Maharashtra

Nagpur

CC/126/2021

PURUSHOTTAM RAMCHANDRA MANWAR - Complainant(s)

Versus

SHRI. VIJAY ANANDRAO SHELKE, MANAGING DIRECTOR, VYANKATESH ASSETS MULTIPLIER PVT. LTD. - Opp.Party(s)

ADV. ASHISH GIRDEKAR

23 Dec 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/126/2021
( Date of Filing : 17 Feb 2021 )
 
1. PURUSHOTTAM RAMCHANDRA MANWAR
R/O. PANCHSHEEL COLONY, MANGRULPIR, WASHIM
WASHIM
MAHARASHTRA
2. MRS. SHRADDHA PURUSHOTTAM MANWAR
R/O. PANCHSHEEL COLONY, MANGRULPIR, WASHIM
WASHIM
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI. VIJAY ANANDRAO SHELKE, MANAGING DIRECTOR, VYANKATESH ASSETS MULTIPLIER PVT. LTD.
INFOTECH HOUSE, SHREE TOWER, OPPOSITE TO PRIMARY SCHOOL, SOMALWADA SQUARE, WARDHA ROAD, NAGPUR-25
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. ASHISH GIRDEKAR, Advocate for the Complainant 1
 
Dated : 23 Dec 2021
Final Order / Judgement

आदेश

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की,       त्याने विरुध्‍द पक्षाकडून मौजा-पिपरी, प.ह.नं. 1,  खसरा क्रमांक 134/1, 134/2, 134/3, 134/4, 134/5  आणि 134/6 , तह. कुही,  जि. नागपूर येथील प्लॉट क्रमांक 180 वर (EXOTICA)एक्झोटीका या स्कीम मध्ये बांधलेला बंगला क्रमांक 65 हा एकूण रुपये 16,91,000/- एवढ्या रक्‍कमेत विकत घेतला असून दि. 16.07.2016 ला त्‍याचे विक्रीपत्र करुन देण्‍यात आलेले आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या बंगल्याचे काम पूर्ण केले नाही, तसेच रस्ता, पाणी व विद्युत पुरवठा सारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्‍या नाही, म्‍हणून तक्रारकर्त्याने दिनांक 10.08.2019 ला पत्र पाठवून उपरोक्त सोयी उपलब्ध करून देण्याबाबत व बंगल्याचा ताबा देण्याबाबत विनंती केली,  परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्याने वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली, परंतु सदरची नोटीस  Left या शे-यासह परत आली. त्यामुळे तक्रारकर्त्याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करून मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने मौजा-पिपरी, प.ह.नं. 1,  खसरा क्रमांक 134/1, 134/2, 134/3, 134/4, 134/5  आणि 134/6 , तह. कुही,  जि. नागपूर येथील प्लॉट क्रमांक 180 वर (EXOTICA)एक्झोटीका या स्कीम मध्ये बांधलेला बंगला क्रमांक 65 चा प्रत्यक्ष ताबा द्यावा सर्व सोयीसुविधा उपलब्‍ध ( रोड, पाणी व विद्युत पुरवठा ) करून देण्‍याचा आदेश द्यावा. तसेच विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याकडून क्लब मेंबरशिप पोटी स्वीकारलेली रक्कम रुपये 50,000/-  दि. 11.07.2009 पासून 18 टक्के व्याजासह देण्‍याचा आदेश द्यावा. त्‍याचप्रमाणे तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च देण्‍याचा ही आदेश द्यावा.
  2.      विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष आयोगा समक्ष हजर न झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 16.07.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  3.       तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तावेज व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेतले  व त्‍यावरील निष्‍कर्ष  खालीलप्रमाणे नोंदविले.

             मुद्दे                                           उत्‍तर

  1.  तक्रारकर्ता हा विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ॽ           होय

 

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली काय ?    होय
  2.  विरुध्‍द पक्षाने अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला काय ॽ होय

 

  1.  काय आदेश ॽ                               अंतिम आदेशानुसार     

                

निष्‍कर्ष

 

  1. मुद्दा क्रमांक 1 ते 3 बाबत -  तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाच्‍या मौजा-पिपरी, प.ह.नं. 1,  खसरा क्रमांक 134/1, 134/2, 134/3, 134/4, 134/5  आणि 134/6 , तह. कुही,  जि. नागपूर येथील प्लॉट क्रमांक 180 वर (EXOTICA)एक्झोटीका या स्कीम मध्ये बांधलेला बंगला क्रमांक 65 हा एकूण रुपये 16,91,000/- एवढ्या रक्‍कमेत विकत घेतला असून त्‍याचे दि. 16.07.2016 ला विक्रीपत्र करुन देण्‍यात आलेले आहे हे नि.क्रं. 2 (1) वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्याच्या बंगल्याचे काम पूर्ण केले नाही, तसेच रस्ता, पाणी व विद्युत पुरवठा सारख्या सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्‍या नाही, म्‍हणून दिनांक 10.04.2019 ला पत्र पाठवून उपरोक्त सोयी उपलब्ध करून देण्याबाबत व बंगल्याचा ताबा देण्याबाबत विनंती केली असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. विरुध्‍द पक्षाला आयोगा मार्फत पाठविण्‍यात आलेली नोटीस unclaimed या पोस्‍टाच्‍या शे-यासह परत आली असल्‍याचे दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षावर तक्रारीत लावलेले आरोप ग्राहय धरण्‍यात येऊन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा दिली असून अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केले असल्‍याचे स्‍पष्‍टपणे दिसून येते.

                       सबब  खालीलप्रमाणे अंतिम  आदेश  पारित.

                                 अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर करण्‍यात येते.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला मौजा-पिपरी, प.ह.नं. 1,  खसरा क्रमांक 134/1, 134/2, 134/3, 134/4, 134/5  आणि 134/6 , तह. कुही,  जि. नागपूर येथील प्लॉट क्रमांक 180 वर (EXOTICA)एक्झोटीका या स्कीम मध्ये बांधलेला बंगला क्रमांक 65 चे पूर्ण बांधकाम करुन प्रत्‍यक्ष ताबा द्यावा. तसेच पाणी पुरवठा, विद्युतपुरवठा व रस्‍ता इत्‍यादीची सुविधा करुन द्याव्‍या. 

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई म्‍हणून रुपये 50,000/- व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 20,000/- वैयक्तिक अथवा संयुक्तिकरित्‍या द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 30 दिवसाच्‍या करावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ‘ब’ व ‘क’ फाईल परत करावी. 
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.