रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. दरखास्त क्र. 4/2008. मूळ तक्रार क्र. 99/2006. दरखास्त निकाली दि.29-1-2009. डॉ.सदानंद विनायक नाडकर्णी, उमा विनायक आनंदधाम, धामणी, पो.आंबेघर, पेण खोपोली रस्ता, ता.पेण, जि.रायगड. ... दरखास्तदार/मूळ तक्रारदार. विरुध्द
श्री.वाय.एस.कुलकर्णी, के.पी.इंजिनियर्स, अनंत अपार्टमेंट, मुळगांव चर्च रोड, तामतलाव, वसई-वेस्ट, जि.ठाणे. ... गैरअर्जदार/मूळ वि.पक्षकार. -ः अंतिम आदेश ः-
1. ही दरखास्त दरखास्तदारानी मूळ तक्रार क्र.99/06 च्या मंचाने दिलेल्या आदेशाचे पालन सामनेवालेनी वेळेत न केल्यामुळे दाखल केली होती. या कामी दरखास्तदारानी दि.29-1-08 रोजी नि. चा अर्ज देऊन मंचाला असे कळविले की, सामनेवालेनी आदेशाप्रमाणे त्यांना नुकसानभरपाई दिली आहे. आता त्यांची कोणतीही तक्रार राहिलेली नाही. तरी ही दरखास्त निकाली काढावी. तसेच त्यांनी त्यात असे कळविले की, मंचाच्या आदेशाप्रमाणे सामनेवालेनी त्यांचे सामान त्यांना घेऊन जाण्याचे असल्यास त्यांनी धामणी येथून घेऊन जावे. ते किंवा त्यांच्या ट्रस्टतर्फे कोणीही अडथळा करणार नाही. 2. मंचाने कागदपत्रांचे अवलोकन केले. दरखास्तदाराच्या मागणीप्रमाणे त्याची पूर्तता झाली आहे, तसेच त्यांनी सामनेवालेना त्यांचे सामान घेऊन जाण्यास ते हरकत करणार नसल्याचे लिहून दिले आहे. अशा परिस्थितीत ही दरखास्त पुढे चालू ठेवण्याचे काही कारण नाही असे मंचाचे मत आहे. 3. सबब ही दरखास्त अंतिमतः निकाली काढण्यात येत आहे, परंतु या कामी सामनेवालेंचे सामान दरखास्तदारांचे जागेत आहे ते घेऊन जाणेबाबत योग्य ते आदेश करणे योग्य होईल असे मंचाचे मत असल्यामुळे सामनेवालेना पुढीलप्रमाणे निर्देशित करण्यात येत आहे- सामनेवालेंनी दरखास्तदारांचे धामणी येथील जागेत असलेले सामान दरखास्तदारांना रजिस्टर्ड पोस्टाद्वारे कमीतकमी 10 दिवसाची पूर्वसूचना देऊन आदेश मिळाल्यापासून 30 दिवसांचे आत समक्ष स्वखर्चाने घेऊन जावे. तसेच दरखास्तदारांना निर्देशित करण्यात येते की, त्यांना वरील प्रमाणे सामनेवालेकडून सूचना मिळाल्यानंतर त्यांनी सूचनेप्रमाणे नेमलेल्या वेळेत व नेमलेल्या तारखेला हजर होऊन सामनेवालेनी सामान नेण्यास सहकार्य करावे. 4. याप्रमाणे आदेश पारित करुन दरखास्तदारांची दरखास्त अंतिमतः निकाली काढण्यात येत आहे.
5. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना पाठविण्यात याव्यात. ठिकाण- रायगड- अलिबाग. दिनांक- 29-1-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Post vacant ......................Shri B.M.Kanitkar | |