सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग वसुली प्रकरण क्र.11/2010 तक्रार दाखल झाल्याचा दि. 29/04/2010 तक्रार निकाल झाल्याचा दि.14/06/2010 श्री अनिल यशवंत दाभोलकर वय 42 वर्षे, धंदा – व्यापार राहणार – सिंधुसागर बिल्डिंग, आचरा रोड, कणकवली, ता.कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग. ... तक्रारदार विरुध्द श्री रविकांत सुर्याजी रासम वय 50 वर्षे, धंदा – नोकरी, राहणार – मु.पो.हरकुळ खुर्द ता.कणकवली, जि. सिंधुदुर्ग ... विरुध्द पक्ष. गणपूर्तीः- 1) श्री. महेन्द्र म. गोस्वामी, अध्यक्ष 2) श्रीमती उल्का राजेश गावकर, सदस्या 3) श्रीमती वफा जमशीद खान, सदस्या. तक्रारदारातर्फेः- विधिज्ञ श्री ए.पी. बर्वे विरुद्धपक्षातर्फे- व्यक्तीशः - आ दे श नि. 1 वर - (दि.14/06/2010) 1) मंचाने मुळ तक्रार क्रमांक 28/2009 मध्ये पारीत केलेल्या आदेशानुसार रु.4,000/- आपणांस वसूल होऊन मिळावेत, यासाठी सदरचे दरखास्त ग्राहक संरक्षण कायदयाच्या कलम 25 अंतर्गत दाखल करण्यात आले आहे. 2) सदर दरखास्तीचे नोटीस गैरअर्जदार रविकांत सुर्याजी रासम यांना बजावण्यात आले. त्यानुसार गैर अर्जदार मंचासमोर हजर होऊन त्यांनी मंचाने पारीत केलेल्या निकालपत्रातील आदेशाची पूर्णतः अंमलबजावणी करुन रु.4,000/- चा धनाकर्ष नि.5 वरील अर्जासोबत प्रकरणात जमा केला व प्रकरण निकाली काढण्याची विनंती केली. त्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही खालील आदेश पारीत करीत आहोत. - आ दे श – 1) मंचाने पारीत केलेल्या तक्रार क्रमांक 28/2009 मधील आदेशाची पूर्तता गैरअर्जदार (मुळ तक्रारदार) यांनी केली असल्यामुळे सदरचे प्रकरण निकाली काढण्यात येते. 2) गैरअर्जदाराने अर्जदारांच्या नावाने जमा केलेला रु.4,000/- (रुपये चार हजार मात्र) चा धनाकर्ष अर्जदारास देण्यात यावा. 3) खर्चाबद्दल काही हुकूम नाही. ठिकाणः सिंधुदुर्गनगरी दिनांकः 14/06/2010 (उल्का गावकर) (महेन्द्र म.गोस्वामी) ( वफा खान) सदस्या, अध्यक्ष, सदस्या, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सिंधुदुर्ग प्रत तक्रारदार यांना हातपोहोच/रजि पोस्टाने रवाना दि. प्रत विरुद्ध पक्ष यांना हातपोहोच/रजि. पोस्टाने रवाना दि. Ars/-
| Smt. Ulka Gaokar, Member | Mr.Mahendra Goswami., PRESIDENT | HONABLE MRS. smt vafa khan, MEMBER | |