सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 77/2010
श्री संतोष काशिनाथ पारकर
वय 35 वर्षे, धदा – व्यापार,
राहाणार – कणकवली,
ता.कणकवली, जि.सिंधुदुर्ग. ... तक्रारदार
विरुध्द
श्री देव टेवनाई विकास सेवा
सोसायटी लिमिटेड तरंतळे, तर्फे
चेअरमन/सचिव,
ता.कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री विरेश नाईक.
आदेश नि.1 वर
(दि.21/12/2010)
1) तक्रारदाराच्या मिळकतीवरुन, कर्जाचा बोजा कमी करुन मिळणेचे आदेश व्हावेत, यासाठी तक्रारदाराने सदरची तक्रार दाखल केली असून, आज सदरचे प्रकरण Admission च्या सुनावणीसाठी मंचासमोर ठेवण्यात आले होते.
2) मंचासमोर आज तक्रारदाराचे वकील श्री विरेश नाईक हजर झाले. त्यांनी मंचासमोर नि.5 वर अर्ज दाखल करुन सदर तक्रारीमध्ये तांत्रिक चूक झालेली असून ती दुरुस्त करता येण्याजोगी नाही, या कारणास्तव तक्रार अर्ज परत करणेत यावा, अशी विनंती मंचाला केली. त्यानुसार आम्ही सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून खालील आदेश पारीत करीत आहोत.
आदेश
1) तक्रारदाराच्या वकीलांनी नि.5 वर दिलेल्या अर्जानुसार सदरचे तक्रार प्रकरण परत देण्याचे तसेच Withdraw करणेची परवानगी देण्यात येते.
2) सदर तक्रार प्रकरणातील नि.4 सोबत जोडलेली कागदपत्रे व मा.सदस्यांचे दस्त फाईल व लखोटे तक्रारदारास परत करणेत यावेत.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 21/12/2010
सही/- सही/-
(महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान)
अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग