सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग
तक्रार क्र. 08/2009 (रिमांड केस)
1) सौ. विणा जगन्नाथ खोरजुवेकर
वय वर्षे 45, धंदा गृहीणी,
2) श्री. प्रथमेश जगन्नाथ खोरजुवेकर
वय वर्षे 20, धंदा शिक्षण,
तक्रारदार नं 1 व 2 तर्फे कुलमुखत्यारी
श्री. दत्तप्रसाद मनोहर महाजन
वय वर्षे 38 धंदा व्यापार,
तिघेही रा. बांदा, ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग. .. तक्रारदार
विरुद्ध
1) श्री. सहदेव सुकाजी सातार्डेकर
वय सज्ञान, धंदा चेअरमन,
2) श्री. हनुमंत शंकर आळवे
वय सज्ञान, धंदा व्हाइस चेअरमन,
3) श्री. शंकर रघुनाथ महाजन
वय सज्ञान, धंदा संचालक,
4) श्री. सुदन राधाकृष्ण केसरकर,
वय सज्ञान, धंदा संचालक,
5) श्री. सतीश अनंत येडवे,
वय सज्ञान, धंदा संचालक,
6) श्री. आनंद विष्णू गवस,
वय सज्ञान, धंदा संचालक, .. विरुद्ध पक्ष
7) श्री. राजन भिमसेन पेडणेकर
वय सज्ञान, धंदा संचालक,
8) श्री. दशरथ अर्जुन परब,
वय सज्ञान, धंदा सरव्यवस्थापक,
9) सौ. रश्मी रमेश सामंत,
वय सज्ञान, धंदा सहायक व्यवस्थापिका,
वरील अनु. 1 ते 9 सर्व रा.
बांदानगर अर्बन क्रेडिट को.
ऑप. सो. लि. बांदा, ता. सावंतवाडी,
जि. सिंधुदुर्ग. .. विरुद्ध पक्ष
गणपूर्तीः-
1) श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष
2) श्रीमती वफा जमशीद खान सदस्या
3) श्रीमती उल्का (पावसकर) गावकर, सदस्या.
- निकालपत्र -
श्री. डी.डी. मडके, अध्यक्ष ः- सदर प्रकरणी जिल्हा मंचाने दि.25/03/2009 रोजी निकाल दिलेला असून तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात आलेली आहे. सदर आदेशाविरुध्द विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेले अपिल क्र.A/10/42 मे.राज्य आयोगाने निकाली काढलेले असून जिल्हा मंचाचा निकाल रद्दबातल केलेला आहे. तसेच तक्रारदार यांना मूळ तक्रारीत बांदानगर अर्बन क्रेडिट को.ऑप.सोसायटी लि. बांदा यांना पक्षकार म्हणून समाविष्ट करण्याबाबत आदेशीत करण्यात आलेले असून सदरची दुरुस्ती तक्रारदाराने केल्यावर उभय पक्षकारांना नोटीस काढण्याबाबत सूचित करण्यात आलेले होते.
2) दरम्यान तक्रारदारतर्फे कुलअखत्यारी यांनी प्रस्तुत मंचासमोर दि.09/04/2013 रोजी अर्ज सादर केलेला असून सहकार न्यायालय, कोल्हापूर येथे दावा दाखल करावयाचा असल्याने प्रस्तुत प्रकरण निकाली काढणेबाबत विनंती केलेली आहे. सदर अर्जास अनुलक्षून आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहेात.
- आदेश -
1) तक्रारदाराची तक्रार त्याला पुढे चालवायची नसल्यामुळे निकाली काढण्यात येते.
2) खर्चाबद्दल कोणताही आदेश नाही.
ठिकाण- सिंधुदुर्गनगरी.
दिनांक –30/04/2013
Sd /- Sd /- Sd /-
(वफा खान) (डी. डी. मडके) (उल्का अंकुश पावसकर (गावकर),
सदस्या, अध्यक्ष, सदस्या,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग