Maharashtra

Kolhapur

CC/10/473

Omkar Uttam Dange - Complainant(s)

Versus

Shri.Datt Nagari Sah Pat Sanstha - Opp.Party(s)

V.B.Shingan

07 Dec 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/472
1. Sou.Sneha Sanjay JadhavA/P.Shahuwadi, Tal-Shahuwadi, Kolhapur.2. Omkar Uttam Dange, R/o.Shahuwadi, Tal.Shahuwadi, Dist.Kolhapur(Complainant in Complaint No.473/10)3. Kum.Pratik Santosh Jadhav, At Post Shahuwadi, Dist.KolhapurMinor Guardian - Father Shri Sanjay Vasant Jadhav, r/o. Shahuwadi, Dist.Kolhapur. (Complainant in Complaint No.474/10) ...........Appellant(s)

Versus.
1. Shri Datt Nagari Sahakari Pat Sanstha Maryadit, through ManagerShahuwadi, Tal-Shahuwadi,Kolhapur.2. Shivaji Mahipati PatilKolgaon Tal-Shahuwadi.Kolhapur3. Bhagwan Dagadu ParaleTal-Shahuwadi.Kolhapur4. Parshuram Sitaram ShindeTal-Shahuwadi.Kolhapur5. Sajjan Pandurang More.Sambu Tal-Shahuwadi.Kolhapur6. Tukaram Bhau KadwekarAmbarde, Tal-Shahuwadi.Kolhapur7. Shivaji Namdev BolaveKaranjoshi, Tal-Shahuwadi.Kolhapur8. Bhagawn Sahdev PatilShirala. Tal-Shahuwadi.Kolhapur9. Sanjay Sakharam ChawareTal-Shahuwadi.Kolhapur10. Amruta Ananda JadhavTal-Shahuwadi.Kolhapur11. Dattatrya Dagadu KambaleKolgaon, Tal-Shahuwadi.Kolhapur12. Tanaji Balwant Gosavi.Sasegaon, Tal-Shahuwadi.Kolhapur13. Dr,Susama Ashok JangteTal-Shahuwadi.Kolhapur14. Sadashiv Dyanu ChougulePatne. Tal-Shahuwadi.Kolhapur ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBER
PRESENT :Adv.V.B.Singhan for the complainants

Dated : 07 Dec 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

संयुक्‍त निकालपत्र :- (दि.07.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

(1)        प्रस्‍तुत ग्राहक तक्रार केस नं.472 ते 474/10 या तिन्‍ही तक्रारींच्‍या विषयांमध्‍ये साम्‍य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्‍याने हे मंच सदर तिन्‍ही प्रकरणांमध्‍ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे.
 
(2)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवालाक्र.1, 3, 6 ते 14 यांनी म्‍हणणे दाखल केले. सामनेवाला क्र.1, 3 6 ते 14 यांचे म्‍हणणेच सामनेवाला क्र.4 व 5 यांचे म्‍हणणे म्‍हणून वाचणेत यावे अशी पुरसिस दाखल केली आहे. सामनेवाला क्र.2 यांना या मंचाने पाठविलेला नोटीसीचा लखोटा “Left address, not known” असा पोष्‍टाचा शेरा होवून परत आला आहे. त्‍या अनुषंगाने तक्रारदारांनी दि.27.09.2010 रोजी शपथपत्र दाखल करुन सदर सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्‍द नो से चा आदेश होणेबाबत विनंती केली आहे. तक्रारदारांच्‍या सदर शपथपत्राचा विचार करता सामनेवाला क्र.2 यांचेविरुध्‍द नो से चा आदेश पारीत करणेत आला.    सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाला गैरहजर आहेत.
 
(3)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे ‘दत्‍त कॉल ठेव’ व दामदुप्‍पट ठेवीच्‍या स्‍वरुपात रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदत/मुदतपूर्ण तारीख
व्‍याजदर/मुदतपूर्ण रक्‍कम
1.
472/10
844
10000/-
03.03.2004
15 दिवस
11%
2.
473/10
141
10000/-
07.08.2002
07.08.2007
20000/-
3.
474/10
142
10000/-
07.08.2002
07.08.2007
20000/-

 
(4)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे. तक्रारदाराना सदर रक्‍कमांची कौटुंबिक व प्रापंचिक आर्थिकर गरजा भागविण्‍यासाठी आवश्‍यकता आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्‍कमा देण्‍यास टाळाटाळ केली. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.05.04.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(5)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
(6)        सामनेवाला क्र.1, 3 ते 14 यांनी त्‍यांच्‍या एकत्रित म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, सामनेवाला क्र.14 हे शासन नियुक्‍त विशेष वसुली अधिकारी असून त्‍यांचा तक्रारीतील व्‍यवहाराशी कोणत्‍याही प्रकारचा संबंध नाही. सामनेवाला संस्‍था ही सन 2006 पासून पूर्णपणे बंद पडली आहे व तिस रुपये 40 लाखाचा तोटा झालेला आहे. वस्‍तुत: शासकिय परिपत्रक क्र.बँका/डी4/शासनअर्थ.सह.अंमल/10/343 सहकार आयुक्‍त व निबंधक, सहकारी संस्‍था, महाराष्‍ट्र राज्‍य, पुणे दि.23.02.2010 नुसार अडचणीत असलेल्‍या पतसंस्‍थेच्‍या पात्र ठेवीदारांना रुपये 10,000/- इतकी रक्‍कम परत करणेचे आदेश झाले आहेत.  त्‍यानुसार  सामनेवाला संस्‍थेच्‍या 476 ठेवीदारांना रुपये 31,71,213/- इतकी रक्‍कम मंजूर केलली असून सदर रक्‍कम के.डी.सी.सी.बँक, शाखा शाहुवाडी येथे संस्‍थेच्‍या खात्‍यात जमा आहे व ठेवीदारांना चेक वाटप सुरु आहे. त्‍यानुसार रुपये 10,000/- चा चेक घेवून जाणेबाबत तक्रारदारांना कळविले असता अद्यापही तक्रारदार हे रक्‍कम घेवून गेलेले नाहीत. सदरची रक्‍कम मे.कोर्टात जमा करणेस सामनेवाला संस्‍था तयार आहेत. परंतु, तक्रारदार कोणतेही सहकार्य करणेस तयार नाहीत. सबब, तक्रारदारांची तक्रार खारीज करणेत यावी अशी विनंती केली आहे.
 
(7)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत संचालक मंडळाचा ठराव, रुपये 10,000/- चेक घेवून जाणेबाबतचे पत्र, यु.पी.सी.सर्टिफिकेट, रजि.ए.डी.ने पाठविलेला स्विकारत नसलेच्‍या शे-यानिशी परत आलेला लखोटा, तक्रारदारांच्‍या नोटीसीस दिलेले उत्‍तर इत्‍यादीच्‍या प्रती दाखल केलेल्‍या आहेत. 
 
(8)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. 
 
