निकालपत्र :- (दि.16/11/2010) ( श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) 1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. सुनावणीचे वेळेस तक्रारदाराचे वकीलांनी युक्तीवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार क्र. 2 हे तक्रारदार क्र.1 यांचे पुतण्या असून ते एकत्र कुटूंबात रहात आहेत. सामनेवाला क्र.1 ही सहकार संस्था असून सामनेवाला क्र.2 व 3 हे अनुक्रमे चेअरमन व व्हा.चेअरमन आहेत. तर सामनेवाला क्र. 4 ते 11 हे संचालक आहेत. (3) यातील तक्रारदार यांनी सामनेवाला संस्थेमध्ये दामदुप्पट व मुदत बंद ठेव स्वरुपात रक्कमा ठेवल्या होत्या. अ. क्र. | तक्रारदाराचे नांव | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेचा दिनांक | मुदत संपलेचा दिनांक | ठेव रक्कम | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 01 | धोंडीराम मा. पोवार | 203 | 24/04/02 | 25/10/06 | 3,000/- | 6,000/- | 02 | धोंडीराम मा. पोवार | 186 | 18/02/02 | 19/08/06 | 3,000/- | 6,000/- | 03 | धोंडीराम मा. पोवार | 1846 | 17/10/05 | 04/01/06 | 6,000/- | 9.5 % | 04 | दयानंद ब. पोवार | 1696 | 08/12/03 | 09/01/05 | 3,000/- | 11 % |
(4) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, सदर ठेवींची मुदत पूर्ण झालेनंतर सामनेवाला यांनी तक्रारदारांना सदर ठेव रक्कमा व्याजासहीत परत करणे आवश्यक होते. पंरतु तक्रारदार हे कामानिमित्त परगावी असलेने व सामनेवाला संस्थेतील संचालक मंडळ यांचेवर विश्वास असलेने सदरची रक्कम बुडणार नाही तसेच रक्कम मागणी करतील त्यावेळी देऊ असा विश्वास सामनेवाला यांनी दिलेला होता. माहे ऑक्टोबर-08 मध्ये तक्रारदारांना आर्थिक अडचणीमुळे रक्कमेची अत्यंत गरज होती. त्यामुळे तक्रारदाराने सामनेवाला संस्थेमध्ये गेले असता संबंधीत इसमांनी ठेव रक्कम परत देणेस टाळाटाळ केली व रक्कम देणेस असमर्थता दर्शविली. तक्रारदार यांना पैशाची अत्यंत निकड असल्याने तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे ठेव रक्कमेची मागणी केली पंरतु आज देतो उदया देतो संस्थेची कर्ज रक्कम वसुल होताच देतो अशी चुकीची व दिशाभूल करणारी कारणे सांगून सामनेवाला यांनी जाणूनबुजून तक्रारदाराची रक्कम देणेस टाळाटाळ केली. तक्रारदाराने वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरुपात ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी सदर रक्कम दिली नाही. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची ठेवीची रक्कम व्याजासह परत न करता आर्थिक, मानसिक व शारिरीक नुकसान केले आहे. यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्या ठेव पावत्यांवरील रक्कम व्याजासहित परत करण्यास वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. सबब, तक्रारदारांनी ठेव पावत्यांवरील रक्कम व त्यावर होणारे व्याज तसेच मानसिक, शारिरीक व आर्थिक त्रासापोटी रु.10,000/- नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च रु.5,000/- सामनेवाला यांचेकडून मिळणेकरिता या मंचासमोर सदरील तक्रार अर्ज दाखल केला आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्यांच्यास सत्यप्रती व शपथपत्र दाखल केलेले आहे. (6) सामनेवाला क्र.1 ते 11 यांना नोटीस लागू होऊनसुध्दा ते सदर कामी हजर झालेले नाहीत किंवा त्यांनी आपले लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. त्यामुळे सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कम परत करणेकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच सदर सामनेवाला यांनी सदर प्रकरणी आपले म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांचा तक्रार अर्ज मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब सर्व सामनेवाला यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांच्या ठेव पावतीवरील रक्कम व्याजासह परत करण्याकरिता जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (7) तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे यांचा साकल्याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे दामदुप्पट व मुदत बंद ठेव स्वरुपात रक्कम ठेवल्याचे निदर्शनास येते. तथापि, सदर ठेव पावत्यांवरील रक्कमेची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कम परत न केल्याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (8) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टी प्रित्यर्थ दाखल केलेल्या मुदतबंद ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता तक्रारदार क्र.2 श्री दयानंद बयाजी पोवार यांचे मुदत बंद ठेव पावती क्र.1696 ची मुदत संपलेली असलेने सदर मुदत बंद ठेव पावतीवरील रक्कम रु.3,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर मुदत बंद कालावधीकरिता ठेवपावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार क्र.1 श्री धोंडीराम मारुती पोवार यांचे मुदत बंद ठेव पावती क्र.1846ची मुदत संपलेली असलेने सदर मुदत बंद ठेव पावतीवरील रक्कम रु.6,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर मुदत बंद कालावधीकरिता ठेवपावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत सदर रक्कमेवर द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच तक्रारदार क्र.1 श्री धोंडीराम मारुती पोवार यांची दामदुप्पट ठेव पावती क्र.203 व 186 ची मुदत संपलेली असलेने सदर ठेव पावतीवरील प्रत्येकी दामदुप्पट रक्कम रु.6,000/-मिळणेस पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर मुदत संपले तारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कम सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश (01) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. (02) सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र. 1 श्री धोंडीराम मारुती पोवार यांना खालीलप्रमाणे दामदुप्पट रक्कम अदा करावी व सदर रक्कमेवर मुदत संपलेतारखेपासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. अ.क्र. | ठेवपावती क्र. | मुदत संपलेचा दिनांक | मुदतीनंतर मिळणारी रक्कम | 01 | 203 | 25/10/06 | 6,000/- | 02 | 186 | 19/08/06 | 6,000/- |
तसेच मुदत बंद ठेव पावती क्र. 1846 वरील रक्कम रु.6,000/-(रु.सहा हजार फक्त) अदा करावी व सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज अदा करावे व मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज अदा करावे. (03) सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदार क्र. 2 श्री दयानंद बयाजी पोवार यांना त्यांचे मुदत बंद ठेव पावती क्र.1696 वरील रक्कम रु.3,000/-(रु.तीन हजार फक्त)अदा करावी व सदर रक्कमेवर ठेव कालावधीकरिता ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज अदा करावे व मुदत संपलेनंतर संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 6 टक्के व्याज अदा करावे. (04) सामनेवाला यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |