निकालपत्र :- (दि.22.02.2011)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी सदरची नोटीस स्विकारली नसलेमुळे ‘नॉट क्लेम्ड्’ या शे-यानिशी या मंचाकडे परत आलेली आहे. सुनावणीचेवेळेस, उभय पक्षकार गैरहजर, त्यामुळे सदरचे प्रकरण गुणावगुणावर निकाली काढणेत येते. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, सामनेवाला हे बांधकाम व्यावसायिक आहेत व सिध्दार्थ कन्स्ट्रक्शन या नांवाने ताराबाई पार्क, कोल्हापूर येथे ऑफिस असून त्यांचे चालक-मालक, नंदकिशोर दुबल हे होते. सदर नंदकिशोर दुबल हे मयत झालेने त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी श्रीमती निलीमा नं. दुबल यांना संपूर्ण अधिकार व व्यवहार प्राप्त झाला आहे. तक्रारदारांनी सामनेवाला हे विकसित करीत असलेल्या अपार्टमेंटमधील युनिट नं.904, क्षेत्र 25 चौ.मि. रुपये 2,50,000/- खरेदी करणेकरिता दि.09.02.2007 रोजी नोंदणीकृत करार केलेला आहे. सदर युनिटचे बांधकाम पूर्ण करुन ताबा देणेचे सामनेवाला यांनी मान्य केले आहे. तक्रारदारांनी सामनेवाला यांच्या सांगण्यावरुन तर्फे कॉन्ट्रॅक्टर नाना गणपती पोवार व विनायक काका पोवार यांनी दि.25.12.2006 व दि. 22.01.2007 स्वत:चे सहीने रक्कम रुपये 30,000/- घेवून रितसर पावती दिली आहे. परंतु, करारातील अटीनुसार युनिट क्र.904 चा ताबा देणेस टाळाटाळ केली. सामनेवाला यांनी युनिट क्र.904 चा पायाभरणी पर्यन्तचे बांधकाम केले आहे. व तदनंतर बांधकाम आहे त्या परिस्थितीत आहे. याबाबत सामनेवाला यांना वारंवार विनंती केलेली आहे. सबब, सामनेवाला यांनी दि.09.02.2007 रोजीचे करारपत्राप्रमाणे युनिट क्र.904 चा अद्याप ताबा तक्रारदारांना न दिल्याने रुपये 30,000/- व त्यावरील 18 टक्के व्याजाची रक्कम देणेचे आदेश व्हावेत किंवा सामनेवाला यांनी युनिट पूर्ण करुन खरेदीपत्र करुन देणेचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. (3) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत रेशनकार्ड, रुपये 30,000/- भरणा केलेबाबतच्या पावत्या, युनिट 904 बाबतचा करारनामा इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (4) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोनक केले आहे. तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या दि.25.12.2006 रोजीच्या रुपये 10,000/- च्या पावतीचे अवलोकन केले असता सदरची पावती ही केदार बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांनी दिली असल्याचे दिसून येते. प्रस्तुत प्रकरणी दाखल असलेलया करारपत्राचे अवलोकन केले असता सदरचा करार हा दि.09.02.2007 रोजी झालेले आहे व सदर पावतीचा उल्लेख करारात केलेचा दिसून येत नाही. सदरचा करार हा सिध्दार्थ कन्स्ट्रक्शन यांचेबरोबर झालेचा दिसून येतो. तसेच, दि.22.01.2007 रोजी नाना गणपती पोवार यांनी तक्रारदारांनाकडून रुपये 20,000/- स्विकारुन पावती दिल्याचे दिसते. परंतु, प्रस्तुत प्रकरणी दाखल करारात नाना गणपती पोवार हे पक्षकार म्हणून दिसून येत नाहीत. सिध्दार्थ कन्स्ट्रक्शनचे प्रोप्रायटर नंदकिशोर शिवाजीराव दुबल हे मयत झाले आहे. त्यानंतर त्यांची पत्नी, निलीमा नंदकिशोर दुबल या दि.09.02.2007 च्या करारात पक्षकार आहेत. दि.25.02.2006 रोजीची रुपये 10,000/- ची पावती ही सदर कराराचा मोबदला दिसून येत नाही. तसेच, दि.22.01.2007 रोजी नाना पोवार यांनी स्विकृत केलेली रक्कम रुपये 20,000/- च्या पावती संदर्भात सदर नाना पोवार यांना पक्षकार केलेले नाही याचा विचार करता तक्रारीत त्यांनी मागणी केलेप्रमाणे खरेदी करणेकरिता रक्कम मागता येणार नाहीत. तसेच, दि.09.02.2007 रोजीच्या कराराचे अवलोकन केले असता त्यांनी अटींची पालन केलेचे दिसून येत नाही. सबब, तक्रारदारांच्या तक्रारीत कोणतीही गुणवत्ता या मंचास दिसून येत नाही. सबब आदेश. आदेश 1) तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |