सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग यांचेसमोर.
दरखास्त क्रमांक - 01/2012
1) श्री गजानन गोविंद गावडे
वय सु.33वर्षे, धंदा- नोकरी,
2) सौ.भाग्यश्री गजानन गावडे
वय सु.34 वर्षे, धंदा- घरकाम,
दोन्ही रा. चौकुळ, तालुका - सावंतवाडी,
जिल्हा सिंधुदुर्ग. तूर्त राहणार खासकीलवाडा,
सावंतवाडी, तालुका – सावंतवाडी,
जिल्हा – सिंधुदुर्ग तर्फे कुलअखत्यारी
श्री सुभाष कुडाजी सावंत
वय सु.55 वर्षे, धंदा- सेवानिवृत्त,
रा.कलंबिस्त, ता.सावंतवाडी,
जि.सिंधुदुर्ग ... तक्रारदार
विरुध्द
श्री संतोष सदानंद कासार
वय सु.31 वर्षे, धंदा – बांधकाम ठेकेदार,
रा.माजगाव, कासारवाडी,
ता. सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग. ... विरुध्द पक्ष.
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या.
3) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या
तक्रारदारातर्फे - विधिज्ञ श्री ए.बी. कविटकर.
विरुद्ध पक्ष - व्यक्तीशः
- आदेश –
(26/02/2013)
1) मूळ तक्रार क्रमांक 17/2011 मधील पारीत निकालपत्राची विरुध्द पक्षाने अंमलबजावणी न केल्यामुळे ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 27 अंतर्गत सदरचे दरखास्त प्रकरण दाखल करण्यात आले आहे.
2) सदर दरखास्तीचे नोटीस विरुध्द पक्ष यांना बजावण्यात आले. दरम्यान सामनेवाला आरोपी यांनी उपरोक्त आदेशाप्रमाणे सर्व रक्कम फिर्यादीस अदा केली असल्याची पुरसीस नि.17 वर तक्रारदाराने दाखल केली असून सामनेवाला आरोपी यांचेविरुध्द कोणतीही तक्रार उरली नसल्याचे कथन केले आहे. दरम्यान जिल्हा मंचाची बैठक न झाल्याने सदरचे प्रकरण आज आदेशासाठी ठेवण्यात आले. त्यामुळे सदरचे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
- आदेश -
1) तक्रारदार यांनी नि.17 वर दाखल केलेल्या पुरसिसनुसार सदरचे दरखास्त प्रकरण निकाली काढण्यात येते.
2) आरोपीचे बेलबॉंड रद्द करण्यात येतात.
2) खर्चाबद्दल काही हुकूम नाही.
ठिकाणः सिंधुदुर्गनगरी
दिनांकः 26/02/2013
Sd/- sd/- sd/-
(उल्का गावकर) (डी.डी. मडके) ( वफा खान)
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, तथा न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग, सिंधुदुर्ग