Maharashtra

Chandrapur

CC/11/12

Shri. Shamrao Maroti Landge, - Complainant(s)

Versus

Shri. Sukhadeo Shankarrao Parate - Opp.Party(s)

Representative - Dr. N.R. Khobragade

20 May 2011

ORDER


Arange sequence number in year 2009 confo-ch-mh@nic.in
Complaint Case No. CC/11/12
1. Shri. Shamrao Maroti Landge,Age 59 years, Occ. Retired, R/o. Maratha Chauk, Babupeth ward, Chandrapur, Ta.& Distt. ChandrapurChandrapurMaharashtra ...........Appellant(s)

Versus.
1. Shri. Sukhadeo Shankarrao ParateAge 45 years, Occ. Thekedari, R/o. Babupeth Ward, Chandrapur, Ta.& Distt. ChandrapurChandrapurMaharashtra ...........Respondent(s)



BEFORE:
HONORABLE Shri Anil. N.Kamble ,PRESIDENTHONABLE MR. Sadik M. Zaveri ,MEMBERHONABLE MRS. Adv. Varsha Jamdar ,MEMBER
PRESENT :

Dated : 20 May 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

(मंचाचे निर्णयान्वये, श्री.अनिल एन.कांबळे, मा.अध्यक्ष)

                  (पारीत दिनांक :20.05.2011)

 

            अर्जदाराने सदर तक्रार, ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अन्‍वये दाखल केली असून तक्रारीचा आशय थोडक्‍यात येणे प्रमाणे.

 

1.           अर्जदाराने, गै.अ. यांचेकडून स्‍वतःचे मकानाचे बांधकाम करण्‍यासाठी गैरअर्जदाराशी लेखी करार करुन बांधकाम करुन घेतले, त्‍यामुळे अर्जदार हे गै.अ.चे ग्राहक आहे.  अर्जदाराने, गै.अ. यांचेशी स्‍वतः राहण्‍याकरीता मकानाचे बांधकाम करण्‍यासंबंधाने दि.2.7.10 रोजी करारनामा केला.  त्‍यानुसार, गै.अ.यांनी करारनामा केल्‍यापासून मकानाचे तळ मजला व पहिला मजला याचे बांधकाम पहिल्‍या मजल्‍यावरील सज्‍जा लेवल पर्यंत केला. त्‍यासंबंधाने अर्जदाराकडून रक्‍कम रुपये 4,50,000/- नगदी दिले.  करारनाम्‍यानुसार पूर्ण बांधकाम केले असते तर रुपये 7,38,000/- गै.अ.स द्यावे लागले असते.  गै.अ. नी बांधकाम फक्‍त तळ मजला व पहिल्‍या माळ्याचे सज्‍जा लेवल पर्यंत जुडाई बांधकाम केले. त्‍यानंतर गै.अ.यांनी सतत बांधकाम बंद ठेवले.  अर्जदाराने, गै.अ.शी केलेल्‍या करारनाम्‍यानुसार घराचे बांधकाम पूर्ण करण्‍याची विनंती केली व अर्जदाराने घराचे बांधकाम पूर्ण होताच उर्वरीत रक्‍कम देण्‍याचे कबुली सुध्‍दा दिली, तरी ही गै.अ. यांनी बांधकाम केले नाही.  म्‍हणून अर्जदारास पहिल्‍या माळ्याचे सज्‍जा लेवलनंतर बांधकाम करण्‍यासाठी दुस-या ठेकेदाराकडून उर्वरीत बांधकाम करुन घेणे भाग पडले.  गै.अ. यांनी केलेल्‍या बांधकामा व्‍यतिरिक्‍त रुपये 1,06,250/- एवढी रक्‍कम अर्जदाराकडून जास्‍तीची वसूल केली आहे. 

 

2.          गै.अ.ने, अर्जदाराचे बांधकाम सोडल्‍यानंतर दुसरा ठेकेदाराने सज्‍जा लेवल नंतर पहिल्‍या माळ्याचे बांधकाम, तळ मजल्‍याचे प्‍लॉस्‍टर, वरच्‍या मजल्‍याचे प्‍लॉस्‍टर, जिना तयार करणे व एक कॉलम तयार करणे एवढे काम केले, त्‍याकरीता अर्जदारास दुस-या ठेकेदाराला रुपये 2,40,000/- नगदी रुपात दिले आहे.  त्‍यानंतर ही उर्वरीत मकानाचे टाईल्‍स लावणे व नळाच्‍या टॉकीचे बांधकाम, संडासचे बांधकाम हे काम बाकी आहे व त्‍याकरीता रुपये 90,000/- लागत आहे.  एकूणच करारनाम्‍यापेक्षा घराचे बांधकामासाठी जास्‍तीचा खर्च हा गै.अ., अर्जदारास भरुन देणे आवश्‍यक आहे.  अर्जदाराने, गै.अ. यांनी अर्धवट सोडलेल्‍या बांधकामाचे निरिक्षण व केलेल्‍या कामाचा मुल्‍यांकन श्री ए.डब्‍ल्‍यु. खान इंजिनिअरकडून दि.25.10.2010 रोजी करुन घेतला आहे.  अर्जदाराने, गै.अ.स दि.20.11.10 रोजी नोटीस पाठवून बांधकाम सोडल्‍याने झालेल्‍या नुकसानी संबंधी अवगत केले व अर्जदाराकडून घेतलेली जास्‍तीची रक्‍कम रुपये 1,06,250/- ही 12 टक्‍के व्‍याजासह देण्‍याची मागणी केली. परंतू, गै.अ.यांनी आपले वकीलामार्फत अर्जदारास खोटे उत्‍तर बेकायदेशीरपणे दिले.  गै.अ. यांनी दिलेल्‍या न्‍युनतापूर्ण सेवेमुळे व अनुचीत व्‍यापार प्रथेचा वापर केल्‍यामुळे अर्जदारास शारिरीक व मानसिक ञास झाला. त्‍यामुळे, अर्जदाराने, गै.अ.स दिलेली अतिरिक्‍त रक्‍कम रुपये 1,06,250/- ही 12 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍याचा आदेश व्‍हावा.  अर्जदाराने दुस-या ठेकेदाराकडून काम करुन घेतल्‍यामुळे आलेल्‍या अतिरिक्‍त रक्‍कम रुपये 42,000/- ही 12 टक्‍के व्‍याजासह मिळण्‍याचे आदेश व्‍हावे.  अर्जदारास शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 1,00,000/- व तक्रारीचा खर्च रुपये  10,000/- देण्‍याचा आदेश व्‍हावा, अशी मागणी केली आहे.

 

3.          अर्जदाराने नि.5 नुसार 6 झेरॉक्‍स दस्‍ताऐवज दाखल केले.  अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन, गै.अ. नोटीस काढण्‍यात आला.  गै.अ. हजर होऊन नि.11 नुसार लेखी उत्‍तर व नि.12 नुसार 5 मुळ दस्‍ताऐवज दाखल केले.

 

4.          अर्जदाराने, गै.अ. यांचेकडून स्‍वतःच्‍या मकानाचे बांधकाम करुन घेतले.  परंतू, हे म्‍हणणे नाकबूल आहे की, त्‍यामुळे अर्जदार हे गै.अ. यांचे ग्राहक आहेत.  गै.अ.ने बहुतांश तक्रार अमान्‍य केली आहे. तसेच, अर्जदाराची मागणी पूर्णपणे खोटी असून अमान्‍य केली, तसेच प्रार्थना सुध्‍दा अमान्‍य केली आहे.

 

5.          गै.अ.ने लेखी उत्‍तरातील विशेष कथनात नमूद केले आहे की, अर्जदार व ठेकेदार यांच्‍यात दि.2.7.2010 ला लेखी करार झाला.  करारनाम्‍यामध्‍ये ठरल्‍याप्रमाणे मटेरीयलसहीत रुपये 7,38,000/-  देण्‍याचे ठरले होते.  त्‍याप्रमाणे, गै.अ. बांधकाम करीत होते.  अर्जदाराने 1419 चौ.फूट ऐवजी 1462 चौ.फुट जागेवर बांधकाम केले.  15 ऐवजी 17 पिल्‍लर तयार केले व बांधकाम करीता असतांना अर्जदाराने मिस्‍ञी व लेबर सोबत झगडा भांडण केले व मिस्‍ञीला दोनदा मारले.  अर्जदार मटेरीयल व लेबर चार्जेस बघूनच अर्जदार पैसे देत होते.  अर्जदाराने कधीही आगाऊ पैसे दिले नाहीत.  आजपर्यंत गै.अ.ने रुपये 5,50,000/- चे काम केलेले आहे.  दि.15.11.2010 ला दुसरा स्‍लॅब टाकलेला आहे व अर्जदाराने श्री खान, इंजिनिअरचा अहवाल दि.25.10.2010 ला दिलेला आहे.  म्‍हणजे पूर्ण काम करायच्‍या अगोदर इंजिनियरचा अहवाल आलेला आहे.  गै.अ. हे काम करावयास तयार होते व आजही तयार आहेत.  कारण गै.अ. चे रुपये 1,25,000/- अर्जदारावरच आहेत. गै.अ.ने रुपये 4,25,000/- अर्जदाराकडून बिल्‍डींग मटेरीयल व लेबर चार्जेससाठी घेतलेले आहेत. गै.अ.ने कमी पैशात जास्‍त काम केलेले आहे.  दोन स्‍लॅब व 9 खोल्‍याचे भिंती, प्‍लास्‍टर, खिडक्‍या, दरवाजे, संडास बाथरुमचे काम केले. फक्‍त घराची फिनिशींग बाकी आहे.  2 जास्‍तीचे पिल्‍लर टाकल्‍यामुळे रुपये 20,000/- अतिरिक्‍त खर्च लागला आहे व अर्जदाराने तो खर्च दिला नाही. तसेच, बिल्‍डींग मटेरीयलचे पैस बाकी आहे. कारण, 15.11.10 रोजी दुसरा स्‍लॅब टाकला त्‍यासाठी बिल्‍डींग मटेरीयल खरेदी केले होते.  रुपये 69,900/- विटाचे व रेतीचे पैसे देणे बाकी आहे.  अर्जदाराने 43 चौ.फुट अतिरिक्‍त काम केले आहे.  तसेच, 2 कॉलम अर्जदाराने सांगीतल्‍याप्रमाणे उभे केले, त्‍यामुळे अतिरिक्‍त खर्च झाला आहे. गै.अ. ने रुपये 5,50,000/- चे काम केलेले आहे.  अर्जदाराने दुसरा स्‍लॅब टाकून झाल्‍यावर, त्‍याला काम दिले नाही. करीता, अर्जदाराने टाकलेली केस खारीज होण्‍यास पाञ आहे.  अर्जदाराची मागणी फेटाळण्‍यात यावी. अर्जदाराने हा अर्ज गै.अ.चे पैसे बुडविण्‍याकरीता केलेला आहे. गै.अ. हा बांधकाम ठेकेदार असून गरीब आहे व बिल्‍डींग मटेरीयलचे बील देणे बाकी आहे.  म्‍हणून, अर्जदाराकडून रुपये 1,25,000/- घेणे आहे.

 

6.          अर्जदाराने, तक्रारीतील कथना पृष्‍ठ्यर्थ नि.17 नुसार शपथपञ, तसेच साक्षदार नागाजी अप्‍पाजी मांडवकर यांचा शपथपथ नि.16, अजीम वहीद खान यांचा शपथपथ नि.18 प्रमाणे दाखल केले आहेत. तसेच, नि.19 नुसार 9 मुळ दस्‍ताऐवज दाखल केलेले आहेत.  गै.अ. यांनी नि.20 नुसार पुरावा शपथपञ दाखल केला. गै.अ. ने आपले तर्फे विठ्ठल रामदास उपरे याचा नि.21 व दशरथ नागोजी पेंदाम नि.24 नुसार शपथपञ दाखल केला.  गै.अ.ने लेखी उत्‍तरासोबत नि.12 नुसार मुळ बिल दाखल केले आहे. अर्जदार तर्फे प्रति‍निधी डॉ.खोब्रागडे व गै.अ.तर्फे सुजाता दुबे यांचा युक्‍तीवाद ऐकण्‍यात आला. 

 

7.          अर्जदार व गै.अ. यांनी दाखल केलेले शपथपञ, दस्‍ताऐवज आणि उभय पक्षाच्‍या वकीलांनी केलेल्‍या युक्‍तीवादावरुन खालील कारणे व निष्‍कर्ष निघतात.   

 

                        @@  कारणे व निष्‍कर्ष @@

 

8.          अर्जदाराने, बाबुपेठ, चंद्रपूर येथील जुने घर पाडून, त्‍याठिकाणी नवीन 1419 चौ.फुट चे बांधकाम करण्‍याचा करार दि.2.7.10 ला पंचासमक्ष गै.अ. यांचेशी करण्‍यात आला.  गै.अ. ने अर्जदाराच्‍या डब्‍बल मजली घराचे बांधकाम रुपये 7,38,000/- मध्‍ये करुन देण्‍याचे ठरले. त्‍याबाबत, लेखी करारनामा करण्‍यात आला.  गै.अ.ने लेखी करारनाम्‍यानुसार डब्‍बल मजली घराचे काही बांधकाम केले याबाबत वाद नाही.  परंतु, गै.अ. यांनी तळ मजल्‍यावरील बांधकाम केल्‍यानंतर वरच्‍या मजल्‍याचे बांधकाम सज्‍जा लेवलपर्यंत केल्‍यानंतर बांधकाम केले नाही व पैसे घेऊनही कराराप्रमाणे बांधकाम पूर्ण न केल्‍यामुळे, अर्जदाराने गै.अ.स दिलेली अतिरिक्‍त रक्‍कम रुपये 1,06,250/- ही 12 % व्‍याजासह देण्‍याकरीता आणि मानसिक, शारीरीक ञासापोटी व तक्रारीच्‍या खर्चापोटी रक्‍कम मिळण्‍याकरीता तक्रार दाखल केलेली आहे.  गै.अ. यांनी बांधकाम पूर्ण करुन दिले नाही आणि जास्‍त रकमेची नोटीस पाठवूनही रक्‍कम दिली नाही, त्‍यामुळे सेवेत न्‍युनता केल्‍याचा मुद्दा उपस्थित केली आहे.    

 

9.                     अर्जदाराने अ-1 वर करारनाम्‍याची प्रत दाखल केले आहे, त्‍याचे अवलोकन केले असता, रुपये 4,25,000/- गै.अ.स दिलेले आहेत, त्‍यावर त्‍याची सही आहे.  अर्जदाराने अ-5 वर ए.एन.खान याचा निरीक्षण अहवाल दाखल केला, त्‍यात गै.अ.यांनी केलेल्‍या बांधकामाचे मुल्‍यमापन करुन रुपये 4,25,000/- चे बांधकाम केल्‍याचे मान्‍य केले आहे.  अर्जदाराने, अतिरिक्‍त दिलेल्‍या रकमेची मागणी गै.अ. कडून केली आहे, तर गै.अ. यांनी दाखल केलेल्‍या लेखी उत्‍तरानुसार अर्जदाराचे घराचे बांधकाम रुपये 5,50,000/- चे केलेले असून फक्‍त फिनिशींगचे काम बाकी आहे. दुसरा स्‍लॅब दि.15.11.10 ला टाकलेला आहे.  गैरअर्जदारासच, अर्जदाराकडून रुपये 1,25,000/- घेणे बाकी आहे.  अर्जदाराच्‍या तक्रारीतील कथन व गै.अ.च्‍या लेखी बयानातील कथनावरुन, एकमेकांनी एकमेकाचे विरुध्‍द दावा-प्रतीदावा (Counter Claim) केलेला आहे.  अर्जदाराने रुपये 1,06,250/- साठी विस्‍तृत वर्णन दिलेला नाही.  तसेच, गै.अ. यांनी रुपये 1,25,000/- अर्जदाराकडून घेणे आहे, याबाबत ठोस पुरावा सादर केलेला नाही. अशास्थितीत, समरी पध्‍दतीने सखोल पुरावा घेतल्‍याशिवाय तक्रार निकाली काढणे शक्‍य नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.  

 

10.         अर्जदाराने तक्रारीत, गै.अ.यांनी बांधकाम करणे बंद केल्‍यामुळे श्री मंगलू सिन्‍हा (दुसरा ठेकेदार) यांचेकडून सज्‍जा लेवलच्‍या नंतर पहिल्‍या माळयाचे बांधकाम व तळ मजला व वरच्‍या मजल्‍याचे प्‍लास्‍टरचे काम, जिना व एक कॉलम भरण्‍याचे काम रुपये 2,40,000/- मध्‍ये केल्‍याचे कथन केले आहे.  तर, गै.अ. यांनी वरच्‍या मजल्‍याचे स्‍लॅब टाकण्‍याचे काम दि.15.11.10 ला केले आहे असे कथन केले आहे.  याबाबत, दशरथ नागोजी पेंदाम याचा शपथपञ नि.24 नुसार दाखल केलेला आहे.  अर्जदार व गै.अ. यांनी एक दुस-याचे विरुध्‍द विसंगत कथन केले असून, अर्जदार यांनी साक्षदाराचे शपथपञ सादर केले.  तसेच, गै.अ. यांनी सुध्‍दा आपल्‍या कथना पृष्‍ठयर्थ साक्षदार शपथपञ सादर केले.  अशापरिस्थितीत, त्‍यांची उलटतपासणी होऊन सत्‍य परिस्थिती येण्‍याकरीता सखोल पुरावा घेणे आवश्‍यक आहे, यामुळे ही तक्रार समरी पध्‍दतीने निकाली काढण्‍यास पाञ नाही, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आले आहे. 

 

11.          अर्जदार यांच्‍या तक्रारीनुसार घराचे बांधकाम 1419 चौ.फुटाचे करण्‍याचे ठरले होते.  परंतु, प्रत्‍यक्षात बांधकाम हे 1463 चौ.फुट करण्‍यात आले.  तसेच, वाढीव दोन कॉलम करारापेक्षा जास्‍त तयार करण्‍यात आले, याबद्दलही तक्रारीत वाद आहे.  अर्जदाराने, आर्कीटेक्‍ट ए.एन.खान याचा शपथपञ व त्‍याबाबतचा रिपोर्ट अ-5 सादर केला. रिपोर्टचे अवलोकन केले असता, वरच्‍या मजल्‍यावरील बांधकाम 1462.87 चौ.फुट झालेले असल्‍याचे नमूद केले आहे.  त्‍याचप्रमाणे, अर्जदार व गै.अ. यांचा बिलाच्‍या बाबतही वाद असल्‍याचे दाखल दस्‍ताऐवजावरुन दिसून येतो.  अर्जदाराने आपले शपथपञात दौलतराव गोवर्धने यांच्‍या विटा, रेतीचे बिल दि.25.10.10 याबाबत वाद उपस्थित केला आहे.  मुळ बिल अर्जदाराकडे असून दुकान मालकाच्‍या सहीचे आहे, तर गै.अ.ने तेच मुळ बिल त्‍याचेकडे असल्‍याचे आपले कथनात म्‍हटले आहे. अशास्थितीत, मनोज गोवर्धन यांचे पुरावे रेकॉर्डवर येणे आवश्‍यक आहे.  तर गै.अ.ने विठ्ठल रामदास उमरे बांधकाम मिस्‍ञी याचा शपथपञ नि.21 नुसार दाखल करुन अतिरिक्‍त काम करुन, रुपये 5,50,000/- चे बांधकाम केल्‍याचे आपले शपथपञात मान्‍य केले आहे.  अशापरिस्थितीत, सदर तक्रार ही समरी पध्‍दतीने निकाली काढण्‍यास पाञ नाही, तर अर्जदाराने योग्‍य त्‍या फोरममधून दाद मागावी, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे.  

 

12.         गै.अ. यांनी आपले लेखी उत्‍तरात मजुरासोबत भांडण केल्‍याचा आरोप केला आहे, तर अर्जदार यांनी असे कुठलाही भांडण केल्‍याचे नाकारले आहे.  अर्जदारांनी दि.25.10.10 चा निरिक्षण अहवाल दाखल केला. त्‍या निरिक्षण अहवालाचे नंतर गैरअर्जदाराने 15.11.10 ला वरच्‍या माळयावरील स्‍लॅब टाकल्‍याचे म्‍हणणे आहे.  याबाबत, अर्जदार व गै.अ. यांनी सिमेंट, लोहा इ. साहित्‍य घेतल्‍याचे बिल सादर केले आहे.  सदर बिल आणि एक दुस-याचे कथनातील सत्‍यता पुढे येण्‍याकरीता सखोल पुरावा घेणे आवश्‍यक आहे.  त्‍यामुळे, अर्जदाराने दिवाणी कोर्टातून किंवा योग्‍य त्‍या मंचातून आपली दाद मागावी.  अर्जदाराने या मंचात व्‍यतीथ केलेला कालावधी भारतीय मुदत कायद्याच्‍या कलम 14 प्रमाणे सुट मिळण्‍यास पाञ आहे, या निष्‍कर्षाप्रत हे न्‍यायमंच आलेले आहे. 

 

            वरील कारणे व निष्‍कर्षावरुन तक्रार निकाली काढून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्‍यात येत आहे.

 

                        // अंतिम आदेश //

(1)   अर्जदाराची तक्रार निकाली.

(2)   अर्जदाराने योग्‍य त्‍या फोरम मधून दाद मागावी.

(3)   अर्जदार मुदत कायद्याच्‍या कलम 14 नुसार मंचात व्‍यतीथ केलेला कालावधी सुट मिळण्‍यास पाञ राहील.

(4)   अर्जदार व गैरअर्जदार यांनी आपआपला खर्च सहन करावा.

(5)   अर्जदार व गैरअर्जदाराना आदेशाची प्रत देण्‍यात यावी.

 


[HONABLE MR. Sadik M. Zaveri] MEMBER[HONORABLE Shri Anil. N.Kamble] PRESIDENT[HONABLE MRS. Adv. Varsha Jamdar] MEMBER