Exh.No.24
सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 25/2013
तक्रार दाखल झाल्याचा दि.19/08/2013
तक्रार निकाल झाल्याचा दि. 01/03/2014
- सौ. शैलजा सुभाष मांजरेकर
- वय – 42 वर्षे, धंदा – गृहीणी
- कु.लक्ष्मण सुभाष मांजरेकर
- वय – 19 वर्षे, धंदा – शिक्षण
- तर्फे कुलमुखत्यारी
- श्री सुभाष लक्ष्मण मांजरेकर
- वय 46 वर्षे, धंदा- व्यवसाय,
- रा.वराड- सावरवाड, ता.मालवण,
- जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
- विरुध्द
- 1) सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था मर्या.कट्टा
- करीता अध्यक्ष
- श्री सतिश दिगंबर वंजारी
- वय – 58 वर्षे, धंदा- अध्यक्ष
- रा.वराड- हडपीवाडी, ता.मालवण
- 2) सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था मर्या.कट्टा करीता
श्री केशव महादेव परुळेकर
वय 57 वर्षे, धंदा- उपाध्यक्ष
रा.वराड- शिरकोंड, ता.मालवण
3) सिंधुदुर्ग सहकारी पतसंस्था मर्या.कट्टा करीता
श्री सुरेश बापु धुरी
वय 55 वर्षे, धंदा – सचिव,
रा. नांदोस सारंगवाडी, ता.मालवण ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः- 1) श्रीम. अपर्णा वा. पळसुले. अध्यक्षा
2) श्रीमती सावनी सं .तायशेटे सदस्या
तक्रारदारतर्फे – व्यक्तीशः
विरुद्धपक्षातर्फे - विधिज्ञ श्री आर.के. परुळेकर
निकालपत्र
(दि.01/03/2014)
द्वारा : मा.सदस्या , श्रीम. एस.एस. तायशेटे.
1) सदरहू तक्रार, तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे अल्पबचत खात्यात गुंतवलेली रक्कम परत केली नाही म्हणून सदोष सेवा दिली व सेवेत त्रुटी ठेवली म्हणून दाखल केली आहे.
2) तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीत विरुध्द पक्ष यांचेकडे अल्पबचत ठेव खाते क्र.1243 आणि 134 उघडून त्यामध्ये अनुक्रमे दि.12/07/2012 आणि दि.15/01/2012 पासून दरदिवशी रु.20/- आणि 100/- अशा अनुक्रमे रक्कमा बचत करण्यास सुरुवात केली होती. त्याप्रमाणे एकूण रक्कम रु.32,150/- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केली होती. सदरची दोन्ही खाती त्यांनी पत्नी व मुलगा यांच्या नावाने उघडली होती. त्याबाबतचा तपशील खालीलप्रमाणे.
अ.क्र. | खातेदाराचे नाव | खाते क्रमांक | खाते प्रकार | जमा रक्क्म |
1 | शैलजा सुभाष मांजरेकर | 1243 | अल्पबचत ठेव योजना | 5350/- |
2 | लक्ष्मण सुभाष मांजरेकर | 134 | अल्पबचत ठेव योजना | 26800/- |
ही रक्कम मुदत पूर्ण होऊन देखील विरुध्द पक्ष यांनी परत केलेली नाही. तक्रारदार यांनी दि.23/06/2013 रोजी विरुध्द पक्ष यांचेकडे लेखी अर्ज सादर करुन रक्कमेची मागणी सादर केली, तरी देखील विरुध्द पक्ष यांनी सदरहू रक्कमा अदा केल्या नाहीत म्हणून सदरहू तक्रार मे. मंचात दाखल केली आहे.
3) ेल्या ी 013 विरुध्द पक्ष यांनी नोटीस बजावणीनंतर मे. मंचासमोर हजर होऊन नि.17 येथे विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांनी त्यांचे लेखी म्हणणे सादर केले. तर विरुध्द पक्ष नं.3 यांनी नि.19 येथे पुरसीस दाखल करुन विरुध्द पक्ष नं.1 व 2 यांनी सादर केलेले म्हणणे आपले म्हणणे म्हणून अंगिकारले आहे.
4) विरुध्द पक्ष यांचा बचाव मुख्यतः तक्रारदार यांनी त्यांचे कुलमुखत्यारी मार्फत तक्रार दाखल केली परंतु त्यादिवशी तथाकथित कुलमुखत्यारपत्र मे. मंचात सादर केलेले नाही आणि काही कालावधीनंतर सादर केले. त्यामुळे सदर तक्रार दाखल करतांना कुलमुखत्यारी यांस तक्रार दाखल करण्याचे अधिकारच प्राप्त नव्हते. त्याचप्रमाणे तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे कोणतीही रक्कम गुंतवलेली नाही कारण तक्रारदार नं.1 हया गृहीणी असून तक्रारदार क्र.2 हा 19 वर्षाचा मुलगा असून त्याचा धंदा शिक्षण असून तो अशा प्रकारची बचत ठेव करु शकत नाही. तसेच अशा प्रकारचा बचाव मुख्यतः उभारला आहे आणि त्यामूळे तक्रार फेटाळून तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांस रक्कम रु.10,000/- दिवाणी व्यवहार संहिता कलम 35 अ अन्वये नुकसान भरपाई म्हणून देणेबाबत आदेश व्हावा अशा प्रकारची विनंती केली आहे.
5) तक्रारदार यांनी त्यांचे तक्रारीचे अनुषंगाने नि.3 सोबत अ.क्र. 1 ला विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस अदा केलेले खाते क्र.1243 चे अल्पबचत ठेव योजना पुस्तक अ.क्र.2 ला खाते क्र.134 चे अल्पबचत ठेव पुस्तक अ.क्र.3 ला तक्रारदार क्र.1 ने विरुध्द पक्ष यांचेकडे सादर केलेला मागणी अर्ज अ.क्र.4 ला तक्रारदार क्र.2 ने विरुध्द पक्ष यांचेकडे सादर केलेला मागणी अर्ज इत्यादी कागदपत्रे हजर केली आहेत. त्यासोबत एक कुलमुखत्यारपत्र दि.17/08/2013 रोजीचे सादर केले आहे. परंतु ते प्राधिकृत अधिका-यासमोर पूर्ण केलेले दिसत नाही. तसेच ते केव्हा हजर केले ? याबाबत देखील नि.3 चे फेरिस्तामध्ये नोंद नाही. मात्र त्यानंतर तक्रारदार यांनी नि.18 येथे लेखी युक्तीवाद सादर करताना नि.20 चे फेरीस्तासोबत दि.26/12/2013 रोजी कुलमुखत्यारपत्र हजर केले आहे. मात्र विरुध्द पक्ष यांने त्याचेतर्फे म्हणण्याच्या पुष्टयर्थ कोणतीही कागदपत्र सादर केली नाहीत परंतु नि.23 येथे लेखी युक्तीवाद सादर केला आहे.
6) एकंदर तक्रारीचे स्वरुप दोन्ही बाजूंचा युक्तीवाद आणि मे. मंचासमोर दाखल झालेली कागदपत्रे आणि पुरावा यांचे अवलोकन केल्यानंतर न्यायनिर्णयासाठी खालीलप्रमाणे मुद्दे मे. मंचासमोर उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दे | निष्कर्ष |
1 | तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेखाली येतात का ? | होय |
2 | तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेकडून त्यांची रक्कम परत मागणी करण्यास हक्कदार आहेत काय ? | होय |
3 | तक्रारदार यांस विरुध्द पक्ष यांनी सदोष सेवा दिल्याचे सिध्द केले आहे काय ? | होय |
4 | काय आदेश ? | अंतीम आदेशानुसार. मंजूर |
7) मुद्दा क्रमांक 1 - तक्रारदार हे ग्राहक या संज्ञेखाली येतात का ?
स्पष्टीकरण – मे. मंचासमोर आलेला पुरावा अभ्यासता आणि तक्रारदार यांनी नि.3 सोबत सादर केलेली अ.क्र.1 व 2 ची अल्पबचत ठेव योजना बचत खाते पुस्तिका पडताळता त्यामध्ये तक्रारदार यांनी अनुक्रमे 5350/- आणि 26800/- अशा रक्कमा विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केल्याबाबत नोंदी दिसून येत आहेत. सदरच्या खाते पुस्तकांवर सचिव यांची सही आणि विरुध्द पक्ष सहकारी पतसंस्था यांचा शिक्का दिसू येत आहे. म्हणजेच तक्रारदार यांचेकडून विरुध्द पक्ष यांनी रक्कमा स्वीकारल्याचे दिसून येते. ही बाब विरुध्द पक्षानी नाकारलेली नाही. सबब सदरची स्वीकारलेली रक्कम परत करणे हे विरुध्द पक्ष यांचे कर्तव्य आहे. सबब, हे मंच तक्रारदार हे ‘ग्राहक’ या संज्ञेखाली समाविष्ट होतात या निर्णयाप्रत आलेले आहे.
मूळ तक्रारदार यांनी त्यांची तक्रार सुभाष लक्ष्मण मांजरेकर यांचे मार्फत दाखल केलेली आहे. तसे कुलमुखत्यारपत्र नि.20 सोबत हजर केलेले आहे. त्यातील मजकूरावरुन सुभाष लक्ष्मण मांजरेकर हे तक्रारदार क्र.1 चे पती तर तक्रारदार क्र.2 चे वडील असल्याचे दिसून येत आहे. तसेच सदर रकमा त्यांनीच भरल्या आहेत. सबब ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 2 ‘म’ (ii) प्रमाणे व्यक्ती या संज्ञेत येतात सबब तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचे ग्राहक आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे. सबब क्र.1 च्या मुद्दयाचे उत्तर होकारार्थी देण्यात येत आहे.
8) मुद्दा क्रमांक 2 व 3 हे एकमेकांशी संलग्न असल्याने त्यांचे स्पष्टीकरण एकत्रित दिले आहे.
या मे. मंचासमोर आलेला पुरावा पाहता तक्रारदार यांनी दि.12/07/2012 रोजी खाते क्र.1243 सुरु केले होते आणि त्यामध्ये नि.3/1 चे खाते पुस्तकामध्ये रु.5350/- जमा असल्याचे दिसून येते तर नि.3/2 चे खाते क्र.134 चे खाते पुस्तकात रक्कम रु.26800/- जमा असल्याचे दिसून येते. सबब ही दोन्ही मिळून रक्कम रु.32,150/- तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष यांचेकडे जमा केलेबाबत शाबीत केले आहे. विरुध्द पक्ष यांचे म्हणण्यानुसार सदरची रक्कम त्यांचेकडे तक्रारदारनी जमा केली नाही अथवा तक्रारदार क्र.2 हा शालेय विद्यार्थी असल्याने त्याचेकडे रक्कम येऊ शकत नाही, हे विरुध्द पक्षाचे म्हणणे विश्वासार्ह नाही. कारण विरुध्द पक्षाचेच सही शिक्का असलेले खाते पुस्तकात सदरच्या रक्कमा जमा असल्याचे स्पष्ट नोंदी आहेत. तसेच कुलमुखत्यारी सुभाष लक्ष्मण मांजरेकर हे तक्रारदार क्र.2 चे वडील असल्याने त्यांनी आपल्या मुलास आर्थिक मदतीच्या दृष्टीने सदरहू दिली असल्याचे तर्कसंगत वाटते. तसेच पत्नी देखील कमावती आहे असा पुरावा या मंचासमोर नाही. सबब तक्रादारांनी पती या नात्याने पत्नीच्या नावे रक्कम गुंतवली आहे हे तर्कसंगत आहे. त्याचप्रमाणे नि.3/3 व 3/4 येथे तक्रारदार याने विरुध्द पक्ष यांचेकडे दि.23/06/2013 रोजी रक्कम मागणी करण्याबाबतचा अर्ज सादर केल्याचे दिसून येते. सदरचे दोन्ही अर्ज विरुध्द पक्ष यांनी पोहोचल्याबाबत त्यांचा सही शिक्का आहे व त्यांस कोणतेही उत्तर विरुध्द पक्ष यांनी दिलेले नाही. तर केवळ आपल्याकडे तक्रारदारने मागणी अर्ज सादर केले नाहीत असा युक्तीवाद उभारला आहे. तो विश्वासार्ह नाही. सदरच्या दोन्ही खाते पुस्तकांवर अनुक्रमे 12/07/2013 आणि 15/01/2013 या रक्कम परत मिळण्याच्या तारखा नमूद केलेल्या आहेत. त्या तारखानंतर विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना रक्कम का अदा केली नाही याचे कोणतेही स्पष्टीकरण विरुध्द पक्ष यांनी त्यांचे म्हणण्यात अथवा युक्तीवादात सादर केलेले नाही. यावरुन तक्रारदारास विरुध्द पक्ष हे देणे लागतात आणि विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस देण्यात येणा-या सेवेत त्रुटी ठेवल्याचे व सदोष सेवा दिल्याचे दिसून येते म्हणून मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर हे मंच होकारार्थी देत आहोत.
9) मुद्दा क्रमांक 4 – अंतिम आदेश -
विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांचे कुलमुखत्यारपत्राबाबत ‘प्रश्न’ उपस्थित केला आहे आणि तक्रार दाखल करणेची दिवशी कुलमुखत्यारपत्र तक्रारदार यांनी हजर केले नव्हते अशी बाब उभारली आहे. परंतु ही बाब तांत्रिक असून मुळ तक्रारदार यांनी या मे. मंचात हजर होऊन कुलमुखत्यारपत्र खोटे, चुकीचे खोडसाळ असल्याबाबत बाब उभारली नाही आणि विरुध्द पक्ष यांचेकडे जमा असलेली रक्कम मुळ तक्रारदार यांस मिळणारी आहे. तसेच नि.20 सोबत तक्रारदार यांनी कार्यकारी दंडाधिकारी, मालवण यांचे समक्ष पूर्ण केलेले कुलमुखत्यारपत्र हजर केले आहे. त्यास भारतीय पुरावा कायदा कलम 85 प्रमाणे गृहीतक लागू होणार आहे. परंतू विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांस त्यांची रक्कम मागणी करुनही परत केली नाही. यामुळे तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेकडे असलेली नमूद रक्क्म रु.32150/- त्यावर ही तक्रार दाखल तारखेपासून पूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत 9% व्याज तसेच तक्रारदार यांना झालेल्या मानसिक, आर्थिक, शारीरिक त्रासापोटी नुकसानी रक्कम रु.3,000/- आणि तक्रारीचे खर्चापोटी रक्कम रु.1,000/- मिळणेस पात्र आहेत, या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे.
10) वरील स्पष्टीकरणावरुन तक्रारदारचा तक्रार अर्ज मंजूर करण्यात येत असून हे मे. मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.दरच्या र्ह ी
आदेश
1) तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार क्र.1 यांस रक्कम रु.5350/- आणि तक्रारदार क्र.2 यांस रक्कम रु.26,800/- अदा करावेत. सदर रक्कमेवर ही तक्रार दाखल तारखेपासून दि.05/08/2013 रोजीपासून संपूर्ण रक्कम वसूल होईपर्यंत द.सा.द.शे. 9% व्याज अदा करावे.
3) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी उभय पक्षकारांस आर्थिक, मानसिक व शारीरिक त्रासापोटी रु.3,000/- दयावी.
4) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी उभय पक्षकारांस रक्कम रु.1,000/- या तक्रारीचे खर्चापोटी दयावेत.
5) विरुध्द पक्ष क्र.1 ते 3 यांनी सदरची पूर्ण रक्कम या आदेशाच्या तारखेपासून 60 दिवसांत उभय तक्रारदारास अदा करावी.
6) सदर आदेशाची विरुध्द पक्ष यांनी पुर्तता न केल्यास तक्रारदार हे विरुध्द पक्ष यांचेविरुध्द ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 25 व 27 मधील तरतुदीनुसार दाद मागू शकतील.
7) या निकालाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य देण्यात याव्यात.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 01/03/2014
सही/- सही/-
(सावनी सं. तायशेटे) (अपर्णा वा. पळसुले)
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि.
प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि.