Maharashtra

Nagpur

CC/32/2021

SHRIMATI DURGA PANKAJ JOHARI - Complainant(s)

Versus

SHRI. THE MANAGER, HAVELLS INDIA LTD., NAGPUR - Opp.Party(s)

ADV. SNEHA J. PANDHARIPANDE

11 Jul 2022

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/32/2021
( Date of Filing : 12 Jan 2021 )
 
1. SHRIMATI DURGA PANKAJ JOHARI
R/O. SHRIMAN PALACE, FLAT NO.303, LOKMAT CHOWK, WARDHA RAOD, NAGPUR-440012
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI. THE MANAGER, HAVELLS INDIA LTD., NAGPUR
99/1, VILLAGE NIMJI, KALMESHWAR, NAGPUR-441501
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. SNEHA J. PANDHARIPANDE, Advocate for the Complainant 1
 
Dated : 11 Jul 2022
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍या, श्रीमती चंद्रिका बैस यांच्‍या आदेशान्‍वये

  1.      तक्रारकर्तीने  प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 2019 च्‍या कलम 35   अन्‍वये दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, तिने विरुध्‍द पक्षाकडून  Maxalkaline-2 ही मशिन खरेदी केली होती व या मशिनचा वार्षिक देखभाल  करण्‍याचा करार ( AMC)  इनव्‍हाईस क्रं. 5656600790 असा असून त्‍याचा ऑर्डर क्रं. 8054045 असा आहे व तो दि. 30.07.2020 रोजी केला होता आणि त्‍याकरिता स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचा धनादेश क्रं. 941254 अन्‍वये रुपये 8,658/- अदा केले होते.  त्‍यानंतर तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाच्‍या कस्‍टमर केअर क्रमांकावर AMC करारपत्राबाबत चौकशी केली असता त्‍यात तिला आढळून आले की, तिने वार्षिक देखभालीकरिता 658/- रुपये अधिकचे दिलेले आहेत. सदरची रक्‍कम परत मिळण्‍याकरिता तिने विरुध्‍द पक्षाकडे फोन केले तसेच ई-मेल द्वारे दि. 14.10.2020 ते 18.11.2020 पर्यंत वारंवांर कळवून ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या ई-मेलची दखल घेतली नाही अथवा तक्रारकर्तीकडून अधिकची घेण्‍यात आलेली रक्‍कम ही परत केली नाही. त्‍यामुळे तक्रारकर्तीने प्रस्‍तुत तक्रार दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाकडे जमा असलेली अधिकची रक्‍कम रुपये 658/- व्‍याजासह परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक, मानसिक त्रासाकरिता नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च देण्‍याचा सुध्‍दा आदेश द्यावा.

 

  1.      विरुध्‍द पक्षाला  आयोगा मार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही ते आयोगा समक्ष विहित मुदतीत हजर झाले नाही व वेळेत आपला लेखी जबाब दाखल न केल्‍यामुळे त्‍यांच्‍या विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश  दि. 14.07.2021 रोजी पारित करण्‍यात आला होता.

 

  1.      तक्रारकर्तीने तक्रारी सोबत दाखल केलेले दस्‍तऐवजाचे काळजीपूर्वक अवलोकन केले व निकाली कामी खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविला.

 

 

1 तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक आहे काय ?      होय

  1.  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला दोषपूर्ण सेवा दिली काय ?  होय

3 काय आदेश ?                                          अंतिम आदेशानुसार

निष्‍कर्ष

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2  बाबत – तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडून  Maxalkaline-2 या मशिनच्‍या वार्षिक देखभाल  करण्‍याचा करार ( AMC)  दि. 30.07.2020 रोजी केला होता आणि त्‍याकरिता स्‍टेट बॅंक ऑफ इंडिया बॅंकेचा  रुपये 8,658/- च्‍या धनादेशान्‍वये अदा केले होते हे नि.क्रं. 2 वर दाखल दस्‍तावेजावरुन दिसून येते. यावरुन तक्रारकर्ती विरुध्‍द पक्षाची ग्राहक असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. तक्रारकर्तीने विरुध्‍द पक्षाकडे तिने वार्षिक देखभालीकरिता 658/- रुपये अधिकचे जमा करण्‍यात आले असल्‍याबाबत व सदरची रक्‍कम परत करण्‍याकरिता अनेक वेळा फोन व ई-मेल द्वारे पत्र पाठविले होते हे तक्रारी सोबत दाखल केलेले दि. 14.10.2020 ते 18.11.2020 पर्यंतच्‍या ई-मेल दस्‍तावेजावरुन दिसून येते. परंतु सदरच्‍या ई-मेल ला कुठलेही उत्‍तर दिले असल्‍याचे दिसून येत नाही. यावरुन विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीच्‍या प्रती सेवेत त्रुटी केली असल्‍याचे दिसून येते.

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                         अंतिम आदेश

 

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः मंजूर.  

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला तिने अधिकची जमा केलेली रक्‍कम रुपये 658/- व त्‍यावर दि. 30.07.2020 पासून ते प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगी पर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम तक्रारकर्तीला परत करावी.

 

  1. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्तीला झालेल्‍या मानसिक, शारीरिक त्रासाकरिता व तक्रारीचा खर्च म्‍हणून रुपये 3,000/-द्यावे.

 

  1. विरुध्‍द पक्षाने उपरोक्‍त आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून 45 दिवसाच्‍या आंत करावी.

 

  1. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.

 

  1. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.
 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.