नि.20 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 26/2010 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.14/05/2010 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.26/10/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या माधव रामचंद्र बापट तर्फे मुखत्यार कु.गीता सोनू सुवारे रा.नाचणे, गुरुमळी, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटीक कार्पोरेशन लि., (formerly known as Kalpataru Agro India Ltd.) करीता अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक, श्री.जयकृष्ण सिंह राणा, रजि.ऑफिस- औरंगाबाद-आग्रा रोड, मथुरा (उत्तर प्रदेश) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.नार्वेकर सामनेवाले : गैरहजर. -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार तर्फे मुखत्यार यांनी दि.04/10/2010 रोजी विधिज्ञासह हजर होवून नि.16 वर पुरशीस दाखल केली. तक्रारदारतर्फे मुखत्यारपत्राची प्रत नि.19/1 वर दाखल. सदर पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत वसूली प्रकरण निकाली करणेत येते असा आदेश नि.1 वर करणेत आला. ब) सदर नि.16 वरील पुरशीसमधील मजकूर खालीलप्रमाणेः- “प्रस्तुत वसुली अर्जामध्ये तक्रारदार व सामनेवाला यांचेत तडजोड झालेली असून त्यानूसार सामनेवाला यांनी तक्रारदार यांना रक्कम रु.10,000/- मात्र अदा केली आहे. सामनेवाला यांनी दिलेली रक्कम तक्रारदार यांना मान्य असून सामनेवाला यांचेकडून तक्रारदार यांना कोणतेही येणे राहीलेले नाही. तसेच सामनेवाला यांचेबद्दल तक्रारदार यांची सदर वसुली अर्जाबाबत कोणतीही तक्रार शिल्लक राहीलेली नाही. सबब सदर वसुली अर्ज तक्रारदार यांना यापुढे चालवावयाचा नाही. सबब सदर अर्ज निकाली करण्यात यावा अशी मे.मंचास नम्र विनंती आहे.” क) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदारतर्फे मुखत्यार विधिज्ञासह उपस्थित. अर्जातील मजकूर मान्य व कबूल करतात. नि.1 वर योग्य तो आदेश करणेत येतो.’’ तक्रारदारतर्फे नि.16 वर दाखल पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 26/10/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |