नि.82 मे.जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,रत्नागिरी यांचेसमोर वसुली अर्ज क्रमांक : 13/2000 वसूली अर्ज दाखल झाल्याचा दि.10/03/2000 वसूली अर्ज निकाली झाल्याचा दि.24/11/2010 श्री.अनिल गोडसे, अध्यक्ष श्रीमती स्मिता देसाई, सदस्या श्री.अविनाश प्रभाकर कारखानीस प्रोप्रा- स्पॅक एंटरप्रायझेस, 1618, बंदर रोड, रत्नागिरी – 415 612. ... तक्रारदार विरुध्द श्री.वाय.व्ही.पाळंदे 2/3 एरंडवणे, स्टेट बँकेचे मागे, एस.एन.डी.टी. कॉलेजच्या समोर, पुणे – 411 004. 2. जोशी ट्रेडर्स, सुखधाम हॉटेलचेवर, रत्नागिरी – 415 612. ... सामनेवाला तक्रारदार : व्यक्तिशः सामनेवाले क्र.1 व क्र.2 : व्यक्तिशः -: नि का ल प त्र :- अ) सदर कामी सामनेवाले यांनी दि.24/11/2010 रोजी हजर होवून प्रस्तुतचे प्रकरण बोर्डावर घेवून नि.78 वर अर्ज दाखल केला. आज रोजी तक्रारदारही उपस्थित. सामनेवाला यांनी नि.79 वर अर्ज देवून दि.07/01/2000 रोजीच्या निकालानुसार रु.750/- (रु.सातशे पन्नास मात्र) आज रोजी बँक ऑफ महाराष्ट्र, रत्नागिरी यांचे डिमांड ड्राफट/पे ऑर्डर क्र.51733 ने भरले आहेत तरी केस निकालात काढावी अशी विनंती केली. तसेच तक्रारदार यांनी नि.81 वर प्रकरण निकाली काढावे यासाठी अर्ज दिला. त्याप्रमाणे नि.1 वर योग्य तो आदेश करणेत येतो असा आदेश करणेत आला. ब) नि.1 वर पुढीलप्रमाणे आदेश करणेत आला. “तक्रारदार यांनी आज रोजी समक्ष उपस्थित राहून नि.81 वर अर्ज सामनेवालाविरुध्द कोणतीही तक्रार नाही तरी सदरहू प्रकरण निकाली करणेत यावे असा अर्ज सादर केलेने नि.81 वरील अर्जाचे अनुषंगाने प्रस्तुत वसुली अर्ज निकाली करणेत येत आहे.” नि.1 वर करणेत आलेल्या आदेशाच्या अनुषंगाने प्रस्तुत वसूली अर्ज निकाली करणेत येत आहे. रत्नागिरी दिनांक : 24/11/2010 (अनिल गोडसे) अध्यक्ष, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. (स्मिता देसाई) सदस्या, ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, रत्नागिरी जिल्हा. प्रत : तक्रारदार यांना हातपोच/रजि.पोस्टाने प्रत : सामनेवाले यांना हातपोच/रजि.पोस्टाने
| [HONABLE MRS. Smita Desai] MEMBER[HONABLE MR. Anil Y. Godse] PRESIDENT | |