आदेश :- (दि.16.12.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज हा ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 27 अन्वये दाखल करणेत आलेला आहे. आजरोजी अर्जदारांच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकणेत आला. अर्जदारांनी श्री शिवाजी सहकारी बँक लि.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर व श्री शिवाजी सहकारी बँक लि., गडहिंग्लज, जि.कोल्हापूर शाखा महालक्ष्मी चेंबर्स, पहिला मजला, कोल्हापूर यांना सामनेवाला म्हणून पक्षकार केले आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 27 मधील तरतुदींचा विचार करता सदरचे कलम हे क्रिमीनल स्वरुपाचे आहे. अर्जदारांनी श्री शिवाजी सहकारी बँक लि.गडहिंग्लज, जि.कोल्हापूर व श्री शिवाजी सहकारी बँक लि., गडहिंग्लज, जि.कोल्हापूर शाखा महालक्ष्मी चेंबर्स, पहिला मजला, कोल्हापूर यांचे अध्यक्ष, सचिव अथवा अन्य कोणी प्रतिनिधी यांना सामनेवाला म्हणून सामील केलेले नाही. समन्स बजावणी ही नांवाने होते. याबाबत अर्जदारांच्या वकिलांना विचारले असता त्यांनी स्पष्टीकरणे दिलेले नाही. तसेच, क्रिमीनल प्रोसिजर कोड कलम 305 व 63 या मंचाचे निदर्शनास आणून दिले आहे. त्यातील तरतुदी विचारात घेतल्या असता समन्स बजावणी ही नांवाने होत असेलेचे दृष्टीकोनातून सामनेवाला बँकेच्या अध्यक्ष, सचिव, व्यवस्थापक अथवा अन्य कोणाही पदाधिका-यांना प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला म्हणून समाविष्ट न केल्याने प्रस्तुत प्रकरणी समन्स काढता येणार नाही. सबब, प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज निकाली काढणेत यावा या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. प्रस्तुतचा अंमलबजावणी अर्ज निकाली काढणेत येतो. 2. प्रस्तुतचा आदेश ओपन कोर्टामध्ये अधिघोषित करणेत आला.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |