कच्चे रजि.नं.224/2008 ग्राहक तक्रार क्रमांकः-455/2008 तक्रार दाखल दिनांकः-17/10/2008 (अडमशिन स्टेज) निकाल तारीखः-24/10/2008 कालावधीः-0वर्ष0महिना8दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. श्री.जगन्नाथ गणु वझे प्रवर्तक-श्री जगन्नाथ वझे मत्स्य संवर्धक प्रकल्प, मु.पो.चिंचणी,खाडीनाका, ता.डहाणू,जि.ठाणे401 503 ....तक्रारकर्ता विरुध्द श्री.विलास डी.पाटील इन्कमटॅक्स व सेल्सटॅक्स कन्सल्टंट, सी-1,महेंद्र पार्क,पालघर रोड, मु.पो.बोईसर,ता.पालघर, जि.ठाणे. ...विरुध्दपक्ष गणपुर्तीः-1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.श्री.पी.एन.शिरसाट, मा.सदस्य 3.सौ.भावना पिसाळ, मा.सदस्या निकालपत्र (पारित दिनांकः-24/10/2008) सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा यांचेव्दारे आदेशः- सदर तक्रार तक्रारदार यांनी कलम 12नुसार दाखल केली आहे. त्याचे कथन पुढील प्रमाणेः- 1)तक्रारदार हे मत्स्य संवर्धक प्रकल्पाचे प्रवर्तक असून 2/- मत्स्य व्यवसाय करतात. विरुध्दपक्षकार हे इन्कमटॅक्सचे काम सन 2001 पासून पाहतात. आयकर विवरणपत्र भरण्याचे काम करण्याकरीता त्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दि.26/06/2002 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर आल्याने पाणी कोळंबी प्रकल्पामध्से शिरल्याने त्यांचे रु.11,32,900/- इतके नुकसान झाले.त्याचे श्री सुर्यकांत नारायण वैद्य यांनी, पोलीस पाटील तहसिलदार डहाणू या नात्याने पंचनामा करण्यात आला. विरुध्दपक्षकार यांनी 2003-2004 च्या जमा व खर्च ताळेबंद विवरणपत्रामध्ये या मुद्दयाची नोंद घेण्यास सांगितले असता ती नोंद न घेतल्याने तक्रारदार यांनी दि.23/01/2006 रोजी 24/07/2006,6/8/2007,18/9/2006 रोजी 1,40,000/- दंड भरावा म्हणून इन्कम टॅक्स ऑफिसकडून डिमांड नोटीसेस काढण्यात आली.त्यावर तक्रारदार यांनी वकील श्री.एस.ए.देसाई यांचेकडून इन्कमटॅक्स कमीशनर समोर अपील दाखल केले होते. परंतु ते 27/08/2008 रोजी फेटाळण्यात आल्याने विरुध्दपक्षकार यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांनी 2,80,000/- रुपये इन्कमटॅक्स कार्यालयात भरणे भाग पडले. विरुध्दपक्षकार यांचे निष्काळजीपणामुळे तक्रारदार यांना 1,55,000/- रुपये नुकसान झाले म्हणून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली आहे. 2)तक्रारदार यांची तक्रार ही सन26/6/2002 रोजी घडली असून 2003-2004 या सालाकरीता विरुध्दपक्षकार यांनी विवरणपत्र दाखल केले आहे. त्यामध्ये नुकसानीची दखल घेतली नाही. व त्याचा दंड 2006-2008 मध्ये तक्रारदार यांना भरावा लागला. म्हणून अशी दंडाची रक्कम नुकसान भरपाई मिळावी, म्हणून सदरची तक्रार दाखल केली आहे, ती मुदत बाहय 3/- असल्याचे मंचापुढे चालण्यास पात्र नाही. म्हणून पुढील आदेश. आदेश 1)तक्रारदार यांची तक्रार मुदतबाहय असल्याने दाखल करुन घेण्यास पात्र नसल्याने सदरची तक्रार प्राथमिक मुद्दयावरच अडमिशन स्टेजला दाखल करुन घेण्यास नामंजूर केली आहे. 2)तक्रारकर्ता यांनी तक्रार दाखल करतेवेळी तक्रारीसोबत मंचाचे नियमानुसार डी.डी.व्दारे भरणा केलेले शुल्क हे शासनाकडे जमा करण्यात येत आहे. 3)सदर आदेशाची प्रत तक्रारदार यांना निःशुल्क देण्यात यावी. 4)तक्रारदार यांनी मा.सदस्य तक्रार दाखल केलेल्या दोन प्रती (फाईल)त्वरीत परत घेऊन जाव्यात. दिनांकः-24/10/2008 ठिकाणः-ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट)(सौ.भावना पिसाळ)(सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे. |