नि.50 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसूली अर्ज क्रमांक : 06/2009 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.05/03/2009 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.21/12/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या रशिदा शौकत दसूरकर रा.कळंबस्ते, ता.संगमेश्वर, जि.रत्नागिरी. ... तक्रारदार विरुध्द कल्पतरु बायोटेक कॉर्पोरेशन लि. करीता मॅनेजींग डायरेक्टर / अध्यक्ष श्री.जयकृष्ण सिंह राणा, ए/ए 43, चंदनवन, रेल्वे स्टेशन ब्रिज जवळ, मथुरा (उत्तर प्रदेश) – 281 001. ... सामनेवाला तक्रारदारतर्फे : विधिज्ञ श्री.ए.ए. शिंदे सामनेवाले : अनुपस्थित. -: नि का ल प त्र :- तक्रारदाराचे विधिज्ञांनी समक्ष उपस्थित राहून प्रस्तुत प्रकरण बोर्डावर घेवून प्रस्तुत वसूली अर्जाचे कामी रक्कम रु.57,000/- धनादेशाने प्राप्त झाले आहेत. सदरची रक्कम तक्रारदार याने full & final settlement पोटी स्वीकारली असलेने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत यावा अशी पूरशिस सादर केली. तक्रारदार समक्ष उपस्थित नसलेने प्रस्तुत प्रकरण आज रोजी नियोजित तारखेनुसार ठेवणेत आले. आज रोजी तक्रारदार उपस्थित नसलेने प्रस्तुत वसूली अर्ज यापुढे चालविणेत तक्रारदार यांना स्वारस्य नसलेचे दिसून येते. सबब प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 21/12/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |