Complaint Case No. CC/21/58 | ( Date of Filing : 31 Mar 2021 ) |
| | 1. Smt.Nanda Latari Telang | Shakti nagar,Durgapur Tah.Dist.Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Shri.Nilesh Narayan Polewar | Arvind Nagar Chowk,Gurudwara road,Sarkar Nagar,Chandrapur,Tah.Dist.Chandrapur | Chandrapur | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | :::नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये,सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक २७/०२/२०२३) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा,२०१९ चे कलम३५ सह ३८अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- विरुध्द पक्षाचा जमीनी विकत घेऊन विकसीत करुन भुखंड, फ्लॅट व डुप्लेक्स तयार करुन विकण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्ती ही दुर्गापूर येथे वास्तव्यास असून तिला मुलाच्या शिक्षणाकरिता चंद्रपूर येथे घर विकत घ्यावयाचे होते. त्यामुळे तक्रारकर्ती व तिचे पती घराचे शोधात असतांना त्यांना चंद्रपूर येथे जेट किंगडम च्या नावाने असलेला रो हाऊस च्या स्कीमच्या जाहिरातीचे बॅनर दिसले व ते बघून त्यांनी विरुध्द पक्षाशी संपर्क साधला असता त्यांनी स्कीम समजवून सांगितल्यानंतर तक्रारकर्ती व तिचे पती यांनी मौजा देवाडा येथील भुखंड क्रमांक ५, सर्व्हे क्रमांक १३०/२ब, एकूण आराजी ७७.०० चौरस मीटर ‘डुप्लेक्स’, विरुध्द पक्ष यांच्याकडून एकूण मोबदला रक्कम रुपये १८,५०,०००/- मध्ये खरेदी करण्याकरिता दिनांक २१/७/२०१५ रोजी पंजीकृत करारनामा केला व दिनांक ३१/०३/२०१८ रोजी पंजीकृत विक्रीपञ करण्यात आले. तक्रारकर्ती व तिच्या पतीने उपरोक्त घर घेण्याकरिता आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडून गृह कर्ज घेतले होते व बॅंक ही गृह कर्जाची रक्कम बांधकामानुसार विरुध्द पक्षाला देणार होते. विरुध्द पक्षाने करारानुसार बांधकाम पूर्ण केल्यानंतर व बांधकाम पूर्णत्वाचे आणि कब्जा प्रमाणपञ दिल्यानंतर बॅक रक्कम रुपये १,८५,०००/- विरुध्द पक्षास देणार होते. परंतु विरुध्द पक्षाने अटींची पुर्तता न केल्याने बॅंकेने रुपये १,८५,०००/- विरुध्द पक्षास दिले नाही. विरुध्द पक्षाने करार करतांना बांधकाम दोन वर्षात पूर्ण करण्याचे कबूल केले होते परंतु आजपर्यंत बांधकाम पूर्ण केले नाही. तक्रारकर्तीचे पतीचे दिनांक २५/६/२०१९ रोजी निधन झाले. त्यानंतर तक्रारकर्तीने बॅंकेच्या कर्जाच्या रकमेची परतफेड केली. तक्रारकर्तीने बांधकामाची पाहणी केली असता व-ह्यांड्याच्या भिंतीच्या टाईल्स फुटलेल्या आहे. दरवाजा खिडक्यांचे दरवाजे कमी प्रतीचे लावलेले आहेत. तक्रारकर्तीने विरुध्द पक्षास डुप्लेक्स मधील उणीवा दुर करुन देण्याची आणि बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपञ देण्याची विनंती केली असता विरुध्द पक्षाने त्याची पुर्तता केली नाही. उलटपक्षी विरुध्द पक्षाने दिनांक ७/२/२०१८ रोजी तक्रारकर्तीस अधिवक्ता मार्फत नोटीस पाठवून रक्कम रुपये २,०४,४००/- ची मागणी केली. सदर नोटीसला तक्रारकर्तीने दिनांक १/४/२०१९ रोजी अधिवक्ता श्री विनय लिंगे यांचे मार्फत उत्तर पाठवून वादातील डुप्लेक्स/जागेची कब्जा पावती व दुरुस्ती करुन देण्याची विनंती केली परंतु विरुध्द पक्षाने पुर्तता केली नाही. विरुध्द पक्षाने अभिवचणाची पुर्तता न करुन तक्रारकर्तीप्रती न्युनता सेवा दिल्याने तक्रारकर्तीने विरुध्द पक्षाविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की, विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस उपरोक्त मौजा देवाडा, जिल्हा चंद्रपूर येथील सर्व्हे क्रमांक १३०/२ब, भुखंड क्रमांक५ मधील डुप्लेक्स चा ताबा तसेच बांधकाम पुर्णत्वाचे प्रमाणपञ द्यावे याशिवाय तक्रारकर्तीस उपरोक्त डुप्लेक्सच्या उपभोगापासून वंचित ठेवल्याने नुकसान भरपाई दाखल रक्कम रुपये २,००,०००/- व शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २५,०००/- आणि तक्रार खर्च रक्कम रुपये २५,०००/- देण्याचे आदेश व्हावेत अशी प्रार्थना केली आहे.
- तक्रारकर्तीची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्ष यांना नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्षाला नोटीस प्राप्त होऊन सुध्दा आयोगासमक्ष प्रकरणात उपस्थित न झाल्याने त्यांचे विरुध्द प्रस्तुत प्रकरण एकतर्फा चालविण्याचा आदेश दिनांक ३/३/२०२२ रोजी निशानी क्रमांक १ वर पारित करण्यात आला.
- तक्रारकर्तीची तक्रार, दस्तावेज, तक्रारीतील मजकुरालाच तक्रारकर्तीचे पुरावा समजण्यात यावे अशी पुरसीस आणि तक्रारकर्तीचा तोंडी युक्तिवाद यावरुन खालील मुद्दे आयोगासमक्ष विचारार्थ घेण्यात आले त्याबाबतची कारणमीमांसा व निष्कर्ष खालीलप्रमाणे.
अ.क्र. मुद्दे निष्कर्षे १. तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे काय ? होय २. विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस न्युनतापूर्ण सेवा दिली आहे काय ? होय ३. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणमीमांसा मुद्दा क्रमांक १ बाबतः- - तक्रारकर्ती आणि तिचे मयत पती श्री लटारी शिवराम तेलंग यांनी एकञीतपणे दिनांक ३१/०३/२०१८ रोजी विरुध्द पक्ष यांचेकडून मौजा देवाडा, तह व जिल्हा चंद्रपूर येथील सर्व्हे क्रमांक १३०/२ब मधील लेआऊट भुखंड क्रमांक ५, एकूण आराजी ७७.०० चौरस मीटर जागेवर एकंदर बांधकाम आराजी ११३.४२१८ चौरस मीटर डुप्लेक्स बंगला एकूण मोबदला रक्कम रुपये १८,५०,०००/- मध्ये खरेदी केला. या संदर्भात तक्रारकर्तीने डुप्लेक्स खरेदी केल्याचे विक्रीपञ प्रकरणात दाखल केले आहे. यावरुन तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाची ग्राहक आहे हे सिध्द होते. सबब मुद्दा क्रमांक १ चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक २ बाबतः- - तक्रारकर्तीची तक्रार आणि तिने प्रकरणात दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्तीने डुप्लेक्स खरेदी करण्याकरिता आय.सी.आय.सी.आय. बॅंकेकडून गृह कर्ज घेतले होते. विक्रीपञ करण्यापूर्वी वादातील डुप्लेक्स चा दिनांक २१/७/२०१५ रोजी उभयपक्षात पंजीकृत करारनामा झाला होता व त्यानंतर दिनांक ३१/०३/२०१८ रोजी विरुध्द पक्षाने तक्रारकर्ती व तिचे पती यांचे नावाने विक्रीपञ करुन मालकी हक्क व ताबा दिल्याचा उल्लेख विक्रीपञामध्ये आहे. यावरुन तक्रारकर्तीस विक्रीपञाच्या दिवशीच डुप्लेक्स चा ताबा दिल्याचे स्पष्ट होते. परंतु विरुध्द पक्ष यांनी दिनांक २१/७/२०१५ रोजीच्या करारनाम्यातील अटी व शर्तीनुसार वादातील भुखंड क्रमांक ५ वरच्या डुप्लेक्सचे बांधकाम हे २ वर्षात पूर्ण करुन देण्याचे मान्य करुनही विहीत मुदतीत बांधकाम पूर्ण करुन दिले नाही, ही बाब तक्रारकर्तीने करारनाम्याच्या अटी व शर्ती दाखल करुन सिध्द केली नाही. तक्रारकर्तीने डुप्लेक्स च्या व-ह्यांड्याचे भिंतीला लावलेल्या टाईल्स फुटलेल्या आहेत आणि दरवाजा, खिडक्याचे दरवाजे, नळ फिटींग इत्यादी निकृष्ट दर्जाचे लावलेले असून बांधकामामध्ये उणीवा आहे, असे कथन तक्रारीमध्ये केलेले आहे आणि त्याबाबत फोटोग्राफ्स व अभियंता श्री अझीम वहीद खान यांचा दिनांक २/७/२०२२ रोजीचा अहवाल प्रकरणात दाखल केला आहे परंतु विक्रीपञावरुन विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस दिनांक ३१/३/२०१८ रोजी डुप्लेक्सचे विक्रीपञ करुन ताबा दिल्याचे स्पष्ट होते आणि अभियंता यांनी दिनांक २०/०२/२०२२ रोजी डुप्लेक्स च्या बांधकामाचे निरीक्षण करुन दिनांक २/७/२०२२ रोजी अहवाल दिला आहे म्हणजे प्रकरणात दाखल केलेला अहवाल हा तक्रारकर्तीने ताबा घेतल्यानंतर तब्बल ३ वर्षानंतर डुप्लेक्सच्या बांधकामाचे निरीक्षण करुन अहवाल दाखल केला आहे, अशा परिस्थितीत सदर अहवाल ग्राह्य धरणे योग्य नाही. तक्रारकर्तीने वादातील डुप्लेक्स चे बांधकाम पूर्णत्वाच्या प्रमाणपञाची मागणी केल्यावरही विरुध्द पक्षांनी दिली नाही आणि ते विक्रीपञासोबतही जोडलेले नव्हते. तक्रारकर्तीस वादातील डुप्लेक्सचे बांधकाम आरंभ व पूर्णत्वाचे प्रमाणपञ मंजूर नकाशासह देणे हे विरुध्द पक्षाचे कर्तव्य असून ते देणे अनिवार्य आहे. तक्रारकर्तीस उपरोक्त डुप्लेक्स च्या मालकी हक्काची संबंधीत विभागाकडे नोंदणी करण्याकरिता सदर दस्तावेज आवश्यक आहे. तक्रारकर्तीने डुप्लेक्स खरेदी करण्याकरिता मोबदला रक्कम विरुध्द पक्षास देऊनही त्यांनी बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपञ तक्रारकर्तीस न देऊन तक्रारकर्तीप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे सिध्द होते,या निष्कर्षाप्रत आयोग आलेले आहे. त्यामुळे तक्रारकर्ती ही विरुध्द पक्षाकडून सक्षम अधिकारी (competent authority) यांचेकडून डुप्लेक्सच्या बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपञ तसेच तिला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम आणि तक्रार खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्तीची तक्रार क्र.५८/२०२१ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्षाने संबंधीत विभागाच्या सक्षम अधिका-याकडून (competent authority) सर्व्हे क्रमांक १३०/२ब मधील लेआऊट, भुखंड क्रमांक ५ वरील डुप्लेक्सच्या बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपञ तक्रारकर्तीस द्यावे.
- विरुध्द पक्षाने तक्रारकर्तीस झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये २०,०००/- व तक्रार खर्च रुपये १०,०००/-अदा करावे.
- उभयपक्षांना आदेशाच्या प्रती विनामुल्य देण्यात यावेत.
| |