Maharashtra

Chandrapur

CC/22/45

Shri.Dr.Gautam Ganapat Nagarale - Complainant(s)

Versus

Shri.Akrambhai (Vidarbha Mechanical Shop ) - Opp.Party(s)

SELF

08 Feb 2023

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTE REDRESSAL COMMISSION
CHANDRAPUR
 
Complaint Case No. CC/22/45
( Date of Filing : 11 Mar 2022 )
 
1. Shri.Dr.Gautam Ganapat Nagarale
Sayare ley-Out,Ananadwan chowk,Post-Ananadwan,Tah.Warora,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. Shri.Akrambhai (Vidarbha Mechanical Shop )
Ratnamala chowk, warora Tah.Warora,Dist-Chandrapur
CHANDRAPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. Atul D.Alsi PRESIDENT
 HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil MEMBER
 HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute MEMBER
 
PRESENT:
 
Dated : 08 Feb 2023
Final Order / Judgement

::: नि का ल  प ञ   :::

           (मंचाचे निर्णयान्वये, सौ. किर्ती वैद्य (गाडगीळ), मा. सदस्‍या)                  

                  (पारीत दिनांक ०८/०२/२०२३)

 

                       

                       

  1. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, अन्‍वये दाखल केली आहे.
  2. तक्रारकर्त्‍याची कार टाटा नॅनो एम.एच. ३४-एए २२८२ चा ब्रेक कमी लागत असल्‍यामुळे दिनांक २/२/२०२२ रोजी पुढचे व मागचे चारही चक्‍क्याचे ब्रेक शुज चंद्रपूर वरुन घेवून आणून विरुध्‍द पक्ष यांना दिले व विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचा गाडीला ब्रेक शुज लावून दिले. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने दिनांक ७/३/२०२२ रोजी श्री मयूर पढाल  या चालकास घेऊन गाडी काढली असता १०० मीटरवरच ड्रायव्‍हर साईडकडील समोरचा चक्‍का घासून जाम झाला तेव्‍हा  वरोरा येथील मिस्‍ञीने तो तात्‍पुरता सेट करुन दिला. नंतर दुस-या दिवशी दिनांक ८/३/२०२२ रोजी तक्रारकर्त्‍याने रत्‍नमाला चौकातील नासीर शेख यांच्‍या  गॅरेजमध्‍ये गाडीचे चक्‍के उघडले असता असे आढळले की तीन ब्रेक शुज मधील अॅडजेस्‍टरला पट्टया नाही व नवीन ब्रेक शुज लाईनरला जुन्‍या लाईनर मधील प्‍लेट लावल्‍या नसल्‍याचे निदर्शनास आले जेव्‍हा की तीन अॅडजेस्‍टर ला चिपकून असलेल्‍या पट्या तक्रारकर्त्‍याच्‍या समोरच विरुध्‍द पक्षाने दिनांक २/२/२०२२ ला तोडून टाकल्‍या होत्‍या तेव्‍हा विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला त्‍याचे काही काम नाही असे सांगितले होते. तक्रारकर्त्‍याचे पुढे असे म्‍हणणे आहे की, तक्रारकर्त्‍याने गाडीसाठी पट्टीसह अॅडजेस्‍टर भगवान ऑटोमोबाईल चंद्रपूर येथून आणल्‍या होत्‍या परंतु ओव्‍हरसाईज निघाल्‍यामुळे त्‍या परत कराव्‍या लागल्‍या. आता पुन्‍हा पुट्टीसह अॅडजेस्‍टर मिळाले नाही तर complete assembly विरुध्‍द पक्षामुळे विकत घेऊन जास्‍तीचा खर्च तक्रारकर्त्‍याला होईल त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांना गाडीचे काम काहीही समजत नसल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याची अशी मागणी आहे की, विरुध्‍द पक्ष यांचा दुकानाचा परवाना रद्द करण्‍यात यावा.
