निकालपत्र :- (दि.13/08/2010) (श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) (1) तक्रार स्विकृत करुन सामनेवालांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.1,2, 4 ते 6, 8, 10 ते 14 यांना नोटीस लागू. सामनेवाला क्र. 3, 7 व 9 यांना नोटीस नॉटक्लेम शे-याने नोटीस परत आली.सामनेवाला क्र.4,6,9ते 14 प्रस्तुत मंचासमोर हजर. त्यांनी लेखी म्हणणे दाखल केलेले आहे. अन्य सामनेवाला गैरहजर. तक्रारदाराचे वकील व सामनेवाला संस्थेचे प्रशासक यांचा युक्तीवाद ऐकणेत आला. सदरची तक्रार ही सामनेवाला यांनी तक्रारदाराच्या ठेवीच्या रक्कमा व्याजासहीत न दिलेने दाखल केलेली आहे. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी:-अ) सामनेवाला क्र.1 सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कागल यांचेमार्फत नियुक्त केलेले प्रशासक असून सामनेवाला क्र.2 व 3 हे सामनेवाला संस्थेचे मॅनेजर व सेक्रेटरी तसेच सामनेवाला क्र. 4 ते 14 हे प्रशासक नियुक्तीपूर्वीचे चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक आहेत.
ब) तक्रारदार हे वयोवृध्द इसम असून तक्रारदार क्र. 1 व 2 यांनी सामनेवाला पत संस्थेत खालीलप्रमाणे कॉल डिपॉझीट स्वरुपाच्या ठेवी ठेवल्या होत्या. अ.क्र. | तक्रा.चे नांव | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेची ता. | व्याजदर | ठेवलेली रक्कम | 01 | मिरासाहेब म.मुजावर | 001141 | 02/01/03 | 15 % | 45,000/- | 02 | शमशाद मि.मुजावर | 001270 | 01/11/03 | 15 % | 40,000/- |
क) नमुद रक्कमेवर दि.01/08/2005 अखेर व्याज मिळालेले आहे. नमुद ठेव रक्कमेची औषधोपचार व प्रापंचीक गरज भागविणेकरिता आवश्यकता भासलेने सामनेवाला पत संस्थेमध्ये जाऊन वेळोवेळी व्याजासहीत ठेव रक्कमेची मागणी केली असता सध्या संस्थेकडे रक्कम शिल्लक नसलेने थोडया दिवसांनी रक्कम देतो अशी उडवाउडवीची उत्तरे देऊन टाळाटाळ केलेली आहे. सबब तक्रारदाराने दि.20/04/2010 रोजी सामनेवाला क्र.1ते14यांना वकीलांमार्फत नोटीस पाठवून सदर रक्कमेची मागणी केली असता त्यास खोटे उत्तर देऊन रक्कम देणेस टाळाटाळ केलेली आहे. तक्रारदार हे पत संस्थेचे ग्राहक असून त्यांना दिलेल्या सेवेत त्रुटी ठेवलेने प्रस्तुतची तक्रार दाखल करणेत आली आहे. सबब रक्कम देणेची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी सामनेवाला क्र.1ते14 यांची असून सबब तक्रारदारांची तक्रार मंजूर करुन वर नमुद ठेव रक्कमा दि.01/08/2005पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत15%व्याज,तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.5,000/-वकील नोटीसीचा खर्च रु.5,000/-तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/-असे सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळावेत अशी विंनती तक्रारदाराने सदर मंचास केली आहे. (4) तक्रारदाराने आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ नमुद ठेव पावत्यांच्या सत्यप्रती, पदाधिका-यांच्या नावाची यादी, वकील नोटीस, पोष्टाची रिसीट, सदर नोटीस मिळालेबाबतची पोच पावती, सामनेवाला यांनी नोटीसला दिलेले उत्तर इत्यादीच्या सत्यप्रती दाखल केलेल्या आहेत. (5) सामनेवाला संस्थेचे प्रशासक यांनी दाखल केलेल्या म्हणणेनुसार नमुद संस्थेवर त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झालेली आहे. तसेच संस्थेची थकबाकी वसुली करुन आशिलांची ठेव रक्कम हप्त्याहप्त्याने देणेची व्यवस्था करीत आहे. सदर ठेव रक्कमांची सर्वस्वी जबाबदारी तत्कालीन संचालक मंडळाची आहे. प्रशासक हे शासकीय कर्मचारी असून त्यांना सदर दाव्यातून वगळणेत यावे अशी विंनती केलेली आहे. (6) सामनेवाला क्र.4, 6, 9 ते 14 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेनुसार तक्रारीतील अंशत: मजकूर मान्य असलेचे नमुद केले आहे. सामनेवाला संचालक होते मात्र ते सध्या कार्यरत नाहीत.तक्रारदाराच्या ठेवी सन-2003चे दरम्यान असून ठेवी ठेवल्या त्यावेळी ते संचालक होते त्यावेळी तक्रारदारांना वेळोवेळी व्याजाच्या रक्कमा अदा केल्या आहेत. तदनंतर दि.31/05/2005रोजी सदर संचालक मंडळ बरखास्त होऊन सामनेवाला क्र.1 वर प्रशासक म्हणून श्री ए.एस.कुंभार यांची नियुक्ती झालेली आहे. प्रस्तुत सामनेवाला यांचेकडे सत्ता अथवा कारभार असता तर व्याजासह मुद्दल अदा केली असती मात्र सामनेवाला यांना कोणतेही अधिकार राहिलेले नाहीत.सबब त्यांचेवर कायदयाने कोणतीही जबाबदारी रहात नाही.सबब सामनेवाला यांनी कोणतीही सेवात्रुटी केलेली नाही. प्रस्तुत सामनेवाला हे संचालक असताना सामनेवाला संस्थेची आर्थिक स्थिती चांगली होती तसेच आजही संस्था त्यांचे ताब्यात मिळालेस ठेवीदारांच्या ठेव परत करणेस तयार आहेत. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज खर्चासह नामंजूर करावा अशी विंनती प्रस्तुंत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (7) सामनेवाला यांनी आपले लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ कोणतेही कागदपत्र दाखल केलेले नाहीत. (8) तक्रारदाराची तक्रार,दाखल कागदपत्रे,सामनेवाला यांचे लेखी म्हणणे तक्रारदार व प्रशासक यांचे युक्तीवाद इत्यादीचे बारकाईने अवलोकन केले असता पुढील महत्वाचे मुद्दे निष्कर्षासाठी येतात. 1. सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी ठेवली आहे काय ? --- होय. 2. तक्रारदार त्यांची ठेव रक्कम व्याजासहीत मिळणेस पात्र आहेत काय?--- होय. 3. काय आदेश ? --- शेवटी दिलेप्रमाणे
मुद्दा क्र.। :-तक्रारदाराने सामनेवालांकडे खालील तपशीलाप्रमाणे मुदत बंद ठेव ठेवलेचे दिसून येते. अ.क्र. | तक्रा.चे नांव | ठेव पावती क्र. | ठेव ठेवलेची ता. | व्याजदर | ठेवलेली रक्कम | 01 | मिरासाहेब म.मुजावर | 001141 | 02/01/03 | 15 % | 45,000/- | 02 | शमशाद मि.मुजावर | 001270 | 01/11/03 | 15 % | 40,000/- |
सदर पावत्यांचे बारकाईने अवलोकन केले असता मुदत संपलेची तारीख-C/D असून याचा अर्थ कॉल डिपॉझीट असा होतो. सबब नमुद ठेव पावत्या हया कॉल डिपॉझीट होत्या.तसेच सदर ठेव पावत्यांवर दि.01/08/2005अखेर व्याज अदा केलेचे दिसून येते. तदनंतर तक्रारदाराने तोडी मागणी करुनही तसेच दि.20/04/2010रोजी नोटीस पाठवूनही सदर ठेव रक्कमा व्याजासही सामनेवालांनी अदा केलेल्या नाहीत. ही सामनेवालांच्या सेवेतील गंभीर त्रुटी आहे.नमुद ठेव रक्कमा व्याजासहीत देणेसाठी सामनेवाला क्र.4 ते 14 हे वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदार असून सामनेवाला संस्थेचे प्रशासक व सामनेवाला क्र.2 व 3 हे मॅनेजर व सेक्रेटरी असलेने ते फक्त संयुक्तिकरित्या जबाबदार राहतील. मुद्दा क्र.2 :- तक्रारदार मुद्दा क्र.1 मधील नमुद तपशीलीप्रमाणे ठेव रक्कमा दि.01/08/2005 पासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत. मुद्दा क्र.3 :- तक्रारदार हे वयोवृध्द ज्येष्ट नागरिक असून सदर ठेवी या त्यांच्या वृध्दापकाळातील आधार होत्या. त्या त्यांना वेळेत न मिळू शकलेने तक्रारदार झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम मिळणेस पात्र आहेत. आदेश (1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करणेत येते. (2) सामनेवाला यांनी तक्रारदारास खालीलप्रमाणे कॉल डिपॉझीटची रक्कम अदा करावी व सदर रक्कमेवर दि.01/08/2005 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के प्रमाणे व्याज अदा करावे. अ.क्र. | तक्रा.चे नांव | ठेव पावती क्र. | ठेवलेली रक्कम | 01 | मिरासाहेब म.मुजावर | 001141 | 45,000/- | 02 | शमशाद मि.मुजावर | 001270 | 40,000/- |
(3) सामनेवाला यांनी तक्रारदारस मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीचा खर्च रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) अदा करावेत. (4) सामनेवाला क्र.1 ते 3 हे फक्त संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.4 ते 12 यांनी तक्रारदारांना वरील सर्व रक्कमा वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या देणेच्या आहेत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |