निकालपत्र तक्रार दाखल दिनांकः- 04.02.2010 तक्रार नोदणी दिनांकः- 05.03.2010 तक्रार निकाल दिनांकः- 16.12.2010 कालावधी 9 महिने11 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी अध्यक्ष - श्री.चंद्रकात बी. पांढरपटटे, B.Com.LL.B. सदस्या सदस्या सुजाता जोशी B.Sc.LL.B. सौ.अनिता ओस्तवाल M.Sc. दतात्रय कमलाकर बार्शीकर अर्जदार वय 50 वर्षे धंदा सरकारी नौकरी, , ( स्वतः ) रा.हुतात्मा स्मारक कोर्टाच्या मागे, जिंतूर जि.परभणी. विरुध्द 1 श्री.मनोज अ.स्वामी कंठाळे गैरअर्जदार वय 25 वर्षे धदा व्यापार रा.न्यू समर्थ आप्टीकल्स ( अड एम.एस.सोळंके ) डॉ.हेडगेवार रोड,परभणी. 2 श्री.धनजय सुरेशराव देशपांडे ( अड एम.एस.सोळंके ) प्रोप्रायटर न्यू समर्थ आप्टीकल्स डॉ.हेडगेवार रोड, परभणी. -------------------------------------------------------------------------------------- कोरम - 1) श्री.सी.बी.पांढरपटटे अध्यक्ष 2) सौ.सुजाता जोशी सदस्या 3) सौ.अनिता ओस्तवाल सदस्या ------------------------------------------------------------------------------------------------------- ( निकालपत्र पारित व्दारा श्रीमती सुजता जोशी सदस्या ) गैरअर्जदाराने दिलेल्या त्रूटीच्या सेवेबद्यल अर्जदाराची ही तक्रार आहे. अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदाराने दिनांक 29.11.2008 रोजी डोळे तपासून त्यानुसार गैरअर्जदाराकडे चष्मा करावयास टाकला त्यावेळी गैरअर्जदाराने अर्जदारास ए.आर.सी. कोटींगचा व फायबर लेन्स असलेला चष्मा घेण्यास सुचविला व एक वर्षाची गॅरंटी असल्याचे गेरअर्जदाराने सांगितले. अर्जदाराने गैरअर्जदारावर विश्वास ठेवून रुपये 2000/- चा चष्मा खरेदी केला. पावतीवर कुठेही गॅरेटी लिहलेली नव्हती त्यानंतर एक महिन्याच्या आतच चष्म्याच्या लेन्सवर आपोआपच रेषा दिसू लागल्या म्हणून अर्जदाराने चष्मा गैरअर्जदाराकडे दिनांक 25.12.2008 रोजी नेवून दिला व दिनांक 25.01.2009 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास चष्मा दिला व चष्म्यास काहीही होणार नाही असे सांगितले. नंतर 6-7 महिन्यातच चष्मा परत खराब झाला म्हणून अर्जदार गैरअर्जदाराकडे दिनांक 05.09.2009 रोजी चष्मा घेवून गेला व दिनांक 10.10.2009 रोजी गैरअर्जदाराने अर्जदारास तोंडी सांगितले की तुम्ही चष्मा निष्काळजीपणे वापरला आहे त्यामुळे तो खराब झालेला आहे म्हणून आता काहीही होणार नाही. गैरअर्जदाराने अर्जदाराकडून जास्तीची किंमत घेवून कमी किंमतीचा चष्मा देवून फसवणूक करुन मानसिक त्रास दिल्याबद्यल अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे व चष्म्याची किंमत रुपये 2000/- मानसिक व शारीरीक त्रासाबद्यल रुपये 5000/- व वकीलामार्फत दिलेल्या नोटीसचे रुपये 500/- असे एकूण रुपये 7500/- मिळावेत अशी मागणी केली आहे. तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जदाराचे शपथपत्र ( नि. 2 ) आणि पुराव्यातील कागदपत्रात नि. 3 लगत चष्मा खरेदीच्या पावतीची छायाप्रत, गैरअर्जदारास दिलेली नोटीस व त्या नोटीसीला आलेले उत्तर इत्यादी कागदपत्रे दाखल केली आहेत. गैरअर्जदार क्रमांक 1 ने त्याच्या लेखी जबाबात त्यानी अर्जदारास विशिष्ट चष्मा घेण्यास सुचविले व त्यास एक वर्षाची गॅरेटी असल्याचे सांगितले व त्यास एक वर्षाची गॅरेटी असल्याचे सांगितले हा मजकूर चुकीचा आहे व अर्जदाराने त्याच्याकडे दोनदा चष्मा दुरुस्तीसाठी दिला हे म्हणणे अमान्य केले आहे. अर्जदाराने चष्मा त्याच्या पसंतीनेच घेतलेला होता व चष्मा वापरणेबाबत त्याना योग्य सुचना दिलेल्या होत्या त्याना चष्म्याच्या गॅरेटीबाबत कोणतेही अभिवचन दिलेले नव्हते चष्मा त्यांच्या निष्काळजीपणाच्या वापरामुळे खराब झालेला आहे. अर्जदाराने प्रस्तूतची तक्रार गैरअर्जदारास विनाकारण त्रास देण्याचे हेतूने केलेली आहे त्याचेकडून कोणत्याही प्रकारे सेवा त्रूटी झालेली नाही सबब तक्रार अर्ज खर्चासह फेटाळण्यात यावा अशी शेवटी विनंती केली आहे. लेखी जबाबाचे पुष्टयर्थ गैरअर्जदार क्रमांक 1 चे शपथपत्र (नि.10) दाखल केले आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबात त्याचा या दुकान, दुकानदार व व्यवहाराशी कोणताही संबंधी नाही असे म्हटलेले आहे. संबंधीत तक्रारीशी तक्रारदाराने त्याला विनाकारण गोवले असल्यामुळे तक्रारदाराची तक्रार खर्चासहीत फेटाळण्याची विनंती केली आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपल्या लेखी जबाबासोबत शपथपत्र जोडले आहे. तक्रारीत दाखल कागदपत्रावरुन तक्रारीत खालील मुद्ये उपस्थित होतात. मुद्या उत्तर 1 गैरअर्जदाराने अर्जदारास त्रूटीची सेवा दिली आहे काय ? नाही 2 अर्जदारकोणता अनुतोष मिळणेस पात्र आहे अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मुद्या क्रमांक 1 व 2 - अर्जदाराने गैरअर्जदाराकडन चष्मा विकत घेतला ही बाब गैरअर्जदार क्रमांक 1 ला मान्य आहे. गैरअर्जदार क्रमांक 2 ने आपला दुकान, दुकानदार व सदरील तक्रारीतील व्यवहाराशी काहीही संबंध नाही असे लेखी जबाबात म्हटलेले आहे व शपथेवरही सांगितले आहे. अर्जदाराने रुपये 2200/- किंमतीचा चष्मा गैरअर्जदाराकडून खरेदी केला हे नि. 3/1 वरील पावतीवरुन सिध्द होते व ते गैरअर्जदार क्रमांक 1 ला ही मान्य आहे. मात्र हया चष्म्यावर एक वर्षाची गॅरेटी गैरअर्जदाराने दिली होतीहयाबाबत अर्जदाराने कोणताही ठोस पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. नि. 3/1 वरील पावतीवर सुध्दा गॅरेटीचा कुठेही उललेख नाही तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे 2 वेळा चष्मा दुरुस्तीसाठी दिला व गैरअर्जदाराने एकदा चष्मा दुरुस्त केला व दुस-यांदा चष्मा खराब झाल्यानंतर गैरअर्जदाराने चष्मा दुरुस्तीसाठी ठेवून घेतला मात्र चष्मा दुरुस्त करुन दिला नाही असे अर्जदाराचे म्हणणे आहे. याबाबतही अर्जदाराने कोणताही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नाही. अर्जदाराने आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ काहीही पुरावा तक्रारीत दाखल केलेला नसल्यामुळ गैरअर्जदारानी त्याला त्रूटीची सेवा देवून मानसिक त्रास व शारीरीक त्रास दिला नाही असे आम्हास वाटते म्हणून खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आ दे श 1 अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात येत आहे. 2 तक्रारीचा खर्च अर्जदार व गैरअर्जदार यानी अपआपला सोसावा. 3 संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. सौ. अनिता ओस्तवाल सौ.सुजाता जोशी श्री. सी.बी. पांढरपटटे सदस्या सदस्या अध्यक्ष
| [HONABLE MRS. Sujata Joshi] Member[HONABLE MR. C. B. Pandharpatte] PRESIDENT[HONABLE MRS. Anita Ostwal] Member | |