ग्राहक तक्रार क्रमांकः-562/2008 तक्रार दाखल दिनांकः-15/12/2008 निकाल तारीखः-17/04/2010 कालावधीः-01वर्ष04महिने2दिवस समक्ष जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे श्री.संतोष गुरुपदा साहा रा-रुम नं.8,मदरसा मोहमदिया चाळ, इस्लामपुरा,कुरार गांव,मालाड(पू), मुंबई. 400 097 ...तक्रारकर्ता विरुध्द 1)श्री.संतोष प्रेमनाथ सिंग रुम नं.1,शांती निवास,दुसरा मजला, अलकापुरी रोड,अचोलेगांव, नालासोपारा(पू)ता.वसई जि.ठाणे. ...वि.प.1 2)श्री.शंभु अधिकारी, शॉप नं.2,न्यु भारत कॉलनी, डॉन लेन,बबुल पाडा,नालासोपारा(पू) ता.वसई जि.ठाणे ... वि.प.2
उपस्थितीः-तक्रारकर्त्यातर्फे वकीलः-श्री.एस.पी.पांडेय विरुध्दपक्षातर्फे वकीलः-श्री.ओ.पी.प्रजापती गणपूर्तीः- 1.सौ.शशिकला श.पाटील, मा.अध्यक्षा 2.सौ.भावना पिसाळ, सदस्या 3.श्री.पां.ना.शिरसाट, मा.सदस्य -निकालपत्र - (पारित दिनांक-17/04/2010) सौ.भावना पिसाळ, सदस्या यांचेद्वारे आदेशः- सदरहू तक्रार श्री.संतोष साहा यांनी श्री.संतोष परमनाथ सिंग व इतर यांचे विरुध्द दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी विरुध्दपक्षकार यांचेकडून एक दुकान करारनामा करुन खरेदी केले होते. परंतु विरुध्दपक्षकार यांनी सदर दुकानाचा ताबा तक्रारदार यांना न देता 2/- दुस-यांना विकले. म्हणून त्या दुकानाचे खरेदीपोटी भरलेली रक्कम तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकाराकडून परत मागितलेली आहे. विरुध्दपक्षकार हे पेशाने बिल्डर व डेव्हलपर आहेत. तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचेबरोबर नोंदणीकृत करारनामा दि.07/03/2005 रोजी करुन दुकान नं.5 तळमजला, सुरज चाळ, शंकरनगर,नालासोपारा,वसई येथे त्यांची ठरलेली किंमत रु.1,80,000/- भरुन खरेदी केली. सदर दुकानाचे बांधकाम झाले तरी विरुध्दपक्षकार यांनी करारनाम्याप्रमाणे तक्रारदार यांस दुकानाचा ताबा दिला नाही. तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार विरुध्दपक्षकार यांनी सदर दुकानाचा तक्रारदाराबरोबर नोंदणीकृत करारनामा केला असूनही तिस-या व्यक्तीस ते दुकान विकले व तक्रारदार यांस त्यांनी दुकानाच्या खरेदी पोटी भरलेल्या रु.1,80,000/- रकमेचे 6 चेकस् दिले जे प्रत्यक्षात वटलेच नाही. त्यांच्यावर त्याबद्दल कोर्टात दावा दाखल केल्यावर त्यातील रु.1,20,000/- तक्रारदार यांस विरुध्दपक्षकार यांनी दिले व आता उरलेली रक्कम रु.60,000/- तक्रारदार यांनी करारनाम्याप्रमाणे सदर दुकानाचा ताबा देऊ शकले नसल्याने व्याजासकट परत मागितली आहेत. विरुध्दपक्षकार 1यांनी त्यांची लेखी कैफियत दि.30/03/2009 रोजी नि.10वर दाखल केली आहे. यामध्ये विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदाराबरोबर दि.07/03/2005 रोजी झालेल्या करारनाम्याप्रमाणे तक्रारदारकडून किंमत रु.1,80,000/- मिळाल्याचे कबूल केले आहे. व तक्रारदार यांस सदर दिलेले 6 धनादेश हे सिक्युरिटी म्हणून दिले होते. तसेच तक्रारदार यांनी तक्रारीत मागणी केलेले रु.60,000/- अगोदरच आरपीआय च्या प्रेसिडेंटसमोर दिले होते. त्यामुळे आता काही देणे बाकी राहीलेले नाही असे विरुध्दपक्षकार यांचे म्हणणे आहे. सदर तक्रार फक्त पैसे वसुल करण्यासाठी केली आहे. त्यामुळे ही तक्रार स्पेसीफिक परफॉर्मन्सखाली दाखल करता येईल व या मंचास आता ही तक्रार चालवण्याचा अधिकार राहीलेला नाही. उभय पक्षकारांची शपथपत्रे,पुरावा कागदपत्रे,लेखी कैफियत व लेखी युक्तीवाद मंचाने पडताळून पाहीले व मंचापुढे पुढील एकमेव प्रश्न उदभवतो. विरुध्दपक्षकार यांच्या सेवेत त्रुटी व कमतरता आढळते का.? या प्रश्नाचे उत्तर हे मंच होकारार्थी देत असून पुढील कारण मिमांसा देत आहे. 3/- कारण मिमांसा तक्रारदार यांनी विरुध्दपक्षकार यांचे बरोबर नोंदणीकृत करारनामा (ठाणे)येथे करुन दुकान नं.5 त्यांची ठरवलेली किंमत रु.1,80,000/- भरुन विकत घेतली. परंतु 2006 पर्यंत सदर दुकानाचा ताबा संपुर्ण किंमत मिळूनसुध्दा विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस देण्यास दिरंगाई दाखवली आहे. तसेच तक्रारदार यांस सदर रकमेचे धनादेश विरुध्दपक्षकार यांनी दिले. परंतु ते वटलेच नाहीत. तसेच सदर धनादेश सिक्युरिटी म्हणून दिले असे विरुध्दपक्षकार यांचे म्हणणे तक्रारदार यांना कबूल नाही. कारण त्याबद्दलचा कोणताही पुरावा दाखल नाही. तसेच करारनाम्याप्रमाणे सदर दुकानाचा ताबा वेळेवर दिला नाही. म्हणून वाद निर्माण झाला असे तक्रारदार यांचे प्रतिउत्तरात म्हणणे दाखल आहे. विरुध्दपक्षकार हे त्यांच्या सेवेत ताबा देण्याची जबाबदारी पुर्ण करु शकले नाहीत. म्हणून त्यांनी घेतलेली रक्कम तक्रारदार यांस परत करण्याची त्यांनी तयारी दाखवली व त्याप्रमाणे रु.1,20,000/- एवढी रक्कम तक्रारदार यांस परत केली. परंतु उरलेली रु.60,000/- रक्कम विरुध्दपक्षकार यांच्या म्हणण्यानुसार जरी आरपीआय प्रमुखासमोर परत केली असे विरुध्दपक्षकार म्हणत असले तरी तदसंबंधी ठोस पुरावा मंचापुढे सादर केलेला नाही. त्यामुळे तक्रारदार यांनी भरलेली पुर्ण रक्कम विरुध्दपक्षकार यांचेकडून मिळण्यास ते पात्र आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणुन हे मंच पुढील अंतिम आदेश देत आहे. -आदेश - 1)तक्रार क्रमांक 562/2008 ही अंशतः मंजूर करण्यात येत आहे.या तक्रारीचा खर्च रुपये 1,000/-(रु.एक हजार फक्त) विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदारास द्यावा व स्वतःचा खर्च स्वतः सोसावा. 2)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस दुकान नं.5 खरेदी करण्यापोटी स्विकारलेल्या एकुण रकमेपैकी राहीलेली रक्कम रु.60,000/-(रु.साठ हजार फक्त) तक्रार दाखल तारखेपासून 7टक्के व्याजाने परत करावेत. या आदेशाचे पालन या आदेशाची प्रत मिळाल्यापासून 2महिन्याच्या आत करावे. अन्यथा वरील रकमेवर 3टक्के जादा दंडात्मक व्याज संपुर्ण रक्कम फिटेपावेतो द्यावे लागेल.. 3)विरुध्दपक्षकार यांनी तक्रारदार यांस मानसिक त्रासाचे 4/- रु.5,000/-(रु.पाच हजार फक्त) द्यावेत. 4)सदर आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी. दिनांकः-17/04/2010 ठिकाणः-ठाणे
(श्री.पां.ना.शिरसाट) (सौ.भावना पिसाळ) (सौ.शशिकला श.पाटील) सदस्य सदस्या अध्यक्षा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, ठाणे
|