Maharashtra

Chandrapur

CC/21/5

Shri.Kisan Motiram Zade - Complainant(s)

Versus

Shri.Deelip Namdeorao Madankar,Adhyaksha Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsansth - Opp.Party(s)

Adv.Raspelli

10 May 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/21/5
( Date of Filing : 07 Jan 2021 )
 
1. Shri.Kisan Motiram Zade
Neharu nagar ward 4,Mul road,Hanuman mandir jawal,Chandrapur
Chandrapur
Maharashtra
...........Complainant(s)
Versus
1. Shri.Deelip Namdeorao Madankar,Adhyaksha Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha maryadit
Railway Station jawal,Jal Nagar ward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
2. Shri.Ajay Damodhar Chahare,Sachiv, Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Railway Station jawal,Jal Nagar ward Chandrapur
Chandrapur
Maharashtra
3. Shri.Bhaurao Udhavrao Umare,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
4. Shri.Gajanan Baburao Borkute,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
5. Shri.Kalidas Tulshiram Shende,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
6. Kumari Priyanka Suresh Admane,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
7. Shri.Vijay Dinkarrao Nerlawar,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
8. Shri.Deepak Yadavrao Bhandekar,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
9. Shri.Gajanan Narayan Kamdi,Sanchalak,Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur Zilla Patbandhare Karmachari Sahakari Pathsanstha Maryadit Chandrapur
Chandrapur
Maharashtra
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 10 May 2022
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                    (पारीत दिनांक १०/०५/२०२२ )

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे  कलम ३५ सह कलम ३८ अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्ता हे सेवानिवृत्‍त शासकीय कर्मचारी असून त्‍यांनी विरुध्‍द पक्ष जिल्‍हा पाटबंधारे कर्मचारी सहकारी पतसंस्‍था मर्या. चंद्रपूर येथे अनुक्रमे रुपये ८,०५,१७१/- देय दिनांक २३/०४/२०२०, रुपये १,१९,१६४/- देय दिनांक २४/०४/२०२०, रुपये ७,८३,४१२/- देय दिनांक २५/०४/२०२० तसेच रुपये २,९०,१५३/- देय दिनांक २७/०४/२०२० १ वर्षाकरिता ९ टक्‍के दराने मुदत ठेव म्‍हणून गुं‍तविले होते.  उपरोक्‍त सर्व रकमेपैकी विरुध्‍द पक्ष यांनी देय रकमेचे धनादेश तक्रारकर्त्‍याला दिले व अनुक्रमे १,२ व ३ प्रमाणे सर्व रक्‍कम तक्रारकर्त्‍याचे युनियन बॅंक ऑफ इंडिया, चंद्रपूर येथील खात्‍यावर दिनांक २/५/२०२० रोजी धनादेश वटविल्‍यामुळे जमा झाल्‍या परंतु रुपये २,९०,१५३/- रकमेचा विरुध्‍द पक्ष यांनी दिलेला धनादेश चंद्रपूर डिस्‍ट्रीक्‍ट को. ऑपरेटीव्‍ह बॅंक, शाखा चंद्रपूर येथे पुरेशी रक्‍कम न ठेवल्‍यामुळे युनियन बॅंक ऑफ इंडिया, शाखा चंद्रपूर यांचेकडून मेमो पावती दिनांक २/५/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याला परत मिळाला. तक्रारकर्त्‍याला धनादेश परत मिळाल्‍यामुळे त्‍याचे वैयक्तिक बचत खात्‍यातून दंड म्‍हणून युनियन बॅंक ऑफ इंडिया यांनी रुपये ५९०/- ची कपात केली. विरुध्‍द पक्ष यांनी बॅंकेत पुरेशी रक्‍कम न ठेवता रुपये २,९०,१५३/- चा धनादेश तक्रारकर्त्‍याला दिला. सदर धनादेश हा अनादर झाल्‍यामुळे दिनांक ४/२/२०२० रोजी रुपये १०,४९०/- ची मागणी विरुध्‍द पक्ष यांना केली परंतु विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याची दखल घेतली नाही. दिनांक ४/५/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याने अर्ज केल्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी आर.टी.जी.एस. व्‍दारे दिनांक ५/५/२०२० रोजी रुपये २,९०,१५३/- चा धनादेश खात्‍यामध्‍ये जमा केला परंतु मागणी करण्‍यात आलेली रक्‍कम व व्‍याज जमा केले नाही त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने पुन्‍हा दिनांक १२/५/२०२० रोजी विरुध्‍द पक्ष यांचेकडे अर्ज करुन नुकसान भरपाईची मागणी केली असता विरुध्‍द पक्ष यांनी दंडाची रक्‍कम रुपये ५९०/- व धनादेश रुपये २,९०,१५३/- आणि सात दिवसाचे व्‍याज रुपये १६७/- असे एकूण रुपये ७५७/- आर.टी.जी.एस. व्‍दारे दिनांक १३/०५/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याच्‍या बचत खात्‍यात जमा केले परंतु अर्जात मागणी केल्‍यानुसार विरुध्‍द पक्ष यांनी दखल घेतली. तक्रारकर्त्‍याची विरुध्‍द पक्ष यांचेकडे रुपये ८७,२००/- ची ठेवी ठेवण्‍यात आली होती ती दिनांक २१/५/२०२० रोजी प्राप्‍त होणार होती. सदर रक्‍कम आर.टी.जी.एस. व्‍दारे तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा करण्‍यात येईल असे विरुध्‍द पक्ष यांनी सांगितले परंतु सदर रक्‍कम पाहिल्‍यावर रक्‍कम जमा झाली नसल्‍याचे समजले. अशा त-हेने विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याची दिशाभूल केलेली आहे व सेवेत न्‍युनता दिली असल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने खालिल मागणी विरुध्‍द पक्षाविरुध्‍द केलेली आहे.
  3. तक्रारकर्त्‍याने अशी मागणी केली आहे की, तक्रार मंजूर होऊन विरुध्‍द पक्ष यांनी प्रत्‍येक तारखेला ठेवीची रक्‍कम न दिल्‍यामुळे त्‍यावरील व्‍याज ९ टक्‍के प्रमाणे प्रत्‍येक दिवसाप्रमाणे व कोरोना संसंर्गामुळे तक्रारकर्ता यांना झालेल्‍या मानसिक व शारीरिक ञासापोटी रुपये १,००,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये १०,०००/- मुदत ठेवीवरील व्‍याज रुपये ४,५६७/- देण्‍याबाबत आदेश व्‍हावेत तसेच अपमानास्‍पद वागणूक व रुपये ८७,२००/- ची ठेवी मध्‍ये पुन्‍हा ञास व त्‍यावरील व्‍याज देण्‍यात यावे.
  4. विरुध्‍द पक्ष यांना आयोगाकडून नोटीस पाठविण्‍यात आले. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारील उपस्थित राहून त्‍याचे लेखी उत्‍तर दाखल करीत कथन केले की, विरुध्‍द पक्ष ही पंजीबध्‍द संस्‍था असून सन १९९७ मध्‍ये स्‍थापन झालेली आहे. विरुध्‍द पक्ष यांचे सेवा तत्‍परता व लेखाजोगा अतिशय योग्‍य असल्‍यामुळे तक्रारकर्ता यांच्‍या खात्‍यात दिनांक  ५/५/२०२० रोजी रुपये ८०५१७१/-, रुपये ११९१६४१/- तसेच रुपये ७८३४१२/- लॉकडाऊन च्‍या संचार बंदीचे अनेक निर्बंध असून सुध्‍दा मुदतीत जमा केले व ती रक्‍कम त्‍याच्‍या युनियन बॅंकेच्‍या  खात्‍यात वळत्‍या केल्‍यावर ती तक्रारकर्त्‍याने स्‍वीकारली सुध्‍दा आहे. माञ जनतेवर आलेल्‍या संकटामुळे बॅंकेच्‍या प्रणालीत जो बदल झाला त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याला रुपये २,९०,१५३/- दिनांक २०/०४/२०२० रोजीचा धनादेश क्रमांक १९५५९२ वटण्‍यास जी तांञिक अडचण निर्माण झाली त्‍यासाठी विरुध्‍द पक्ष हे जबाबदार नसून युनियन बॅंक ऑफ इंडिया व चंद्रपूर जिल्‍हा मध्‍यवर्ती बॅंक चंद्रपूर या यंञणा जबाबदार आहेत. त्‍यामुळे सदर तक्रारीत सदर बॅंकेला पार्टी करणे आवश्‍यक होते त्‍यामुळे Non-joinder of necessary party या तत्‍वाखाली तक्रार खारीज करण्‍यात यावी. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्‍याला रुपये २,९०,१५३/- चा धनादेश वटण्‍यास जी अडचण निर्माण झाली त्‍याबद्दल युनियन बॅंक यांचे दंडाची रक्‍कम रुपये ५९०/- व आर.बी.आय.  प्रमाणे नुकसान भरपाईची रक्‍कम रुपये १६७/- विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक १३/०५/२०२० रोजी आर.टी.जी.एस. व्‍दारे तक्रारकर्त्‍याला दिले व ते त्‍यांनी स्‍वीकारले. तक्रारकर्त्‍याने ग्राहक कायद्याचा दुरुपयोग केलेला असून सदर खोटी तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्त्‍याने खरी वस्‍तुस्थिती लपवून दिशाभूल करण्‍याचा प्रयत्‍न केला असल्‍यामुळे सदर तक्रार विरुध्‍द पक्ष विरुध्‍द खारीज करण्‍यात यावी.
  5. तक्रारकर्त्‍याची तक्रार, दस्‍तावेज, शपथपञ व लेखी युक्तिवाद, विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज, शपथपञ आणि विरुध्‍द पक्ष यांचे लेखी उत्‍तर, दस्‍तावेज, शपथपञ यालाच त्‍यांचे लेखी युक्तिवाद समजण्‍यात यावे अशी पुर‍सिस दाखल तसेच परस्‍पर विरोधी कथनाचा सखोल विचार करुन न्‍यायनिर्णयासाठी आयोगाने खालिल कारणमीमांसा व निष्‍कर्षे विचारार्थ घेण्‍यात आले. 
  6. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडे मुदत ठेवी ठेवल्‍यामुळे तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचे ग्राहक आहे तसेच ग्राहक संरक्षण कायद्यान्‍वये ग्राहकाला हक्‍क व अतिरीक्‍त व दिवाणी स्‍वरुपाचा कायदेशीर हक्‍क असल्‍यामुळे या कायद्याअंतर्गत आयोगाला सदर तक्रारीचे निवारण व आदेश देण्‍याचे अधिकार आहेत. सबब विरुध्‍द पक्षाचे म्‍हणणे की सदर तक्रार चालविण्‍याचा आयोगाला अधिकारी नाही ही बाब मान्‍य करण्‍यास योग्‍य नाही.
  7. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष यांचेकडे तक्रारीत नमूद असलेल्‍या मुदत ठेवी ९ टक्‍के   व्‍याज दराने ठेवल्‍या व त्‍या मुदत ठेवी व्‍याजाप्रमाणे त्‍यांना  देय तारखेला म्‍हणजेच अनुक्रमे दिनांक २३,२४,२५ या तारखेला न मिळता दिनांक २/५/२०२० रोजी मिळाल्‍या यात वाद नाही. तक्रारकर्त्‍याने तक्रारीप्रमाणे वादातीत देय रक्‍कम रुपये २,९०,१५३/-या रकमेचा धनादेश परत आल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याचे युनियन बॅंक यांनी त्‍याचेवर दंड बसविला व तक्रारकर्त्‍याला सदर रक्‍कम मिळण्‍यास विलंब झाला. सबब तक्रारकर्त्‍याने आयोगाकडे तक्रार दाखल करुन विलंबाने मिळणा-या देय रक्‍कम व्‍याजासकट मिळण्‍यात यावी अशी मागणी केलेली आहे. विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याच्‍या बचाव पक्षात वादातीत मुदतठेव रक्‍कम रुपये २,९०,१५३/- दिनांक २७/०४/२०२० जी तक्रारकर्त्‍यास धनादेश वटवण्‍यास अडचण झाली ती रक्‍कम आर.टी.जी.एस. व्‍दारे तक्रारकर्त्‍याच्‍या खात्‍यात जमा केली असे नमूद करुन तक्रारीत दिनांक २२/०३/२०२१ च्‍या दस्‍त यादी सोबत दस्‍त क्रमांक ३ वर मुदत ठेव प्रपञ दाखल केलेले असून त्‍यावर तक्रारकर्त्‍याची देय रक्‍कम रुपये २,९०,१५३/- प्राप्‍त झाल्‍याची स्‍वाक्षरी आहे तसेच विरुध्‍द पक्ष यांनी दिेलेला धनादेश परत आल्‍यामुळे तक्रारकर्ता यांना बसलेल्‍या दंडाची रकमेची मागणी केली होती ती सुध्‍दा रक्‍कम विरुध्‍द पक्ष यांनी दिनांक १३/०५/२०२० रोजी नुकसान भरपाई रक्‍कम रुपये १६७/- सहीत तक्रारकर्त्‍याच्‍या युनियन बॅंकेच्‍या खात्‍यात आर.टी.जी.एस. व्‍दारे जमा केली आहे व  ती रक्‍कम तक्रारकर्त्‍याला मिळालेली आहे तसेच तक्रारकर्त्‍याने तक्रारीत नमूद केलेली देय रक्‍कम रुपये ८७,२००/- दिनांक २२/०५/२०२० रोजी तक्रारकर्त्‍याचे खात्‍यात आर.टी.जी.एस. व्‍दारे जमा झाली असून ती रक्‍कम ही तक्रारकर्त्‍याला प्राप्‍त झाली त्‍याबद्दलचे दस्‍तावेज दस्‍त क्रमांक ७ वर दाखल आहे. आयोगाच्‍या मते तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत दाखल केलेल्‍या कागदपञांचे अवलोकन केले असता विरुध्‍द पक्ष यांनी कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणुचा प्रसार भारतच काय तर जगभरच झालेला असतांना अशा कठीण प्रसंगी कामाचे तास व मनुष्‍यबल कमी असूनही तक्रारकर्त्‍याची देय रक्‍कम त्‍याच्‍या युनियन बॅंकेच्‍या खात्‍यात व्‍याजासकट जमा केलेली आहे तसेच धनादेश काही अडचणीमुळे उशीरा जमा झाल्‍यामुळे तक्रारकर्त्‍यावर बसविलेली दंडाची रक्‍कम ही आर.बी.आय. च्‍या नुकसान भरपाईच्‍या नियमाप्रमाणे तक्रारकर्त्‍यास दिलेली आहे. आयोगाच्‍या मते तक्रारकर्त्‍याला विरुध्‍द पक्ष यांचेकडून मिळालेली देय रक्‍कम ही अवास्‍तव विलंबामुळे मिळालेली नसून योग्‍य वेळेत मिळालेली आहे. सबब विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति कोणतीही सेवेत ञुटी केलेली नाही असे आयोगाचे मत आहे. सबब आयोग खालिल आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. ५/२०२१ खारीज करण्‍यात येते.
  2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.