000/-
2.
2782
30000/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना दामदुप्‍पट ठेव पावती क्र.97 वरील रक्‍कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर भारतीय रिझर्व्‍ह बँकेच्‍या मार्गदर्शक तत्‍त्‍वानुसार ठेव तारखेपासून सदर ठेव पावतीची तक्रार दाखल दि. 10.12.2010 रोजीअखेर जितकी मुदत पूर्ण झाली आहे, त्‍या मुदतीकरिता देय असणा-या व्‍याजदरातून द.सा.द.शे.1 टक्‍का व्‍याज वजाजाता होणारे व्‍याज द्यावे व दि.11.12.2010 रोजीपासून सदर रक्‍कमांवर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.253 वरील रक्‍कम रुपये 44,671/- (रुपये चव्‍वेचाळीस हजार सहाशे एक्‍काहत्‍तर फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.14.12.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(5)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना त्‍यांच्‍या पिग्‍मी ठेव खाते क्र.267/8 वरील रक्‍कम रुपये 7,050/- (रुपये सात हजार पन्‍नास फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.22ऋ8.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
 
(6)   सामनेवाला क्र.1 संस्‍थेने तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT