Maharashtra

Nanded

CC/08/374

Wamanrao Vithalrao Saknale - Complainant(s)

Versus

Shri.Mata karshi seva - Opp.Party(s)

ADV.A.V.Choudhary

17 Mar 2009

ORDER


District Consumer Reddressal Forum , NandedDistrict Consumer Forum , Visava Nagar, V.I.P. Road, Nanded
Complaint Case No. CC/08/374
1. Wamanrao Vithalrao Saknale R/o.Martoli Tq. Degloor Dist.NandedNandedMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. Shri.Mata karshi seva Tq.degloor Dist.NandedNandedMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:

PRESENT :

Dated : 17 Mar 2009
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

 

जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण न्‍यायमंच, नांदेड
 
प्रकरण क्र.374/2008.
                                                     प्रकरण दाखल दिनांक  02/12/2008.
                                                     प्रकरण निकाल दिनांक 17/03/2009.
                                                   
समक्ष         -    मा.श्री.बी.टी. नरवाडे,पाटील        अध्‍यक्ष.
                     मा.श्रीमती. सुजाता पाटणकर.         सदस्‍या.
                 मा. श्री.सतीश सामते.                सदस्‍य.
 
वामनराव विठठलराव सकनाळे/पाटील                              
वय वर्षे 50, व्‍यवसाय शेती,
रा. मरतोळी ता. देगलूर जि. नांदेड.                          अर्जदार
विरुध्‍द
1.   श्रीमाता कृषी सेवा केंद्र
     मोंढा देगलूर,जि.नांदेड                            गैरअर्जदार
2.   अजीत सिडस लि.,
     रजिस्‍टर्ड कार्यालय, दुसरा मजला,
     तापडीया टेरेसेस, अदालत रोड,
     औरंगाबाद-431 001.
अर्जदारा तर्फे.           - अड.अ.व्‍ही.चौधरी
गैरअर्जदार क्र. 1 व 2 तर्फे - अड.रमेश व्‍ही. पाटील
 
निकालपत्र
(द्वारा,मा.श्री.सतीश सामते, सदस्‍य)
 
         गैरअर्जदार यांच्‍या ञूटीच्‍या सेवे बददल अर्जदार यांनी आपली तक्रार खालील प्रमाणे दाखल केली आहे.
 
              अर्जदार हे मरतोळी ता. देगलूर येथे गट नंबर 97/02 व 101 या क्षेञात 66 आर व 40 आर या जमिनीत 2008 साली उडीद बियाण्‍याची पेरणी केली. बियाणे हे टी.ए.यू.एल. लॉट नंबर 1035 अजीत सिडस कंपनीचे प्रति पाच किलोच्‍या तिन बँग दि.01.07.2008 रोजी शेतात पेरल्‍या असताना त्‍यापैकी 1 बँगचे बियाणे चांगले नीघाले व दूस-या दोन बँगचे बियाणे चांगल्‍या प्रमाणात नीघाले नाही. त्‍या दोन बँग पिकास फुले व शेंगा लागल्‍या नाहीत. अर्जदाराने पेरणी सर्व योजना राबविल्‍या, बियाणे बददलची तक्रार गैरअर्जदार क्र.1 यांना कळविली असता गैरअर्जदार क्र.2 चे कर्मचारी येऊन शेतात पाहणी करुन गेले त्‍यांनी एक बँग चांगली नीघाली तर दूस-या दोन बँगा बददल काही करु शकत नाही असे सांगितले. अर्जदाराने या बाबतची तक्रार कृषी अधिकारी देगलूर यांचेकडे दि.07.09.2008 रोजी केली. त्‍यानंतर त्‍यांनी जायमोक्‍यावर येऊन दि.08.09.2008 रोजी पाहणी करुन पंचनामा केला.  अजीत बियाणे दोन बँग खराब नीघाले त्‍या दोन बँगचे 20 क्विंटल 100 टक्‍के नूकसान झालेले आहे व बाजारभावाप्रमाण्‍हो एकूण रु.60,000/- चे नूकसान झालेले आहे ती नूकसान भरपाई तसेच मानसिक ञासापोटी रु.25,000/- व दावा खर्च म्‍हणून रु.5,000/- गैरअर्जदारांकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.
 
              गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आपआपले म्‍हणणे वकिलामार्फत वेगवेगळे दाखल केलेले आहे परंतु दोघाचेही म्‍हणणे एकच असल्‍याकारणाने एकञित लेखी म्‍हणणे देत आहोत.  अर्जदार यांची तक्रार त्‍यांना मान्‍य नाही. कृषी अधिकारी यांनी दि.10.09.2008 रोजी केलेला पंचनामा गैरअर्जदार यांचे गैरहजेरीत केलेला आहे व आयूक्‍तालयाचे परिपञक जा.क्र.गुनियो/बियाणे/स्‍था.अ./5/92 का.66 दिनांक 27.03.1992  या परिपञकातील नियमानुसार केलेला नाही त्‍यामूळे तो पंचनामा त्‍यांना मान्‍य नाही. अकोला यांनी दिलेल्‍या महाराष्‍ट्र शासन प्रमाणीकरण यंञणा यांनी दिलेला मूक्‍तता अहवालानुसारच सदरील बियाणे त्‍यांनी विक्री केलेले आहे. तक्रारीतील बियाणे उत्‍कृष्‍ट चांगल्‍या दर्जाचे आहेत. मूक्‍तता अहवाल हा त्‍यांचा पूरावा आहे. त्‍यामूळे अर्जदार यांची तक्रार खोटी आहे. योग्‍य उत्‍पादन हे अनेक गोष्‍टीवर अवलंबून असते. उत्‍कृष्‍ट दर्जाचे बियाणे, जमिनीची बियाणे पेरणीपूर्वी व नंतर योग्‍य व मेहनत व मशागत, जमिनीत पेरणी करतेवेळी योग्‍य ओलावा, हवामान तसेच पीकावरील किड नाशकाची योग्‍य काळजी घेणे तसेच खताच्‍या व सिंचनाच्‍या योग्‍य वेळेस वापर करणे हे ही घटक अपेक्षीत व योग्‍य उत्‍पादनारस लागू पडतात. त्‍यामूळे एकटया गैरअर्जदार यांना जबाबदार धरता येणार नाही. सबब अर्जदाराची तक्रार खोटी असल्‍याकारणाने खर्चासह फेटाळावी अशी विनंती केली आहे.
              अर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार यांनी पूरावा म्‍हणून आपआपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्‍ही पक्षकारांनी दाखल केलेले दस्‍ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्‍तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात.
 
          मूददे                               उत्‍तर
   1. गैरअर्जदार यांचे सेवेतील ञूटी अर्जदार सिध्‍द       होय.
       करतात काय ?                             
2.    काय आदेश ?                         अंतिम आदेशाप्रमाणे
                          कारणे
मूददा क्र.1 ः-
 
              अर्जदार यांनी उडीद टी.ए.यू.एल. लॉट नंबर 1035 चे अजीत सिडस कंपनीचे खरेदी केलेल्‍या बियाण्‍याची दि.28.06.2008 रोजी पावती क्र.3923 दाखल केलेली आहे. उडीद बियाण्‍याची सन 2007-08 ला पेरणी केल्‍याबददल शेतक-यांनी दोन 7/12 दाखल केलेले आहेत. बियाणे खराब नीघाल्‍या बददल दि.07.09.2008 रोजी कृषी अधिकारी यांना दिलेला अर्ज दाखल केलेलो आहे. कृषी अधिका-याने दि.08.09.2008 रोजी जायमोक्‍यावर जाऊन पिकाचा पंचनामा केला. याप्रमाणे गट नंबर 97/2 व गट नंबर 101 या अर्जदाराच्‍या शेतामध्‍ये पंचनाम्‍यावर उल्‍लेख केल्‍याप्रमाणे बियाणे तिन एकरामध्‍ये पेरलेले असून त्‍यापैकी एक बँग बियाणे चांगले नीघाले व दोन बँग बियाणे खराब नीघाले. दोन बॅंग बियाण्‍याच्‍या पिकाला फुले व शेंगा काहीच लागल्‍या नाहीत. त्‍यामूळे शेतक-याचे नूकसान झाले असे म्‍हटले आहे. यात कृषी अधिका-याने पिकास फुले व शेंगा आल्‍या नाहीत एवढेच लिहीलेले आहे. हे जर भेसळयूक्‍त बियाणे असते तर वेगळया प्रकारची फूले व शेंगा यात फरक दिसला असता एकाच लॉट मधील एकाच बँगचे पिक चांगले येते व दोन बँगचे बियाणे खराब नीघते यासाठी उघडया डोळयाने त्‍यांचे अनूमान काढणे शक्‍य नाही. यासाठी हे बियाणे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवीणे आवश्‍यक आहे व यांचा रिपोर्ट पाहिल्‍याशीवाय उर्वरित दोन बँगचे बियाणे बोगस होते असे म्‍हणता येणार नाही. गैरअर्जदार यांनी शेतक-याला पूरविलेले बियाणे हे महाराष्‍ट्र राज्‍य प्रमाणीकरण यंञणा यांनी प्रमाणीत केलेले व त्‍यांचे मूक्‍तता अहवालानुसार बियाणे पूरविले आहेत. प्रमाणीत केलेले बियाणे निकृष्‍ट दर्जाचे आहेत असे ठरविण्‍यासाठी बिज प्रमाणीकरण यंञणा यांना पार्टी करणे आवश्‍यक होते व तक्रार अर्जात त्‍यांचे प्रमाणीकरणा बददल ही तक्रार घेणे आवश्‍यक होते व ते तक्रारदाराने केलेले नाही. प्रमाणीत केलेले बियाणे हे निकृष्‍ट दर्जाचे आहे हे सिध्‍द करण्‍यासाठी त्‍या लॉटचे बियाणे प्रयोगशाळेत पाठवीणे आवश्‍यक आहे. एकाच लॉट मधील एक बँगचे उत्‍पादन चांगले आलेले आहे व दूस-या दोन बँग ज्‍या की दूस-या गटात पेरलेल्‍या आहेत त्‍यांचे उत्‍पादन येण्‍यासाठी गेरअर्जदार त्‍यांचे म्‍हणणे प्रमाणे हवामान, जमिनीतील ओलावा, लागवड, मशागत, रासायनिक खते व किटकनाशके इत्‍यादी गोष्‍टीवर देखील उत्‍पादन अवलंबून आहे. या गोष्‍टी अर्जदाराने तंतोतंत केल्‍या यासाठी पूरावा नाही. मूक्‍तता अहवाल या प्रकरणात दाखल आहे. याप्रमाणे बियाण्‍याची शूध्‍दता 98 टक्‍के व उगवण 75 टक्‍के असे म्‍हटले आहे. गैरअर्जदारांनी परिपञक जोडलेले आहे या परिपञकात अनेक नियम दाखवलेले आहे. यात पॅरा नंबर 4,7,8,9 प्रमाणे यांची सखोल चौकशी केल्‍या गेली नाही. शिवाय पंचनामा हा जिल्‍हास्‍तरीय कमिटीचा नाही. अर्जदाराने लावलेल्‍या लॉट नंबर मधील बियाणे दूस-या शेतक-याने पेरुन चांगले पिक घेतले. त्‍यामध्‍ये गीरीश गोंविदराव देशंपाडे रा. मदनूर, अब्‍दूल मेहबूबसाब पिंजारे रा.झरी, पंढरीनाथ निवळे रा. काठेवाडी, दिंगबर तळेगावे रा.देगलूर, बजरंग गुरमुडकर रा.देंगांव (बु), व्‍यंकट बापुराव बगनुरे रा.होटटल, रमेश नाईक रा.गोंडगांव, यासर्व शेतक-यांनी अजीत सिडस कंपनीचे उडीद बियाणे लॉट नंबर 1035 जून, जूलै महिन्‍यात पेरले होते व त्‍यांना चांगल्‍या प्रकारे उत्‍पन्‍न झाले असे बयाण दिलेले आहेत. ते सर्व बयाण गैरअर्जदार यांनी या प्रकरणात दाखल केलेले आहेत. शिवाय त्‍यावर्षी अतशिय कमी पाऊस झाला. त्‍याबददल पर्जन्‍यमापक रिपोर्ट गैरअर्जदार यांनी दाखल केलेले आहे. त्‍यामूळे त्‍यांचे लॉटमधील दोन बँग बियाणे खराब नीघतात यांला फारसा आधार किंवा ठोस पूरावा या प्रकरणात उपलब्‍ध नसल्‍याकारणाने ही तक्रार फेटाळण्‍यास योग्‍य आहे. यावर मा. राज्‍य आयोग महाराष्‍ट्र राज्‍य आयोग, मुंबई  III (2003) CPJ 628 Bejo Sheetal Seeds Pvt. Ltd. Vs   Shivaji Anaji Ghole      या प्रकरणात तज्ञ व्‍यक्‍तीचा रिपोर्ट नाही त्‍यामूळे सदर तक्रार फेटाळली आहे. तसेच II (2006) CPJ 488   Prabhari Sachiv Kshetriya Sadhan Sahkari Samiti   Vs. Gyan Chandra Sharda &others.  या प्रकरणात पंचनामा आहे पण त्‍या पंचनाम्‍यामध्‍ये दोष नाही. म्‍हणून सदर तक्रार फेटाळली आहे.
 
              वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्‍ही खालील प्रमाणे आदेश करीत आहोत.
                             आदेश
1.                 अर्जदाराची तक्रार फेटाळण्‍यात येते.
 
2.                 पक्षकारानी आपआपला खर्च सोसावा.
 
3.                 पक्षकारांना आदेश कळविण्‍यात यावा.
 
 
 
 
 
(श्री.बी.टी.नरवाडे,पाटील)      (श्रीमती.सुजाता पाटणकर)      (सतीश सामते)    
           अध्यक्ष.                               सदस्या                   सदस्‍य
 
 
 
 
जे.यु, पारवेकर
लघुलेखक.