तक्रार क्रमांक – 10/2009 तक्रार दाखल दिनांक – 12/01/2009 निकालपञ दिनांक – 17/04/2010 कालावधी - 01 वर्ष 03 महिना 05 दिवस जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे यांचे समोर श्रीमती. बलजीत जसबीरसिंग कौर रा. D/31 पुनरवसु सि.एच.एस लि., सेक्टर III, क्षृष्टी कॉप्लेक्स, मिरा रोड(पुर्व) 401 107, जिल्हा - ठाणे. .. तक्रारदार विरूध्द श्री. विक्रम दवे, प्रोप.ऑफ जगदीश एंटरप्रायजेस केडीया हाऊस, 3रा मजला, 6/7, विश्वभारती सोसायटी, जुहु गली, एस.व्ही रोड, अंधेरी(पश्चिम),मुंबई 400 058. .. विरुध्दपक्ष
समक्ष - सौ. शशिकला श. पाटील – अध्यक्षा सौ. भावना पिसाळ - सदस्या श्री. पी. एन. शिरसाट - सदस्य उपस्थितीः- त.क तर्फे वकिल डी.एन.कदम वि.प तर्फे वकिल एस. के. जैन आदेश (पारित दिः 17/04/2010) मा. सदस्य सौ. भावना पिसाळ, यांचे आदेशानुसार 1. सदरहु तक्रार श्री.बलजीत कौर यांनी विक्रम दवे प्रोप. ऑफ जगदीश एंटरप्रायजेस यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द 4.उभयपक्षकारांना या आदेशाची सही शिक्याची प्रत निःशुल्क देण्यात यावी.
दिनांक – 17/04/2010
ठिकान - ठाणे
(श्री.पी.एन.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ. शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
1. सदरहु तक्रार श्री.बलजीत कौर यांनी विक्रम दवे प्रोप. ऑफ जगदीश एंटरप्रायजेस यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्द पक्षकाराकडुन खरेदी केलेल्या सदनिकेचा ताबा नुकसान भरपाईसकट मागितला आहे.
2. विरुध्द पक्षकार हे जगदीश एंटरप्राईजेसचे प्रोपरायटर आहेत. ते पैशाने बिल्डर व डेव्हलपर आहेत. त्यांनी कश्मिरा रोडवर ’शिवम’ नावाची बिल्डिंग बांधण्यास घेतली होती. तक्रारदार यांनी विरुध्द पक्षकाराकडे सदर इमारतीमध्ये .. 2 .. सदनिका नं.A/504 पाचवा मजला सुमारे 575 चौ.फुट क्षेत्रफळ असलेल्या या सदनिकेची किंमत रु.2,86,306/- ठरले व तत्सम दि.15/12/1995 रोजी ’allotment letter नं. 1-A/504 विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायांस दिले होते व त्यामध्ये सदरचे allotment letter हे यापुढे नॉर्मल मालकी तत्वाच्या नियमाप्रमाणे करारनामा म्हणुन सबोधावे असे कबुल केले आहे व तदनंतर तक्रारकर्ता यांनी रु.1,000/-चा धनादेश दि.24/07/1995 या तारखेचा देऊन सदर सदनिकेचा ताबा (डिसेंबर 1997) दोन वर्षात देण्याचे कबुल केले व तदनंतर तक्रारीतील पान 3 प्रमाणे विविध चेकद्वारे रु.2,69,128/- एवढी रक्कम विरुध्द पक्षकार यांना पोच केली ठरवलेल्या रकमेपैकी फक्त रु.17,178/- एवढी रक्कम अद्यापी तक्रारकर्ता यांनी विरुध्द पक्षकार यांना फेडलेली नाही कारण ती ताबा घेताना द्यायचे ठरले होते असे त्यांचे म्हणणे आहे. रक्कम मिळाल्याबद्दल विरुध्द पक्षकार यांनी तत्सम पावत्या तक्रारकर्ता यास दिलेल्या आहेत. परंतु अद्यापी सदर ’शिवम इमारतीचे’ बांधकाम पुर्ण झालेले नाही व गेल्या दहा वर्षापासुन सदनिकेचा ताबा मिळाला नाही तरी तक्रारकर्ता हे बँकेचे व्याज भरत आहेत. वेळेवर ताबा मिळाला असता तर त्यावर भाडेकरु कडुन महीना रु.4,000/- कमवता आले असते असे तक्रारकर्ता यांचे म्हणणे आहे. तसेच रु.13,181/-दि.24/07/1995 रोजी व रु.42,949/- दि.05/04/1998 याच्या रोख रकमेच्या पेमेंटची पावत्या विरुध्द पक्षकार यांनी दिली नव्हती. 3. विरुध्द पक्षकार यांनी त्यांची लेखी कैफीयत दि.23/04/2009 रोजी दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, तक्रारदाराकडुन स्वीकारलेली रक्कम ही लोन ट्राझेक्शन होते व सदनिकेचा खरेदीचा करारनामा केलेला नव्हता. तसेच बॅक डेटेड चेक व तशा बॅक डेटेट पावत्या विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांच्या विनंतीवरुन दिल्या होत्या असे विरुध्द पक्षकार यांचे म्हणणे आहे. विरुध्द पक्षकार यांनी मिरा भाईंदर म्युनिसिपल कौन्सिलने प्लान दि.30/06/1997 मध्ये पास केला त्याप्रमाणे बांधकाम सुरू केले होते. परंतु नंतर बांधकाम थांबवले गेले कारण N.A परवानगी मिळाली नव्हती म्हणुन त्यांच्याविरुध्द दिवाणी दावा दाखल केलेला होता. बांधकामासाठी कोर्टाची स्थगीती मिळाली असल्यामुळे विरुध्द पक्षकार पुढील बांधकाम पुर्ण करु शकत नाहीत. म्हणुन विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यांना त्यांनी स्वीकारलेली पुर्ण रक्कम परत करण्यास तयार होते परंतु आर्थिक अडचणीमुळे ते देऊ शकले नाहीत असे .. 3 .. विरुध्द पक्षकार हे त्यांच्या लेखी कैफीयतीत कबुल करतात. तसेच विरुध्द पक्षकार यांच्या म्हणण्यानुसार त्यांना तक्रारदाराकडुन फक्त रु.2,12,998/- एवढीच रक्कम आतापर्यंत प्राप्त झालेली आहे ऐवजी तक्रारकर्ता म्हणतात त्याप्रमाणे रु.2,69,128/- एवढी रक्कम मिळालेली नाही.
4. उभयपक्षकारांची पुरावा कागदपत्रे, शपथपत्रे, लेखी कैफीयत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळुन पाहीले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उपस्थित होतो. प्र. विरुध्द पक्षकार यांच्या सेवेत निष्काळजीपणा व त्रृटी आढळतात का? वरील प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असुन खालील कारण मिमांसा देत आहे. कारण मिमांसा तक्रारकर्ता यांना विरुध्द पक्षकार यांना बोललेल्या शिवम इमारतीत सदनिका नं.A/504 देण्याबद्दल ’Allotment letter’ विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायास दिले त्यांच्याकडुन सुरवातीस रु.1,000/- घेतले व नंतर बांधकामाच्या टप्पयानुसार रक्कम स्वीकारल्यावरही ठरलेल्या रु.2,86,306/- किंमतीपैकी 50% पेक्षा जास्त रक्कम स्वीकारल्यावरही विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता बरोबर कायदेशीर नोंदणीकृत करारनामा केलेला नाही यातच MOFA नियमांचा विरुध्द पक्षकार यांनी भंग केलेला आहे.
5. विरुध्द पक्षकार त्यांच्या लेखी कैफीयतीत तक्रारकर्ता कडुन स्वीकारलेली रु.2,12,998/- एवढी रक्कम जी तक्रारकर्ता यांना परत करण्यास तयार असल्याचे कबुल केले आहे कारण सदर इमारतीचे बांधकाम पुढे पुर्ण होण्यास बाधा निर्माण झालेल्या आहेत. परंतु तरीही सदर रक्कम परत करण्यातही विरुध्द पक्षकार हे असमर्थ ठरले आहेत. यावरुन विरुध्द पक्षकार हे सेवा देण्यास निष्काळजी ठरले. तक्रारकर्ता हे यांनी दि.24/07/1995 रोजी दिलेली रक्कम रु.13,181/- व दि. 05/04/2008 रोजी दिलेली रक्कम 42,945/- याबद्दल पावती दाखल करण्यास किंवा तत्सत पुरावा सादर करण्यात असमर्थ ठरले असल्यामुळे मंच सदरच्या रकमेचा विचार पुराव्याअभावी करु शकत नाही. परंतु दाखल पुराव्याप्रमाणे रु.2,12,998/-एवढी रक्कम विरुध्द पक्षकारयांनी स्वीकारल्याचे मंच मान्य करीत आहे व पुढील अंतिम आदेश पारीत करीत आहे.
.. 4 .. अंतीम आदेश 1. तक्रार क्र. 10/2009 हि अंशतः मंजुर करण्यात येत आहे. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारीचा खर्च रु.5,000/- (रु.पाच हजार फक्त) द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास ’शिवम’ इमारतीतील सदनिका नं.A/504 पाचवा मजला या सदनिकेचा ताबा व तत्सम नोंदणीकृत करारनामा करुन या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महिन्याच्या आत द्यावा व तक्रारकर्ता यांनी सदर सदनिकेची राहीलेली किंमत त्याच वेळेस विरुध्द पक्षकार यांना द्यावी तसेच विरुध्द पक्षकार यांनी सदनिकेचा ताबा ठरलेल्या वेळेवर दिला नाही त्यामुळे त्याबद्दलची नुकसानी भरपाई रु.50,000/-(रु. पन्नास हजार फक्त) विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास द्यावी. अन्यथा, तक्रारकर्ता यांच्या परवानगीने किंवा तक्रारकर्ता यांना मान्य असल्यास रु.2,12,998/-(रु. दोन लाख बारा हजार नौशे अठ्याण्णव फक्त) एवढी रक्कम दि.01/03/2000 पासुन 15% व्याजाने विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्तायास या आदेशाची प्रत मिळाल्यापासुन 2 महीन्याच्या आत परत करावेत व तदनंतर वरील रकमेवर 3% जादा दंडात्मक व्याज द्यावे लागेल. 3.विरुध्द पक्षकार यांनी तक्रारकर्ता यास मानसिक त्रासाचे रु. 25,000/-(रु.
|