  3. तक्रारकर्त्‍याची तक्रार स्‍वीकृत करुन विरुध्‍द पक्ष यांना नोटीस पाठविण्‍यात आले.
  4. विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारीत उपस्थित होऊन तक्रारीत त्‍याचे उत्‍तर नमूद करीत तक्रारकर्त्‍याचे तक्रारीतील कथन खोडून काढीत पुढे असे नमूद केले की, विरुध्‍द पक्ष हे कुशल मेकॅनिक आहे. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेल्‍या भगवान ऑटोमोबाईल दिनांक १/२/२०२२ रोजीचे बिलावरुन दिसून येते की, तक्रारकर्त्‍याने जे लाईनर घेतलेते तक्रारकर्त्‍याचे गाडीला सुसंगत नव्‍हते. त्‍याचप्रमाणे सदर लाईनरला हॅन्‍ड ब्रेक  पट्टी सुध्‍दा नव्‍हती. तक्रारकर्ता हा जेव्‍हा विरुध्‍द पक्षाकडे गाडी घेऊन आला तेव्‍हा विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍यास नवीन लाईनर शुज मध्‍ये नवीन हॅन्‍ड ब्रेक पट्टी नाही, ती वेगळी घेऊन टाकावी लागेल असे सांगितले त्‍यावेळी तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला सांगितले की त्‍यांना तातडीने बाहेर जायचे असल्‍यामुळे हॅन्‍ड ब्रेक पट्टी नसली तरी लाईनर ला कही फरक पडत नाही त्‍यामुळे फक्‍त नवीन लाईनर लावून द्यायला सांगितले त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याने आणलेल्‍या सर्व वस्‍तु गाडीमध्‍ये ज्‍या  ज्‍या ठिकाणी ब्रेक शुज व्‍यवस्थित नसतील अश्‍या पध्‍दतीने गाडी दुरुस्‍ती करुन दिली. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदर गाडी किती किलोमीटर व कशी चालवली याची कल्‍पना विरुध्‍द पक्ष यांना नाही. त्‍यानंतर तक्रारकर्त्‍याने सदर गाडी १ महिना घरी ठेवली. त्‍यानंतर जेव्‍हा दिनांक ७/३/२०२२ रोजी तेव्‍हा गाडी १०० किलोमीटर चालवली तेव्‍हाच तक्रारकर्त्‍याने गाडी विरुध्‍द पक्षाकडे आणून दाखवायला हवी होती किंवा विरुध्‍द पक्ष यांना बोलावून घ्‍यायला पाहिजे होते परंतु तसे न करता तक्रारकर्ता सदर गाडी दुस-या तिस-या मेकॅनिकला दाखवून त्‍याच्‍या कडून काय दुरुस्‍ती करुन घेतली त्‍याबद्दल काहीही विरुध्‍द पक्ष यांना माहीत नाही. विरुध्‍द पक्ष यांनी पुढे नमूद केले की गाडीच्‍या स्‍पेअर पार्टची कोणतीही हमी नसते. त्‍याचप्रमाणे रोड वरील ब्रेकर पार करतांना लाईनरवर लोड आल्‍यास ते डॅमेज होण्‍याची शक्‍यता असते त्‍याचप्रमाणे नट बोल्‍ट गंजु शकतात तसेच ते ढीले होऊ शकतात. वास्‍तविक तक्रारकर्ता हा पहिल्‍यांदा जेव्‍हा  विरुध्‍द पक्षाकडे ब्रेकर शुज घेऊन आला तेव्‍हा विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याला सदर ब्रेक शुज गाडीला लागत नाही असे स्‍पष्‍ट सांगून परत करण्‍यास सांगितले व ते तक्रारकर्त्‍याने भगवान ऑटोमोबाईल मध्‍ये परत केले. यावरुन विरुध्‍द पक्ष यांनी कोणतीही कामात कुचराई/हलगर्जी केली नाही असे स्‍पष्‍ट होत आहे. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार फक्‍त स्‍पेअर पार्टचे पैसे विरुध्‍द पक्षाकडून वसुल करण्‍यासाठी वाईट हेतूने सदर तक्रार दाखल केलेली आहे. आयोगाला विरुध्‍द पक्ष यांचे परवाना रद्द करण्‍याचा आदेश पारित करण्‍याचे अधिकार नाही. सदर तक्रार तक्रारकर्त्‍याने वाईट हेतूने व आयोगाची दिशाभूल केलेली असल्‍यामुळे सदर तक्रार दंडासह खारीज करण्‍यात यावी.
  5. तक्रारकर्त्‍याने दाखल केलेली तक्रार, शपथपञ तसेच विरुध्‍द पक्ष यांनी दाखल केलेले उत्‍तर, शपथपञ तसेच उभयपक्षांचा लेखी व तोंडी युक्तिवादयावरुन  तक्रारीच्‍या निकालीकामी खालील मुद्दे व त्‍यावरील निष्‍कर्षे आणि कारणमीमांसा खालीलप्रमाणे आहे.
  6. तक्रारकर्त्‍याने सदर तक्रार विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याच्‍या नॅनो गाडीचे ब्रेक कमी लागत असल्‍यामुळे दिनांक २/२/२०२२ रोजी विरुध्‍द पक्ष गाडीचे पुढचे व मागचे चारही चाकाचे ब्रेक शुज बदलविण्‍यासाठी विकत घेऊन नेले असता विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याचे गाडीचे पुढचे व मागच्‍या चाकाचे ब्रेकचे काम केले. तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍यानंतर एक महिना गाडी त्‍याच्‍या  घरीच उभी होती. त्‍यानंतर दिनांक २/३/२०२२ रोजी त्‍याचा ड्रायव्‍हर श्री विनोद वाढई हा गाडी घेऊन गेला असता त्‍या गाडीचे ब्रेक फार कमी लागत होते. त्‍यांनतर पुन्‍हा दिनांक ७/३/२०२२ रोजी गाडीचा चक्‍का घासून जाम झाल्‍यामुळे पुन्‍हा तक्रारकर्त्‍याने वरोरा येथील अवी मिस्‍ञीकडे चाक तात्‍पुरता सेट करुन देऊन त्‍याने गाडी चालवली असता ब्रेक कमी लागत आहे असे सांगितले व दिनांक ८/३/२०२२ रोजी नसीर शेख नामक मेकॅनिक कडे गाडी दाखवली असता त्‍याने तिन ब्रेक शुज लाईनरला जुन्‍हा लाईनर मधील प्‍लेट लावल्‍या नसल्‍याचे सांगितले. तक्रारकर्त्‍याचे तक्रारीप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी जेव्‍हा दिनांक २/२/२०२२ रोजी गाडीचे काम करतांना तीन अॅडजेस्‍टरला चिपकून असलेल्‍या  पट्टया त्‍याच्‍यासमोर तोडून टाकल्‍या व तक्रारकर्त्‍याने आणून दिलेल्‍या ब्रेक शुज विरुध्‍द पक्ष यांनी लावले नाही व ते तक्रारकर्त्‍याने दुकानदाराला परत केले. त्‍यामुळे विरुध्‍द पक्ष यांनी अॅडजेस्‍टर पट्टी तोडल्‍यामुळे त्‍यांना नवीन सेट घ्‍यावा लागला. तक्रारकर्त्‍याने तक्रारीत मागणी केली की, विरुध्‍द पक्ष यांना गाडीचे काम व्‍यवस्‍थीत येत नसल्‍यामुळे त्‍याचे काम करण्‍याचा परवाना रद्द करण्‍यात यावा. त्‍यावर विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याच्‍या  उत्‍तरात या आयोगाला विरुध्‍द पक्ष यांचा परवाना रद्द करण्‍याचा अधिकार नाही. विरुध्‍द पक्ष यांनी त्‍याचे उत्‍तरात नमूद केले की, तक्रारकर्त्‍याने आणलेले चुकीचे लाईनर हे नॅनो कारचे नसल्‍यामुळे ते विरुध्‍दपक्ष यांनी परत करुन अॅडजेस्‍टर पट्टी आणायला सांगितली परंतु ती तक्रारकर्त्‍याने आणली नाही व तातडीचे काम असल्‍यामुळे लवकर जाण्‍याचे कारण सांगितल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याच्‍या  सांगण्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी लाईनर लावून दिले. त्‍यानंतर विरुध्‍द पक्ष सदर गाडी घरी घेऊन गेला व दिनांक ७/३/२०२२ रोजी व नंतर दिनांक ८/३/२०२२ रोजी इतर दोन मेकॅनिक कडे गाडी दुरुस्‍ती करिता घेवून गेला. त्‍यामुळे ह्या दोघांनी सदर गाडीत काही दुरुस्‍ती  केली त्‍याबद्दल विरुध्‍द पक्षाचा काहीही संबंध नाही किंवा सदर मिस्‍ञी यांना तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्ष म्‍हणून तक्रारीत जोडलेले नाही तसेच विरुध्‍द पक्ष यांचे लायसन्‍स रद्द करण्‍याचा आयोगाला अधिकार नाही. आयोगाने दोन्‍ही पक्षाचे परस्‍परविरोधी युक्तिवाद तसेच दस्‍तऐवजांचे अवलोकन केले असता असे स्‍पष्‍ट होत आहे की, तक्रारकर्त्‍याचा गाडीचा ब्रेक शुजचे काम दिनांक २/२/२०२२ रोजी तक्रारीत नमूद केल्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्ष यांनी केले पण त्‍यानंतर जर बेक व्‍यवस्थित लागत नाही अशी तक्रार गाडीची असतांना तक्रारकर्त्‍याने सदर गाडी पुन्‍हा विरुध्‍द पक्षाकडे दुरुस्‍ती करिता न आणता सदर गाडी एक महिण्‍यानंतर दुस-याच तक्रारीत नमूद मेकॅनिककडे जाऊन सदर ब्रेक शुज बद्दल दुरुस्‍ती करुन घेतली. आयोगाच्‍या मते जर विरुध्‍द पक्ष यांनी गाडीचे चाकाचे ब्रेक शुजचे काम व्‍यवस्थित केले नव्‍हते तर तक्रारकर्त्‍याने एक महिना गाडी कशी चालवली किंवा चालवली नाही तर दुरुस्‍ती करिता पुन्‍हा विरुध्‍द पक्षाकडे का घेऊन गेले नाही या बद्दल काहीही खुलासा तक्रारीत केला नाही तसेच ब्रेक शुजचे काम व्‍यवस्थित केले नाही ही बाब सिध्‍द करण्‍यासाठी तक्रारकर्त्‍याने तक्रारीत कोणताही तज्‍ज्ञ  व्‍यक्‍तीचा अहवाल दाखल केला नाही. याउलट महिण्‍याभरानंतर दुस-याच व्‍यक्‍तीकडे जाऊन सदर गाडीची दुरुस्‍ती केल्‍याचे दिसून येत आहे. आयोगाचे मते तक्रारकर्ता हा त्‍याची तक्रार विरुध्‍द पक्षाविरुध्‍द सिध्‍द करु शकला नाही. आयोगाच्‍या मते तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीत काहीही तथ्‍य नसल्‍यामुळे तसेच विरुध्‍द पक्ष यांनी तक्रारकर्त्‍याप्रति  न्‍युनतापूर्ण सेवा दिलेली नसल्‍यामुळे सदर तक्रार खारीज करण्‍यात येत आहे.  

वरील विवेचनावरुन आयोग खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.

 

अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार क्र. ४५/२०२२ खारीज करण्‍यात येते.
  2. उभयपक्षांनी तक्रारीचा खर्च स्‍वतः सहन करावा.
  3. उभयपक्षांना आदेशाच्‍या प्रती विनामुल्‍य देण्‍यात यावे.
 
 
[HON'BLE MR. Atul D.Alsi]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. Kirti Vaidya Gadgil]
MEMBER
 
 
[HON'BLE MRS. Kalpana Jangade Kute]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.