Maharashtra

Kolhapur

CC/10/332

Shivaji Yamaji Mangle. - Complainant(s)

Versus

Shri.Bhawanimata Mahila Nagri Sah Pat Sanstha and others, - Opp.Party(s)

P.A.Vankudre

21 Oct 2010

ORDER


monthly reportDistrict Consumer Forum, Kolhapur
Complaint Case No. CC/10/332
1. Shivaji Yamaji Mangle.Mahagaon.Tal-Gadhinglaj.Kolhapur ...........Appellant(s)

Versus.
1. Shri.Bhawanimata Mahila Nagri Sah Pat Sanstha and others,Gargoti.Tal-Bhudargad.Kolhapur2. Bhawanimata Mahila Nagari Sah Pat Sanatha Branch - Gadhingalaj.Tal-Gadhingalaj.Kolhapur3. Chairman.Dr.Sou.Ashalata Shamrao Desai.Gadhinglaj Road.Gargoti.Tal - Bhudargad. Kolhapur, 4. Vic,Chairaman. Sou.Suman Appaso Ingale.Khadak Galli.Gargoti.Tal - Bhudargad. Kolhapur, 5. Sou.Rekha Sadashiv Devaradekar.Sonarwadi.Tal - Bhudargad. Kolhapur, 6. Sou.Ranjana Sambhaji Desai.Dr.J.P.Naik Colony.Gargoti.Tal - Bhudargad. Kolhapur, 7. Sou.Saroj Bhimrao Dhere.Fanaswadi.Tal - Bhudargad. Kolhapur, 8. Sou.Jayshri Namdev Patil.Nadhawde.Tal - Bhudargad. Kolhapur, 9. Sou.Sanjiwni Shridhar Koli.Waghapur.Tal - Bhudargad. Kolhapur, 10. Smti.Gourawa Mallappa Dandgi.Subhash Road.Gadhingalaj.Kolhapur11. Sou.Shalan Masnu Kambale.Madur.Tal - Bhudargad. Kolhapur, 12. Sou.Anjali Shahebrao Jadhav.Sonarwadi.Tal - Bhudargad. Kolhapur, 13. Sou.Anandi Pandurang Gurav.Khanapur.Tal-Bhudargad.Kolhapur14. Sou.Sonabai Pundlik Desai.Kolawan.Tal - Bhudargad. Kolhapur, ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh ,PRESIDENTHONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar ,MEMBERHONABLE MRS. Mrs.V.N.Shinde ,MEMBER
PRESENT :P.A.Vankudre, Advocate for Complainant
Adv.Kasim Mulla for the Opponent No.3 to 14

Dated : 21 Oct 2010
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

निकालपत्र :- (दि.21.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्‍यक्ष)

 (1)        प्रस्‍तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.3 ते 14 यांनी म्‍हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्‍हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्‍या व सामनेवाला क्र.3 ते 14 यांच वकिलांनी युक्तिवाद केला.
 
(2)        तक्रारदाराची थोडक्‍यात तक्रार अशी,
           यातील तक्रारदारांनी स्‍वत:च्‍या व नात-नातीच्‍या नांवे सामनेवाला पतसंस्‍थेकडे मुदत बंद ठेवीच्‍या स्‍वरुपात व सेव्‍हींग्‍ज खात्‍यावर रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत, त्‍यांच्‍या तपशील खालीलप्रमाणे :-
 

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
ठेव तारीख
मुदतपूर्ण तारीख
मुदत
1.
2323
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
2.
2330
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
3.
2333
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
4.
2334
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
5.
2331
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
6.
2332
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
7.
2328
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
8.
2327
25000/-
29.04.2005
25000/-
3 महिने
9.
1097
686675/-
--
--
--

 
(3)        सदर ठेवींची मुदत संपल्‍यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्‍थेकडे रक्‍कमांची वारंवार मागणी केली आहे.  तक्रारदारांनी सामनेवाला यांचेकडे वारंवार मागणी केलेनंतर सामनेवाला यांनी रुपये 2,000/-, रुपये 3,000/- व रुपये 5,000/- अशा रक्‍कमा दिलेल्‍या आहेत. तथापि, तदनंतर सामनेवाला यांचे अध्‍यक्ष, उपाध्‍यक्ष व संचालकांना भेटणेस गेलेवर सर्वजण टाळाटाळ करतात व आजतागायत रक्‍कम देणेत आलेली नाही.  तक्रारदारांना सदर रक्‍कमांची आवश्‍यकता होती त्‍यावेळी न मिळाल्‍याने त्‍यांची आर्थिक कामे झालेली नाहीत. त्‍यामुळे तक्रारदारांनी दि.26.11.2009 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्‍याजासह ठेवींच्‍या रक्‍कमांची मागणी केली. सदरची नोटीस मिळूनही सामनेवाला यांनी कोणतेही उत्‍तर दिलेले नाही किंवा तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा अदा केल्‍या नाहीत. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्‍था गारगोटी यांचेकडे सामनेवाला संस्‍थेच्‍या संचालक मंडळाच्‍या यादीची मागणी करुनही त्‍यांनी न दिल्‍याने सामनेवाला संस्‍थेमध्‍ये नोंद असलेल्‍या संचालक मंडळाची यादी लिहून त्‍याप्रमाणे प्रस्‍तुत प्रकरणी सामनेवाला केले आहे.   त्‍यामुळे तक्रारदारांनी व्‍याजासह ठेव रक्‍कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे.
    
(4)        तक्रारदारांनी त्‍यांच्‍या तक्रारीसोबत ठेव पावत्‍या, सेव्हिंग्‍ज खात्‍यांचे पासबुक, जिल्‍हा उपनिबधंक यांचेकडे केलेला अर्ज व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्‍यादींच्‍या सत्‍यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे.
 
(5)        सामनेवाला क्र.3 ते 14 यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यान्‍वये तक्रारदारांच्‍या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात पुढे सांगतात, बचत खाते क्र.1097 वरील रक्‍कम तक्रारदारांनी मागणी केली त्‍याप्रमाणे दिलेली आहे. सामनेवाला संस्‍थेकडे जसजशी रक्‍कम वसुली होईल त्‍याप्रमाणे तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेव रक्‍कमा देणेत येतील असे सांगूनही तक्रारदारांनी प्रस्‍तुतची तक्रार दाखल केली आहे. त्‍यामुळे तक्रारदारांना मानसिक त्रास देणेचा प्रश्‍न उदभवत नाही. तक्रारदारांच्‍या ठेवींशी संचालक मंडळाचा वैयक्तिकरित्‍या संबंध असलेचे कागदोपत्री पुरावा दाखल केलेला नाही. त्‍यामुळे सामनेवाला क्र.1 व 2 संस्‍थाखेरिज सामनेवाला क्र.3 ते 14 संचालकांना वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या जबाबदार धरता येणार नाही. प्रस्‍तुत सामनेवाला हे संस्‍थेचे सेवाभावी संचालक म्‍हणून काम करीत असून संस्‍थेचा कारभार सुरळित चालावा या उद्देशाने विनामोबदला काम करीत असून तक्रारदारांना त्‍यांच्‍या ठेवी प्रथम प्राधान्‍याने देणेचा प्रामाणिक प्रयत्‍न करीत आहेत. निवडून येणा-या संचालकांचे काम हे संस्‍थेवर केवळ नियंत्रण ठेवणेचे असलेने त्‍यांना लाभ घेणेचे अधिकार नसतात. ठेवी स्विकारणे व अदा करणेची जबाबदारी ही संस्‍था स्‍तरावर प्रशासकिय स्‍वरुपाची असल्‍याने संचालकांना वैयक्तिक व संयुक्तिकरित्‍या जबाबदार धरत येणार नाही. सबब, सामनेवाला क्र.1 व 2 यांचेबाबत जबाबदारी निश्चित करुन सामनेवाला क्र.3 ते 14 यांना वगळणेत यावे अशी विनंती केली आहे.
 
(6)        सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यासोबत तक्रारदारांचे सेव्‍हींग खाते क्र.1097 चा उतारा दाखल केलेला आहे.
 
(7)        प्रस्‍तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्‍लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्‍थेमध्‍ये ठेव रक्‍कमा ठेवलेल्‍या आहेत; सदर ठेव पावत्‍यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्‍थेमध्‍ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्‍कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्‍कमांच्‍या मुदती संपून गेलेल्‍या आहेत व सदर रक्‍कमांची तक्रारदारांनी व्‍याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्‍तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला यांनी त्‍यांच्‍या म्‍हणण्‍यात संस्‍थेत वसुल होईल त्‍याप्रमाणे तक्रारदारांच्‍या सेव्‍हींग खात्‍यावरील रक्‍कमा दिलेचे कथन केले व सदर बचत खात्‍याचा उतारा दाखल केला आहे. सदर खाते उता-याचे अवलोकन केले असता अद्याप रुपये 6,64,675/- इतकी रक्‍कम तक्रारदारांना देय असलेचे दिसून येते. सामनेवाला यांच्‍या उर्वरित म्‍हणण्‍यातील कथनांचा तक्रारदारांच्‍या तक्रारींशी कोणताही दुरान्‍वयेदेखील संबंध नसल्‍याचे स्‍पष्‍ट होते.  सबब, तक्रारदारांच्‍या व्‍याजासह ठेव रक्‍कमा सामनेवाला यांनी न देवून त्‍यांच्‍या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्‍या ठेव रक्‍कमा देण्‍याची सामनेवाला क्र. 1 ते 14 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(8)        तक्रारदार यांनी प्रस्‍तुत कामी दाखल केलेल्‍या ठेव पावत्‍यांच्‍या सत्‍यप्रतींचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्‍या या मुदत बंद ठेवींच्‍या आहेत व त्‍यांची मुदत संपलेचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे त्‍यांच्‍या मुदत ठेव रक्‍कमा पावतीवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत. तसेच, मुदत संपलेनंतर तक्रारदारांना मुदत ठेवींची संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे. 6 टक्‍के व्‍याज मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(9)        तसेच, तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्‍थेकडे सेव्‍हींग्‍ज खात्‍याच्‍या स्‍वरुपातदेखील रक्‍कमा ठेवल्‍याचे दिसून येते. सदर सेव्हिंग्‍ज खाते क्र. 1097 वर दि.12.08.2009 रोजीअखेर रुपये 6,64,675/- जमा असल्‍याचे दिसून येते. त्‍यामुळे तक्रारदार हे सदर सेव्हिंग्‍ज खात्‍यावरील रक्‍कम द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे.
 
(10)       तक्रारदारांनी ठेव रक्‍कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्‍याजासह रक्‍कमा परत न दिल्‍याने सदर रक्‍कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्‍यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्‍कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्‍कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
 
आदेश
 
(1)   तक्रारदारांची तक्रार मंजूर करणेत येते.
 
(2)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना खालील कोष्‍टकातील मुदत बंद रक्‍कमा द्याव्‍यात. सदर रक्‍कमांवर ठेव पावत्‍यांवर नमूद मुदतीकरिता नमूद व्‍याज द्यावे व तदनंतर तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.6 टक्‍के व्‍याज द्यावे.

अ.क्र.
ठेव पावती क्र.
ठेव रक्‍कम
1.
2323
25000/-
2.
2330
25000/-
3.
2333
25000/-
4.
2334
25000/-
5.
2331
25000/-
6.
2332
25000/-
7.
2328
25000/-
8.
2327
25000/-

 
(3)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना त्‍यांच्‍या सेव्हिंग्‍ज खाते क्र.1097 वरील रक्‍कम रुपये 6,64,675/- (रुपये सहा लाख चौसष्‍ट हजार सहाशे पंच्‍च्‍याहत्‍तर फक्‍त) द्यावी. सदर रक्‍कमेवर दि.12.08.2009 रोजीपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्‍कम मिळेपावेतो द.सा.द.शे.3.5 टक्‍के व्‍याज द्यावे.
 
(4)   सामनेवाला क्र.1 ते 14 यांनी वैयक्तिकरित्‍या व संयुक्तिकरित्‍या तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.

[HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER