द्वारा मा. श्रीमती गीता एस. घाटगे, सदस्या
** आदेश **
(05/05/2014)
सदरहू प्रकरण हे तक्रारदार यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 27 नुसार तक्रार क्र. पीडीएफ/85/2010 मधील खालील आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्यामुळे दाखल केलेले आहे.
** आदेश **
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. तक्रारदारानी जाबदेणा-यास सदनिकेची उर्वरित रक्कम
रुपये 18,000/-आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर दोन
आठवडयात दयावी. त्यानंतर जाबदेणा-यांनी तक्रारदारास
सदनिकेचा ताबा तसेच नुकसान भरपाई पोटी रक्कम
रुपये 25,000/-, तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1,000/-
आदेशाची प्रत प्राप्त झाल्यानंतर सहा आठवडयात दयावी.
सदरहू प्रकरणी आरोपी श्री. ए. ए. खान यांचेविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आले होते. आरोपी श्री. ए. ए. खान हे मयत झाल्याबद्दलचा अहवाल प्रस्तुत प्रकरणी पोलीसांनी दाखल केलेला आहे. त्यानंतर आरोपीचे मृत्युचे प्रमाणपत्रही प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेले आहे. सदरहू प्रकरण हे ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 27 अंतर्गत दाखल केलेले आहे. सदरचे प्रकरण हे फौजदारी स्वरुपाचे असल्याकारणाने आरोपींच्या वारसांविरुद्ध हे प्रकरण चालविता येणार नाही. सबब, प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज निकाली काढण्यात येतो.
स्थळ : पुणे
दिनांक : 05/मे/2014