(9)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यामध्‍ये सहकार खात्‍याच्‍या परिपत्रकानुसार रुपये 10,000/- चा चेक घेवून जाणेबाबत तक्रारदारांना कळविले असता अद्यापही तक्रारदार हे रक्‍कम घेवून गेलेले नाहीत. सदरची रक्‍कम मे.कोर्टात जमा करणेस सामनेवाला संस्‍था तयार आहेत असे कथन केले आहे. सदर कथनाच्‍या पुष्‍टयर्थ सामनेवाला यांनी तक्रारदारांना पाठविलेल्‍या पत्राबाबतचा पुरावा म्‍हणून यु.पी.सी.सर्टिफिकेट व रजि.ए.डी.चा परत आलेला लखोटा प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेला आहे. सदर यु.पी.सी.सर्टिफिकेट व रजि.ए.डी.चा परत आलेला लखोटा यांचे अवलोकन केले असता सामनेवाला यांनी तक्रारदारांनी सदरची पत्रे ही दि.07.09.2010 रोजी पाठविलेचे दिसून येते. प्रस्‍तुतची तक्रार ही दि.09.08.2010 रोजी दाखल झालेली आहे व दि. 09.08.2010 रोजी या मंचाने सामनेवाला यांना प्रस्‍तुत प्रकरणाची नोटीस पाठविली आहे. सामनेवाला यांना तक्रारदारांची ठेव रक्‍कम द्यावयाची असती तर त्‍यांनी सहकार खात्‍याचे परिपत्रक दि.23.02.2010 जारी झाले त्‍यानंतर व तक्रार दाखल होणेचेपूर्वीही दिली असती. तथापि, सामनेवाला यांनी तसे केलेले नाही. सदर विवेचनाचा विचार करता सामनेवाला यांनी सदरचे कथन व कृती हे दोन्‍हीही पश्‍चातबुध्‍दीने केलेचे स्‍पष्‍ट होते. सामनेवाला यांनी तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा मागणी करुनही व्‍याजासह परत न करुन सेवेत त्रुटी केली असल्‍याचे निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे. सामनेवाला क्र.14 हे शासनाने नियुक्‍त केलेले विशेष वसुली अधिकारी आहेत. त्‍यामुळे तक्रारदारांच्‍या ठेवी परत करणेची जबाबदारी त्‍यांचेवर येत नाही. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 (संस्‍था) ते 13 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) यांची केवळ संयुक्तिक‍ जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       ग्राहक तक्रार क्र.472/10 मधील तक्रारदारांनी कॉल डिपॉझिट पावती क्र.844 स्‍वरुपात रक्‍कम ठेवली आहे. म्‍हणजेच, तक्रारदारांनी सदर पावत्‍यांची रक्‍कम मागणी करताच सामनेवाला यांनी रक्‍कम व्‍याजासह देणे आवश्‍यक होते. तथापि, तसे सामनेवाला यांनी केलेले नाही. तक्रारदार यांनी सदर कॉल डिपॉझिट पावतीची रक्‍कम ही त्‍यांनी प्रथमत: सामनेवाला यांचेकडे दि.05.04.2010 रोजीच्‍या वकिलामार्फत पाठविलेल्‍या नोटीसीने मागणी केल्‍याचे स्‍पष्‍ट होते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर कॉल ठेव रक्‍कमा ठेव तारखेपासून 05.04.2010 रोजीपर्यन्‍त ठेव पावत्‍यांवर नमूद म्‍हणजेच द.सा.द.शे.11 टक्‍के व्‍याजासह व त्‍यानंतर द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजाने मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(11)        ग्राहक तक्रार क्र.473 व 474/10 मधील तक्रारदारांनी प्रस्‍तुत प्रकरणी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या दामदुप्‍पट ठेवींच्‍या असून त्‍यांच्‍या मुदती संपलेल्‍या आहेत असे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे दामदुप्‍पट ठेव पावत्‍यांवरील मुदतपूर्ण रक्‍कमा मुदत संपलेल्‍या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(12)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांच्‍या तक्रारी मंजूर करणेत येतात.
 
(2)   सामनेवाला क्र.1 (संस्‍था) ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रार क्र.472/10 मधील तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील कॉल डिपॉझिट पावती क्र.844 ची रक्‍कम रुपये 10,000/- (रुपये दहा हजार फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर ठेव तारखेपासून दि. 05.04.2010 रोजीपर्यन्‍त कोष्‍टकात नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(3)   सामनेवाला क्र.1 (संस्‍था) ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील दामदुप्‍पट रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर दि.08.08.2007 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज द्यावे.
 

अ.क्र.
तक्रार क्र.
ठेव पावती क्र.
मुदतपूर्ण देय रक्‍कम
व्‍याज देय तारीख
1.
473/10
141
20000/-
07.08.2007
2.
474/10
142
20000/-
07.08.2007

 
 
(4)   सामनेवाला क्र.1 (संस्‍था) ते 13 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तर सामनेवाला क्र.1 (मॅनेजर) यांनी केवळ संयुक्तिकरित्‍या प्रत्‍येक तक्रारीकरिता तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT