नि.23 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 13/2010 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.04/05/2010 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.27/10/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या ललिता दत्ताराम लोंढे तर्फे मुखत्यार कु.गीता सोनू सुवारे रा.नाचणे, गुरुमळी, ता.जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटीक कार्पोरेशन लि., (formerly known as Kalpataru Agro India Ltd.) करीता अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक, श्री.जयकृष्ण सिंह राणा, रजि.ऑफिस- औरंगाबाद-आग्रा रोड, मथुरा (उत्तर प्रदेश) ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.नार्वेकर सामनेवाले : गैरहजर. -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी तक्रारदार तर्फे मुखत्यार यांनी दि.28/09/2010 रोजी विधिज्ञासह हजर होवून प्रस्तुतचे प्रकरण बोर्डावर घेवून नि.20 वर पुरशीस दाखल केली. तक्रारदारतर्फे मुखत्यारपत्राची प्रत नि.4/1 वर दाखल. सदर पुरशिसचे अनुषंगाने प्रस्तुत वसूली प्रकरण निकाली करणेत येते असा आदेश नि.1 वर करणेत आला. ब) सदर नि.20 वरील पुरशीसमधील मजकूर खालीलप्रमाणेः- “प्रस्तुत केसमध्ये अर्जदार व सामनेवाला यांचेत तडजोड झालेली असून त्यानुसार सामनेवाला यांनी अर्जदार यांस रक्कम रु.10,000/- अदा केलेले आहेत. सदरची रक्कम अर्जदार यांना मान्य व कबूल असून अर्जदार यांना सामनेवाला यांचेकडून सर्टिफिकेट नं.R10010767 याबद्दल आता कोणतेही येणे बाकी नाही. तसेच त्यांचेबाबत कोणतीही तक्रार नाही तरी सदरची केस निकाली करण्यात यावी अशी मे.मंचास नम्र विनंती आहे.” क) सदर पुरशिसवर पुढीलप्रमाणे आदेश करण्यात आला. ‘‘तक्रारदारतर्फे मुखत्यार विधिज्ञासह उपस्थित. सदर अर्जातील मजकूर मान्य व कबूल करतात. आज रोजी या मंचाचे सन्मा.सदस्य रजेवर असलेने नि.1 वर योग्य त्या आदेशासाठी नियोजीत तारखेदिवशी ठेवणेत येते.’’ तक्रारदारतर्फे नि.20 वर दाखल पुरशिसच्या अनुषंगाने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 27/10/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |