Maharashtra

Nagpur

CC/264/2020

CHAITRAM SONBAJI PANPATE - Complainant(s)

Versus

SHRI. SUNIL NILKANT GORDEY - Opp.Party(s)

ADV. G.K. BHUSARI

03 Aug 2021

ORDER

DISTRICT CONSUMER DISPUTES REDRESSAL COMMISSION, NAGPUR
New Administrative Building
5th Floor, Civil Lines,
Nagpur-440 001
0712-2548522
 
Complaint Case No. CC/264/2020
( Date of Filing : 04 Aug 2020 )
 
1. CHAITRAM SONBAJI PANPATE
R/O. FLAT NO.201, 2ND FLOOR, VIJAYA VILLA, PLOT NO.P/8/A, LAXMI NAGAR, NAGPUR
NAGPUR
MAHARASHTRA
...........Complainant(s)
Versus
1. SHRI. SUNIL NILKANT GORDEY
R/O. PLOT NO.P-8/A, LAXMI NAGAR, NAGPUR-440022
NAGPUR
MAHARASHTRA
............Opp.Party(s)
 
BEFORE: 
 HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL PRESIDENT
 HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS MEMBER
 HON'BLE MR. SUBHASH R. AJANE MEMBER
 
PRESENT:ADV. G.K. BHUSARI, Advocate for the Complainant 1
 
Dated : 03 Aug 2021
Final Order / Judgement

आदेश

 

मा. सदस्‍य, श्री. सुभाष रा. आजने यांच्‍या आदेशान्‍वये

 

  1.    तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायद्या अंतर्गत दाखल केली असून त्‍यात नमूद केले की, विरुध्‍द पक्ष प्‍लॉटचे विकसन करुन त्‍यावर दुमजली इमारत बांधण्‍याचा व्‍यवसाय करतो. त्‍याने विरुध्‍द पक्षाने बांधलेल्‍या ‘विजया‍ विला’ या दुमजली इमारतीमधील दुस-या मजल्‍यावरील  एकूण क्षेत्रफळ 80.14 चौ.मी. असलेली सदनिका क्रं.201, एकूण रक्‍कम रुपये 85,51,000/- इतक्‍या किंमतीत विकत घेतली.  
  2.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याला सदरच्‍या सदनिके मध्‍ये फर्निचरचे काम करावयाचे आहे याबाबत विरुध्‍द पक्षाकडे इच्‍छा दर्शविली असता विरुध्‍द पक्षाने त्‍याच्‍या सदनिके मध्‍ये केलेले फर्निचरचे काम तक्रारकर्त्‍याला दाखविले व त्‍याच्‍याकडे चांगले काम करणारा सुतार असून तो चांगले फर्निचर बनवित  असल्‍याचे सांगितले व त्‍याच्‍या सुताराला सदनिकेमधील फर्निचरचे काम देण्‍याची विनंती केली. तक्रारकर्ता हा त्‍याच्‍या कामात व्‍यस्‍त असल्‍याने तो फर्निचरच्‍या कामाकडे लक्ष देऊ शकत नाही व त्‍याच्‍याजवळ वेळ नसल्‍याने तक्रारकर्त्‍याने त्‍याच्‍या सदनिकामधील फर्निचरचे काम विरुध्‍द पक्षाच्‍या विश्‍वासावर त्‍याच्‍या सुताराला द्यावयाचे ठरविले. त्‍याप्रमाणे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या सदनिकेमधील फर्निचरचे काम काळजीने वेळेत करुन देण्‍याचे कबूल केले. त्‍यानंतर तक्रारकर्ता व विरुध्‍द पक्ष यांच्‍यामध्‍ये झालेल्‍या(निगोशीएशन) बोलणीनुसार ठरले की, विरुध्‍द पक्ष हा  फर्निचरकरिता एकूण विकत घेण्‍यात येणा-या सामानावर 40 टक्‍के मजुरी आकारेल व फर्निचरचे काम कमीत कमी वेळेत करुन देण्‍याचे कबूल केले.
  3.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, विरुध्‍द पक्षाने फर्निचरचे काम वेळेत करुन दिले नाही व फर्निचरच्‍या कामाकरिता एकूण 65 प्‍लायवुड शीट एकूण रुपये 1,22,841/- रक्‍कमेच्‍या विकत घेतल्‍या आणि याची रक्‍कम तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला चेक द्वारे अदा केली आणि इतर सामानाचे वेगवेगळया तारखेचे रुपये 1,49,280/- इतक्‍या रक्‍कमेचे बिल रेज केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षावर विश्‍वास ठेवून विरुध्‍द पक्षाला त्‍याच्‍या मागणीनुसार फर्निचरच्‍या कामापोटी संपूर्ण रक्‍कम रुपये 5,57,000/- इतकी अदा केलेली आहे.
  4.      तक्रारकर्त्‍याने पुढे नमूद केले की, त्‍याने विरुध्‍द पक्षाला तक्रारकर्त्‍याच्‍या सदनिकेतील केलेल्‍या फर्निचरच्‍या कामाचे मोजमाप करण्‍याकरिता विनंती केली आणि ज्‍या सुताराने फर्निचरचे काम केले त्‍याला बोलविण्‍याबाबत सांगितले, परंतु विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला फर्निचरचे मोजमाप करण्‍याकरिता अनेक वेळा ई-मेल केले तसेच विरुध्‍द पक्षाला प्रत्‍यक्ष भेट ही दिली तरी ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केले व मोजमाप ही करुन दिले नाही. त्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने स्‍वतःहून दुस-या सुताराला बोलावून फर्निचरचे मोजमाप करुन घेतले व तक्रारकर्त्‍याने बोलविलेल्‍या सुता-याने विरुध्‍द पक्षाने बनविलेल्‍या फर्निचरची तपासणी केली आणि सविस्‍तर फर्निचरचे मोजमाप काढून दिले असता लक्षात आले की, विरुध्‍द पक्षाने खालील तक्‍त्‍यात नमूद केल्‍याप्रमाणे आकारणी केलेली आहे.

Sr.No.

  • Material

Qty of Material

Amount to be Recovered for Exccess Matrial

 

 

Purchased

Used

  • Excess

 

I

Ply

  1.  
  1.  
  1.  

60,000/-

  1.  

MICA

  1.  
  1.  
  1.  

1,00,000/-

  1.  

Other misc material not used but charged

46,000/-

Iv

40% Labour charges on excess material

80,000/-

  • Total

2,86,000/-

अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने 36 प्‍लायवुड शीटचा वापर केला असून 65 प्‍लायवुड शीट मागविल्‍या होत्‍या, म्‍हणजेच विरुध्‍द पक्षाने 29 प्‍लायवूड शीट जास्‍त विकत घेतल्‍या आणि तक्रारकर्त्‍याकडून 65 प्‍लायवुड शीटचे बिल लावले. त्‍याचप्रमाणे मायकाच्‍या बाबतीत सुध्‍दा विरुध्‍द पक्षाने केवळ 50 मायका शीट वापरल्‍या आणि 156 मायका शीट विकत घेतल्‍याचे दाखविले आणि 106 मायका शीटचे जास्‍तीची रक्‍कमेचे बिल लावून त्‍याची रक्‍कम ही तक्रारकर्त्‍याकडून घेतली. अशा प्रकारे विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याची फसवणूक करुन धोक्‍याने जास्‍तीच्‍या सामानाचे बिल देऊन  रक्‍कम वसूल केलेली आहे. तसेच विरुध्‍द पक्षाने ज्‍या दुकानातून सामान खरेदी केले त्‍या दुकानाचे वैध बिल न देता तक्रारकर्त्‍याला कम्‍प्‍युटराईज अवैध बिल दिलेले आहे. म्‍हणून  विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून घेतलेली अधिकची रक्‍कम रुपये 2,86,000/-  परत करण्‍याची अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केले व जास्‍तीची वसूल केलेली रक्‍कम परत न केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने दि. 22.06.2015 ला  वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठविली. विरुध्‍द पक्षाला सदरची नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्षाने त्‍याची दखल न घेतल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने प्रस्‍तुत तक्रार मंचासमक्ष दाखल करुन मागणी केली की, विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून फर्निचरच्‍या कामामध्‍ये घेतलेल्‍या अधिक मालाच्‍या संबंधाने लावलेली अधिकची मजुरीची वसुल केलेली रक्‍कम रुपये 2,86,000/-  व त्‍यावर जानेवारी 2018 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 18 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम परत करण्‍याचा आदेश द्यावा. तसेच शारीरिक,मानसिक त्रासाकरिता नुकसानभरपाई व तक्रारीचा  खर्च देण्‍याचा ही  आदेश द्यावा.    

  1.      विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष हजर  झाले  नाही अथवा आपला लेखी जबाब ही दाखल न केल्‍यामुळे विरुध्‍द पक्षा विरुध्‍द प्रकरण एकतर्फी चालविण्‍याचा आदेश दि. 16.07.2021 रोजी पारित करण्‍यात आला.
  2.  तक्रारकर्त्‍याने तक्रारी सोबत दाखल केलेले कागदपत्र व त्‍यांच्‍या वकिलांनी केलेला तोंडी युक्तिवाद ऐकून घेतल्‍यावर मंचाने खालील मुद्दे विचारार्थ घेऊन त्‍यावरील निष्‍कर्ष खालीलप्रमाणे नोंदविले.

मुद्दे                                       उत्‍तर

  1. तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक आहे काय ?      होय
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला दोषपूर्ण सेवा

देऊन अनुचित व्‍यापारी प्रथेचा अवलंब केला काय? होय

  1.    काय आदेश ?                           अंतिम आदेशानुसार 

 

  • निष्‍कर्ष 

 

  1. मुद्दा क्रमांक 1 व 2 बाबत – तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला त्‍याच्‍या राहत्‍या सदनिकामधील फर्निचरचे काम दिले होते. विरुध्‍द पक्ष तक्रारकर्त्‍याकडून सदनिकेतील फर्निचर बनविण्‍याकरिता लागणा-या सामानाच्‍या किंमतीवर 40 टक्‍के प्रमाणे मजुरी आकारेल असे ठरले होते. त्‍यानुसार विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या सदनिकेतील फर्निचरकरिता एकूण 65 प्‍लायवूड शीट रुपये 1,22,841/- इतक्‍या रक्‍कमेचे विकत घेतले व रुपये 1,49,280/- रक्‍कमेचे फर्निचरला लागणारे इतर सामान विकत घेतले. त्‍यानुसार तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाला धनादेशाद्वारे रक्‍कम अदा केली. तक्रारकर्त्‍याने सदनिकेमधील फर्निचर बनविण्‍याकरिता विरुध्‍द पक्षाला एकूण रक्‍कम रुपये 5,46,920/- अदा केले. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने अधिकची आकारलेली मजुरीची रक्‍कम परत करण्‍याची अनेक वेळा विनंती करुन ही तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुर्लक्ष केले. तसेच विरुध्‍द पक्षाला मंचामार्फत पाठविलेली नोटीस प्राप्‍त होऊन ही विरुध्‍द पक्ष मंचासमक्ष उपस्थितीत झाला नाही अथवा आपला लेखी जबाब दाखल केला नाही याचा अर्थ तक्रारकर्त्‍याने तक्रारीत विरुध्‍द पक्षावर लावलेले आरोप विरुध्‍द पक्षाला मान्‍य असल्‍याचे स्‍पष्‍ट होते. यावरुन तक्रारकर्ता विरुध्‍द पक्षाचा ग्राहक असल्‍याचे सिध्‍द होते. तक्रारकर्त्‍याने विरुध्‍द पक्षाने   नेमलल्‍या सुताराकडून फर्निचरे मोजमाप करुन देण्‍याची अनेक वेळा विनंती करुन ही विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याच्‍या विनंतीकडे दुलर्क्ष केल्‍यामुळे तक्रारकर्त्‍याने स्‍वतः नियुक्‍त केलेल्‍या सुताराकडून मोजमाप केले असता लक्षात आले की, विरुध्‍द पक्षाने विकत घेतलेल्‍या 65 प्‍लायवुड शीट पैकी फक्‍त 36 प्‍लायवुड शीटचा वापर करण्‍यात आला व 29 प्‍लायवुड शीटचे जास्‍तीचे बिल तक्रारकर्त्‍याकडून आकारण्‍यात आले. तसेच सदनिकेतील फर्निचर करिता 50 मायका शीटचा वापर करण्‍यात आला आणि 105 जास्‍त मायकाशीटचे जास्‍तीचे बिल तक्रारकर्त्‍याकडून आकारण्‍यात आले. त्‍यामुळे तक्रारकर्ता फर्निचरच्‍या कामाकरिता प्‍लायवुड तसेच मायका शीटच्‍या खरेदीपोटी त्‍यावर लावण्‍यात आलेल्‍या जास्‍त प्‍लायवुडशीट व मायकाशीटच्‍या रक्‍कमे‍करिता व त्‍यावर लावलेल्‍या 40 टक्‍के मजुरीची रक्‍कम परत मिळण्‍यास तक्रारकर्ता पात्र आहे असे मंचाचे स्‍पष्‍ट मत आहे. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याकडून फर्निचर कामाकरिता ठरल्‍याप्रमाणे रक्‍कम न घेता प्‍लायवूड व मायका व इतर सामानाच्‍या खरेदी द्वारे जास्‍तीची रक्‍कम आकारुन तक्रारकर्त्‍या प्रति दोषपूर्ण सेवा देऊन अनुचित व्‍यापार प्रथेचा अवलंब केला आहे असे मंचाचे मत आहे.

 

सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित.

 

                       अंतिम आदेश

  1. तक्रारकर्त्‍याची तक्रार अंशतः  मंजूर.
  2. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला रुपये 2,86,000/- व त्‍यावर तक्रार दाखल तारीख म्‍हणजेच दि. 09.07.2020 पासून तर प्रत्‍यक्ष रक्‍कम अदायगीपर्यंत द.सा.द.शे. 10 टक्‍के दराने व्‍याजासह रक्‍कम द्यावी.
  3. विरुध्‍द पक्षाने तक्रारकर्त्‍याला झालेल्‍या शारीरिक मानसिक त्रासाकरिता रुपये 40,000/- व तकारीचा खर्च म्‍हणून रुपये  20,000/- द्यावे.
  4. वरील आदेशाची पूर्तता आदेशाची प्रत प्राप्‍त झाल्‍याच्‍या तारखेपासून एक महिन्‍याच्‍या आंत विरुध्‍द पक्षाने करावी.
  5. उभय पक्षांना आदेशाची प्रथम प्रत निःशुल्‍क द्यावी.
  6. तक्रारकर्त्‍याला तक्रारीची ब व क फाईल परत करावी.    

                                                                                                                                           

 
 
[HON'BLE MR. SANJAY VASUDEO PATIL]
PRESIDENT
 
 
[HON'BLE MRS. CHANDRIKA K. BAIS]
MEMBER
 
 
[HON'BLE MR. SUBHASH R. AJANE]
MEMBER
 

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.